* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: GO KISS THE WORLD
 • Availability : Available
 • Translators : SUNITI KANE
 • ISBN : 9788184981568
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 192
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY
Quantity
GO, KISS THE WORLD WERE SUBROTO BAGCHI S BLIND MOTHER S LAST WORDS TO HIM. THESE WORDS BECAME THE GUIDING PRINCIPLE OF HIS LIFE. SUBROTO BAGCHI GREW UP AMIDST WHAT HE CALLS THE MATERIAL SIMPLICITY OF RURAL AND SMALL-TOWN ORISSA, IMBIBING FROM HIS FAMILY A SENSE OF CONTENTMENT, CONSTANT WONDER, CONNECTEDNESS TO A LARGER WHOLE AND LEARNING FROM UNUSUAL SOURCES. FROM HUMBLE BEGINNINGS, HE WENT ON TO ACHIEVE EXTRAORDINARY PROFESSIONAL SUCCESS, EVENTUALLY CO-FOUNDING MINDTREE, ONE OF INDIA S MOST ADMIRED SOFTWARE SERVICES COMPANIES. THROUGH PERSONAL ANECDOTES AND SIMPLE WORDS OF WISDOM, SUBROTO BAGCHI BRINGS TO THE YOUNG PROFESSIONAL LESSONS IN WORKING AND LIVING, ENERGIZING ORDINARY PEOPLE TO LEAD EXTRAORDINARY LIVES. GO KISS THE WORLD WILL BE AN INSPIRATION TO YOUNG INDIA , AND TO THOSE WHO COME FROM SMALL-TOWN INDIA, URGING THEM TO RECOGNIZE AND DEVELOP THEIR INNER STRENGTHS, THEREBY HELPING THEM REALIZE THEIR OWN, UNIQUE POTENTIAL.
असे प्रेरणादायी अनुभव वाचणं हा कोणत्याही वयोगटाच्या वाचकाला अत्यंत श्रीमंत करणारा अनुभव ठरतो. ‘माइन्ड-ट्री’ या भारतातल्या अत्यंत नामवंत अशा सॉफ्टवेअर सव्र्हिसेस कंपनीचे सहसंस्थापक सुब्रतो बागची म्हणतात, ‘‘देशातील लाखो व्यावसायिकांना आणि लहान लहान गावातील तरुणांना संदेश देणं की, माझ्याप्रमाणेच तेसुद्धा आयुष्यात यशस्वी होऊ शकतील, हा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे.’’ व्यावसायिक आयुष्याचा प्रारंभ असतो जीवनातला अत्यंत निर्णायक टप्पा! या टप्प्यावर बुजुर्ग व्यक्तीनं स्वानुभवाद्वारे, तरुणाईला हसत-खेळत केलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरतं. ‘गो, किस द वर्ल्ड’ (जा, सारी दुनिया कवेत घे!) हा ‘माइन्ड-ट्री’ या सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक श्री. सुब्रतो बागचींच्या मृत्युशय्येवरच्या अंध मातु:श्रींनी त्यांना दिलेला संदेश, हेच प्रेरणादायी पुस्तकाचं शीर्षक आहे. चला तर मग! पाहू या की, श्री. बागचींनी आपली आंतरिक शक्ती ओळखून ती विकसित करताना कोणती आव्हानं पेलली आणि नव्या अनुभवांसाठी मनाची कवाडं उघडी ठेवून कोणता बोध घेतला!!
Video not available
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SUBROTO BAGCHI #सुनीति काणे #गो किस द वर्ल्ड #GO KISS THE WORLD #SUNITI KANE
Customer Reviews
 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-02-2011

  तरुणाईला हसत खेळत केलेलं मार्गदर्शन... गो, किस द वर्ल्ड’ (जा, सारी दुनिया कवेत घे!) हा माइन्ड - ट्री’ या सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक सुब्रतो बागचींच्या मृत्युशय्येवरच्या अंध मातोश्रींनी त्याना दिलेला संदेश हेच प्रेरणादायी पुस्तकाचं शीर्षक आहे. बुजु्ग व्यक्तींनं स्वानुभवाद्वारे, तरुणाईला हसत खेळत केलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरतं. बागचींनी आपली आंतरिक शक्ती ओळखून ती विकसित करताना कोणती आव्हानं पेलली आणि नव्या अनुभवांसाठी मनाची कवाडं उघडी ठेवून कोणता बोध घेतला, याचे विस्तृत विवेचन पुस्तकामध्ये आहे. सुब्रतो बागची यांचा जन्म १९५७ साली ओरिसा येथील पटनागढ येथे झाला. हे ‘माइन्ड ट्री चे सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत. पहिली आठ वर्षे तिचे सी. ओ. ओ. (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) म्हणून कार्यरत होते. २००८ साली सुब्रतो यांनी या कार्यातून बाजूला होऊन ‘माइन्ड ट्री’चे बागवान, माळी बनायचं ठरवलं. माइन्ड ट्रीच्या सर्वोत्कृष्ट १०० मनांची निगराणी ठेवणं आणि संस्थेच्या तीस विभागांना प्रशिक्षणाची मदत देणं हा त्यांच्या कार्याचा प्रमुख भाग आहे. सुब्रतोंच्या पत्नी सुस्मिता बागची प्रसिद्ध लेखिका आहेत. हे पुस्तक म्हणजे धैर्य, सचोटी आणि साहसाची एक असामान्य कथा आहे. ‘ह्रदय आणि आत्मा असलेली कंपनी संस्थापीत करण्यावर सुब्रतोबागचींनी दिलेला विशेष जोर हा आजच्या व्यवस्थापनात अत्यंत प्रचलित असलेल्या हायर अँड फायर (कामावर घ्या आणि डच्चू द्या) ह्या प्रथेवर रामबाण उतारा ठरेल.’ असे उद्गार मार्क टुली यांनी काढले आहेत. ही आत्मकहाणी सुब्रतो बागचींनी आत्मपरिक्षण करत आयुष्याचा आढावा घेतानाच पुन:प्रत्ययाचा आनंद लुटत लिहीलेली आहे. ओरिसाच्या लहान खेड्यांमध्ये गेलेलं बालपण, आईबापांनी आपल्या वागणुकीनं ठसा उमटवलेली उच्च नीतिमूल्यं, स्वत:चं व्यक्तिमत्व घडवताना आई वडिल आणि भावंडांची झालेली मदत जिवंत कुतूहल,नव्याच्या आनंद आणि घरातील ममता यांनी समृद्ध झालेलं बालपण हे सर्व पुस्तकाच्या पहिल्या भगात रेखाटलं आहे. दुसऱ्या भागात आपली ओळख होते, त्यांच्या चाळिशी पर्यंतच्या व्यावसायिक आयुष्याशी! राज्य शास्त्रातल्या पदवीनंतर ओरिसरच्या सचिवालयात कनिष्ठतम कारकून म्हणून व्यवसायाला सुरुवात करून डीसीएममध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जाऊन, तत्त्वासाठी आणि सचोटी राखण्यासाठी डीसीएम सोडून कंम्प्युटर विक्रीच्या व्यवसायात जाऊन, अखेरीस विप्रो कंपनीत मोठं योगदान देऊन उच्चपद मिळवेपर्यंतचा यातला अत्यंत बोधप्रद प्रवास आपल्याला भारावून टाकतो. तिसऱ्या भागात ‘माइंड-ट्री’ची संस्थापना आणि प्रवास रेखाटला आहे़ मध्यायुष्यात विप्रो सोडून पुरेसा विचार न करता आपल्या स्वभावाला विसंगत अशी नोकरी स्वीकारण्याची चूक त्यांनी प्रांजळपणे कबूल केली आहे. उच्च ध्येय ठेवून नवीन कंपनीची संस्थापना करण्यासाठी त्यांना समानधर्मीय कसे भेटले आणि ही मध्यायुष्यातली चूक सुधारताना त्यांनी अलौकिक अशी झेप समर्थपणे कशी घेतली, त्यात कोणत्या अडचणी आल्या आणि त्यातून ते सहसंस्थापक म्हणून यशस्वीरित्या कसे बाहेर पडले याचं अत्यंत ह्रद्य वर्णन तिसऱ्या भागात आहे. सामान्य परिस्थितीत जन्म घेऊन, उच्च नीतिमूल्यांची पायमल्ली न करता तेही असामान्य उंची गाठू शकले, पण तरीही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहणं, अंगी विनय राखणं, त्रयस्थपणे आपल्या यशची कारणमीमांसा करत असताना त्यासाठी कारणीभूत असलेल्यांना योग्य श्रेय देणं, सतत नव्या अनुभवांसाठी मनाची कवाड उघडी ठेवून त्यातून बोध घेत राहणं ह्या गोष्टी या आत्मकथनात जाणवतात. त्यामुळे सुब्रोतो बागची हे एक माणूस म्हणूनही फार श्रेष्ठ वाटतात. ते म्हणतात, ‘देशातील लाखो व्यावसायिकांना आणि मुख्यत्वेकरून भारतातील लहान लहान गावातील माणसांना तेही आयुष्यात यशस्वी होऊ शकतील असा संदेश देणं हा पुस्तक लिहिण्याचा हेतू आहे.’ पण याहूनही महत्त्वाचा संदेश पुढील ओळीत येतो. ‘पण यशस्वी होणं म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या यशस्वी होऊन भैतिक सुखं मिळवणं नव्हे. यशस्वी होणं म्हणजे तेजाकडून आणखी उच्च तेजाकडे जाणं आणि जाताना समवेत इतरांनाही घेऊन जाणं. यशस्वी होण म्हणजे मोठा माणूस बनणं नव्हे! यशस्वी होणं म्हणजे चांगला माणूस बनणं!’ या माणसाला आयुष्यात अनेक देवदूत भेटले. जाताजाता संदेश देऊन गेले. प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीनंतर घरी परतत असताना निवड समितीच्या प्रमुखाने सांगितले, ‘बाळा, कधीही लष्करात, नौदलात किंवा वायुदलात जाऊ नकोस.’ शिकागोला भेटलेल्या एका स्त्रीने म्हटले होते ‘तुम्ही जेव्हा एखादा पर्याय स्वीकारत असता, तेव्हा तुम्ही त्यांचे परिणामही स्वीकारत असता. ही गोष्ट मुलांच्या मनावर बिंबवणं एवढीच गोष्ट चांगल्या आईबापांच्या हाती असते.’ हवाईला एक ऐंशीपेक्षा जास्त वयाचा माणूस भेटला. तो म्हणाला,‘कधी निवृत्तीचा विचार करु नको. तुझं वय वाढलं की, कामाचा ताण कमी कर. कमी वेळ काम कर. पण कामं थांबवू नकोस.’ न्यूजर्सीच्या घरमालकाने सांगितले होते, ‘तुमचं तोंड उघडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनाची कवाडं उघडा!’ आयुष्यात शिकलेल्या काही महत्त्वाच्या धड्यांबद्दल ते लिहितात... १) साऱ्याची सुरुवात मनातूनच होते, २) स्वीकारण्याची क्षमता, ३) स्वीकारण्याच्या क्षमतेसाठी तुम्हाला प्रथम देता यायला हवं ४) लोकांशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित करा, ५) आयुष्य सततची वाटाघाट असतं. ६) अपेक्षेपलीकडचं यश मिळवण्यामुळं होणारी घसरगुंडी, ७) अगदी शेवटचा माणूसही महत्त्वाचा असतो, ८) इच्छेची तीव्रता त्याच्या परिणामकारकतेवरून मोजावी, ९) स्थितिस्थापकतेची, लवचीकपणाची शक्ती, १०) धन ही सुखाची गुरु-किल्ली नव्हे, ११) स्वत:पलीकडे बघायला शिका, १२) थोर माणसं चूक कबूल करतात, १३) स्वत:ला माफ करायला शिका, १४) स्वत:बद्दल शंका वाटणं सकारात्मकतेचं लक्षण असतं ‘कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी ‘गो, किस द वर्ल्ड’ हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. त्यातून शहाणपणाच्या आणि प्रामाणिकपणाच्या सोन्याच्या लगडी झळाळून उठतात,’ हे उद्गार आहेत एन. आर. नारायणमूर्ती यांचे. सुनीति काणे यांनी या ह्रद्य आत्मकहाणीचा सुंदर अनुवाद मराठीत केला आहे. अगदी स्वतंत्र लिखाण असावं एवढा यथार्थ. -डॉ. शैलजा यादवाड ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SHIVCHARITRAPASUN AAMHI KAY SHIKAVE
SHIVCHARITRAPASUN AAMHI KAY SHIKAVE by DR.JAYSINGRAO PAWAR Rating Star
Ajay Bobade

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही घटनांबाबत ऐतिहासिक माहिती देणारे पुस्तक आहे. यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना, त्यांचे धर्मनिरपेक्ष धोरण, रयत व कल्याणकारी प्रशासन, त्यांचा राज्याभिषेक यासंदर्भात लिहीलेले छोटेलेख आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात केलेली एकमेव आरमारी मोहीम म्हणजेच `बसरूर ची मोहीम` याबाबत माहिती आहेच, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रंज यांचे संबंध व छत्रपती शिवाजी महाराजांवर सुरतेच्या मोहिमेदरम्यान झालेला खुनी हल्ली याबाबत माहिती आहे. सर्वांनी जरूर वाचावे असे. मला पुस्तकातील आवडलेले एक वाक्य :- "शिवाजी राजा हा इतिहासावरही मात करणारा राजा होता." ! ...Read more

MAZA GAON
MAZA GAON by RANJEET DESAI Rating Star
Bageshree Deshmukh

#रणजितदेसाई #माझागाव उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे पुस्तकांच्या राशीत लोळायचं, उठायचं बसायचं, अखंड वाचायचं. पुस्तकं म्हटले की रणजित देसाई हे नाव मला वगळता येत नाही. या वेळी "माझा गाव" नावाचं पुस्तक हातात घेतलं. सध्याच्या वातावरणात जिथे कोरोनाने धुमाकू घातलाय त्यापासून तुटून एका वेगळ्याच गावी जाऊन बसले. बेळगावच्या परिसरातले डोंगर- टेकाडातले गाव. गावात नदी आहे, देऊळ आहे, विविध जातीचे थर आहेत कुलकर्णी- पाटलांची सत्ता आहे. पण त्या सत्तेत स्वार्थापेक्षा एकमेकांना जगवण्यासाठी लागणारा माणुसकीचा खळाळता झरा आहे. म्हणूनच गावावर अनेक संकटं येऊन गेली तरी माणसा- माणसांतला ओलावा आटलेला नाहीय... कथेचा सुत्रधार त्याचं हे गाव सोडून निघाला आहे, त्याच्या मनात आठवणींनी गर्दी केलीय. नदीकाठाला वळसा देऊन तो पुढे जाताना, टेकडीवरचं लक्ष्मीचं देऊळ त्याच्या नजरेत भरतंय. समोरच्या पांधीतून पुढे जाऊन पुर्वेची टेकडी ओलांडली की तालुक्याला जाणा-या बसने तो बेळगावी जाणार आहे... त्याचं मन भरून आलं आहे. या उंचावरच्या पांधीतून पलीकडे गेला की गाव दृष्टीआड होईल याची त्याला जाणीव आहे. न राहवून मागे वळून पाहताना एकाच ठिकाणी खिळल्यागत तो उभा राहिला आहे. दूर माडांच्या चौकोनाकडे त्याची नजर लागलीय. त्या चौकोनी जागेतच त्याचा दिमाखदार वाडा उभा आहे. इनामदारांचा वाडा. आणि हे स्वतःचं गाव सोडून, भविष्याकडे वाटचाल करताना त्याचं मन त्या वाड्यात, नव्हे. वाड्यातल्या एका व्यक्तीत अडकले आहे.... ती व्यक्ती त्याच्याशिवाय किती एकटीये, याची जाणीव त्याच्या भारलेल्या मनाला अधिकच अस्वस्थ करते आहे..... या पार्श्वभुमीवर सुरू झालेली गोष्ट आपल्याला त्या काळातल्या इनामदारकी. सत्तालोलूप नसलेली पण आपल्या पाखराखाली असलेल्या गावाचं आपण काय आणि कसं देणं लागतो याची जाणीव मनात सतत जागृत असलेले अप्पासाहेब या कथेचे नायक असल्यासारखे शोभतात. अप्पासाहेबांचा मुलगा त्यांच्या अगदीच विरोधी वृत्तीचा. बाहेरख्याली सुद्धा. तोच आपला अधिकृत वारस असल्याने अप्पासाहेबांची पदोपदी होणारी कोंडी. सोन्यासारखी सून, उमा. तिचे तुटलेले माहेर. लग्न होऊन दहा वर्षे उलटून गेली तिला मूल नसल्याने तिची होणारी तगमग आणि अप्पासाहेबांचा दुसरा मुलगा म्हणजेच कथेचा सुत्रधार, जयवंत तो अवघा आठ वर्षांचा. म्हणजे उमा घरात आली तेव्हा दोन वर्षांचा जयवंतच जणू तिचे मूल. त्याने फक्त उमेच्या पोटी जन्म घेतलेला नाही. पण उमेने आईची जागा भरून वर काकणभर जास्तच त्याच्यावर माया केलेली आहे. शेजारी राहणारे तात्यासाहेब गावातले मानलेले ब्राह्मणाचे घर आहे. तात्या- अप्पा बालपणीचे मित्र आहेत. तात्या आणि काकूने गावाला आपलंस केलंय ते फक्त त्यांच्या प्रेमाने नव्हे तर ते गावचे अनाधिकृत वैद्य आहेत. कुठल्याही व्याधीवर तात्या उपचार करू शकतात. ते वैद्य म्हणून धावत जातात तेव्हा त्यांना कुठलाही धर्म, जात त्याज्य नाही. एक आदर्श गाव कदाचित रणजित देसाईंच्या मनात रेंगाळत असावा. त्यातून त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं असावं. जिथे वर्षानुवर्ष जमीनदारकीने पिचलेला समाज भारताच्या इतिहासाने पाहिला आहे, तिथे देसाईंच्या या पुस्तकात माणुसकीने व्यापलेला गाव, समाज पाहिला की जाणवतं असं काही खरोखरच असलं असतं तर आपला समाज फार पूर्वीच माणुसकीने ओतप्रोत, समृद्ध असा झाला असता. जगावर, भारतावर कुठलीही आपदा कोसळल्यावर लोकांनी सर्व थरांतून मदत करावी. एकमेकांना जगवावे हे आवाहन करण्याची वेळ आली नसती. कृती आपोआप घडत गेली असती. तो समाज- स्वभाव ठरला असता. अतिसुखाने नांदणा-या गावात जत्रा भरतात, सोहळे होतात. अप्पासाहेब सूनेवर प्रेम-माया- विश्वास आपल्या पोटच्या पोरापेक्षा अधिक करतात. आपल्या पोरांत असलेल्या दुर्गुणांमूळे या घरात आणलेल्या या मुलीला "पुरेसे" सुख मिळालेले नाहीये, याची जाणीव अप्पासाहेब ठेवून आहेत. आपल्या अवती- भोवती कुठे अशी व्यक्ती सापडते का, आपण शोधत राहतो. गावावर अनेकवेळा अनेक संकटे येतात. अप्पासाहेब धिरोदात्त. परोपकारी. एकदा गावावर महामारी ओढवते. माणसे पटापटा गळून जातात. प्रेतांची विल्हेवाट लावायला तरूण धजावत नाहीत. अप्पसाहेब स्वतः तिरडी धरायला पुढे होतात तसा गाव जागा होतो. पुढे दुष्काळ येतो. अप्पासाहेब धनधान्याचे कोठार खुले करून देतात. गाव इनामदारांचे कोठार बघता बघता रिकामे करतात. अप्पासाहेबांच्या मुलावरच त्याच्या आततायी स्वभावामुळे बाहेरख्यालीपणामुळे नको ते बालंट येतं. तेव्हा मात्र हवालदिल अप्पासाहेब, ज्याला मायेने गोंजारलं तेच गाव यावेळी अप्पासाहेबांच्या विरोधात उभं ठाकल्यावर हललेले अप्पासाहेब देसाई लेखणीतून उभे करतात. गावात पडलेली दुफळी पुन्हा कसबाने जोडून घेतात. गाव पुन्हा अप्पासाहेबांना मानू लागतं. आपल्याला अप्पासाहेबांची काहीही घडलं तरी माझ्यावर कलंक नको ची भुमिका क्षणभर व्यथित करते. त्या पेक्षा जास्त तात्यासाहेबांतले राजकारण पाहून आपण दिग्मुढ होतो. या ठिकाणी देसाईंनी हे राजकारण ब्राह्मण तात्यांनाच का खेळायला लावले, आपण विचारात पडतो. तात्यांची झाकली मुठ, उघडी झाल्यावर, एकाएकी व्यक्तीरेखातला हा बदल पचायला जड जातो. गावावरच्या एका दरोड्यात अप्पासाहेब स्वतः लढून मृत्यूमुखी पडतात तेव्हा मात्र आपण लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर वाचतो आहोत असा भास होतो. आपल्याला उमा मात्र कथेत धरून ठेवते. एका पातळीवर या अनेक गोष्टी घडत असताना, अप्पासाहेब -उमा, जयवंत- उमा यांच्यातील संवाद आपल्या मनातली हळवी तार छेडून जातातच. वहिनी दीरातले हे संवाद. मर्यादाशील असले तरी, त्यांच्यातलं आई मुलाचं नातं सतत आपल्याकडे डोकावून पहात असतं. देसाईंचे हेच कसब हाती घेतेलेले पुस्तक सोडू देत नाही. जयवंताची एक- एक करून प्रेमाची माणसं गळून गेली आहेत आणि तो वरच्या शिक्षणाकरता हे गाव सोडून जातो आहे. पांधीच्या तोंडाशी त्याला त्याचा जीवनपट उलगडत जातोय. "माझा गाव" म्हणून अप्पासाहेबांची ही कथा तो आपल्याला सांगतो आहे. हे गाव सोडून जाताना, वाड्यात नवरा असला, तिचा तो सहचर असला तरीही, अप्पासाहेब आणि तो नसल्यावर तिथे त्याची उमावहिनी किती एकटी आहे, याची जाणीव होऊन पाय जागीच खिळले आहेत. डोळ्यांतून पाणी अखंड खळतंय.... वाड्याकडे पाहून त्याचे हात जोडले गेले आहेत. "तुला माहिती आहे, तू हाक मारशील तेव्हा मी धावत येईन" असे स्वतःशीच बोलून तो पांधीतून दिसेनासा झाला आहे.... ...Read more