* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE JOY OF CANCER
  • Availability : Available
  • Translators : MADHURI SHANBHAG
  • ISBN : 9788177664348
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS IRONICAL THAT IN THE FACE OF DEATH, I BEGAN, FOR THE FIRST TIME, TO REALLY LIVE." BY THE TIME ANUP KUMAR DISCOVERED HE HAD CANCER, IT HAD ALREADY ADVANCED TO THE LAST STAGES AND HE WAS TOLD HE HAD FOUR MONTHS TO LIVE. THE JOY OF CANCER IS THE OUTCOME OF THE EMOTIONAL AND PHYSICAL ANGUISH THAT FOLLOWED, BUT EVEN MORE, IT IS ABOUT THE POWER OF THE HUMAN MIND AND BODY TO REVERSE A DEATH SENTENCE. IT IS SAID THAT THE ONLY REAL EXPERTS ON CANCER ARE THOSE WHO HAVE SUFFERED FROM IT. THEY WILL TELL YOU THINGS THAT DOCTORS WON`T. ON HOW TO ACCEPT THE PRESENCE OF CANCER IN YOUR LIFE, FOR INSTANCE AND HOW TO CONQUER FEAR. ON THE REAL SIDE-EFFECTS OF CHEMOTHERAPY AND THE PRECAUTIONS YOU SHOULD TAKE. THE JOY OF CANCER ADDRESSES ALL THESE QUESTIONS AND MORE. WRITTEN IN THE FORM OF A GUIDE, IT ENUMERATES A SEVEN-POINT BATTLE PLAN AGAINST CANCER. THE BASIC PREMISE OF THIS PLAN IS THAT SURVIVAL IS AS MUCH IN THE HANDS OF THE PATIENT AS THE DOCTOR
कॅन्सरसारख्या रोगाशी लढणं सोपं नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कॅन्सरचं निदान होतं, तेव्हा त्या व्यक्तीची आणि कुटुंबीयांची काय अवस्था होते, या रोगाचे आर्थिक, कौटुंबिक परिणाम कसे होतात, त्या रोगावर कोणते उपचार केले जातात, उपचारांदरम्यान त्या रोग्याची मानसिक, शारीरिक स्थिती काय असते आणि या रोगाला धीरादात्तपणे कसे सामोरे जावे याची माहिती देणारं पुस्तक आहे, ’द जॉय ऑफ कॅन्सर.’ अनुपकुमार यांच्या स्वानुभवातून साकारलेलं हे पुस्तक आहे. एका आंतररराष्ट्रीय कंपनीत उपाध्यक्षपदावर काम करणार्‍या अनुपकुमार यांची नोकरी गेली. वयाची पन्नाशी उलटलेली, मुलीचं लग्न तोंडावर आलेलं, जाहिरात क्षेत्र मंदीच्या लाटेखाली होतं; त्यामुळे नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होत नव्हत्या. ज्या होत होत्या त्या तरुणांसाठी होत्या. एकूण अशी निराशाजनक परिस्थिती असताना अबुधाबीतील एका दूरसंचार संस्थेने त्यांना मुलाखतीसाठी बोलावले. त्या नोकरीसाठी अनुपकुमार यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्या तपासणीदरम्यान त्यांच्या फुफ्फुसावर डाग असल्याचे आढळले आणि मग तपासण्यांचे चक्र चालू झाले. त्या तपासण्यांमधून त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा कॅन्सर चौथ्या स्टेजला लक्षात आल्याने अनुपकुमार चार महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाहीत, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं; त्यामुळे त्यांच्यावर केमोथेरपीचे उपचारही करू नयेत, असंही डॉक्टर म्हणाले होते; पण अनुपकुमार यांना जगायची तीव्र इच्छा होती. म्हणून त्यांनी केमोथेरपी करायचे ठरवले. केमोथेरपीदरम्यान शारीरिक गुंतागुंत निर्माण झाली; त्यामुळे त्यांना मरणप्राय यातना सोसाव्या लागल्या. त्याचदरम्यान त्यांच्या चालू असलेल्या क्ष-किरण तपासण्या, सीटीस्कॅन त्यांचा कर्करोग हटत असल्याचे दाखवत होत्या. सहा महिन्यांच्या या वेदनामय कालखंडात या पुस्तकाचा बराचसा भाग त्यांनी लिहिला. स्वत: कर्करोगाशी झुंजत असताना कर्करोगाच्या इतर रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी ते संपर्क साधत होते. त्याचाही हे पुस्तक लिहिताना त्यांना फायदा झाला. या पुस्तकात त्यांनी कर्करोगाशी लढण्याचा सातकलमी कार्यक्रम सांगितला आहे. पहिल्या कलमात कर्करोगाचा स्वीकार कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. दुसर्‍या कलमात तुम्ही तुमचे उपचार आणि डॉक्टर कसे निवडाल हे सांगितले आहे. तिसर्‍या कलमात सकारात्मकतेची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. चौथ्या कलमात कुटुंबाच्या, स्नेह्यांच्या आधाराची मांडणी कशी करावी, हे सांगितलं आहे. पाचव्या कलमात उर्वरित आयुष्यासाठी ध्येयनिश्‍चिती कशी करावी, याबद्दल लिहिले आहे. आरोग्याकडे नेणारा मार्ग मन:चक्षूने कसा पाहावा, हे सहाव्या कलमात सांगितले आहे आणि सातव्या कलमात आहार नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले आहे. सगळ्या उपचारांनंतर त्यांना जेव्हा बरं वाटू लागलं त्यानंतरचं त्यांचं जीवन, कॅन्सर परत उद्भवला तेव्हाही त्यांनी त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं, याबद्दलही त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. या पुस्तकाच्या शेवटी नोंदवलेल्या परिशिष्टामध्ये त्यांनी कर्करोग म्हणजे काय, कर्करोग कशामुळे होतो, कर्करोगाचे प्रकार, कर्करोगाच्या खुणा आणि लक्षणे, कर्करोगावरील उपचार, उपचारांचे आनुषंगिक परिणाम, उपचार चालू असताना घ्यावयाची दक्षता, भविष्यातील कर्करोग उपचार काय असतील याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच विविध कर्करोग संस्था आणि त्यांच्याकडून मिळणार्‍या मदतीचे स्वरूप याविषयी माहिती दिली आहे. कर्करोगाशी संबंधित इंठाजी शब्द आणि त्यांचे अर्थ समाविष्ट केले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#CANCER #ANUPKUMAR #कॅन्सर #अनुपकुमार
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more