* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A NEW EARTH
  • Availability : Notify Me
     
  • Translators : NILIMA JOSHI
  • ISBN : 9789387319974
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ECKHART TOLLE`S A NEW EARTH WILL BE A CORNERSTONE FOR PERSONAL SPIRITUALITY AND SELF-IMPROVEMENT FOR YEARS TO COME, LEADING READERS TO A NEW LEVELS OF CONSCIOUSNESS AND INNER PEACE. TAKING OFF FROM THE INTROSPECTIVE WORK THE POWER OF NOW, WHICH IS A NUMBER ONE BESTSELLER AND HAS SOLD MILLIONS OF COPIES WORLDWIDE, TOLLE PROVIDES THE SPIRITUAL FRAMEWORK FOR PEOPLE TO MOVE BEYOND THEMSELVES IN ORDER TO MAKE THIS WORLD A BETTER, MORE SPIRITUALLY EVOLVED PLACE TO LIVE. SHATTERING MODERN IDEAS OF EGO AND ENTITLEMENT, SELF AND SOCIETY, TOLLE LIFTS THE VEIL OF FEAR THAT HAS HUNG OVER HUMANITY DURING THIS NEW MILLENNIUM, AND SHINES AN ILLUMINATING LIGHT THAT LEADS TO HAPPINESS AND HEALTH THAT EVERY READER CAN FOLLOW.
एकदा का मनुष्याला आपल्या स्वत:मधल्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याचं अवधान जागृत झालं की, स्वत:च्या ठिकाणचा दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली चेतना एक आहेत याची त्याला जाणीव होते. त्या जीवाविषयी त्याला प्रेम वाटू लागतं. जोवर हे घडत नाही तोवर बहुतेक लोक बाह्यरूपाकडे, मनोकायिक अस्तित्वाकडेच पाहतात. स्वत:च्या आणि आंतरिक चेतनेचं त्यांना भान नसतं. ज्यांना हे भान असतं त्यांना भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी अधिक आहे, याची जाणीव असते. बुद्ध, जीझस आणि अन्य अनाम आत्मे मनुष्य चेतनेच्या बहराची उमलण्याची साक्ष आहेत. त्यांनी मनुष्यजातीला दिलेल्या संदेशांचे आज विकृतीकरण झाले आहे. मनुष्यजातीची मनोरचना यांत्रिक झाली आहे. तिच्या जडतेतून चैतन्याचा प्रकाश आरपार जाऊन ती पारदर्शक होईल का? नाम, रूप, व्यक्तिमत्त्व, अहं यांच्या पिंजऱ्यातून ती मुक्त होईल का? या आंतरिक परिवर्तनाची गती कशी वाढवता येईल? अहं केंद्रित अशा चेतनेच्या प्राचीन काळापासून असलेल्या स्थितीला कसं ओळखायचं? नव्याने उदित होत असलेल्या मुक्त चेतनेची तरी खूण काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि सृष्टिविकासाला अनुकूल अशी नवी जीवनपद्धती या पुस्तकात सांगितली आहे. अहंकाराला दूर सारून चेतना जागरणाची सुरुवात करणं आणि स्वरूपाचा म्हणजे स्वत:चा शोध घेणं हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EARTH# ECKHART TOLLE# EGO BETTER LIFE# SPIRITUALITY# RELIGION# TRANSFORMATION# INNER BODY# FORGETFULNESS# PEACE# HUMANITY# MATERIALITY# TRUE IDENTITY# PAIN-BODY# HAPPINESS# PARENTING# A NEW EARTH# AVANI EK NAVI# NILIMA JOSHI# मानवी चेतना# आध्यात्मिकता# धर्म# अहंता# अहंकार# तादात्म्यता# अस्तित्व# व्यथाशीर# भावना# स्वरूपाचा शोध# जागृत चेतना# मानवाचा स्थायीभाव# शांती# आतील अस्तित्वाची जाणीव# नवी चेतना# नवी धरा# मनुष्य जातीची विकृती# स्वामित्वाचा भ्रम# नीलिमा जोशी# अवनी एक नवी# एकहार्ट टोले# अ न्यू अर्थ#
Customer Reviews
  • Rating StarlOKPRABHA - 24-09-2021

    स्व-शोधाचा मार्ग... मन एकाग्र करण्यात षड् रिपूंमुळे अडचणी येतात. या षड् रिपूंमधील एखादा विकारसुद्धा माणसाला शांतता, स्वस्थता आणि आरोग्य लाभू देत नाही. हे सर्वच विकार मानवाच्या ठायी मोठ्या प्रमाणात असतील, तर त्याचे जीवन नरकयातनांनी भरून जाते, यात शंकच नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांना दूर सारणे सोपे नसले, तरी ते अशक्य नक्कीच नाही. ‘अवनी एक नवी’ या पुस्तकात लेखक एकहार्ट टोले हेच सांगू पाहतात. चेतना जागरणाचा प्रारंभ करण्यास आणि स्वत:चा शोध घेण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते. पुस्तकात एकूण १० प्रकरणे आहेत. ज्याला इथे संवाद म्हटले आहे. या वेगवेगळ्या संवादांत मनुष्याच्या दु:खाचे मूळ म्हणजेच षड् रिपू आणि त्यांच्याशी निगडित प्रसंग मांडले आहेत. त्यातून संदेश दिले आहेत. अस्मिता म्हणजे ‘मी पणा’ची जाणीव. परंतु, मीपणा हे आध्यात्मिक दृष्टीने अज्ञान आहे. आपण जेव्हा मी या शब्दाचा उपयोग करतो, तेव्हा बहुतेक वेळा आपला अहंकारच बोलत असतो. प्रत्येक व्यक्तीचा अहंकार स्वतंत्र असतो, असे लेखक सांगतात. आपल्या दु:खाचे, अस्वस्थतेचे मूळ अहंकारात आहे. ‘अहंकार असतो तरी कसा?’ याचा सविस्तर ऊहापोह करत लेखकाने अहंकाराची विविध रूपं आपल्यासमोर उलगडली आहेत. ‘अहंकाराची व्याधी रूप’, ‘अहंकार आणि कीर्ती’, ‘व्याधिग्रस्त अहंकार’, ‘अहंकारासहित कर्म आणि अहंकाररहित कर्म’ अशा कित्येक पाठांतून आपल्यातील अहंकाराची जाणीव, ओळख लेखकाने करून दिली आहे. अहंकार दूर करण्यासाठी महत्त्वाची आहे ती जाणीव, स्वत:ची, स्व-अस्तित्वाची. मानवाला एकदा आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली, त्याचं अवधान जागृत झालं, की स्वत:तील दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली चेतना एक आहेत, याचे आकलन त्याला होते. त्या जीवाविषयी त्याला प्रेम वाटू लागते. जोवर हे घडत नाही तोवर बहुतेक लोक बाह्यरूपाकडे, मनोकायिक अस्तित्वाकडेच पाहतात. स्वत:च्या आणि आंतरिक चेतनेचे त्यांना भान नसते. आपण सदाचारी होण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र जोवर चेतनेचे परिवर्तन होत नाही. तोपर्यंत प्रयत्न यशस्वी होत नाहीत. ज्यांना हे भान असते त्यांना भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी अधिक आहे, याची जाणीव असते. ही जाणीव जागृत करण्याचे काम अनेक संत महात्म्यांनी केले आहे. त्याचीही शिकवण पुस्तकात ओघाने येते. उपनिषदे, बौद्ध वाङ्मय, चिनी अध्यात्म, जे. कृष्णमूर्ती आणि खिस्त साधना या सर्वांचे संदर्भ लेखकाने दिले आहेत. त्यातून त्यांचा इतर धर्मांचा सखोल अभ्यास दिसून येतो. जुन्या काळापासून जपलेल्या आणि जागृत असलेल्या प्रत्येकाच्या सूक्ष्म शरीरातल्या नकारात्मक भावनांना लेखकाने व्यथाशरीर हे नाव दिले आहे. हे सांगतानाच लेखक आपल्या अशांत मनातील वेदना संपवण्याचा मंत्र देतात. सृष्टी विकासाला अनुकूल अशी नवी जीवनपद्धती या पुस्तकात सांगितली आहे. अहंकाराला दूर सारून चेतना जागरणाची सुरुवात करणे आणि स्वरूपाचा म्हणजे स्वत:चा शोध घेणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. पुस्तकाचा अनुवाद नीलिमा जोशी यांनी केला आहे. लेखकाचे मुद्दे अथवा प्रेरणा तितक्याच प्रभावीपणे आणि परिपूर्ण शब्दांत त्यांनी मांडल्या आहेत. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-07-2018

    सध्याच्या धावपळीत जगात आपण नको तितका विचार करतो, नको तेवढ्या गोष्टींच्या मागे धावतो आणि जगण्यातील निखळ आनंद हरवून बसतो. लोक आपल्याला काय म्हणतील? मित्र, कुटुंब आणि शेजारच्यांच्या तुलनेत आपण कुठे, कसे आहोत, याचा विचार करतो आणि आत खोलवर कुठेतरी आपल्याल चिंता वाटते, की जसे आपण इतरांच्या दृष्टीत असायला हवे, तसे नाही आहोत की काय? हे पुस्तक स्वत:चा शोध घ्यायला लावते. प्रसन्नतेचे आणि मुक्तपणे जीवन जगायला लावण्याची सवय त्यामुळे लागेल. ‘जाऊ या उन्नत जगाकडे’ हा मंत्र लेखकाने अधोरेखित केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती