* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Upcoming (COMMING SOON..!)
  • ISBN : 97893575207935
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2025
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
IF WE LOOK AT TURING ONLY AS A SCIENTIST OR A PERSON WHO MADE FUNDAMENTAL ACHIEVEMENTS IN THE FIELD OF COMPUTERS; THEN PERHAPS ONE WILL NOT FIND ANYTHING SPECIAL IN HIM. THEREFORE, LOOKING AT TURING ONLY AS A SCIENTIST WILL NOT DO JUSTICE TO HIS PERSONALITY. ALAN TURING, WHO WENT ON TO PROPOSE ONE EXTRAORDINARY CONCEPT AFTER ANOTHER, EXPERIENCED VERY UNEXPECTED EVENTS AT THE END OF HIS LIFE. ONLY AFTER THE MANY LAYERS OF ALAN TURING`S EXTRAORDINARY LIFE ARE REVEALED, PERHAPS THE `ENIGMA` IN HIM CAN BE UNRAVELED TO SOME EXTENT. ENIGMA MEANS `A MYSTERY` OR `INCOMPREHENSIBLE`. DUE TO THIS SERIES OF EVENTS THAT LEAVE US NUMB, THE END OF TURING`S LIFE WAS REFLECTED IN TRAGEDY. PERHAPS IT IS BECAUSE OF THE AMAZING BUT INCOMPLETE RESEARCH IN MATHEMATICS THAT ALAN IS STILL ALIVE TODAY THROUGH `AI`.
फक्त शास्त्रज्ञ किंवा संगणकाच्या क्षेत्रामध्ये मूलभूत कामगिरी करणारा माणूस म्हणून ट्युरिंगकडे बघितलं; तर कदाचित एखाद्याला त्यात फार काही विशेष वाटणार नाही. म्हणूनच ट्युरिंगकडे फक्त शास्त्रज्ञ म्हणून बघणं हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देणारं ठरणार नाही. एकामागून एक भन्नाट संकल्पना मांडत पुढे गेलेल्या अ‍ॅलन ट्युरिंगच्या आयुष्याच्या अखेरीला अतिशय अकल्पित घटना घडल्या. अ‍ॅलन ट्युरिंगच्या विलक्षण आयुष्याला असलेले अनेक पदर उलगडल्यावरच कदाचित त्याच्यामधला `एनिग्मा’ काही प्रमाणात उलगडू शकतो. एनिग्मा म्हणजेच `एखादं गूढ’ किंवा `अनाकलनीय’. आपल्याला सुन्न करून सोडणार्‍या या घटनाक्रमामुळे ट्युरिंगच्या आयुष्याचा अंत शोकांतिकेमध्ये परावर्तित झाला. गणितातील अचंबित करणार्‍या; परंतु अपूर्ण संशोधनामुळेच असेल कदाचित अ‍ॅलन आजही `एआय’च्या माध्यमातून जीवंत आहे असेच म्हणावे लागेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #चरित्र #अॅलन ट्युरिंग #अतुलकहाते #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHILITERATURE#BIOGRAPHY #ALANTURING #ATULKAHATE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे