* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: WARREN BUFFET
 • Availability : Available
 • ISBN : 9788184985672
 • Edition : 8
 • Publishing Year : OCTOBER 2014
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 216
 • Language : MARATHI
 • Category : BIOGRAPHY
 • Sub Category : BUSINESS, INDUSTRY, SPORTS
 • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
EVERYONE IS CURIOUS TO KNOW MORE ABOUT THE GREATEST INVESTOR OF THIS ERA; WARREN BUFFETT. HE HAS NEVER TAKEN UP A JOB OR HAS NOT ESTABLISHED ANY BUSINESS. YET, HE IS ONE OF THE VERY FEW RICHEST PEOPLE OF THIS WORLD. WHAT MAKES IT A MIRACLE IS THE FACT THAT HE HAS NOT OPTED FOR ANY ILLEGAL WAY WHILE MAKING MONEY. EACH ONE OF US HAS A LOT TO LEARN FROM HIM. HIS EXCLUSIVE VISION COMBINED WITH A WITTY MIND WILL SURELY BE HELPFUL TO ONE AND ALL; THE ENTREPRENEURS, THE PROFESSIONALS, THE EMPLOYEES AND PEOPLE WHO WORK-FROM-HOME. THIS BOOK IS A COMPILATION OF FIFTY OF WARREN BUFFET’S FAMOUS QUOTES EXPLAINED IN A SIMPLE LANGUAGE.
गुंतवणूक तसंच शेअरबाजार यांच्यात रस असलेल्या माणसाला ‘वॉरन बफे ’ हे नाव माहीत नसणे, हे केवळ अशक्य आहे. गेली कित्येक दशक बफेनं गुंतवणुकीच्या विश्वात मिळवलेलं यश अफाट आहे. शेअरबाजाराच्या चढ-उतारांवर सातत्यानं मात करून प्रचंड वेगानं त्यानं आपल्या वैयक्तिक संपत्तीत तर भर घातलीच आहे; पण शिवाय आपल्या ‘बर्वशायर हॅथवे’ या कंपनीमधल्या शेअरधारकांनाही कोट्यधीश केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतके पैसे कमावणा-या आणि जागतिक पातळीवरच्या सगळ्यात श्रीमंत माणसांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचलेल्या या माणसाला पैशांचा उपभोग घेण्यामध्ये अजिबात रस नाही. त्याचं राहणीमान अत्यंत साधं आहे आणि पैसे विनाकारण खर्च करण्याचा त्याला साफ तिटकारा आहे. अतिशय काटकसरी वृत्तीनं राहणा-या बफेनं आपली जवळपास सगळी संपत्ती सामाजिक कामांसाठी खर्च करण्याचं जाहीर करून सगळ्या जगासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. आपल्या कारकिर्दीत कधीही नीतिमत्ता सोडून न वागलेल्या बफेचं माणूस म्हणून महत्त्व याचसाठी खूपच जास्त आहे. अशा या विलक्षण माणसाच्या अफाट आयुष्याची आणि त्याच्या गुंतवणुकीच्या रहस्यांचा उलगडा करणारी ही सफर!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#WARAN BUFFETT#ATUL KAHATE#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY
Customer Reviews
 • Rating StarAparna D P

  अतुल कहाते लिखित वॉरन बफे यांच्यावरच हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं , खरंतर वॉरन बफे या जगातील श्रीमंत माणसाबद्दल खोल माहिती जाणून घेण्याची मला नक्कीच अतिशय उत्सुकता होती. बऱ्याच प्रसार माध्यमांमधून त्यांच्याबद्दलचे लेख ,डॉक्यूमेंट्री ऐकूनत्यांच्याबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे असं वाटत असताना हे पुस्तक हातात पडलं आणि अतुल कहाते यांच्या सोप्या ओघवत्या मराठी लेखन शैलीतून अवतरलेले वॉरन बफे वाचून अवाक व्हायला झालं इतकंच खरं. गुंतवणुकीच्या क्षेत्रात उत्तुंग यशस्वी असलेल्या या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील काही नाट्यमय घडामोडी वाचायला नक्कीच आवडतात. अर्थशास्त्र , गुंतवणूक ,शेअर बाजार या विषयी कणभर ज्ञान आणि कधी आवड नसणाऱ्याला या क्षेत्रात उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या बफे यांचा प्रवास खिळवून ठेवणारा आहे हे लेखकाचे यश मी मानते. खरंतर बफे हे अनाकलनीय व्यक्तिमत्व मी म्हणेन सतत आकड्यांच्या जंजाळात स्वतःला गुंतवून ठेवणारे बफे, आयुष्यात भावनांना महत्व नसणारे बफे, कर्करोगग्रस्त पत्नीची काळजी घेणारे बफे आणि पैसा कमवण्यासाठी आयुष्यभर धडपडणारी ही व्यक्ती त्या पैशाचा कधीही उपभोग न घेणारी व्यक्ती. हे वॉरन यांच्या स्वभावातील विरोधाभास म्हणता येतील पण गुंतवणूक तज्ञ आणि माणूस म्हणून बफे कडून आपण बरंच काही शिकू शकतो असं लेखकाने प्रास्तविकात म्हंटल आहे हे अगदीच मान्य! अर्थशास्त्र माहिती आणि तंत्रज्ञानाचा गाढा अभ्यास असणाऱ्या अतुल कहाते यांच्या अभ्यासपूर्ण ओघवत्या लेखन शैलीतील वॉरन बफे नव्याने उमगतात. अतुल कहाते यांनी अशाप्रकारची बरीच अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण पुस्तकं काही स्वलिखित तर काही अनुवादित स्वरूपात आपल्याला मराठीत उपलब्ध करून दिली आहेत त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!! आजच्या चंगळवादी तरुणाईला पैसा खर्च करताना गुंतुवणुकीची जवाबदारी आणि धाडस शिकवणारे वॉरन बफे यांचं हे चरित्र नक्की वाचावे ही मी विनंती करेन. ©अपर्णा…(ADP) ...Read more

 • Rating StarKotwal Bhushan

  काही दिवसांपूर्वीच आपले "वाॅरन बफे" हे पुस्तक वाचले . वाचून अत्यानंद झाला . तसा मी एकवीस वर्षाचा Science background चा विद्यार्थी ; पण वेळ उपलब्ध असल्यामुळे शेअर मार्केट जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि पुस्तकांचा शोध सुरू झाला. त्यातच माझ्या एा मित्राने आपले पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला . पुस्तक आवडण्याचे कारण असे की हा सर्व भाग Commerce आणि Economics चा आहे आणि हे दोघे खूप अवघड असतात , याची मला कल्पना देखील आहे . एवढे अवघड विषय मला कोणी मराठी भाषेत इतक्या सोप्या भाषेत समजावू शकतो यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही , खरोखरच आपल्या लिखाण कौशल्याला आणि बुद्धिमत्तेला दाद द्यायला पाहिजे . शेअर मार्केट आणि सन्माननीय वॉरन बफे यांचे जीवन चरित्र सोप्या भाषेत लिहिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि भविष्यात अशीच पुस्तक लिहून मराठी माणसांचा उत्साह वाढवा . आपल्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा ! आपला नम्र कोतवाल भूषण ...Read more

 • Rating StarPratik Deshmukh

  I have Warren Buffett`s biography written by Atul Kahate. I have liked it very much and got very inspired to invest in stock market(long term)

 • Rating StarNilesh Shinde

  वाँरेन बफे एक सामान्य पेपर टाकणारा मुलगा वयाच्या 11 व्या वर्षी पासून गुंतवणूक क्षेत्रात आला आणि आज वयाच्या नव्वदीत तो अमेरिकेतील नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार आहे. आज त्याच्याकडे संपत्ती 6.4 लाख करोड रूपये आणि त्यातही कितीतरी कंन्याची मालकी त्याच्याकडे आहे. त्याच्या बर्कशायर हँथवे हया गुंतवणूक कंपनीचा एक शेअर 2.16 करोड रूपयाला आहे यावरून कळते की त्याच्या गुंतवणूक पद्धतीवर गुंतवणूकदारांचा किती ठाम विश्वास आहे. त्याच्या यशाची सूत्र आणि गुंतवणूक पद्धत हया पुस्तकात सांगितली आहेत त्याच्या व्हँल्यू इन्व्हेस्टींग सूत्रांची माळ गुंफण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक गुंतवणूकपूर्व सल्ले : श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यापेक्षा खरेखुरे श्रीमंत व्हा आपण कितीही महाग कपडे घेतले,गाडी घेतली तरीही आपण कुणाही श्रीमंतापेक्षा गरिबच वाटणार कारण हया तुलनेच्या खेळाला अंत नाही त्यामुळे फक्त गरजांवर खर्च करा अनावश्यक वायफळ खर्च टाळून पैसे वाचवा...आणि आर्थिक असहाय्यतेला नाही म्हणा..... ज्याचा वाचवलेला पैसा घरात आहे त्यांनी तो बँकेत साठवा आणि ज्यांचा साठलेला पैसा खात्यात कुजत पडलाय त्यांनी तो तसाच ठेवण्यापेक्षा गुंतवा. छोट्या छोट्या गोष्टीत बेपर्वा माणसे मोठमोठ्या गोष्टीमध्ये बेफिकीर आणि बेशिस्त असू शकतात आणि लोक जितकी बेपर्वाईने वागतील तितकेच आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे. माणूस अनुकरणशील प्राणी आहे पण म्हणून इतरांच्या चुकांचे अनुकरण करणे हे पण चुकीचेच होईल गुंतवणूकदार होण्यापूर्वी : आपल्या कुटुंबाचा आयुर्विमा ,आरोग्य विमा (क्रिटिकल इलनेस सह) काढलेला असावा सहा महिन्यांचे उत्पन्न Emergency फंड म्हणून वेगळ्या बँक अकाउंट वर FD सारख्या सुरक्षित पर्यायात गुंतवावेत जेणेकरुन अडचणीच्या वेळी ते कामाला येतील आणि आपली गुंतवणूक दीर्घकालीन ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. गुंतवणूकदार झाल्यानंतर : ज्याला वेळेचा आणि ज्ञानाचा अभाव आहे आणि पैशाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची वाटते त्यांनी कमी नफा असले तरी बाँड किंवा FD मध्ये पैसे गुंतवणूक करावी. ज्यांची थोडीफार रिस्क घ्यायची तयारी असेल त्यांनी म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी ज्यांना शेअरबाजाराचे जुजबी ज्ञान आहे त्यांनी इंडेक्स फंडात पैसे गुंतवावेत ज्यात सेन्सेक्स निफ्टी लिस्टेड कंपन्याचे शेअर्सच्या प्रमाणानुसार गुंतवणूक केली जाते ज्यांना अकाउंटसचे आणि शेअर बाजार कसा चालतो याचे मूलभूत ज्ञान आहे त्यांनी इक्विटी शेअर्स मधे गुंतवणूक करावी. तसेच शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अतिबुद्धिवान किंवा गणितज्ञ असण्याची कुठलीही गरज नाही ब्ल्यूचिप कंपन्यात गुंतवणूक करूनही उत्तम परतावा मिळवता येतो. Profit loss, Financial Statement विश्लेषण करता येणे पुरेसे आहे. पण तेवढ्यासाठी पण आपण कुणावर तरी विसंबून राहत असू तर एवढेच लक्षात ठेवा "जो दुसऱ्या वर विसंबला त्याचा कार्यभार संपला" शेअर बाजार खूप अवघड क्लिष्ट आहे असा काही तज्ञ आणि ट्रेनिंग सेंटरने त्यांच्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी निर्माण केलेला भ्रम आहे आणि टीव्ही ,न्यूजपेपर , मासिक यांनी तो भ्रम आणखी जास्त बळकट केला आहे. त्यामुळे माणसाने स्वतःचा नजरिया बदलावा गुंतवणूक कशी करावी: दरमहा गुंतवणूकीसाठी रक्कम बाजूला काढायची सवय लावावी गुंतवणूक करण्यासाठी बाजूला काढलेली रक्कम ही आयुष्यभर फक्त गुंतवणूकीसाठीच वापरावी. शक्यतो लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करावी जेणेकरून चक्रवाढीचा फायदा आपल्याला भेटेल. ज्या कंपन्या सातत्याने उत्तम नफा कमावतात. अश्या केवळ 8-10 कंपन्यात दीर्घकाळ म्हणजेच दहा आणि त्यापेक्षा जास्त वर्षासाठी गुंतवणूक करावी आणि निश्चिंत राहावे हयात काहीच थ्रिल नाही म्हणून इन्स्टंट पैसा कमवायच्या (Trading , FO, Commodity )मागे धावू नये. हाव भीती आणि मूर्खपणा हे माणसाचे अवगुण असतात त्यामुळे आपल्या अवगुणांवर मात करायची आणि दुसऱ्याच्या हयाच अवगुणांचा फायदा घ्यायचा तसाच मत्सर हा ही माणसाचा मोठा दुर्गुण आहे जो माणसाला कायम असमाधानी बनवतो. त्यावर मात करा आपल्याला कळत नसलेल्या व्यवसायात गुंतवणूक करू नये. लक्षात ठेवा इथे सबुरीने वागणा-या माणसाला सतत कार्यरत माणसे संपत्ती मिळवून देतात. जे सेक्टर कायम चालतात आणि भविष्यात ज्यांची मागणी राहील अशा सेक्टर टाँप कंपन्याची गुंतवणुकीसाठी निवड करावी. गुंतवणूक करताना Lumpsum रक्कम एकदाच गुंतवू शकता ते पण ज्यावेळी मार्केट करेक्शन मोड वर असेल किंवा ज्यावेळी मार्केट भयभीत असेल आणि डिस्काउंटचे बोर्ड झळकत असतील किंवा गुंतवणूकीसाठी SIP पद्धतीचा वापर करू शकता ज्यात महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम ठराविक शेअर्स खरेदीसाठी वापरली जाते. लक्षात ठेवा गुंतवणूक विषयीचे अज्ञान आणि कर्ज एकत्रितपणे माणसाला डुबवू शकतात त्यामुळे कर्ज काढून गुंतवणूक करू नये गुंतवणूकीचे निर्णय विचारपूर्वक सर्व पर्याय पडताळून, योग्य सल्लागारांच्या मार्गदर्शनाने करावी. कारण अविचाराने केलेली खरेदी आपल्याला निश्चिंत झोप देऊ शकत नाही. सल्लागार निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावा जो स्वतःच्या कमिशन साठी काम न करता आपल्या हिताला प्राधान्य देईल आणि जेणेकरुन आपले कुठेही नुकसान होणार नाही. आपले वर्तन हे गुंतवणूकदारापेक्षा उद्योजकाप्रमाणे हवे वायफळ खर्च टाळणारा ,नियमांचे पालन करणारा,यशाने हुरळून न जाणारा आणि अपयशाने खचूनही न जाता ध्येयाकडे सतत मार्गक्रमण करणारा उद्योजक व्हावे शेअर मार्केट मध्ये भाकिते करणारे कायम तोंडावर पडतात 100% खात्रीशीर भाकीत कुणीच मांडू शकत नाही. भाकीत मांडणारे कदाचित आपल्या उतावीळपणाचा फायदा घ्यायला टपले असतीलही भविष्यातील निरनिराळ्या शक्यताविषयी कुठलेच अंदाज बांधू नये आणि त्यावर आधारित गुंतवणूक ही नकोच. उदा. EV, AI सार्वमत हे आपल्या विचारांना पर्याय ठरत नाही त्यामुळे सगळेजण एखादा शेअर्स विकताना दिसतात म्हणून आपणही तसेच करू नये. इतर लोकांची मतानुसार नव्हे तर आपल्या उद्दिष्टानुसार आणि आपल्या अभ्यासानुसार शेअर्स बाबत आपले वर्तन असावे त्यामुळे एकदा गुंतवणूक केली तीन वर्षानंतरच पोर्टफोलिओत डोकवायचे, त्यातही सर्व गोष्टी योग्य असतील तर गुंतवणूक दीर्घकाळ तशीच ठेवावी. इथेच रंकाचा राव आणि रावाचा रंक होतो त्यामुळे फूकटचा माज बाळगू नका शेअर मार्केट पेक्षा कुणीही मोठे नाही शेअर्सची किंमत ही कामगिरीनुसार बदलते ट्रेडिंग मुळे वाढलेली किंमत कधीही खालीही येऊ शकते बाजारात अधूनमधून वेगवेगळ्या बूम येतात ,पण लक्षात ठेवा हे जास्त काळ टिकत नाही त्यामुळे दीर्घकाळ टिकणार्या कंपन्या निवडा. खराब कंपनीचे (Fraud Case) व्यवस्थापन बदलले तरीसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करा. तेजीच्या काळात सगळ्या चांगल्या वाईट कंपन्या तरून जातात कंपनी आणि शेअरहोल्डरची खरी कसोटी बाजार भीतीच्या सावटाखाली असताना लागते. शेअर्स खरेदीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीच्या कामगिरीचा विचार करा. नुसत्या कोरड्या आकडेवारीने किंवा अपूर्ण माहितीने फक्त दिखाव्याला भुलून गुंतवणूक करु नये. ज्या उद्योगांना सतत भांडवलाची आणि कर्जाची गरज लागते अश्या उद्योगातून परतावा नेहमी कमी मिळतो. तसेच काही क्षेत्राला वारंवार अडचणी (कच्च्या माल तुटवडा,आर्थिक घोटाळे ) येतात त्या कंपन्या गुंतवून पडू नका. नफा जरूर कमावयचा पण त्यासाठी अनाठायी धोका पत्करून आपली रात्रीची झोप मात्र गमवायची नाही घिसाडघाईने चुकीचे गुंतवणूक निर्णय घेउन अडचणीत स्वतःला पाडू नका शेअर्स विक्रीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचे भवितव्य आणि कामगिरी याचाच विचार करा. शेअर्स चे भाव कोसळले म्हणून विकू नका. तसेच दीर्घकाळ आपल्या जवळ शेअर्स बाळगले म्हणून घसरणीमुळे नुकसानही सहन करु नका शेअर बाजारात काय किंवा एकूणच काय ह्रदयापेक्षा मनाला आणि भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. कारण बाजार पैशापेक्षा मानसिकतेवर चालतो. Comments ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर