* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO WIN FRIENDS & INFLUENCE PEOPLE
  • Availability : Available
  • Translators : SHUBHADA VIDVANS
  • ISBN : 9788184983098
  • Edition : 10
  • Publishing Year : NOVEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Sub Category : FAMILY & RELATIONSHIPS, PARENTING
  • Available in Combos :DALE CARNEGIE COMBO SET- 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FOR MORE THAN SIXTY YEARS THE ROCKSOLID, TIMETESTED ADVICE IN THIS BOOK HAS CARRIED THOUSANDS OF NOW FAMOUS PEOPLE UP THE LADDER OF SUCCESS IN THEIR BUSINESS AND PERSONAL LIVES. NOW THIS PREVIOUSLY REVISED AND UPDATED BESTSELLER IS AVAILABLE AS EBOOK FOR THE FIRST TIME TO HELP YOU ACHIEVE YOUR MAXIMUM POTENTIAL THROUGHOUT THE NEXT CENTURY! LEARN:THREE FUNDAMENTAL TECHNIQUES IN HANDLING PEOPLE.THE SIX WAYS TO MAKE PEOPLE LIKE YOU . THE TWELVE WAYS TO WIN PEOPLE TO YOUR WAY OF THINKING.THE NINE WAYS TO CHANGE PEOPLE WITHOUT AROUSING RESENTMENT
तुम्हाला तुमच्या पसंतीचे काम हवे आहे का? ते तुम्हाला सहज मिळेल. तुम्हाला जे काम मिळाले आहे ते तुम्ही आवश्य घ्या आणि त्यामध्ये अधिक सुधारणा करा. तुम्ही कोणत्याही संकटात सापडला असाल तर त्याचा उपयोग संधी म्हणून करा. डेल कार्नेगी ह्यांच्या अजरामर आणि काळाच्या कसोटीला उत्तरलेल्या उपदेशांमुळे आज अगणित लोकांनी यशाचे शिखर गाठले आहे. त्यांना व्यावसायिक यश तर मिळालेच पण त्यांचे व्यक्तिगत आयुष्यही समृद्ध झाले. त्यांच्या कालातील अनेक उत्तम मार्गदर्शनपरपुस्तकांपैकी `मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा` हे पुस्तक तुम्हाला पुढील गोष्टी शिकवते. * लोकांना तुम्ही आवडावे म्हणून करायच्या सहा युक्त्या. * लोक तुमच्याशी सहमत व्हावेत म्हणून करायच्या बारा युक्त्या. * लोकांना राग न येऊ देता त्यांच्यात बदल घडवून आणण्याच्या सहा युक्त्या. आणि आणखीही खूप काही. `मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा` ह्या पुस्तकाचा जास्तीत जास्त लाभ घ्या.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MITRAJODAANILOKANVARPRABHAVPADA #LOKANSHIKASEVAGAVE #YABADDALCHIMULBHUT TANTR #LOKANAJINKUNGHENYACHAMULMANTRA #NETRUTVASWIKARA #LAKSHANIYAYASHMILAVINYACHAZATPATMARG
Customer Reviews
  • Rating StarNilesh Shinde

    लेखमाला - भाग पहिला लेखकाविषयी : माणूस नावीन्यपूर्ण कल्पनेने पछाडलेला आणि उत्साहाने भारलेला असेल तर तो मोठे यश मिळवू शकतो हयाचे उत्तम उदाहरण म्हणजे "डेल कार्नेगी" त्यांचा जन्म वायव्य अमेरिकेतील मिसुरी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबातला झाला. एकेकाळी काऊबाँय असणारा मुलगा पुढे जाऊन मोठमोठ्या कंपन्यांच्या उच्चाधिकार्यांना व्यक्त कसे व्हावे हे शिकवणारा सर्वात जास्त फी आकारणारा प्रशिक्षक बनेल असे स्वप्नात सुद्धा कुणाला खरे नसते वाटले. घरचे अठराविश्व दारिद्रय ,काबाडकष्ट आणि कर्जाचा वाढता डोंगर हया कशानेच नाउमेद न होता शिकत होता. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्न करून त्याने वक्तृत्व कलेवर प्रभुत्व मिळवले. शिक्षणांतर काही काळ विक्रेत्याचे काम करून काही काळ अभिनय केल्यानंतर त्याला लेखक होण्याचे वेध लागले. दिवसभर पुस्तक वाचन लिखाण आणि रात्री प्रौढ शिक्षण वर्ग असा त्याचा दिनक्रम बनला. त्यांचे पब्लिक स्पिकींग कोर्स अल्पावधीतच लोकप्रिय झाले त्यांचे विद्यार्थी असलेले व्यवसायिक नोकरदार हयांना मित्रांवर छाप पाडायची, व्यवसाय नोकरीत तत्काळ वापरता येतील अशी व्यवहारी तंत्र जाणून घ्यायची होती त्यानुसार त्यांनी व्यावहारिक शहाणपणाचा कोर्स बनवला ज्यात भाषण,विक्री, नातेसंबंध आणि हयासर्वामागचे मानसशास्त्र शिकवायचे त्यांनी ठरवले हयातूनच पुढे ज्या पुस्तकाचा जन्म झाला ते म्हणजे " मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा" पुस्तकाविषयी : हया पुस्तकातून लेखकाने लोकांना कसे हाताळावे जेणेकरुन ते तुमचे ऐकतील, तुमच्या विचारांशी सहमत होतील, तुमचे जिवलग बनतील. लोकांवर छाप पडण्यासाठी लागणारी संवाद कौशल्य आणि पथ्ये सांगितली आहेत. लोकांना प्रेमाने जिंकण्यासाठी वादविवाद कसे टाळावेत तसेच चांगले वागण्यासाठी आव्हान कसे द्यायचे तसेच प्रतिकूल परिस्थितीत संयम ढळू न देता बाजी कशी पलटवायची याची सूत्रे सांगितली आहोत तसेच लोकांना राग येऊ न देता टीका न करता त्यांच्यात बदल कसे घडवायचे त्यांच्या चुका सह्रदयतेने कशा सुधारायच्या हयाबाबत पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. ...Read more

  • Rating StarVaibhav Pathrudkar

    संग्रही असावे असे सुंदर पुस्तक.

  • Rating StarChandrashekhar Sakpal

    वाचून पूर्ण...... thank you so much

  • Rating StarDhanraj Bhandare April 8

    डेल कार्नेगी यांनी लिहलेले - मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा हे पुस्तक नुकतेच वाचुन झाले त्या विषयी हे एक कृतीशील असे पुस्तक असुन आपला भविष्यकाळ अधिक आणि अधिक आनंददायी व यशस्वी व्हायला हवा असे आपना सर्वानांच वाटते अश्या प्रत्येकांनी किमान एक वेळ तरी हे पुस्तक वाचायला हवे किती तरी वेळा आपन सर्वत्र अनुभव घेत असतो रोजचे आयुष्य जगतेवेळी विनाकारण किती वाद होत असतात हे आपन पाहतो. आपला मराठी माणूस तर मोडेल पन वाकणार नाही हीच वृत्ती ठेऊन वागत असतो (मोडल्यानंतर कोणतीही गोष्ट पहिल्या सारखी होईल का ? ) शकतो एक घाव दोन तुकडे करण्यापेक्षा यात सुर्वणमध्ये नेहमीच वर्तमान व भविष्यासाठी फलदायी असतो. आयुष्यातील किती तरी वादविवाद निव्वळ शब्दाने शब्द वाढल्याने होत असतात या कार्नेगी सरांनी या मध्ये अंत्यत सोप्या शब्दात हजारो उदाहरणे देऊन वाद विवाद कसे टाळता येतात हे यात सांगितले आहे ते असे सांगतात कि व्यक्ती कितीही छोटा असु द्या आत्मसन्मान त्यांच्यात असतोच लोकांना स्वतः विषयी बोलणे आवडते या बाबत कार्नेगी सर म्हणतात की लोक तुमच्यात रूची घेत नाहीत ना ते माझ्यात घेतात ते अगदी तिन्ही त्रिकाळ फक्त स्वतः मध्ये रूची घेतात अगदी सकाळी दुपारी रात्री जेवणानंतर सुध्दा एखाद्या माणसाला दुखःवल्याने त्यांच्या मनात रागाची भावना ईतकी तीव्र असते की मृत्यू नंतरही शोकाच्या ऐवजी त्याने केलेला अपमानच आठवतो यातुन प्रत्येकाने बोध घेतला पाहिजे की आपन कधी कधी आपल्या जीभेवरचा ताबा सुटल्याने व क्षणिक रागामुळे एखाद्याचे मन कायमचे दुरावेल अशी कृती कटाक्षाने टाळायला हवी वादविवाद जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वादविवाद टाळा नेहमीच इतरांच्या मनाचा आदर करा तुम्ही चुकला असे म्हणने शक्यतो टाळा पुढच्या व्यक्तीचे नेहमी शांतपणे ऐकून घ्यायला हवे चांगल्या वक्ता होण्याचा आपन प्रयत्न करतो पन कधी आपणास चांगला श्रोता व्हायला पाहिजे हे कोणीही आपणास सांगत नाही ते यातुन समजते कितीही नाजुक प्रसंगात मनावर ताबा असायला हवा आरडाओरडा केल्याने समस्या कधीच सुटणार नाही मात्र परिस्थिती आणखीण बिकट होईल असे कार्नेगी म्हणतात आपली चुक आपन मान्य केली तर तुम्ही कधीच अडचणीत येऊ शकत नाही त्यामुळे सगळे वादविवाद मिटतात आणि तुमच्या विरोधकालासुध्दा न्याय बुध्दीने वागण्याची स्फुर्ती मिळते हे लक्षात असू द्यावे या बाबत त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. समोरच्याशी बोलताना आधी त्याचे कौतुक करा ज्याला नेतृत्व करायचे आहे त्याने ही हातोटी वापरायला हवी एखाद्या कठीण प्रसंगात व्यक्ती ने कसे तोंड द्यायला हवे या बद्दल ते सांगतात की थिओडोर रूझवेल्ट यांच्या कारकिर्दीत एखाद्या बाबतीत कठीण प्रसंगात निर्णय घ्यायचा प्रसंग आला तर ते White House मधील लिंक न यांच्या तैलचित्रा कडे पाहुन स्वतःला असे विचारत असे जर माझ्या जागी लिंकन असते तर त्यांनी ही समस्या कशी सोडवली असती. या पुस्तकातील एक उतारा जो मला खुप आवडला तो असा आहे `आपन कसे असायला हवे व आपण काय आहोत अशी स्वतःशीच तुलना केली तर आपण अर्धजागृत आहोत अशी आपली खात्री पटते. आपण आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा फारच थोडा वापर करतो. अधिक सुस्पष्टपणे सांगायचे झाले,तर प्रत्येक माणुस स्वतःभोवती कुंपण घालून जगतो. त्याच्याकडे इतक्या अनेक प्रकारच्या अर्मयाद क्षमता असतात,पण त्याच्या सवयीमुळे त्यांचा वापर करण्यात तो अपयशी ठरतो.` शेवटी एवढच सांगेन की हे पुस्तक वाचून आपन कसे वागायला हवे हे जरी नाही शिकलो तरी कसे वागू नये हे मात्र नक्की शिकतो! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more