BHASKAR HANDED OVER THE TORCH TO SUMEETA SAYING ‘BE OUR LEADER NOW’. HE TOOK THE LANTERN FROM HER HANDS IN HIS OWN HANDS WHILE ENTERING THE GANDHI GRAM.SOME THOUGHTS CREPT IN HIS MIND.THIS IS NOT THE SUMEETA WHOM I KNEW…SHE IS NOT THE ONE WHOM I HAD SEEN ON THE ROADS OF MY VILLAGE…SHE IS NEITHER THE ONE WHO SEEMED TO BE A BIT MORE WISER AS SHE LEFT THE OLD TEMPLE…HE WAS NOT ABLE TO POINT OUT AS TO WHAT WAS THE EXACT CHANGE THAT HAD TAKEN PLACE.BUT THE SUMEETA THAT HE WAS SEEING NOW WAS SOMEONE NEW, THIS WAS A MIRACLE.
``तू आमचं नेतृत्व कर.`` असं म्हणून भास्करनं
आपल्या हातातील मशाल सुमीताच्या हाती दिली. गांधीग्राममध्ये प्रवेश करता-करता
तिच्या हातातला कंदील आपल्या हातात घेतला.
त्याच्या मनात आलं की,
आपल्या ओळखीची सुमीता ही नव्हे...
प्रथम आपल्याला गावच्या सडकेवर दिसली,
ती ही नव्हे...
त्या जुन्या देवळाबाहेर पडताच
थोडी अधिक शहाणी झालेली, ती ही नव्हेच...
हिच्यात नेमका कोणता बदल झालेला आहे,
हे त्याला सांगता येत नव्हतं;
पण आत्ताची सुमीता ही नवी होती,
एक चमत्कार होता.