* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LADHA LOKPALCHA UDREK AAM ADMICHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985450
  • Edition : 1
  • Publishing Year : 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IT IS AS IF INDIA HAS BECOME A RICH COUNTRY OF POOR PEOPLE. IT WAS DURING THIS PERIOD THAT THE COUNTRY GOT A `LOKPAL` DUE TO THE FIERCE STRUGGLE OF AAM AADMI AND SOCIAL WORKERS. PEOPLE ARE NOW STRUGGLING AGAINST INJUSTICE, EVEN WITHOUT LEADERSHIP. THIS IS A PROMISING PICTURE FOR A LIVING, STRONG, VIBRANT DEMOCRACY. INFILTRATION IS CURRENTLY GOING ON IN ALL STRATA OF SOCIETY. WHY IS ALL THIS HAPPENING NOW? THIS IS AN ATTEMPT TO FIND THE ANSWER TO THIS QUESTION.
देशात आज ५५ कोटी मोबाईल फोन, तर चौदा कोटी इंटरनेट कनेक्शन्स आहेत. रस्त्यावर दर मिनिटाला वीस नव्या कोऱ्या मोटरसायकल, तर तासाला दोनशे चकचकीत चारचाकी गाड्या दाखल होत आहेत. सुबत्तेची गंगा दुथडी भरून वाहत असताना दुसऱ्या बाजूला जनता भ्रष्टाचार, अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरत आहे. ‘भारत हा जणू गरीब लोकांचा श्रीमंत देश बनला आहे.’ नेमक्या अशा काळातच आम आदमीच्या आणि समाजसेवकांच्या चिवट लढ्याने देशाला ‘लोकपाल’ मिळाला. अन्यायाविरोधात लोक आता कोणाचे नेतृत्व नसले, तरी संघर्ष करीत आहेत. जिवंत, सशक्त, सळसळत्या लोकशाहीसाठी हे आश्वासक चित्र आहे. समाजाच्या सर्व थरांत सध्या घुसळण सुरू आहे. हे सारे नेमके आताच का घडत आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा केलेला हा प्रयत्न....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #LADHALOKPALCHAUDREKAAMADMICHA #LADHALOKPALCHAUDREKAAMADMICHA #लढालोकपालचाउद्रेकआमआदमीचा #POLITICS&GOVERNMENT #MARATHI #DHANANJAYBIJALE #धनंजयबिजले "
Customer Reviews
  • Rating StarDaily Sakal – 23-11-14

    देशात सध्या तरुणवर्गाची संख्या वाढतेय. २०२०मध्ये याच तरुणाईची संख्या ५५ कोटीच्या घरात जाईल. तरुण मंडळी अन्यायाच्या विरोधात पटकन सक्रिय होतात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत लोकपाल कायद्यासाठी आंदोलन केलं आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगयांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला लोकपाल कायदा करावा लागला. अण्णांच्या आंदोलनाचा जोरच इतका होता, की या कायद्याला संसदेत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. अण्णांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून हा कायदा झाला. इतकच नाही तर दिल्लीत आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सरकारही स्थापन झालं. अण्णांचं आंदोलन आणि केजरीवाल यांच्या सरकारची स्थापना या घटनाक्रमाची सविस्तर नोंद हे पुस्तक घेतं. पत्रकार धनंजय बिजले यांनी या आंदोलनामागचे प्रवाह आणि त्यातील सहभागी मंडळींच्या कार्याची नेमकी माहिती दिली आहे. अण्णांच्या या आंदोलनापूर्वींच्या राज्यातील विविध प्रश्नांसंबधीच्या आंदोलनांचीही माहितीही या पुस्तकात त्यांनी दिली आहे. अकरा प्रकरणांमध्ये या आंदोलनाची माहिती देतानाच बिजले यांनी केजरीवाल यांचीही सविस्तर माहिती दिली आहे. सरकारी सेवेत प्रवेश केल्यावर त्यांना आलेले विचित्र अनुभव आणि मग त्यांनी जनआंदोलनात घेतलेला पुढाकार हे सगळं या पुस्तकामुळं नीटपणानं समजून घेता येतं. लोकपालच्या प्रश्नावरून देशात एक आंदोलन अत्यंत कमी वेळात कसं उभं राहिलं आणि त्याची व्याप्ती कशी पसरली, याचा सगळा प्रवास या पुस्तकातून समजून घेता येतो. आज केजरीवाल सत्तेच्या परिघातून बाहेर फेकले गेले आहेत; पण त्या मंतरलेल्या दिवसाच्या काळातील सा-या घटना या पुस्तकामुळं ताज्या होतात. केजरीवाल आणि अण्णांच्या आंदोलनाचा परिणाम आणि त्या काळात नेमकं काय घडल, हे समजून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक उपयोगी ठरतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more