* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE FIST OF GOD
  • Availability : Available
  • Translators : ANIL KALE
  • ISBN : 9788171619283
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 480
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :FREDERICK FORSYTH COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FROM THE BESTSELLING AUTHOR OF THE DAY OF THE JACKAL, INTERNATIONAL MASTER OF INTRIGUE FREDERICK FORSYTH, COMES A THRILLER THAT BRILLIANTLY BLENDS FACT WITH FICTION FOR ONE OF THIS SUMMER`S--OR ANY SEASON`S--MOST EXPLOSIVE READS! FROM THE BEHIND-THE-SCENES DECISION-MAKING OF THE ALLIES TO THE SECRET MEETINGS OF SADDAM HUSSEIN`S WAR CABINET, FROM THE BRAVE AMERICAN FLIERS RUNNING THEIR DANGEROUS MISSIONS OVER IRAQ TO THE HEROIC YOUNG SPY PLANTED DEEP IN THE HEART OF BAGHDAD, FORSYTH`S INCOMPARABLE STORYTELLING SKILL KEEPS THE SUSPENSE AT A BREAKNECK PACE. SOMEWHERE IN BAGHDAD IS THE MYSTERIOUS "JERICHO," THE TRAITOR WHO IS WILLING--FOR A PRICE--TO REVEAL WHAT IS GOING ON IN THE HIGH COUNCILS OF THE IRAQI DICTATOR. BUT SADDAM`S ULTIMATE WEAPON HAS BEEN KEPT SECRET EVEN FROM HIS MOST TRUSTED ADVISERS, AND THE NIGHTMARE SCENARIO THAT HAUNTS GENERAL SCHWARZKOPF AND HIS COLLEAGUES IS SUDDENLY IMMINENT, UNLESS SOMEHOW, THE SPY CAN LOCATE THAT WEAPON--THE FIST OF GOD--IN TIME. PEOPLED WITH VIVID CHARACTERS, BRILLIANTLY DISPLAYING FORSYTH`S INCOMPARABLE, KNOWLEDGE OF INTELLIGENCE OPERATIONS AND TRADECRAFT, MOVING BACK AND FORTH BETWEEN WASHINGTON AND LONDON, BAGHDAD AND KUWAIT, DESERT VASTNESSES AND CITY BAZAARS, THIS BREATHTAKING NOVEL IS AN UTTERLY CONVINCING STORY OF WHAT MAY ACTUALLY HAVE HAPPENED BEHIND THE HEADLINES.
१९९० साली सद्दाम हुसेनन कुवेतवर आक्रमण केल. त्याआधी काही दिवस इंग्लडमध्ये एक अस्पष्ट रेडिओ-संभाषणं पकडल गेल. त्या संभाषणात ` कुबत-उत-अल्ला` नावाच्या एका अत्यंत गुप्त, महाविध्वंसक शत्राचा उल्लेख होता. हे शस्त्र संयुक्त फौजाचा विध्वंस करणार होत.... हुबेहूब अरबासारख्या दिसेना-या मेजर माइक मार्टिनला, कुवेतमधल्या इराकी फौजांची माहिती काढण्यासाठी आणि इराकला कुवेतमधून गुप्त सशस्त्र विरोध करण्यासाठी कुवेतमध्ये पाठवल गेलं. तिथं मिळालेल्या माहितीमुळे त्यानं चक्क बगदाद मध्ये शिरकाव केला. बगदाद मध्ये त्याला `जेरिको` नावाच्या फितुरांकरवी माहिती गोळा करायची होती.... हे युद्ध जिंकण्याची सद्दामला एवढी खात्री का होती? त्यांन कुवेतमधून बाहेर पडायला का नकार दिला? या प्रश्नाची उत्तर हि कादंबरी वाचल्याखेरीज मिळणार नाहीत?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THEFISTOFGOD #THEAFGHAN #NOCOMEBACKS #दफिस्टऑफगॉड #दअफगाण #नोकमबॅक्स #ANILKALE #BALBHAGWAT #VIJAYDEODHAR #अनिलकाळे #बाळभागवत #FREDERICKFORSYTH #फ्रेडरिकफॉरसाइथ"
Customer Reviews
  • Rating StarNavnath Devnale

    #द_फिस्ट_ऑफ_गॉड जागतिक कीर्तीचा लेखक फ्रेडरिक फोरसिथ याचे या अगोदर `द अफगाण` आणि `द ओडिसी फाईल` हे दोन पुस्तके वाचलेले होते. एकूणच या लेखकाची लेखनशैली व वाचकाला शेवटपर्यंत खेळवून ठेवत जणू काही आपण एक चित्तथरारक चित्रपट पाहात आहोत, अशी उत्सुकता नि्माण करते. म्हणून या लेखकाचे नवीन एखादे पुस्तक कधी हाती लागते याची वाटच पाहात असताना #द_फिस्ट_ऑफ_गॉड मिळाले आणि आज वाचून पूर्ण झाले. हे पुस्तक 1991 मध्ये झालेल्या इराक-कुवेत युद्धावर आधारित आहे. हे युद्ध या दोन देशापुरतेच मर्यादित नव्हते तर यामध्ये अमेरिका, ब्रिटन, इस्राएल, फ्रान्स अन इतर अरब राष्ट्र यांचा सुद्धा सहभाग होता. इराकमध्ये सद्दाम हुसेन सत्तेवर आल्यानंतर त्याची राजकीय आकांक्षा व बलाढ्य अमेरिका व इतर राष्ट्रांचे राजकीय धोरणे यातून या घडलेल्या युद्धात `द फिस्ट ऑफ गॉड` चा शेवट होईपर्यंतची चित्तथरारक कहाणी व या कहाणीचा नायक मेजर माईक मार्टिन नक्कीच भाव खाऊन जातो. फ्रेडरिक फोरसिथ यांचे हे पुस्तक इराक-कुवेत युद्धावर आधारित एक कादंबरी आहे. यांचे बहुतेक पुस्तके एखाद्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लिहलेले असतात. त्यामुळे जागतिक राजकारणात मोठी घटना घडते तेव्हा फोरसिथचा चाहता वर्ग त्यांच्या पुस्तकाची वाट पाहात असतो आणि चर्चा घडते खरंच असं घडलं का!!! या पुस्तकात ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर, जॉन मेजर अमेरिकेचे जॉर्ज बुश, इस्राएलचे बेंजामिन नेतान्याहू, इराकचे सद्दाम हुसेन, रशियाचे मिखाईल गोर्बाचेव्ह या प्रमुख राजकीय पात्रासह इतर या देशाशी संबंधित विविध जे की या युध्दाशी व द फिस्ट ऑफ गॉड संबंधित जवळजवळ 70 पात्र आहेत. खरं तर या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराक मधील एक गुप्त रेडीओ संदेश इंग्लडमध्ये पकडलं गेलं त्यामधील `कुब्त-उत-अल्ला` म्हणजेच अल्लाचा ठोसा/दणका या नावाचा महाविध्वंसक शस्त्राचा उल्लेख होता. ते नष्ट करण्यासाठी हुबेहूब अरबासारखा दिसणारा इंग्लंडचा मेजर मार्टिन गुप्तपणे थेट बगदादमध्ये प्रवेश करून तिथल्याच `जेरिको` या टोपण नावाने सद्दामच्या जवळचाच माणूस सर्व गुपिते त्यास पुरवतो व त्यावरून अमेरिका, ब्रिटनला त्या संहारक शस्त्राचा नायनाट करता येतो. हे युद्ध जिंकण्याची सद्दामला एवढी खात्री `कुब्त-उत-अल्ला` मुळे होती. केवळ पैशाच्या मोहासाठी `जेरिको` म्हणजेच इराकच्या गुप्त पोलीस दलाचा प्रमुख व सद्दामचा एक विश्वासू ब्रिगेडियर जनरल उमर खातीब सर्व गुपिते इस्राएलची मोसाद, ब्रिटनची एस ए एस व अनेरिकेच्या सी आय ए ला पुरवतो, म्हणूच `कुब्त-उत-अल्ला` म्हणजेच `द फिस्ट ऑफ गॉड` चा नायनाट करता येतो. इस्राएल, ब्रिटन, अमेरिका यानंतर जेरिको म्हणजेच उमर खातीबचाही उपयुक्तता संपल्यावर त्याचाही काटा काढून या प्रकणावर कायमस्वरूपी पडदा टाकतात. आणि या युद्धात सद्दाम हुसेनवर विजयी आघाडी घेतात. मेहता पब्लिसिंग हाऊसने प्रकाशित केलेले फ्रेडरिक फोरसिथ यांचे हे पुस्तक मराठीत अनिल काळे यांनी अनुवादित केलेले एक चित्तथरारक पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    इराकच्या अण्वस्त्रनिर्मितीचे रहस्य आणि सद्दाम हुसेनवरील हल्ले... बेस्टसेलर लेखकांच्या प्रभावळीत गाजणाऱ्यांमध्ये फ्रेडरिक फोरसीथ हे एक अग्रगण्य नाव. विस्तृत राजकीय, दहशतवादी, आंतरराष्ट्रीय पट उभा करण्यात त्याचा हातखंडा आहे, विविध देश, त्यांचे राज्यकरते, त्यांच्यातील ताणतणाव कुठल्याही समस्येशी संबंधित असणारे निरनिराळे घटक व त्यांच्यातील गुंतागुंत यांचे धागेधोरे तो इतक्या कुशलतेने गुंफतो की वाचक त्यात हरवून जातो. त्यातील वास्तव तपशील मर्मिक व भेदक असतात. वाचकाच्या सामान्य ज्ञानात ते तपशील प्रचंड भर घालतात. राज्यकर्त्यांच्या सर्वोच्च दरबारापासून ते शय्यागृहापर्यंत सर्वदूरच्या बारीकसारीक गोष्टी त्यातून कळतात. त्याचबरोबर नाट्यपूर्ण घटनेच्या अनुषंगाने अत्यंत उत्कंठावर्धक कथावस्तूचा प्रचंड डोलारा तो उभा करतो. व्यक्तिरेखाही अत्यंत नावीन्यपूर्ण ढंगाने पेश करतो. त्यामुळे त्याच्या कादंबऱ्या जगभरच्या वाचकांची दाद सहजपणे मिळवतात. फोरसीथचा बेस्टसेलरचा जो काही फॉर्म्युला आहे तो विलक्षण लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. इतकी गुंतागुंतीची रचना इतर कोणा बेस्टसेलर लेखकाला जमलेली नाही. ‘द फिस्ट ऑफ गॉड’ (दैवी तडाखा किंवा ईश्वराची मूठ) या त्याच्या कादंबरीत ग्रेट ब्रिटन, अमेरिका, इस्त्राएल, कुवेत, इराक, रशिया या राष्ट्रांतील पंचाहत्तरावर व्यक्तिरेखा आल्या आहेत. त्यात ब्रिटनच्या प्रधानमंत्री थॅचर व जॉन मेजर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, इस्त्राएलचे प्रधानमंत्री यित्झाक शामिर, इराकचा राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्यापासून तेथील सैन्यप्रमुख, गुप्तहेर व पोलिस संघटनांचे प्रमुख, बँकर्स व व्यावसायिक, बंडखोर अतिरेकी नेते, अणुशास्त्रज्ञ - इत्यादी अनेक व्यक्तींचा समावेश आहे. कादंबरीत ही नावे केवळ शोभेसाठी भरताड म्हणून येत नाहीत. ती आपापली पदसिद्ध कर्तव्ये व हक्क, आणि आपापले मानवी चेहरे व स्वभाव घेऊन येतात. विशिष्ट भूमिका बजावतानाही आपल्या वृत्तिप्रवृत्तींशी प्रामाणिक राहतात. ऑगस्ट १९९० मध्ये इराकने कुवेत या शेजारी राष्ट्रावर हल्ला करून सहा तासात कुवेतवर कब्जा केला. कुवेतची मुक्तता करण्यासाठी बरेच राजनैतिक प्रयत्न झाले. पण सद्दामने दाद दिली नाही. १९९१ मध्ये अमेरिका-ब्रिटन - फ्रान्स - अरब देश यांच्या संयुक्त फौजांनी इराकवर हल्ला चढवला. इराकने आपल्या भूमीवर अतिसंहारक शस्त्रास्त्रांचे कारखाने काढले, शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा केला आणि अण्वस्त्रे बनविण्याचा घाट घातला. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी, कुवेत मुक्त करून इराकच्या सद्दाम हुसेन या सत्ताधीशाला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने ही लष्करी कारवाई करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघावर दडपण आणून इराकविरोधी या लष्करी कारवाईला जागतिक मान्यता असल्याचा दावाही केला. कुवेतची मुक्तता झाल्यावरही सद्दाम हुसेनने इराकमध्ये आपल्या स्थानाला धक्का लागू दिला नाही, उलट शस्त्रास्त्रांची जमवाजमव करून, अण्वस्त्रांच्या उत्पादनाचा आपला प्रयत्न जारीच ठेवला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवरील द फिस्ट ऑफ गॉड ही कादंबरी आहे. इराकला मुख्य उत्पन्न तेलाच्या निर्मितीतून मिळते. एप्रिल ९० ते मार्च ९१ याकाळात तेलाच्या बॅरची किंमत १५ डॉलरवरून २५ डॉलर एवढी वाढली. त्यामुळे भारताला तेलापोटी जादा रक्कम द्यावी लागली. भारताची व्यापारी तूट ७७३१ कोटी ऐवजी ११५०० कोटी रुपये एवढी वाढली (हे केवळ माहितीसाठी) इराकी सैनिकांनी पराभूत होऊन माघार घेताना कुवेतच्या तेलाच्या विहिरींना आगी लावल्या. त्या कित्येक महिने धुमसत होत्या. इराकी सैनिकांनी एक कोटी बॅरल्स तेल समुद्रात ओतले. त्यामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले. कादंबरीच्या आरंभी आपल्याला भेटतो तो डॉक्टर जेरॉल्ड बुल. ब्रुसेल्समधील आपल्या स्पेस रिसर्च कॉर्पोरेशनच्या ऑफिसमधून तो आपल्या रेनॉल्ट - २१ मधून घरी चाललेला असतो. त्याची सेक्रेटरी मोनिक जॅमिनी ही तरुणी कार चालवत असते. तिच्या विनोदावर तो हसत असतो. आणि पुढे एकदम असे वाक्य येते ‘‘आणखी दहाच मिनिटांची आपण मरणार आहोत याची त्याला मुळीसुद्धा कल्पना नव्हती. अर्थात् तशी ती असण्याचं कारणही नव्हतं.’’ हा डॉक्टर जेरॉल्ड बुश शास्त्रज्ञ असतो. नवनवीन तोफांची डिझाइन्स बनवण्याबद्दल त्याची जगभर ख्याती असते. आपल्या संशोधनाचे कागदपत्र एखाद्या कपाटात वा घरी सुरक्षित राहू शकतील यावर त्याचा विश्वास नसतो. ते सर्व आपल्या जवळच्या बॅगेत ठेवूनच तो सगळीकडे जात असतो. सद्दाम हुसेनसाठी तो एक सुपनगन तयार करीत असतो. अक्कलहुशारी वापरून या सुपरगनच्या वेगवेगळ्या भागांची वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या कारखान्यांत निर्मिती चालू असते. आपण जो भाग करीत आहोत. तो कुठल्या यंत्रासाठी आहे याची त्यापैकी कुठल्याही कारखान्याला कल्पना नसते. त्याच्या निवासस्थानी कार उभी करून मोनिका त्याचा निरोप घेते. डॉ. जेरॉल्ड बुल आपला फ्लॅटचा दरवाजा उघडण्यासाठी वाकतो; आणि त्याच्या डोक्याच्या पाठीमागच्या भागात पाच गोळ्या घुसतात. गोळ्या झाडणारा मारेकरी तो मेलाय की नाही हे पाहण्यासाठीही न थांबता पळ काढतो. डॉ. बुलच्या हत्येनंतर अर्थातच वृत्तपत्रांतून वेगवेगळे तर्क प्रकट केले जातात. तसेच युरोपमध्ये एक विचित्र घटनांचे सत्र सुरू होते. ११ एप्रिलला इंग्लंडमधल्या एका गोदीतून ब्रिटिश कस्टम्स अधिकारी आठ पोलादी पाइप्स जप्त करतात. ते इराकला रवाना होणार असतात. हे सुपरगनचे भाग असावेत असा तर्क केला जाता २३ एप्रिलला तुर्कस्थान जाहीर करते की जप्त केलेल्या एका हंगेरियन ट्रकमध्ये दहा मीटर लांबीचा पोलादी पाईप मिळाला. मे महिन्यात इटलीत तोफेचे नव्वद टन वजनाचे सुटे भाग मिळतात. जर्मनीतही सुपरगनचे काही भाग मिळतात. अशी सुपरगनची जुळवाजुळव होत जाते. १५६ मीटर लांबीच्या, एक मीटर व्यासाच्या दोन बॅरल्सचाही पत्ता लागतो. स्वित्झलँड, इटली, ऑस्ट्रिया, जर्मनी, बेल्जियम, ग्रीस इत्यादी देशातही या सुपरगनचे भाग बनवले जात असतात. बुलची हत्या कोणी केली याबद्दल तर्कवितर्क होत राहतात. कॅनडात जन्मलेला बुल अमेरिकन नागरिक होता. तो बडबड्या होता. भरपूर पिणारा होता. इस्त्राइलवर त्याचं प्रेम होतं. रॉकेटच्या निर्मितीचा तो अभ्यास करतो. रॉकेटचा ९० टक्के भाग पृथ्वीपासून दीडशे किलोमीटरच्याआत खर्ची पडतो. उपग्रह रॉकेटऐवजी महाकाय तोफेतून अंतरिक्षात पाठवता येईल व खर्चात बचत करता येईल असे त्याला वाटते. अमेरिकन भूदल त्याला ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास मदत करतो कॅनडातील एक विद्यापीठ छोटी यंत्रशाळा उभारून देते. बार्बाडोस बेटावर स्वत:ची संशोधनशाळा तो तेहतिसाव्या वर्षी उभी करतो. पारंपारिक तोफांच्या विकासाचं काम करून खूप पैसा मिळवतो. तोफांतून उपग्रह पाठवण्यासाठी लागणारं योगय ते इंधन व दारूगोळा तयार करण्यात यश मिळवतो. छोटी राष्ट्रे त्याच्या संशोधनाची दखल घेतात. त्यांच्यासाठी तो तोफखान्याचा सल्लागार म्हणून काम करतो. १९७२ मध्ये त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळते. दक्षिण आफ्रिकेला तो जीसी ४५ या प्रगत तोफा विकसित करून देतो. तेव्हा अमेरिका त्याला एक वर्ष कैदेची शिखा सुनावते. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे ज्ञान त्याला नसते. या शिक्षेमुळे तो अमेरिका-कॅनडा यांचा त्याग करून बेल्जियममध्ये स्थायिक होतो. त्याच्या जीसी४५ तोफांची निर्मिती ऑस्ट्रियातील एक कारखाना करून त्याला लाखो डॉलर्स देतो. त्याच्या तोफा वापरून आठ वर्षे लढून सद्दाम हुसेन आघाडी मिळवतो. इराकचा एक उच्चपदस्थ अधिकारी उपग्रह सोडणाऱ्या रॉकेट निर्मितीबद्दल बुल याच्याशी वाटाघाटी करतो. तो आपली प्रचंड तोफेची कल्पना सांगून, तीस लाख डॉलर्स खर्च येईल असे म्हणतो. इराकला त्याची योजना मान्य होते. ‘सद्दाम हुसेन हा खुनी रक्तपिपासू आहे. त्याला मदत करू नये’ असे म्हणणाऱ्या मित्रांना बुल सांगतो, ‘‘इतर अनेक कंपन्या व राष्ट्रे त्याला मदत करीत आहेत. मग मीच एकट्यानं काय घोडं मारलंय ?’’ सुपरगनचं स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी प्रथमच मिळत असल्याने बुल सद्दामसाठी काम करायला तयार होतो. ‘प्रोजेक्ट बॅबिलॉन’च्या कामाला आरंभ होतो. बगदादला शस्त्रास्त्रप्रदर्शनात त्याची उपग्रह सोडणारी तोफ पाहून देशोदेशींची गुप्तहेरखाती खडबडून जागी होतात. आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणास्त्र म्हणून या अल अबिद रॉकेटची उपयुक्तता सर्वांच्या लक्षात येते... त्या रॉकेटची तिसरी प्रगत अवस्था तयार करण्याची तयारी सुरू होते... परंतु सद्दामच्या खऱ्या हेतूची कल्पना बुलला येते. तेव्हा त्याच्या मनात चलबिचल होते. त्याचे इस्त्राइलशी असणारे संबंध स्वत: सद्दामलाही खटकतात. बुलचा काटा काढण्याची निकड त्याला वाटू लागते. इराकने १६ जानेवारी १९९१ पर्यंत कुवेतमधून माघार न घेतल्यास अमेरिका-ब्रिटन-फ्रान्स यांच्या संयुक्त सैन्याने कुवेतमध्ये प्रवेश करून इराकला हुसकावून लावावे असा ठराव राष्ट्रसंघ मंजूर करते. या लष्करी कारवाईची पूर्वतयारी आधीपासून कसकशी केली जाते याचे तपशील पहिल्या दोनशे पृष्ठात आले आहेत. मध्यपूर्वेत ब्रिटिश-अमेरिकन गुप्तहेरसंघटनांचा वावर वाढत जातो. १६ जानेवारीची मुदत संपल्यावर अमेरिकेची अ‍ॅपाची जातीची हॅलिकॉप्टर्स आकाशात उड्डाण करतात. ती इराकची दोन रडार केंद्रे उद्ध्वस्त करतात. नंतर लढाऊ विमाने इराकच्या लष्करी तळांवर बाँम्बवर्षाव करतात. विनाशिकांतून टोमाहॉक क्षेपणास्त्रे सोडण्यात येतात... - हे या लढाईचे तपशील अर्थातच रोमहर्षक आहेत. आणि शेवट ? इराकमधला सफवान गावाजवळच्या विमानतळावर संयुक्त फौजांचे अधिकारी ३ मार्चला इराकच्या शरणागतीच्या मसुद्याची चर्चा करायला जमतात. त्या वेळी तेथे आलेल्या एका इराकी अधिकाऱ्याला अमेरिकन अधिकारी ताब्यात घेऊन जीपने विमानतळावर नेतात. तेथे त्याला सौदी अरेबियाच्या विमानतळावर आणतात. व्हिएन्नामधल्या त्याच्या गुप्त खात्यात एक कोटी डॉलर्सची रक्कम जमा झालेली आहे असे सांगतात. ‘‘वेल, माय फ्रेंड, टू युवर रिटायरमेंट अँड प्राँस्पेरिटी.’’ असे म्हणून अमेरिकन अधिकारी त्याला ग्लास वर करून चीअर्स देतात. एका किल्ल्यात इराकचा अणुबाँब सुरक्षित आहे ही बातमी सिद्दिकी मृत्यूपूर्वी जेरिकोला सांगतो, तेव्हा जेरिको - म्हणजे ब्रि. ज. उमर खातिबच्या मनावरचा ताण उतरतो. पण त्याला विमानातून इस्त्राइली पायलट सरळ फेकून देतात. त्याच्या खात्यातले पैसे इस्त्राइली गुप्तहेर संघटनेच्या मोसादच्या फन फंड खात्यात भरण्यात येतात. माईक मार्टिन अरबासारखा दिसतो म्हणून त्याला युद्धाच्या तयारीसाठी कुवेतमध्ये पाठवण्यात येते. इराकी फौजांची माहिती मिळवून तो बगदादमध्ये प्रवेश मिळवतो. तेथे जरिको या फितुराकडून आणखी माहिती मिळवतो. तो हा मेजर नंतर मात्र भ्रमनिरास झाल्यासारखा कुवेतबद्दल बोलायचे टाळतो. असा हा मोठा युद्धपट फ्रेडरिक फोरसीथने अत्यंत ताकदीने पेश केला आहे. त्यात नाट्य आहे. हेरगिरी आहे. चातुर्य आहे. दगाबाजी, क्रौर्य, मुत्सद्देगिरी, राजकारण, गुंतागुंत सर्व काही आहे. आश्चर्य हे की एकही प्रेमप्रकरण नाही. जेम्स बाँड टाइप मादक मस्त ललनांची पलटण नाही. युद्ध म्हणजे युद्ध. नावे गावे अपरिचित असल्याने कुठे-कुठे वाचकाला अडखळल्यासारखे वाटेल. परंतु त्यासाठी आरंभीच पात्रांचे परिचय दिले आहेत. आंतरराष्ट्रीय संदर्भही स्पष्ट केले आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more