* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIYATI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618316
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 1986
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A LONG PATH STRETCHES BEFORE THE EYES. MEANDERING THROUGH THE GREEN FOLIAGE – LONELY! BUT THEN LIFE IS LIKE THAT. THE PATH BECKONS – WITH ITS SCENTS AND SOUNDS. TREES OFFER SHADE. BIRDS SING. STREAMS BURBLE. THE SKY – SOMETIMES OFFERS SHADE, WITH LOVE AND AFFECTION; SOMETIMES SCORCHES. ONE FINDS COMPANIONSHIP; WHICH SOMETIMES BREAKS. ULTIMATELY, MAN IS ALONE…ABSOLUTELY ALONE! THERE IS SOMETHING LIKE THE MIND, BEYOND THE BODY. IF THIS MIND IS MATURE, ONE CAN FIGHT ALL KINDS OF ADVERSITIES, EVEN LONELINESS! JUST PEEP INTO ANY HOUSE, AND YOU SHALL FIND SILENT SUFFERING. THE SUFFERING OF LONELINESS. BUT EACH ONE TO HIS FATE…INEVITABLE FATE!
नजरेसमोर एक लांबसडक वाट असते. हिरव्या वनराईतून गेलेली - निर्मनुष्य - एकाकी! असंच तर असतं जीवन. ती वाट खुणावत असते. सारे गंध, स्वर सभोवताली लवलवत असतात. झाडं सावली देतात. पक्षी रिझवतात. निर्झर गुणगुणतात. आकाश - कधी सावली देत मायेनं गोंजारतं, तर कधी भाजून काढतं. साथ भेटते. तुटते. पण कुणीच कुणाचं नसतं. शेवटी - माणूस एकटाच! एकटा. या शरीरापलीकडे एक मन असतं. ते मन जर प्रगल्भ असेल, तरच साऱ्या संकटांवर मात करता येते. एकटेपणावरही! प्रत्येक घरात, जाता-जाता सहज जरी डोकावलं, तरी एक मूक सल जाणवतो. एकाकीपणाचा सल! ती ज्याची त्याची नियती असते. अटळ नियती!

No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarGAOKARI, NASHIK 05-07-1987

    नाजूक विषयाची समर्थ हाताळणी करणारे : नियती माधवी देसाई यांची नियती ही सामाजिक कादंबरी मन, शरीर, प्रतिष्ठा, प्रारब्ध ह्या सर्व अंगांचा सखोल विचार करून लिहिली गेली आहे. एका नाजूक विषयाची ही कादंबरी आपणासही निश्चित मानवी स्वभावाचा अभ्यास करावयास लावते खोट्या प्रतिष्ठेपायी दिले जाणारे बळी, शारीरिक आकर्षणातून निर्माण होणाऱ्या समस्या व त्यातून निर्माण होणारी तडजोड प्रारब्ध आणि नियतीच्या चक्री वादळातले प्रवासी या सर्व गोष्टींचा लेखिकेने अतिशय सूक्ष्म विचार ह्या कादंबरीत केला आहे. नुसता विचारच नव्हे, तर काही मार्गदर्शनही मिळू शकते. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी मानसी. जिनं कधी दुःखं पाहिलच नव्हतं. ती एका श्रीमंत घरात लग्न करुन येते. आई-वडील सुखावतात तर मानसीच्या दुःखाला प्रारंभ होते. रितेनसारखा सुंदर, रुबाबदार नवरा मिळूनही ती दुःखी असते. रितेनकडून शारीरिक सुख तिला मिळणार नसतं तरी रितेन तिला तिच्या सोबतीची भीक मागतो. २४ तासांची मुदत देतो. दोन मनांच्या संघर्षातून सुसंस्कारी मानसी रितेनचा स्वीकार करते, त्याला सुखी करण्याचा निर्णय घेते. विधवा आत्याच्या शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेला रितेनमधील हा दोष ती सहृदयतेने बाजूला ठेवते. पण विधीलिखीत वेगळेच असते. रितेन फॉरिनला जातो. मानसीची नणंद ४ दिवसांसाठी मानसीला आपल्या घरी घेऊन जाते. रितेन बरोबरचाच तिचा मुलगा संतोष व मानसीची मैत्री जमते. त्यात जे नको घडायला ते घडतं. साधी भोळी मानसी संतोषकडे लग्नाची मागणी करते. संतोष प्रतिष्ठेला सांभाळून असतो. तो छुप्या संबंधासाठी तयार होतो. तर मानसी लग्न करुन उघडपणे संसार मांडायला तयार असते. संतोषच्या नकारानं ती उन्मळून पडते. आपल्या घरी येते. दुःखाचं ताट पुढे वाढून ठेवलेलच असतं. तिला दिवस जातात. घरातल्यांना तोंड दाखवणं मुश्कील होतं. पण सगळा वेगळाच प्रकार दिसून येतो. सासूबार्इंच्या आनंदाला ऊधाण आलेलं असतं. ही दुःखानं पिचून जाते आणि अशातच सासूबाई गौप्यस्फोट करतात. सारा डाव त्यांनीच आखलेला असतो. विधवा आत्यावर मुलाला सोपवणारी आई-आपल्या चुकीचं परिमार्जन अशा रितीने करते. मानसी चक्रावून जाते. तिला माणसाच्या प्रवृत्तींची घृणा आलेली असते. रितेन आल्यावर तोच प्रकार होतो. तो आनंदाने बेहोश होतो. वरील कथा पाहता प्रत्येक पात्र विचार करायला लावणारं असंच आहे. मानसीचा निर्णय, संतोषचा नकार, आत्याचा अतिरेक, आईचा खोटेपणा, रितेनची अनैतिक मूल सांभाळण्याची तयारी ही प्रत्येक घटना काय सांगते ? तर प्रत्येकाला प्रतिष्ठा हवी आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी कोण काय करेल ह्याचा नेम नाही. काही ह्यातले नियतीचे बळी तर काही प्रतिष्ठेचे बळी शेवटी लेखिका म्हणते स्वतःचे दुःख कुरवाळीत बसण्यापेक्षा स्वतःच अंतरंग स्वच्छ मनानं पाहिलं तर कितीतरी संसार सुखी होतील व जीवन सुसह्य होईल. एकंदरीत कठीण विषय लेखिकेने फार सहजतेने हाताळला असून कोणत्याही पात्रावर अन्याय न करता प्रत्येक पात्राची त्याच्या वागण्यामागची कारणमिमांसा शोधून काढली आहे. सुंदर भाषाशैली, काकतालीय न्याय कथेची मांडणी आणि जीवन सुसह्य होण्याचा मार्ग सर्वच काही कादंबरीत सापडते. प्रस्तावनेपासून कादंबरी वाचण्यास सुरुवात करायला हवी. प्रस्तावनादेखील काहीतरी देऊन जाते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more