* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9788177668001
  • Edition : 9
  • Publishing Year : MARCH 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
TWO OF AMERICA`S BESTLOVED INSPIRATIONAL SPEAKERS JACK CANFIELD AND MARK VICTOR HANSEN SHARE THE VERY BEST OF THEIR COLLECTED STORIES THAT HAVE TOUCHED THE HEARTS OF MILLIONS OF PEOPLE. THEY BRING YOU WIT AND WISDOM, HOPE AND EMPOWERMENT TO CHEER YOU UP THROUGH LIFE`S DARK MOMENTS. AS AFTER SOME ILLNESS WE CONSUME CHICKEN SOUP TO REJUVEHATE OUR BODY IN THE SAME WAY THIS CHICKEN SOUP SOOTHES YOUR SOUL AND FILLS IT WITH HOPE, ASPIRATIONS AND INSPIRATIONS. WHENEVER YOU WISH TO MAKE A POINT, INSPIRE A FRIEND OR TEACH A CHILD, YOU WILL FIND JUST THE RIGHT STORY IN THE THESE HEART WARMING BOOKS. THE MAGIC OF THESE RUNAWAY BESTSELLERS IS REALLY HELPING PEOPLE TO CHANGE THEIR ATTITUDE TOWARDS THEMSELVES AND THE WORLD AROUND. THESE BOOKS HAVE CAPTURED THE IMAGINATION OF THE READERS WITH ITS UPLIFTING MESSAGE OF HOPE AND INSPIRATION. SOME OF THESE STORIES HAVE AN ORDINARY MESSAGE OF HOPE AND INSPIRATION, SOME OF THESE STORIES ARE OF AN ORDINARY PERSON DOING SOME EXTRAORDINARY WORK, JUST THROUGH HIS WILL POWER, GRIT AND DESIRE TO ACHIEVE SOMETHING IMPOSSIBLE. WITH TIMELESS WISDOM ABOUT LEARNING, OVERCOMING OBSTACLES, LOVE AND FAMILY ATTITUDE EACH STORY OFFERS TOUCHING AND PROFOUND EXAMPLES OF HUMAN CARING, COMPASSION AND LOVE. THESE STORIES WILL STIR YOUR EMOTIONS, ENCOURAGE YOU TO RAISE YOUR CONSCIOUSNESS AND REAFFIRM YOUR COMMITMENT TO LIVE LIFE TO THE FULLEST. ON CAN KEEP A COPY OF ANY OF THESE BOOKS AT BEDSIDE AND JUST READ ONE OR TWO STORIES EVERY NIGHT BEFORE GOING TO BED. ONE CAN`T STOP PONDERING OVER THESE EXCELLENT, AMAZING REAL STORIES OF HUMAN COURAGE, PERSEVERENCE ETC. ONE CAN AGAIN AND AGAIN READ ANY STORY FROM ANY BOOK AT ANY TIME AND IT WILL DEFINITELY BOOST ONE`S MORALE SO NOURISH YOURSELF AND THOSE YOU LOVE WITH THE GIFT OF ANY OR ALL THE BOOKS OF "CHICKEN SOUP FOR THE SOUL.` IN INDIA, STILL THERE ARE PEOPLE WHO DON`T READ ENGLISH BOOKS THOUGH THEY HAVE LEARNT THE LANGUAGE AS A SUBJECT. STUDYING IN VERNACULAR MEDIUM DOES NOT ALWAYS CREATE LIKING TO LOVE AND READ ENGISH BOOKS. BUT THESE PEOPLE SHOULD NOT BE DEPRIVED FROM SUCH LOVELY ENGLISH BOOKS, SO THIS IS MY EFFORT TO TRANSLATE THESE VOLUMES (VOL. 1 AND 3 ALREADY PUBLISHED AND 4, 5, 6 ARE ON THE WAY) IN ONE OF THE MANY INDIAN LANGUAGES MARATHI WIDELY SPOKEN IN MAHARASHTRA STATE. SO FAR, I HAVE GOT TREMENDOUS RESPONSE FROM ALL OVER INCLUDING FROM PEOPLE LIVING IN SAME SMALL VILLAGES IN REMOTE AREAS. THEY ALL CONVEY THEIR APPRECIATION VIA PHONE, LETTERS AND UMPTEEN EMAILS. MANY OF THEM SAY THAT I HAVE GIVEN THEM A AMAZING TREASURE BOX OF THE THESE STORIES WHICH WAS HIDDEN FROM THEM FOR ALL THESE YEARS. IT GIVES ME A REAL SENSE OF SATISFACTION. I WILL SINCERELY TRY TO KEEP UP THE SAME STANDARD OF TRANSLATION FOR OTHER BOOKS TOO!
जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकेतल्या सर्वप्रिय, सुप्रसिद्ध अशा दोन वक्त्यांनी मिळून संकलित केलेल्या या कथा जगाच्या कानाकोपयातल्या जनमानसाच्या मनाला जाऊन भिडल्या आहेत, भावल्या आहेत. या कथांमधील आशावाद, बुद्धीवाद तुम्हाला येणारं नैराश्य झटकून टाकायला मदत करेल. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या या कथा म्हणजे ‘अशक्य’ शब्दप्रयोगाला झुगारून देऊन आपल्या आयुष्याचा मार्ग उजळून टाकणाया आहेत. जेव्हा कधी तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडावासा वाटेल, एखाद्या मित्रमैत्रिणीला स्फूर्ती द्यावीशी वाटेल किंवा लहान मुलाला शिकवण द्यावीशी वाटेल, तेव्हा या पुस्तकातील अनेक हृदयस्पर्शी कथांचा हा ठेवा नक्कीच उपयोगी पडेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN
Customer Reviews
  • Rating Starममता मुनगीलवार

    जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकेतल्या. सर्वप्रिय, सुप्रसिद्ध अशा दोन वक्त्यांनी मिळून संकलित केलेल्या या कथा जगाच्या कानाकोपऱ्यातल्या जनमानसाच्या मनाला जाऊन भिडल्या आहेत, भावल्या आहेत. या कथांमधील आशावाद, बुद्धीवाद तुम्हाला येणारं नैराश्य झटून टाकायला मदत करेल. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या या कथा म्हणजे `अशक्य` शब्दप्रयोगाला झुगारून देऊन आपल्या आयुष्याचा मार्ग उजळून टाकणाऱ्या आहेत. जेव्हा कधी तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडावासा वाटेल, एखाद्या मित्र-मैत्रिणीला स्फूर्ती द्यावीशी वाटेल किंवा लहान मुलाला शिकवण द्यावीशी वाटेल, तेव्हा या पुस्तकातील अनेक हृदयस्पर्शी कथांचा हा ठेवा नक्कीच उपयोगी पडेल.. "लोकं फार वाईट वागतात...!” “जिकडे बघावं तिकडे निराशाजनक चित्र दिसत असतं.” “चांगलं असं काही घडतच नाही का?” “सगळीकडेच परिस्थिती कशी खराब झाली आहे नाही?" इ.इ. असे उद्गार वेळोवेळी आपल्याला ऐकायला मिळतात. कधी कधी आपणही त्याच सुरांत सूर मिळवतो. हे उद्गार अगदीच निरर्थक असतात असं नाही, पण वाईटाबरोबरच जगात थोडं का होईना चांगलंही घडतं आहेच की! चांगलंही वागणारी, विधायक कामं करणारी माणसंही आहेतच की! आपल्याला अनेक वेळा माणुसकीचे सुखद अनुभव येत असतात. आशादायक असं काहीतरी घडतंय असं जाणवतं. कधी कधी एखादी अगदी सामान्य व्यक्ती देखील अशी काहीतरी असामान्य, अद्भुत कृति करून दाखवते की जी आदर्श ठरावी. जिच्यापासून सर्वांनी बोध घ्यावा- शिकावं असं तीव्रतेनं वाटतं! आजच्या ताणतणावाच्या, हिंसेच्या, दहशतवाद-द्वेषानी भरलेल्या जगात गरज कशाची आहे तर- प्रेमाची, परोपकाराच्या भावनेचं पुनरूत्थान करण्याची! पाश्चिमात्य व पौर्वात्य देशातील अनेक सामान्य (क्वचित सुप्रसिद्ध) व्यक्तींनी असंच काहीतरी जगावेगळं करून दाखवलंय जे सगळ्यांच्याच मनाला भावण्यासारखं आहे. अशा या सत्यकथा `Chicken Soup for the Soul` ह्या Best Sellers च्या यादीतील इंग्रजी पुस्तकांतून १९९२ साली प्रसिद्ध झाल्या आहेत. ह्याचे पुढील भाग Second, Third, Fourth Serving of Chicken Soup for the soul या शीर्षकाखाली.. मराठी भाषांतर पण खूप सुंदर रित्या केलेलं आहे.. इंडीयन सोल, मदर्स सोल ही पुस्तके अजून वाचनीय आहेत. ...Read more

  • Rating StarCHATURANG 01-12-2007

    उत्साहवर्धक चिकन सूप... ‘चिकन सूप फॉर द सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द वुमन्स सोल’ ही दोन्ही पुस्तके अलीकडेच ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रसिद्ध केली आहेत. अमेरिकेत प्रथम प्रकाशित झालेली चिकन सूप नामक पुस्तकांची मालिका बघता बघता बेस्ट सेलर झाली आणि जगभर पोहचली. मेहतांनी त्याचे अनुवादाचे हक्क मिळवले आणि त्यामुळे त्यातील काही कथा आता मराठीत वाचायला मिळत आहेत. अनुक्रमे उषा महाजन आणि शामला घारपुरे यांनी ही पुस्तके मराठीत अनुवादित केली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल’ मधील काही कथा ‘चतुरंग’ पुरवणीत २००३ मध्ये उषा महाजनांच्या ‘जीवनाचे सार’ या सदरात प्रसिद्ध झाल्या आहेत. दोन्ही पुस्तकांच्या किंमती प्रत्येकी १६० रुपये आहेत. त्या पुस्तकांतील या कथा वानगीदाखल इथे प्रसिद्ध करीत आहोत. या दोन्ही पुस्तकातील छोटेखानी कथा आपल्याला उत्साहाचे, सकारात्मकतेचे टॉनिक पुरवतात. काही कथा अंतमुख करतात, तर काही कथा नवा दृष्टिकोन देतात. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-05-2007

    जगावं कसं? सांगणारं ‘चिकन सुप फॉर द सोल’ … प्रकाशावाचून सूर्य असूनच शकत नाही पण मध्ये येणारे ढग त्या प्रकाशाला झाकून टाकतात. त्यामुळे सुर्याचा नितळ प्रकाश धुसर होत जातो. मानवी मनाचे देखील असेच आहे. मनावरील ताण तणाव मानवाची शक्ती क्षीण करून टाकतात. मावर मरगळ येऊन माणसाचे संपूर्ण जीवन निरस होऊन जाते. अशावेळी गरज तसे ती ही मरगळ झटकून चालण्याची आणि उत्साहाने कामाला लागण्याची पण हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण आपल्यापेक्षा दु:खी आणि समस्येने ग्रासलेली माणसे पाहतो. त्यांच्याविषयी ऐकतो. त्यावेळी आपल्याला त्यांच्यापुढे आपले दु:ख थिटे वाटू लागते. या लोकांनी अडचणींवर मात करून ज्या पद्धतीने संकटावर मात केली असते. ते बघुन आपल्यालाही उभे राहण्याची ताकद मिळते. अशीच ताकद आपल्याला ‘चिकन सुप फॉर द सोल’ हे पुस्तक वाचून मिळते. जॅक कॅनफिल्ड अणि मार्क व्हिटर हॅसन यांनी लेखन आणि संकलन केलेल्या मानवी मनोगुणांचा शोध घेणाऱ्या कथा या पुस्तकात आहेत. अतिशय उत्साहकारक आणि प्ररेक अशा कथा या पुस्तकात आहेत. मुळ इंग्रजी कथा आणि अनुभवांचा अनुवाद उषा महाजन यांनी केला आहे. पुस्तकाचे नाव मोठे गमतीशीर आहे ‘चिकन सुप फॉर द सोल’ मुखपृष्ठ आणि पुस्ताकचे नाव वाचून प्रथमदर्शी पाहणाला वाटते की हे रेसीपीचेच पुस्तक आहे. दुस अर्थाने ते रेसीपीचेच पुस्तक आहे पण ते मानवी मनाच्या स्वास्थासाठी असणे रेसीपीच आहे. त्या प्रत्यक्ष कृतीनेच आपले स्वास्थ अबाधित राहते याबाबत अनुवादक म्हणतात की अनेक ठिकाणी माणसे आजारीपणातून उठले की शारिरीक शक्ती पुर्ववत येण्यासाठी चिकन सूपच फक्त पीत असतात. त्याचप्रमाणे हे पुस्तक तुमच्यासाठी जीवनाचे सार ठरते. गमावलेला आत्मविश्वास परत मिळविण्यासाठी या पुस्तकातील अनुभवांचा फायदा आपलयाला होत असतो. आजच्या ताणतणावाच्या जगात आवश्यकता आहे ती एकमेकांविषयी प्रेमाची सहानुभूतीची आवश्यकता आहे. आधुनिक स्पर्धेच्या युगात त्यालाच माणसे पारखी झालेले आहेत. म्हणूनच गरज आहे परोपकाराच्या भावनेचे पुनरुस्थान करण्याची, पाश्चिमात्त्य आणि पौर्वात्त्य देशातील अनेक सामान तसेच प्रसिद्ध व्यक्तींनी आपले जीवनविषयक अनुभव यात सांगितलेले आहेत. काहींनी जगावेगळे धाडस केलेले आहेत. त्यांचे अनुभव आणि ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेली मेहनत हे सगळ्यांनाच अत्यंत प्रेरक असेच आहे. अशा या सत्यकथा ‘चिकन सूप फॉर द सोल’ ह्या ‘बेस्ट सेलर’च्या यादीतील इंग्रजी पुस्तकातून १९९२ साली प्रसिद्ध प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचे चार भाग प्रसिद्ध झाले आहेत. यातील अनुभव आणि सत्यकथा अतिशय भावस्पर्शी असल्याने जगातील अनेक भाषांतून त्याचे भाषांतर झालेले आहे. जीवनातील अनेक वाटांवर ह्या पुस्तकातील सत्यअनुभव आपल्याला मदतीला येतात. पुस्तकात या सत्य अनुभवांचे सात भाग करण्यात आले आहेत. त्यात प्रेमाविषयी, विद्वत्ता, स्वप्नपूर्ती अडचणींवर मात आणि वाईटातून चांगले शोधण्याची कला याविषयी लोकांनी आपले अनुभव सांगितले आहे. या कथांमधील आशावाद, बुद्धिवाद तुम्हाला येणारे नैराश्य झटकून टाकायला नक्कीच मदत करील. ज्याप्रमाणे पंचतत्रातील कथा आपण मुलांना बोधकथा म्हणून सांगतो. त्याप्रमाणे या पुस्तकातील अनुभव कथा मुलांना बोधपर आपल्याला सांगता येतील या सत्यकथा असल्याने मुलांना देखील त्या उद्बोधक होतील यात शंका नाही. -मंजुषा पवनीकर ...Read more

  • Rating StarINDIAN EXPRESS 19-6-2007

    Timeless treasure... YEARS ago, the series of `Chicken Soup for the Soul` books was on the best sellers list. Recently I saw the Marathi translation of the book and on reading it, I think it is the best possible gift for those who read only Marathi iterature. My heartiest congratulations to the translator. Usha Mahajan, who has really done an excellent job with her lucid Marathi. These true stories of courage, love, compassion and achieving dreams are truly inspiring for one and all. They are a timeless treasure. V. M. Pranjapye ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more