* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 5
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9788184981988
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
“NOT ANOTHER HELPING OF CHICKEN SOUP FOR THE SOUL... JUST WHEN I THOUGHT IT WAS SAFE TO RETURN TO AN UNCARING AND INSULAR EXISTENCE, ANOTHER SHOT OF STORIES ARRIVES REMINDING US THAT THE KEY TO OUR HUMANITY LIES WITHIN OUR SELVES.”LLOYD WEINTRAUB. TELEVISION PRODUCER, AMERICA’S FUNNIEST HOME VIDEOS JACK CANFIELD AND MARK VICTOR HANSEN, WORLDRENOWNED AND UNIVERSALLY LOVED MOTIVATIONAL SPEAKERS, OFFER YOU THEIR LATEST BANQUET OF TIMELESS TALES AND INSPIRING WISDOM. WHETHER YOU ARE A LONGTIME FAN OF THE SERIES OR A FIRSTTIME SAMPLER, YOU WILL TREASURE CHICKEN SOUP FOR THE SOUL’S LATEST TRIBUTE TO LIFE AND HUMANITY. WITH TOPICS RANGING THE EMOTIONAL AND EXPERIENTIAL GAMUT, THESE HEARTWARMING STORIES INVITE YOU TO ENJOY CHICKEN SOUP IN WHATEVER WAY YOU FIND MOST COMFORTING AND APPEALING... BY THE SPOONFUL, THE BOWLFUL OR THE WHOLE SOUP POT IN ONE SITTING. THE AUTHORS OF THESE STORIES SHARE WITH YOU SOME OF THEIR MOST MEANINGFUL LIFE EXPERIENCES. THEIR NARRATIVE GIFTS WILL HELP YOU TO FIND DEEPER MEANING IN YOUR OWN EXPERIENCES AND TO MOVE FORWARD INTO A RICHER, MORE FULFILLING LIFE. REMEMBER, IN YOUR LIFE AND THE LIVES OF THOSE YOU LOVE, THERE IS ALWAYS ROOM FOR MORE WISDOM, MORE INSPIRATION, MORE SHARED STORIES AND, OF COURSE, MORE CHICKEN SOUP. JACK CANFIELD AND MARK VICTOR HANSEN, # 1 NEW YORK TIMES BESTSELLING COAUTHORS, ARE PROFESSIONAL SPEAKERS WHO HAVE DEDICATED THEIR LIVES TO ENHANCING THE PERSONAL AND PROFESSIONAL DEVELOPMENT OF OTHERS. THEY ARE THE COAUTHORS OF EIGHT NEW YORK TIMES BESTSELLERS, INCLUDING CHICKEN SOUP FOR THE SOUL, CHICKEN SOUP FOR THEWOMEN’S SOUL, CHICKEN SOUP FOR THE MOTHER’S SOUL AND CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL.
मनाला अतिशय भावणाया हृदयस्पर्शी, स्फूर्तिदायक अशा पुढील कथांचा तुम्हाला आनंद प्राप्त करून देण्यासाठी सादर आहे तुमच्या आवडत्या ‘चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाचा पाचवा भाग! मानवी आयुष्याला व माणुसकीला मानाचा मुजरा करणाया या कथारूपी पुष्पगुच्छाचा सुगंध प्रत्येकाच्या मनात दरवळेल व असाच अनेकांच्या मनात दरवळत जाऊन साया पृथ्वीतलावर सुगंधित वातावरण निर्माण होईल, शांती प्रस्थापित होईल अशी खात्री आहे. हे ‘चिकन सूप’ चव घेत घेत चमचाचमचा पिऊ शकता. हवं तर वाडगाभर सूप प्राशन करू शकता आणि वाटलंच तर सूपचं भरलेलं पूर्ण पातेलंच एका बैठकीत संपवू शकता! या भागातील सामान्य लोकांच्या जीवनातले असामान्य अनुभव वाचताना एखाद्या वेळी तुम्हाला आलेल्या अनुभवाची आठवण जागी होईल आणि मग त्या कथेचा खरा गर्भितार्थ तुमच्या मनाला अधिक चांगल्या प्रकारे स्पर्श करून जाईल. एक लक्षात ठेवा – तुमच्या व तुमच्या जिवलगांच्या आयुष्यात प्रेमासाठी, स्फूर्तीसाठी भरपूर जागा आहे. तेव्हा ह्या पाचव्या भागातील कथांचा ठेवा मनात जरूर जपून ठेवा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK
Customer Reviews
  • Rating StarCHATURANG 10-1-2009

    ‘चिकन सूप फॉर द सोल’ या जगप्रसिद्ध ‘बेस्ट सेलर’ पुस्तक मालिकेतील चौथ्या, पाचव्या व सहाव्या भागातील काही कथांचा उषा महाजन यांनी केलेला स्वैरानुवाद पेश करणारे हे सदर. या तिन्ही भागांच्या अनुवादांचे हक्क ‘मेहता प्रकाशन’ला मिळाले आहेत. यापूर्वी ‘मेहता प्काशन’ने पहिल्या व तिसऱ्या भागाचा अनुवाद पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे. ‘‘माणसाच्या आयुष्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. पहिली म्हणजे दयाळू असणे, दुसरी म्हणजेही दयाळू असणे व तिसरी म्हणजेदेखील दयाळू असणेच!’’ - हेन्री जेम्स एका सकाळी जॉन इव्हॅन्स हा असाच अचानक माझ्या आयुष्यात आला. कोणीतरी दिलेल्या जुन्यापुराण्या अतिशय ढगळ कपड्यातला व शिवणी उसवलेल्या, झिजलेल्या बुटातील ती स्वारी म्हणजे एक गबाळ छोटासा मुलगा. नॉर्थ कॅरोलिना राज्यातील आमच्या लहानशा गावात सफरचंद तोडण्याच्या मोसमात जे भटके कामगार नुकतेच येऊन पोहोचले होते त्यातल्या एकाचा हा मुलगा. ते कामगार तुटपुंज्या वेतनावर आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करत असत. त्या दिवशी सकाळी आमच्या दुसरीच्या वर्गाच्या दारात उभा असलेला जॉन इव्हॅन्स म्हणजे एक मूर्तिमंत केविलवाणं दृश्यच होतं. एका पायावरून दुसऱ्या पायावर भार देत तो उभा होता व आमच्या वर्गशिक्षिका पार्मिली रजिस्टरमध्ये त्याचं नाव लिहून घेत होत्या. त्या गबाळ्या ध्यानाला पाहून वर्गाच्या प्रत्येक रांगेतून खालच्या आवाजात कुरबूर व नाराजीचा सूर उमटत होता. ‘‘कोण आहे तो?’’ माझ्या मागच्या बाकावरचा मुलगा पुटपुटला. ‘‘ए, कोणीतरी खिडकी जरा उघडा बरं,’’ एक मुलगी खुदुखुदू हसत म्हणाली. पार्मिली बार्इंनी चष्म्यातून वर्गाकडे करडी नजर टाकली. एकदम कुजबूज थांबली व त्या परत आपल्या कामात गुंग झाल्या. ‘‘मुलांनो, हा जॉन इव्हॅन्स बरं का,’’ बार्इंनी उत्साहाच्या आविर्भावात सगळ्यांना सांगितलं. जॉनने चौफेर नजर टाकली व केविलवाणं हसला, कोणीतरी हचून आपल्याला प्रतिसाद देईल या अपेक्षेने. पण कोणीच काही प्रतिक्रिया दिली नाही. तो बिचारा हसतच राहिला. माझ्या बाकावरची शेजारची रिकामी जागा बार्इंना दिसू नये अशी मनात प्रार्थना करत मी श्वास रोखून धरला होता; आणि नेमकी त्यांना तीच जागा दिसली आणि त्यांनी जॉनला माझ्या शेजारी बसायला सांगितलं. बसताना त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, पण मी मात्र जाणूनबुजून त्याची नजर टाळली. पहिला आठवडा संपता संपता जॉनने वर्गातलं त्याचं सर्वात खालचं स्थान पक्कं केलं. ‘‘ह्यात त्याचाच दोष आहे.’’ एकदा रात्रीच्या जेवणाच्या वेळी मी आईला सांगितलं. ‘‘साधे आकडेदेखील त्याला अजून नीट मोजता येत नाहीत.’’ रोज रात्रीच्या माझ्या जॉनपुराणामुळे आईला मात्र एव्हाना जॉनची बरीच माहिती झाली होती. माझं सगळं बोलणं ती शांतपणे ऐकून घेत असे; पण ‘असं,’ ‘हो का?’ ‘बरं बरं,’ या पलीकडे ती जास्त काही प्रतिक्रिया देत नसे. ‘‘मी बसू तुझ्याजवळ?’’ मधल्या सुट्टीत जेवणाचा ट्रे हातात घेऊन, माझ्या पुढ्यात उभं राहून जॉन हसत हसत विचारत होता. ‘‘बरं ठीक आहे. बस बस,’’ मी कसंबसं म्हणालो. त्याला जेवताना, इकडेतिकडे हिंडताना बघून मी विचार केला की जॉनच्या वाट्याला आलेली एवढी हेटाळणी खरं तर अयोग्यच होती. तो माझ्या जवळपास असला की उलट मला छान वाटायचं व तोही आता जास्त आनंदी दिसू लागला होता. जेवणानंतर खेळाच्या मैदानावर जाऊन सगळ्यांबरोबर आम्ही खूप हुंदडलो. मधली सुट्टी संपल्यावर पार्मिली बार्इंच्या मागे रांगेत उभं असताना मी मनाशी पक्कं केलं की यापुढे जॉन एकाकी राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. ‘‘सगळी मुलं जॉनशी फार दुष्टपणे वागतात, असं तुला वाटतं का गं?’’ एकदा रात्री आई मला पांघरूण घालत असताना मी तिला हा प्रश्न केला. ‘‘मला काही कळत नाहीये. कदाचित असंच वागण्याची सवय असेल.’’ ती खेदाने म्हणाली. ‘‘आई, उद्या जॉनचा वाढदिवस आहे आणि त्याला केक, भेटवस्तू काहीच मिळणार नाही गं. कोणालाच त्याची पर्वाच नाहीये.’’ शाळेतील प्रत्येक मुलाच्या वाढदिवसाला त्याची आई संपूर्ण वर्गासाठी छोटे केक्स व पार्टीसाठी छान छान वस्तू घेऊन शाळेत येई. माझ्या व बहिणीच्या वाढदिवसालाही माझी आई शाळेत येत असे. जॉनची आई तर सफरचंदाच्या बागेत दिवसभर काम करत असे. त्यामुळे त्याचा ‘खास’ दिवस सामान्य दिवसाप्रमाणेच जाणार, असाच विचार मी केला. ‘‘तू काळजी करू नकोस. मला खात्री आहे की सगळं कसं छान, नीटपणे पार पडेल बघ.’’ आईने माझी पापी घेत मला ‘शुभरात्री’ म्हणाली आणि निघून गेली. आईला वाटलेली खात्री नक्कीच खोटी ठरणार, असं मला आयुष्यात पहिल्यांदाच वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारीच्या वेळी मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी शाळेत जायचं नाही, असं ठरवलं. ‘‘तुझ्या या निर्णयाचा व जॉनच्या वाढदिवसाचा काही अर्थाअर्थी संबंध आहे का?’’ आईने विचारलं. शरमेने लाल झालेले माझे गालच उत्तर देऊन गेले. ‘‘समजा तुझा एखादा जवळचा मित्र तुझ्या वाढदिवसाला गैरहजर राहिला, तर तुला कसं वाटेल?’’ तिने मला विचारलं. मी क्षणभर विचार करून पटकन तिची पापी घेऊन, टाटा करून शाळेत पळालो. गेल्या गेल्या मी जॉनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या वाढदिवसाची मी आवर्जून आठवण ठेवली, याचा आनंद त्याच्या ओशाळवाण्या हास्यातून जाणवत होता. म्हणजे मला वाटलं होतं तेवढा काही त्याचा दिवस खराब जाणार नव्हता कदाचित! दुपारपर्यंत तर माझा पक्का समज झाला की वाढदिवस म्हणजे काही फार महत्त्वाचा दिवस नसतोच. पार्मिली बाई फळ्यावर एक गणित मांडत होत्या. तेवढ्यात बाहेरच्या हॉलमधून मला ओळखीचा आवाज आला. माझ्या खूप ओळखीच्या त्या आवाजात वाढदिवसाचं शुभेच्छागीत ऐकू येत होतं. काही सेकंदांतच दारातून माझी आई येताना दिसली. तिच्या हातात एक ट्रे होता. त्यात छोटे केक्स व मेणबत्त्या दिसत होत्या. छानशा रंगीत कागदात एक प्रेझेंट दिसत होतं. पार्मिली बाईदेखील चिरक्या आवाजात आईबरोबर गाऊ लागल्या. पूर्ण वर्गाने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. रात्री गाडीच्या प्रखर दिव्यांसमोर भेदरून उभ्या असलेल्या हरणासारखा जॉन आईकडे बघत होता. तिने छोटे केक्स व प्रेझेंट बाकावरती त्याच्यासमोर ठेवलं व म्हणाली, ‘‘वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.’’ माझ्या त्या मित्राने ट्रे हातात घेऊन, शांतपणे प्रत्येक बाकापाशी जाऊन मोठ्या अदबीने ते छोटे केक्स सर्वांना वाटले. आई माझ्याकडेच बघत होती, हे माझ्या लक्षात आलं. मी केकचा तुकडा तोडत असताना तिने माझ्याकडे बघून डोळे मिचकावले. आता भूतकाळात शिरल्यावर जाणवलं की, त्या दिवशी वर्गातल्या ज्या मुलांनी आपला वाढदिवस साजरा केला होता, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांची नावंही नीट आठवत नाहीयेत. काही दिवसांनंतर जॉन इव्हॅन्स आमच्या गावातून निघून गेला. त्यानंतर आजतागायत मला त्याची काहीच खबरबात नाही. पण जेव्हा जेव्हा मी ते वाढदिवसाचं गीत ऐकतो, तेव्हा प्रत्येक वेळी मला तोच दिवस आठवतो... माझ्या आईचं ते सरप्राइझ... आणि माझ्या मित्राच्या डोळ्यातली चमक. - मूळ कथा - रॉबर्ट टेट मिलर A Birthday Song ...Read more

  • Rating StarCHATURANG 7-2-2009

    ‘मुलाला तुमच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज केव्हा असते? जेव्हा खरंच त्याची/तिची ते प्रेम मिळण्याची योग्यता नसते.’ - अनामिक मला एकूण तीन मुलं. मुलगा एकच सर्वात मोठा- पॉल, ज्याचं नाव त्याच्या वडिलांवरून ठेवलंय. थेरेसा हे आमचं शेंडेफळ. वडिलांसारखे घारेडोळे आणि कुरळे केस असलेली. एलिन ही दोघांच्या मधली. तिचं नाव माझ्यावरून व माझ्या आईवरून (तिचं नाव एलिन अ‍ॅन होतं!) ठेवलंय. माझा जन्म झाल्यानंतर माझ्या आईनं माझं नाव ठेवलं- अ‍ॅन एलिन. मला मुलगी झाल्यावर मीही आईसारखंच करून मुलीचं नाव ठेवलं- एलिन अ‍ॅन. जेमतेम पाच महिन्यांची होत नाही तोवर एलिनमध्ये स्वतंत्रपणे जगण्याचा बाणा दिसू लागला होता. दुसऱ्या कोणी तिच्या तोंडात दुधाची बाटली धरलेली तिला चालत नसे. सगळं स्वत:च्या मर्जीने करण्याचा तिचा हट्ट असे. तीन मुलं घरात आजूबाजूला बागडत असताना त्या काळात खूप मजा येत असे. तिघंही कामात मदत करत. त्यांची थट्टामस्करी, मस्ती चाले. घराघरात जसं घडतं तसंच आमच्याही घरात कधीकधी चर्चा, वादविवादाला तोंड फुटत असे. काही बाबतीत त्यांच्या वर्तणुकीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असं मला व त्यांच्या वडिलांना वाटत असे, तेव्हा आम्हीच विषयाला हात घालत असू. कधी मुकाट्याने ऐकून घेणं व होकार देणं, तर कधी शाब्दिक विरोध दर्शविणं- अशा पॉल व थेरेसाच्या प्रतिक्रिया होत असत. पण शेवटी सगळं स्पष्टीकरण होऊन, एकमेकांचं ऐकून घेऊन वातावरण शांत होत असे. पण एलिनबरोबर मोकळ्या मनाने चर्चा करण्याची कधीच वेळ येत नसे. आम्ही काही मत दर्शवू शकतो या विचारालाच तिचा विरोध असे. मग थाडथाड पाय आपटत जिना चढून ती तिच्या खोलीत जाऊन धाडकन दार बंद करून घेत असे. खोलीमध्ये जोरजोरात गाणी लावून बसत असे. व तारस्वरात ओरडून सांगत असे की तिला कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्याची इच्छा नाही. सुरुवातीच्या काळात मी अनेकदा तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे तिची चिडचिड व राग अजूनच वाढत असे. एके दिवशी मात्र, एलिनने आमची वाजू ऐकून घेतलीच पाहिजे, अशी निकड निर्माण झाल्यावर मी तिला एक पत्रच लिहिलं. त्या पत्रात माझी व तिच्या वडिलांची बाजू स्पष्ट केली. आम्हाला कोणत्या गोष्टीत तिनं थोडं बदलावं असं वाटत होतं, ते मोकळेपणाने मांडलं. सकाळी ती शाळेत जाईपर्यंत मी थांबून राहिले व नंतर तिच्या खोलीत जाऊन पलंगावर ते पत्र ठेवून आले. तिने कधीच त्या पत्राचा उल्लेखही केला नाही. तिने ते वाचल्याचंही मला कळू दिलं नाही. पण तिच्या वागण्यात थोडीफार सुधारणा मात्र दिसून आली. त्यानंतर काही वर्षांसाठी अशाच प्रकारे ती शाळेत, नोकरीवर, मित्राला भेटायला गेली असताना मी तिला पत्र लिहायची आणि ती पत्रं तिच्या पलंगावर जात राहिली. मला वाटतं, वर्षातून दोन-तीन वेळा तरी मी तिला पत्र लिहिलं. तब्बल १४ वर्षे हा सिलसिला चालू होता. तिने पत्र वाचल्याचं ना मला कधी सांगितलं, ना की त्यातल्या मुद्यावर माझ्याशी काही चर्चा केली. पण तिच्या वागण्यात, स्वभावात सकारात्मक बदल मात्र घडून येत होते. कधी खोलीत जाऊन वरून ओरडून ती सांगत असे, ‘आता ही अशी पत्र लिहीत नको जाऊस मला.’ मी मात्र अर्थातच निग्रहाने लिहीतच राहिले. एलिनच्या वडिलांचे १९९० साली निधन झाले. त्यानंतर तीन वर्षांनी तिचं लग्न ठरलं. वर्चस्व गाजवणारी माता न राहण्याचा मी निश्चय केला. सगळं कसं सुरळीत चालू होतं. पण लग्नाला एकच महिना उरलेला असताना आमच्या दोघींमध्ये जबरदस्त वादावादी, मतभेद झाले. तिने रागानेच मला सुनावलं, ‘‘मी आता २४ वर्षांची झाली आहे. मतिमंद मुलांची एक खास शिक्षिका म्हणून काम करतेय. व लवकरच माझं लग्न होणार आहे. आता त्यामुळे मला पत्र लिहू नये.’’ असं तिने मला स्पष्ट शब्दांत बजावलं, परंतु तरीही मी लिहिलंच पत्र. लग्नाच्या आधी तीन दिवस एलिन तिच्या नव्या घरी जाण्यासाठी सामानाची आवराआवर करत होती. तिच्या कपाटात एक डबा होता. तो फेकून न देता तसाच ठेवून द्यावा, असं तिने मला सांगितलं- ‘आतापर्यंत तू मला जी पत्र लिहिली होतीस, ती सगळी पत्रं या डब्यात मी ठेवलेली आहेत. अधूनमधून मी परत परत ती वाचत असते आणि पुढेमागे कधीतरी माझ्या मुलीला मी ती पत्रं वाचून दाखवेन. थँक यू आई. याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते.’ ‘थँक यू एलिन.’ एवढंच मी म्हणू शकले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more