* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660678
  • Edition : 9
  • Publishing Year : 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANY THINK THAT MODERN SCIENCE IS SOME VERY EXPENSIVE BUSINESS. ON THE CONTRARY, IN RELATION WITH THE AGRICULTURE MODERNIZATION MEANS UNDERSTANDING THE SECRETS OF NATURE AND USING THEM FOR THE BEST BENEFIT, WHILE INCREASING THE YIELD OF THE NATURE AND AUTOMATICALLY OF THE PRODUCE. FOR THIS, WE NEED TO COME TOGETHER, STUDY THE CROPS AND LAND TYPES IN OUR AREA, EXPERIMENT ON IT, AND THEN FIND OUT SUITABLE CONCLUSION TO GIVE BENEFIT TO ALL. WE REALLY WISH TO HAVE PROSPERITY, HAPPINESS AND FREEDOM, BUT WE FAIL TO UNDERSTAND THAT THE NATURE, THE SURROUNDINGS, AND OUR ENVIRONMENT ALL ARE WILLING TO SHOWER ALL GOOD THINGS UPON US. WE CAN WORK ON OUR NEW TECHNIQUES AND YET HELP THE NATURE. IN THE WESTERN COUNTRIES, THESE DAYS THE NEW SLOGAN IS `WE WITH OUR HAPPINESS, SATISFACTION, SURROUNDING, AND ENVIRONMENT SHALL LIVE IN PROSPERITY AND HARMONY`. WE NEED TO WORK ON SUCH LINES FOR THE BENEFIT OF OUR COUNTRY. IN THIS BOOK WE ARE GOING TO LEARN ABOUT VARIOUS SMALL EXPERIMENTS THAT WILL SURELY HELP US TO IMPROVE THE QUALITY AND QUANTITY OF OUR YIELD.
टाकाऊ पदार्थ कसे खत बनत असतात व त्यातून त्याच वेळी निसर्गातील कार्बनचक्र, नत्रचक्र या चक्रांना योग्य गती कशी मिळते... योग्य वनस्पतिसृष्टीशी हातमिळवणी केली तर पुन्हा आपणास उपयुक्त असे अनेक नवनवे पदार्थ कसे मिळविता येतात... शेतातील काढलेले तण शेतातच परत कसे गेले पाहिजे...आपल्या परिसरातील वनस्पती, प्राणी इत्यादी सजीवसृष्टीने टाकाऊ म्हणून टावूÂन दिलेल्या सर्व घटकांचे, आपल्या नव्या गरजा भागवण्यासाठी वापर करण्याचे शास्त्र सप्रयोग सांगणारे... परिसरात वाNयावर उधळला जाणारा पालापाचोळा व शेताच्या बांधावर कुजून पडलेले गहू, ज्वारीची धाटे, कांडे-धसकटे व टरफले आपल्या परिसराशी काहीतरी नेमके नाते सांगत आहेत याची जाणीव देणारे... कृषिवैज्ञानिक समाजजीवनाची स्थिर पायाभरणी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIPULACHSRUSHTI #विपुलाचसृष्टी #AGRICULTURE #MARATHI #SHRI.A DABHOLKAR श्री.अ.दाभोळकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL NASHIK 22-01-1990

    काही माणसं प्रयोगशील असतात. समृद्धीचा मार्ग प्रयोगातून जात असतो, हे ते आपल्या प्रयोगातून इतरांना दाखवून देतात. प्रयोगशीलता हा गुण अनेकांनी आत्मसात केल्यास ‘आपल्याच सृष्टीत असलेले विपुल धन’ आपल्या सर्वांना सुख-समृद्धीकडे नेईल यात शंकाच नाही, परंतु यासठी प्रथम आपणाला ‘प्रयोग’ परिवारात जावे लागेल आणि याच परिवारातील श्री. अ. दाभोळकरांचे ‘विपुलाच सृष्टी’ हे पुस्तक वाचावे लागेल. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा असलेला मानव नाही म्हटलं तरी जास्त प्रयोगशील झालेला आहे, संगीताच्या सहवासात पिकांची वाढभरघोस होते, हे काही आता नवीन राहिले नाही; परंतु अलीकडेच विद्युत क्षेत्राच्या सानिध्यात पिके चांगली येतात, असे दिसून आले आहे. परंतु आज परदेशात मात्र जमिनीसाठी व पिकासाठी वापरली जाणारी रासायनिक खते, किटकनाशके, औषधे, यांच्याविरुद्ध कृषी विचाराची एक नवी वैज्ञानिक लाट आली आहे. रासायनिक खतांच्या चांगल्या परिमाणापेक्षा वाईट परिणामांना जास्त तोंड द्यावे लागत असल्याने ‘जुने ते सोने’ या विचारानुसार विविध प्रयोगामार्फत परत जुनी सेंद्रिय खते व बियाणे कृषी क्षेत्रात वापरात येऊ लागली आहेत, याचे विवेचन या पुस्तकात आहे. लेखकाने सांगितलेल्या फेबर, जीन पेन, मासा नोबू फुकुओका वगैरेंच्या प्रयोगामुळे कॉग्रेस गवताला नाके मुरडणारेसुद्धा ‘माझ्या अंगणात कॉग्रेस फुलवला’ असे सांगू लागतील. गच्चीत निवडुंग लावणारे त्याच गच्चीत फळांचे भरघोस पीक घेतील. परंतु यासाठी ‘विपुलाच सृष्टी’ हे पुस्तक एकदा तरी उघडावे लागेल. निसर्ग हा आपला मित्र आहे. तो आपल्याला मदत करण्यास सदैव तयार असतो. त्याच्याशी हात मिळवणी करून त्याची रहस्ये जाणून घेतली पाहिजेत. निसर्गात घडणाऱ्या घटनांचे डोळसपणे निरीक्षण करून, त्यांचा उपयोग करून घ्यावा. पावसाळ्यात कुजणारा साधा पाला-पाचोळा, काटक्या किती उपयोगी आहेत हे सांगताना लेखक म्हणतो, ‘‘असा कुजलेला पाला-पाचोळा झाडाच्या मुळांच्या वाढीस उपयुक्त असणारे घटक बनवीतात. शिवाय हवेतील ओलावा ओढून घेण्याच्या त्याच्या शक्तीमुळे तो जमिनीचा ओलावा टिकवून ठेवतो.’’ जमिनीतील तण टाकाऊ नसून, धनाइतकेच मौल्यवान आहे. त्यांच्यामार्फत पिकांना आवश्यक ते सूक्ष्म घटक पुरविले जातात. शेतातल्या वा बागेतल्या काटक्या-कुटक्या, पाला-पाचोळा, कंपोस्ट खत वापरून केलेल्या ढिगावर कोणतेही रासायनिक खत न वापरता चांगले पीक येते याची सचित्र माहिती पुस्तकात आहे. जीन पेनच्या प्रयोगानुसार रंधलेले लाकूड, बारीक केलेला काटुकफाटा भिजवून व कृत्रिमरित्या कुजवून त्यापासून उत्तम खत, बायोगॅस व वीजही मिळविता येते. फुकुओका या जपानी शास्त्रज्ञाच्या ‘पेरा, फिरा, कापणी करा व काड तेथेच फिसकरा’ या भातशेतीच्या वेगळ्या प्रयोगाने भाताचे उत्पन्न वाढते हे दाखवून दिले आहे. फुकुओकाचे तत्त्व वापरून रानझाडाप्रमाणे भाजीपाल्याचीही लागवड करता येते. पॉडिचेरी येथील अरिंवद आश्रमातील अ‍ॅटोव्हिले आश्रमवासियांनी उजाड जमिनीचा कायापालट करता येतो हे दाखवून दिले आहे. यासंबंधीची माहिती मोठी उद्बोधक वाटते. आपल्या अनेक प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण सभोवतालचा परिसरच करतो. फक्त त्यासाठी थोडीशी वैज्ञानिक साक्षरता संपादिली पाहिजे. आधुनिक विज्ञानाचा समजून उपयोग केला तर दहा आर जमिनीवर पाच माणसांच्या कुटुंबाचा निर्वाह होऊ शकतो, याचे सविस्तर विवेचन लेखकाने केलेले आहे. पुस्तकाचा शेवट लेखकाने स्वत:च्या मनोगताने केला आहे. हौशी शेतकऱ्यांना व शेतात विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना हे पुस्तक उपयुक्त वाटेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more