* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: MANS SEARCH FOR MEANING
 • Availability : Available
 • Translators : VIJAYA BAPAT
 • ISBN : 9788184980721
 • Edition : 7
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 148
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
A PROMINENT VIENNESE PSYCHIATRIST BEFORE THE WAR, VIKTOR FRANKL WAS UNIQUELY ABLE TO OBSERVE THE WAY THAT HE AND OTHER INMATES COPED WITH THE EXPERIENCE OF BEING IN AUSCHWITZ. HE NOTICED THAT IT WAS THE MEN WHO COMFORTED OTHERS AND WHO GAVE AWAY THEIR LAST PIECE OF BREAD WHO SURVIVED THE LONGEST - AND WHO OFFERED PROOF THAT EVERYTHING CAN BE TAKEN AWAY FROM US EXCEPT THE ABILITY TO CHOOSE OUR ATTITUDE IN ANY GIVEN SET OF CIRCUMSTANCES.NNTHE SORT OF PERSON THE PRISONER BECAME WAS THE RESULT OF AN INNER DECISION AND NOT OF CAMP INFLUENCES ALONE. ONLY THOSE WHO ALLOWED THEIR INNER HOLD ON THEIR MORAL AND SPIRITUAL SELVES TO SUBSIDE EVENTUALLY FELL VICTIM TO THE CAMP`S DEGENERATING INFLUENCE - WHILE THOSE WHO MADE A VICTORY OF THOSE EXPERIENCES TURNED THEM INTO AN INNER TRIUMPH.NNFRANKL CAME TO BELIEVE THAT MAN`S DEEPEST DESIRE IS TO SEARCH FOR MEANING AND PURPOSE. THIS OUTSTANDING WORK OFFERS US ALL A WAY TO TRANSCEND SUFFERING AND FIND SIGNIFICANCE IN THE ART OF LIVING.
दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वत:च्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या , तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनानेही वैÂदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते...
Video not available
Keywords
MANS SEARCH FOR MEANING, VIKTOR E. FRANKL, DR. VIJAYA BAPAT , UPODGHAT, CONTRATION CAMP, LOGOTHEROPHY, THODE AJUN, SHOKATMA AASHAVADACHYA PUTHYARTHA, UPSANHAR,
Customer Reviews
 • Rating StarHrishikesh Pawar

  अर्थाच्या शोधात हे Man search for meaning या जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवाद आहे . या पुस्तकाची सुरुवात व्हिक्टर फ्रँकल यांच्या कहाणीने होते. व्हिक्टर फ्रँकल व्हीएन्नामधील एक मानसशास्त्रज्ञ होते . दुसऱ्या महायुद्धात त्यांची रवानगी नाझींच्या छळछावण्यांमध्े झाली. तेथेच त्यांनी जीवनाला अर्थ देणारी `लॉगोथेरपी` शोधुन काढली.नंतर त्यांची छळछावण्यामधून सुटका झाल्यावर, त्यांनी झपाटलेल्या अवस्थेत नऊ दिवसात, एक पुस्तक लिहले ते म्हणजेच `Man search for meaning` ज्यामध्ये लोगोथेरपी दिली आहे. लोगोथेरपीचा लाखो लोकांवर प्रभाव पडल्यामुळे , ह्या पुस्तकाचा नंतर 24 भाषेत अनुवाद झाला.*लोगोथेरपी म्हणजे काय ? हे सविस्तर समजुन घेण्यासाठी अर्थांच्या शोधात पुस्तक वाचावे लागेल . ...Read more

 • Rating StarVinay Nandurdikar

  Viktor Frankl लिखित "Man`s Search For Meaning" या पुस्तकाचा "अर्थाच्या शोधात" हा विजया बापट यांनी केलेला अनुवाद नुकताच वाचला. १९४६ साली सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या या पुस्तकात मानसशास्त्रज्ञ असलेल्या Viktor Frankl यांचे नाझी कॅम्पमध्ये कैदेत असतानचे हृदय पिळवटून टाकणारे असे अनुभव आहेत. Viktor Frankl हे " लोगॉथेरपी" या मानसशास्त्रीय उपचार पद्धतीचे जनक आहेत. या उपचार पद्धतीची विस्ताराने माहिती पुस्तकाच्या उत्तरार्धात आहे. आयुष्य जगण्यासाठी एखादे ध्येय उराशी बाळगले पाहिजे यावर प्रामुख्याने पुस्तकात भर दिलेला आहे आणि हेच या उपचार पद्धतीचे मूळ आहे. कोणत्याही दुःखद प्रसंगात तुम्ही सकारात्मकतेने परिस्थितीवर मात करू शकता याचे अनेक दाखले त्यांनी दिले आहेत . एक व्यक्ती त्यांच्याकडे आला कारण त्याचे हस्ताक्षर खराब येत होते . त्याला त्यांनी अजून खराब हस्ताक्षर काढण्याचा सल्ला दिला. आणि जाहले उलटेच, तो पहिल्यापेक्षा चांगले हस्तक्षर गिरवू लागला. हे उदाहरण म्हणजे लोगॉथेरपी या उपचार पद्धतीचा एक छोटा भाग आहे. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या, व्यसनाधीन आणि आजूबाजूच्या बऱ्या-वाईट परिस्थिमुळे संभ्रमावस्थेत असे जगणाऱ्या एखाद्याला जर हे पुस्तक मार्गदर्शक ठरले तर नवल वाटायला नको . ...Read more

 • Rating StarShrish Deshpande

  फार चांगलं पुस्तक. मरगळलेल्या मनासाठी उत्तम आधार. Greater than self साठी self evaluation & meaning शोधणारांसाठी बेस्ट

 • Rating StarDAINIK PUNYANAGARI 4-4-2010

  व्हिक्टर फ्रॅन्कलचे ‘मॅन्स सर्च फॉर मिनिंग’ या पुस्तकाचा अनुवाद डॉ. विजया बापट यांनी केला आहे. या पुस्तकाच्या इंग्रजीत शंभर आवृत्त्या निघाल्या आहेत. जगातील विविध भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली आहेत. लक्षावधी प्रती खपण्याचे भाग्य या पुस्तकाला लाभले हे. या पुस्तकाचे वैशिष्ट्ये म्हणजे उत्तरार्धात सांगितलेली ‘लोगोथेरपी’ ही उपचारपद्धती लेखकाला ज्यूंच्या यातना शिबिरातून अनुभवण्यास आले. त्यानंतर या कॅम्पमधून बाहेर पडल्यावर लेखकाने झपाटल्यासारखी नऊ दिवसात हे पुस्तक लिहून पूर्ण केले. त्याचे झपाटलेपण या पुस्तकात अधोरेखित होते हे नक्की. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SECOND LADY
SECOND LADY by IRVING WALLACE Rating Star
SANDIP CHAVAN

सेकंड लेडी ही आयर्विंग वॅलेस या अमेरिकन लेखकाची गाजलेली रहस्यकथा (कादंबरी) आहे. याचा मराठी अनुवाद रवींद्र गुर्जर यांनी केलेला आहे. रशियाची गुप्तचर संस्था केबिजी, अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नीची हुबेहूब नक्कल (डमी) तयार करते. अमेरिका अध्यक्षांची खर पत्नी जेव्हा एका ठरलेल्या कार्यक्रमासाठी मॉस्को मध्ये येते तेव्हा तिच्या जाग्यावर नकली व्यक्ती अतिशय योजनाबद्ध रीतीने बदलवली जाते. या कामासाठी केबिजीने तीन वर्षे मेहनत घेतलेली असते. या योजनेचा हेतू काय असतो? ही गोष्ट अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला समजते का? अमेरिकी अध्यक्षांना या गोष्टीचा सुगावा लागतो की नाही? केबीसीला हवी असणारी माहिती मिळते की नाही? आणि शेवटी व्हाईट हाऊसमध्ये राहते ती अध्यक्ष्यांची खरी पत्नी असते की खोटी? हे जाणून घ्यायला ही कादंबरी वाचायला हवी. ही कादंबरी वाचताना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या रहस्यकथेत आपण इतके हरवून जातो की काळ- वेळेचे भानही आपल्याला राहत नाही. समोर एखादा हॉलिवूड चित्रपट पाहतोय अशी रंगत ही कादंबरी वाचताना येते. पुढे काय होणार याची उत्कंठा शेवटापर्यंत राहते हे या कथेचे यश आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नी बदलणे आणि तिच्या जागी खोटी व्यक्ती पत्नी म्हणून पाठवणे हे काम म्हणजे थोडी अतिशयोक्ती वाटते. परंतु पूर्वग्रह न ठेवता पुस्तक वाचल्यास वाचक त्यामध्ये हरवून जातो हे निश्चित! ही काल्पनिक कथा वाचत असताना पाश्चात्य लेखकांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते. अनुवादकाने घेतलेली मेहनतही कौतुकास्पद आहे. ...Read more

CORPOKSHETRA
CORPOKSHETRA by DEEPAK KAUL Rating Star
DAINIK LOKMAT 08-12-2019

आधुनिक महाभारताची विनोदी गाथा... महाभारत आणि रामायण तसे हिंदू धर्माची अस्मितेची प्रतिके. लहानपणापासूनच या साहित्याची ओळख आपआपल्यापरीने प्रत्येक कुटुंबात करून दिले जाते. पण तुमच्या हातात जर हेच महाभारत, त्यातील सर्व पात्रे फक्त आधुनिक व कॉर्पोरेट क्षत्राशी संबंधित पद्धतीने जुळवून आले तर किती आनंददायी अनुभव असेल नाही का? कॉर्पोक्षेत्र हे पुस्तक म्हणजे एमबीए युगातील महाभारत वाचकांसमोर ठेवते. त्यातून मराठी वाचकांना हे पुस्तक पुराणातील अनुभव देण्यासोबतच आधुनिक दृष्टी देईल. आजच्या काळात महाभारतातील पात्रांशी काही संबंध शोधण्याचा प्रयत्न करेल. कॉर्पोक्षेत्र यातील कथा ज्या रंजक शैलीने आणि विनोदीपद्धतीने मांडतानाच युवकांचा विचारप्रवाह बदलू शकेल इतकी सामथ्र्यशाली आहे. महाभारताची आधुनिक ही गाथा मनोवेधक आहे. -दीपक कुलकर्णी ...Read more