* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE CRY OF THE KINGFISHER
  • Availability : Available
  • Translators : SHYAMAL CHITALE
  • ISBN : 9789353171896
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Discount : RAJBHASHA DIVAS(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SET MAINLY IN THE VERDANT, SUNSHINY LAND OF GOA, THE CRY OF THE KINGFISHER IS A WARM AND INSPIRING TALE OF HOPE AND COURAGE. IT DEALS WITH THE INNER AND OUTER FORCES IN LIFE THAT BREAK, AND MAKE, THREE DIFFERENT WOMEN. MAYOLA S SHELTERED, DUTY BOUND LIFE IS RIPPED APART WHEN HER GORGEOUS, TEMPESTUOUS OLDER SISTER, ZARELLA, IN WHOSE SHADOW SHE HAS GROWN, IS MYSTERIOUSLY FOUND DROWNED. ALL HER TRAINING IN MEDICINE AND PSYCHIATRY CANNOT HELP HER AS SHE GRAPPLES WITH THE SUDDEN EMPTINESS OF HER LIFE. ANGRY DESPAIR SPURS HER ON A QUEST FOR MEANING WHICH BRINGS HER IN CONTACT WITH DONNA AND SUCCORINA. SUCCORINA IS A VILLAGE GIRL, BORN TO SUPERSTITION, IGNORANCE AND THE DISASTER OF BEING THE FOURTH DAUGHTER INSTEAD OF THE LONG AWAITED SON. HER ATTEMPTS TO BREAK OUT OF HER POVERTY-STRICKEN EXISTENCE TAKE HER AS A HOUSEMAID TO KUWAIT, THROUGH A DISTRESSING ABORTION AND A FAILED MARRIAGE. NO LONGER ABLE TO DEAL WITH THE CRUEL TWISTS AND TURNS HER LIFE HAS TAKEN, HER MIND BEGINS TO CRACK. DONNA IS THE PROVERBIAL POOR LITTLE RICH GIRL , BROUGHT UP IN ENGLAND, SHOWERED WITH EVERYTHING EXCEPT LOVE. SHE TURNS PUNK, SINKING DEEPER INTO CHAOS AND BEWILDERMENT AS HER HOPES OF FINDING LOVE AND ACCEPTANCE START CRUMBLING UNDER AN EXPLOSION OF FEARS THAT THREATEN HER VERY EXISTENCE. YET, WHEN MAYOLA S PATH INTERSECTS WITH THESE TWO KINDRED SOULS, THEY EMBARK ON A JOURNEY OF SELF-REALISATION, UNRAVELING THE PAINFULLY TANGLED STRANDS OF FEARS AND DREAMS WAITING TO BE REALIZED. SHE WATCHES IN ADMIRING DELIGHT AS THEY BRAVELY SET OUT TO UPROOT THE MALEDICTION AND HOPE GUSHES OUT.
‘धीवराची आर्त साद’ची कथा तीन कुटुंबांतील तीन मुलींभोवती फिरते. सुक्कोरिना, डॉना आणि मायोला. सुक्कोरिना गरीब, डॉना श्रीमंत आणि मायोला मध्यमवर्गीय कुटुंबातलीR. सुक्कोरिना आणि डॉनाला आई-वडिलांकडून प्रेम मिळालेलं नाही. मायोलाला ते मिळालंय, पण तिची मोठी बहीण झरेला हिच्या स्वैर वर्तनाला अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरलेले आई-वडील आणि झरेलाने केलेली आत्महत्या यामुळे समुपदेशक असलेली मायोला अस्वस्थ आहे. सुक्कोरिनाचा विवाहित पुरुषाकडून झालेला कौमार्यभंग आणि तिने केलेला गर्भपात, याचं तिच्या वैवाहिक जीवनावर पडलेलं सावट, त्यामुळे ढळेलेलं मानसिक संतुलन, प्रेमाच्या शोधात वणवण फिरणाऱ्या डॉनाचं अयशस्वी ठरलेले दोन विवाह, त्यामुळे तीव्र निराशेने (डिप्रेशन) ग्रासलेलं मन. सुक्कोरिना, डॉना आणि मायोलाचं नाट्यमयरीत्या एकत्र येणं...तिघींच्या जीवनाचा हा प्रवास अनुभवण्याजोगा आणि मन:स्पर्शी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#THE CRY OF THE KINGFISHER#BELINDA VIEGAS, SHYAMAL CHITALE# #बेलिंडा व्हिएगस#श्यामल चितळे#धीवराची आर्त साद#
Customer Reviews
  • Rating StarLOKSATTA 2-6-2019

    अनेकपात्री गुंताड्याची आशावादी कथा शीर्षकाबद्दल उत्सुकता वाढवणारी ही अनुवादित कादंबरी. धीवर हा गोव्यात दिसणारा एक निळ्या रंगाचा पक्षी या पक्ष्याबद्दलची एक रूपककथा कादंबरीतली एक आजी सांगते... खूप वर्षांपूर्वी या भूमीवर एक शूर राजा राज्य करत असतो.त्याची राणी जुळ्या मुलांना जन्म देते. त्यापैकी पहिल्यांदा जन्मलेल्या निळ्या रंगाच्या शरीराच्या मुलाला बघून राणी कींचाळून म्हणते, `हे मूल माझं नाही, त्याला नाहीसं करा.’ दुसरं गोरं मूल मात्र ती प्रेमाने जवळ घेते. पहिल्या निळ्या मुलाला नाहिसं करण्याचं काम दाईच्या हातून होत नाही. त्याऐवजी ती स्वत: त्याला सांभाळते. तो मोठा झाल्यावर राजवाड्यातला स्वयंपाकी बनतो; मात्र कुणालाही हे कळत नाही, की तो थोरला राजपुत्र आहे. पुष्कळ वर्षं जातात. राजा-राणी मृत्यू पावतात निळ्या मुलाला सांभाळणारी दाईसुद्धा हयात नसते. गोरा राजपुत्र राजा बनतो. एकेवर्षी दुष्काळ पडतो., पिकं जळून जातात. यावर उपाय सांगण्यासाठी राजा एका ज्ञानी ऋषिंना बोलावतो., पाऊस न पडण्याचं कारण विचारतो. ऋषी ध्यान करून सांगतात, `थोरल्या राजपुत्राला राज्यपद न मिळाल्यामुळे हे अघटीत घडतंय. तो निळ्या रंगाचा असून तुमच्याच घरात काम करतोय.` राजाच्या आज्ञेवरून त्याला बोलावलं जातं. हातात साफ करत असलेला मासा घेऊन तो बिचारा घाबरून तसाच हजर होतो. एक खुद्द राजा आणि दुसरा कळकट कपड्यांतला स्वयंपाकी. तरीही त्या दोघांतलं साम्य पाहून दरबारी अवाक होतात. पण राजाला हे सहन होत नाही. तो ऋषी आणि त्या निळ्या भावाला मारून टाकायचा हुकुम करतो. कुणीच त्याचा हुकुम पाळत नाही, हे बघून राजा स्वत: त्यांच्यावर वार करतो. ऋषी आकाशात नाहिसे होतात. राजपुत्रसुद्धा नाहिसा होतो आणि त्याच जागेवरून एक निळा पक्षी आकाशात झेप घेतो. त्या पक्षाचं ओरडणं इतकं कर्कश असतं, की प्रजा घाबरून जाते. त्या पक्षाला मारायला जावं, तर एकाच्या जागी दोन पक्षी जन्म घेतात. पुढे दुष्काळामुळे ते साम्राज्य लयाला जातं. ही कथा म्हणजे आयुष्यात जवळच्या माणसांकडून होणाऱ्या अन्यायाचं प्रतीक म्हणून सबंध कादंबरीच्या रंगमंचावरील मागच्या पडद्यासारखी व्यापून राहते. गोव्याच्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या, आशा आणि धैर्य यांचा मिलाफ असणाऱ्या या कादंबरीत तीन वेगवेगळ्या स्त्रियांना उद्ध्वस्त करणाऱ्या आणि पुन्हा उभारी देणाऱ्या आयुष्यांची कहाणी आहे. इंग्लंडमध्ये मोठी झालेली, श्रीमंत कुटुंबातली असूनही आईवडिलांचं प्रेम न मिळालेली डॉना; सुंदर पण वादळी स्वभावाच्या मोठ्या बहिणीमुळे आयुष्य झाकोळून गेलेली मायोला, जी डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि खेड्यात, अंधश्रद्धाळू गरीब कुटूंबात चौथ्या क्रमांकावर जन्माला आलेली सुक्कोरीना अशा तिघींच्या आयुष्याची ही गोष्ट. मायोला गोव्यात येते, तेव्हा तिच्या आजीपासून त्यांच्या घरात कामाला येणारी सुक्कोरीना तिच्यासाठी काम करू लागते. डॉना आणि सुक्कोरीना दोघींना मायोलाच्या मानसोपचारांचा उपयोग होतो. मायोला रूग्णांना खूप वेळ देते, त्यांची दु:खं ऐकुन घेते आणि मग त्यांना योग्य तो सल्ला देते. औषधं देण्यापेक्षा ती समुपदेशावर जास्त भर देते. मायोलाची उपचारपद्धती गोव्यातील पुष्कळ जणांना फायद्याची ठरते. पण तिच्याकडे लोक मन मोकळं करत असल्यानं घरातील गुपितं बाहेर पडतात., म्हणून लोकांना ते आवडत नाही. कादंबरीची रचना काहीशी गुंतागुंतीची आहे. अनेक पात्रांची आपापसातली नाती समजून घेताना जरा गोंधळ उडू शकतो. पण जसजसं त्यांचं स्वभावचित्र तयार होत जातं, तशी कादंबरी मनाची पकड घेऊ लागते. भाषा अतिशय थेट, काहीशी `बोल्ड` म्हणावी अशी आहे. एकुण मनुष्य स्वभावातले असंख्य कंगोरे, भावछटा उलगडून दाखवणारी ही कादंबरी वेगळ्या जगाची सफर घडवते. -नीलिमा बोरवणकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो