* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FIFTY SHADES DARKER
  • Availability : Available
  • Translators : DR. SHUCHITA NANDAPURKAR-PHADKE
  • ISBN : 9789353171346
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 552
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : FANTASY, EROTIC, ROMANCE, SAGAS, CLASSIC
  • Available in Combos :E. L. JAMES COMBO SET - 3 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ROMANTIC, LIBERATING AND TOTALLY ADDICTIVE, THE FIFTY SHADES TRILOGY WILL OBSESS YOU, POSSESS YOU, AND STAY WITH YOU FOR EVER ... DAUNTED BY THE DARK SECRETS OF THE TORMENTED YOUNG ENTREPRENEUR CHRISTIAN GREY, ANA STEELE HAS BROKEN OFF THEIR RELATIONSHIP TO START A NEW CAREER WITH A US PUBLISHING HOUSE. BUT DESIRE FOR GREY STILL DOMINATES HER EVERY WAKING THOUGHT, AND WHEN HE PROPOSES A NEW ARRANGEMENT, SHE CANNOT RESIST. SOON SHE IS LEARNING MORE ABOUT THE HARROWING PAST OF HER DAMAGED, DRIVEN AND DEMANDING FIFTY SHADES THAN SHE EVER THOUGHT POSSIBLE. BUT WHILE GREY WRESTLES WITH HIS INNER DEMONS, ANA MUST MAKE THE MOST IMPORTANT DECISION OF HER LIFE. AND IT`S A DECISION SHE CAN ONLY MAKE ON HER OWN.
‘फिफ्टिी शेड्स डार्कर’ ही अ‍ॅनेस्टेशिया (अ‍ॅना) स्टील आणि खिश्चन ग्रे यांची प्रेमकहाणी आहे. अ‍ॅना आणि खिश्चन यांच्यात प्रेमबंध आहे; पण खिश्चनची अधिकार गाजवण्याची वृत्ती आणि काही वेळेस वेदनादायक ठरणारा त्याचा प्रणय यामुळे ती नाराज होते आणि खिश्चनपासून दूर होण्याचा निर्णय घेते. ते परस्परांपासून दूर होतातही; पण दोघांनाही एकमेकांशिवाय चैन पडत नसतं. खिश्चनचं बालपण त्याच्या आईच्या वासनांधतेमुळे करपलेलं असतं. त्यामुळे प्रणयात तो काही वेळेला विकृत पातळीवर जातो. ही विकृती आणि हक्क गाजवण्याची वृत्ती जर खिश्चनने त्यागली तर मात्र ती परत त्याच्याकडे जायला तयार असते. मग ते परत एकत्र येतात आणि त्यांचा प्रणय रंगायला लागतो आणि ते विवाह बंधनात अडकायचं ठरवतात. तेव्हा शरीराकडून मनाकडचा किंवा शरीर-मन या द्वंद्वातून पुढे सरकणारा या युगुलाचा हा प्रवास अनुभवण्यासाठी ‘फिफ्टिी शेड्स डार्कर’ अवश्य वाचलं पाहिजे.

No Records Found
No Records Found
Keywords
#FIFTY SHADES DARKER#E L JAMES# DR SUCHITA NANDAPURKAR PHADKE# #फिफ्टी शेड्स डार्कर# ई एल जेम्स#शुचिता नंदापुरकर फडके#
Customer Reviews
  • Rating StarMaharashtra Times Samwad 1-9-2019

    खळबळजनक प्रेमकथा… महाविद्यालयीन तरुणी अ‍ॅनास्टॅशिया स्टील आणि उद्योजक ख्रिश्चन ग्रे यांच्यातील अनोखी प्रेमकहाणी `फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे` या कादंबरीतून लेखिका ई. एल. जेम्स यांनी मांडली आहे. ही कादंबरी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली. विशेषतः महिलांनी तीडोक्यावर घेतली. अ‍ॅना आणि ख्रिश्चन यांच्या प्रेमकथेत असं नेमकं काय होतं, या उत्सुकतेपोटी जे-जे कादंबरी वाचवतात, तेव्हा कथाविषय धक्का देऊन जातो. आपल्या जोडीदाराला शारीरिक इजा पोहचवून, प्रसंगी अवमानजनक वेदना देत लैंगिक सुखाचा आनंद घेऊ इच्छिणारा ख्रिश्चन या कादंबरीचा नायक आहे. तर त्याच्यावरील प्रेमाखातर या संबंधांचा स्वीकार करणारी अ‍ॅना ही नायिका. ही कादंबरी जून २०१५मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. आजपर्यंत जवळपास बारा कोटींचा खपाचा आकडा गाठलाय. जगातील सर्वाधिक वेगाने विकली गेलेली कादंबरी म्हणून तिचा लौकिक आहे. शिवाय ५२ भाषांमध्ये तिचे अनुवाद केले गेलेत. दुसरा भाग `फिफ्टी शेड्स डार्कर` आणि तिसरा भाग `फिफ्टी शेड्स फ्रीड` नावाने प्रसिद्ध झालेत. पण त्याचबरोबर जगभरात ही कादंबरी आणि त्यावरून काढलेल्या चित्रपटाला बंदीचा सामनाही करावा लागला आहे. एकवीस वर्षांची अ‍ॅना तिची मैत्रिणी केट हिच्यासाठी ख्रिश्चन ग्रे या तरुण उद्योजकाची मुलाखत घेण्यासाठी जाते. पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडते. तोही तिच्यावर भाळतो. दोघं एकमेकांकडे आकृष्ट होत ही प्रेमकथा पुढे सरकत असतानाच, ख्रिश्चन तिला स्वतःविषयी एक धक्कादायक माहिती देतो. ते म्हणजे शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर तिला एका करारावर सही करावी लागेल. एखाद्या मुलीला आकर्षण वाटावं, अशा सगळ्या गोष्टी ख्रिश्चनकडे असतात. मात्र शारीरिक संबंधांबाबत मात्र तो वेगळा असतो. आपल्या जोडीदाराला पीडा देण्यातूनच त्याला लैंगिक सुख लाभतं. हे जेव्हा तो अ‍ॅनाला सांगतो. तेव्हा अ‍ॅना हे स्वीकारायला तयार होत नाही. मात्र ख्रिश्चनवरच्या प्रेमापायी अखेर त्या करारावर सही करते. आजवरच्या कित्येक प्रेमकथांतून वेगवेगळे विषय हाताळले गेले असतील, पण परपीडनातून सुख मिळवण्यासाठी करार करणाऱ्या प्रेमीयुगुलाची कथा प्रथमच लिहिली गेली. त्यामुळे या कादंबरीविषयी चर्चा झाली. कादंबरीत ख्रिश्चनला अशी लैंगिक इच्छा होण्यामागे एक उपकथानक आहे. पण मुळात ख्रिशनची ही अट मान्य होणं, आणि त्यासाठी स्वतःहून तयार होणं, हे वाचकांना धक्का देणारं ठरलं. लैंगिक संबंध आणि त्याभोवती फिरणारी प्रेमकथा असं काहीच स्वरूप असल्यामुळे आणि परपीडन ही गोष्ट अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय असू शकते. त्यामुळे अनेकांना या कांदबरीत नेमकं काय हे जाणून उत्सुकतेचं वाटलं. कादंबरीचा निम्मा भाग हा परपीडनातून लैंगिक सुख कसं मिळवलं जातं, याविषयीच्या औत्सुक्याचा परिचय करून देणारं असल्यानेच कदाचित त्याची चर्चा झाली. शिवाय ठरावीक पानानंतर शारीरिक संबंधांचं वर्णन हेही वाचकांना गुंगवून ठेवणारं आहे. ग्रे यांच्या या लैंगिक सुखाविषयीच्या इच्छा, त्यामागचा भूतकाळ, त्याची प्रेमकथा ते लग्न असा प्रवास या तीन कादंबरींतून मांडला गेला आहे. अर्थात त्यातला पहिला भाग धक्कादायक आहे तो त्यातल्या लैंगिक संबंधातील त्याच्या अनैसर्गिक इच्छांच्या पूर्ततेच्या वर्णनामुळे. अशा कादंबरी केवळ कामूक साहित्य म्हणून सोडून दिलं गेलं नाही, हेच या कादंबरीचं यश आहे. लैंगिकता या गोष्टींपाशी नुसतंच न रेंगाळता, त्याचा तपशीलवार वर्णनातही ही कथा अडकलेली नाही. तर ख्रिश्चन ग्रेच्या आयुष्यातील घटना आणि त्याचा त्याच्या लैंगिकतेवर झालेला परिणाम हेही यात आहे. मात्र तरीही दुर्दैवाने ही कादंबरी केवळ परपीडनात आनंद मानणाऱ्या प्रेमीयुगुलाची कथा म्हणून वाचली गेलीय. ही कादंबरी मराठीत आणताना काही शब्द जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. त्यात खटकण्यासारखं काही नाही. पण भाषेत आणखी सहजता आली असती, तर ते अधिक नैसर्गिक वाटलं असतं. मुळात या कादंबरीत असलेले अनेक दोष अनुवाद करताना बाजूला सारणं तसं कठीणच आहे. अ‍ॅना आणि ग्रे यांच्यातील संवाद हे या कादंबरीचा प्राण आहेत. यू हॅव टू किस अ लॉट फ्रॉग्ज बिफोर यू फाइंड युवर प्रिन्स, अशा सारख्या वाक्यांना मराठीत आणणं कठीणच! -अपर्णा पाटील ...Read more

  • Rating StarSuhas Birhade

    अखेर उत्सुकता संपली!. फिफ्टी शेड्स..मराठीत टिनएजर्स मुली आपल्या पालकांसमोर हक्काने वाचू शकत होत्या असं एकमेव शृंगारिक पुस्तक "फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे" या जगात गाजलेल्या पुस्तकाचे तीनही भाग मराठीत…एक शृंगारिक पण खिळवून ठेवणाऱ्या गाजलेल्या इ एल जम्स यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मेहताने प्रसिद्ध केलाय. "फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे", "फिफ्टी शेड्स डार्क" आणि "फिफ्टी शेड्स फ्रिड" असे तीन भाग आहेत. यावर सिनेमा आलाय ( जो आपल्याकडे अधिकृत बॅन आहे). ज्यांनी हे पुस्तक इंग्रजीत वाचलं नसेल, सिनेमा पहिला नसेल, त्यांना ही चांगली संधी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more