URAVASHI BUTALIA

About Author




उर्वशी बुटालिया यांचा जन्म हरियाणामध्ये अंबाला इथे झाला. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीची एम.ए. (साहित्य) ही पदवी संपादन केली आहे आणि लंडन युनिव्हर्सिटीतून साऊथ एशियन स्टडीजची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. दिल्लीतील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमधून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. लंडनस्थित ‘झेडबुक्स’साठी संपादक म्हणून त्यांनी काम केलं. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी रीडर या पदावर काम केले आहे.रितू मेनन यांच्याबरोबर त्यांनी ‘काली’ या खास स्त्रियांसाठीच्या प्रकाशनाची स्थापना केली. या प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना आवाज दिला. लेखिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. फाळणी आणि त्यासंबंधीचा मौखिक इतिहास याचा स्त्रीवादी आणि डाव्या विचारसरणीच्या अंगाने विचार, हे त्यांचं अभ्यासाचं मुख्य क्षेत्र आहे. त्यांनी लिंगभेद, साम्यवाद, मूलतत्त्ववाद आणि प्रसारमाध्यमं या विषयांवर अनेक वृत्तपत्रांतून आणि मासिकांतून लेखन केलं आहे. ‘द गार्डियन’, ‘न्यू इंटरनॅशनॅलिस्ट’, ‘द स्टेट्समन’, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’, ‘आऊटलूक’ आणि ‘इंडिया टुडे’ ही त्या संदर्भातील काही नावे. ‘तेहेलका’ आणि ‘बीटुबी’साठी त्यांनी नियमित स्तंभलेखन केलं आहे. उर्वशी बुटाला आणि रितू मेनन यांनी ‘इन आदर वर्ड्स’, ‘मेकिंग अ डिफरन्स’ ही पुस्तके संपादित केली. तनिका सरकार यांच्याबरोबर त्यांनी ‘विमेन अँड द हिंदू राइट’ या निबंधांच्या संकलनाचं आणि ‘विमेन अँड राइट विंग मुव्हमेंट्स’ ही पुस्तकं संपादित केली आहेत. ‘स्पिकिंग पीस’ आणि ‘इनर लाईन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तकं आहेत. उर्वशी बुटाला आणि रितू मेनन यांना पद्मश्री पुरस्काराने संयुक्तरीत्या गौरवण्यात आलं आहे.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
33 %
OFF
THE OTHER SIDE OF SILENCE Rating Star
Add To Cart INR 395 INR 265

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more