* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: GHARATIL BAG
 • Availability : Available
 • ISBN : 8177663658
 • Edition : 4
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 156
 • Language : MARATHI
 • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
Quantity
EVERYONE FINDS HAPPINESS IN THE COLOURFUL FLOWERS, A FULLY BLOSSOMED TREE, AND A PLANT WITH COLOURFUL LEAVES. THERE IS HARDLY ANYONE WHO IS NOT FOND OF PLANTS, WHO DOES NOT FIND HAPPINESS IN THE COMPANY OF PLANTS. BUT STILL, THESE DAYS THE SITUATION IS TIGHT, IT DOES NOT ALLOW US TO ALLOT ANY SPACE TO THE PLANTS AND TREES IN OUR LIVES AND HOUSES. HOW MUCH WE LOVE THEM, WE CANNOT GIVE JUSTICE TO THEM. IN THE CEMENT AND CONCRETE JUNGLES AROUND US THERE IS SPACE ONLY FOR THE FLATS AND NOT THE GARDENS. BUT, WHEN THERE IS A WILL, THERE IS A WAY, ISN`T IT? IT IS TRUE THAT WE CANNOT PLANT THEM OUTSIDE IN GARDENS, BUT THEN WE CAN ALWAYS MAKE SOME PLACE FOR THEM IN OUR HOUSES, ISN`T IT? CAN WE NOT HAVE A SMALL GARDEN INSIDE OUR HOUSE? A FEW YEARS BACK, PEOPLE WOULD NOT HAVE AGREED TO THIS IDEA, BUT TODAY THIS IDEA IS LARGELY ACCEPTABLE. A VARIETY OF PLANTS ARE SEEN INSIDE HOUSES AND OFFICES AS WELL. WHILE PRACTICING IT, WE HAVE TO REMEMBER THAT THE INDOOR PLANTS ARE DIFFERENT FROM THE OUTDOOR VARIETIES. THEIR TECHNIQUE IS A BIT DIFFERENT. THIS BOOK WILL BE YOUR GUIDE TO KNOW THESE TECHNIQUES OF INDOOR GARDENING. GO THROUGH IT AND EXPERIENCE NATURE INSIDE YOUR HOUSE LATER BY FOLLOWING IT.
रंगीबेरंगी पानांचे एखादे झाड पाहिले, सुंदर पुÂलांनी लगडलेले एखादे झुडूप पाहिले, तर कोणाला आनंद होत नाही. झाडा-झुडपांबद्दल प्रेम न वाटणारा, मनाला आनंद न होणारा माणूस विरळाच!म्हणूनच संत तुकारामांनी म्हटले आहे, ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरींR वनचरे.’ परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आपणांस झाडाबद्दल प्रेम वाटत असले, फुलझाडे आपणांस आवडत असली तरी मोकळी जागा कोठे आहे, सध्या शहरात सिमेंट-क्राँक्रीटची जंगले झाली आहेत. फ्लॅट संस्कृती वाढते आहे. अशा परिस्थितीत झाडे कोठे लावायची ? परंतु इच्छा असेल तर मार्ग निघतो. घराबाहेर झाडे लावायला जागा नाही. म्हणून घरातच झाडे लावली, तर? घरातच आपण आपली बाग फुलवली, तर ? काही वर्षांपूर्वी ही कल्पना अनेकांना पटली नसती. परंतु आता ही कल्पना रुजली आहे. अनेक घरांत, कार्यालयांत निरनिराळ्या प्रकारची झाडे ठेवली जात आहेत. परंतु ‘घराबाहेरच्या बागेतील’ झाडांपेक्षा ‘घरातील बागेत’ लावायची झाडे वेगळी असतात. त्यांना जगवायचे, वाढवायचे तंत्र वेगळे असते ! ते तंत्र समजावे, आपल्या घरात नैसर्गिक झाडांची छान छान बाग कशी फुलवावी,वाढवावी याचसाठी आहे हे मार्गदर्शन - हे वाचून घरातच छान बाग फुलवा,निसर्गाचा आनंद लुटा, आनंदी व निरोगी व्हा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GHARATILBAG #GHARATILBAG #घरातीलबाग #TECHNOLOGYENGINEERINGAGRICULTURE #MARATHI #A. B.PATIL #ए. बी.पाटील "
Customer Reviews
 • Rating StarAAGMAN 25-11-2001

  बागकाम करण्याची आवड असणाऱ्यांना जागेचा प्रश्न नेहमीच सतावतो. त्यांची ही समस्या आता सुटू शकेल. बागकाम करू इच्छिणाऱ्यांसाठी याविषयीची माहिती देणारे पुस्तक आ. बा. पाटील यांनी लिहिले आहे. घरातील बागकामासाठी झाडे कोणती निवडावीत, त्या झाडांच्या कुंड्या कशानिवडाव्या, कोणती झाडे घरात कोणत्या ठिकाणी अधिक शोभून दिसतात. अशी झाडे कुंड्यांमध्ये लावताना कोणती काळजी घ्यावी. अशी खूप माहिती या पुस्तकात आहे. हँगिग बास्वेट, काचहंडीतील शोभेची झाडे, डिश गार्डन, घराच्या खिडकीतील बाब अशा बागकामाची माहिती देत झाडांची निगा कशी घ्यावी, त्यांची छाटणी कशी करावी, रोपे कशी करावीत, झाडांच्या कुंड्या बदलताना काय काळजी घ्यावी, रोगकिडीपासून झाडांचा बचाव कसा करावा याविषयी या पुस्तकात विस्तृत चर्चा करण्यात आली. झाडांचे अनेक प्रकारही या पुस्तकात दिले आहेत. अशा झाडांना किती तापमान लागते, पाणी किती लागते, ती झाडे घरात कोठे ठेवावीत अशी माहिती अनेक प्रकारची झाडे या प्रकरणात वाचण्यास मिळते. अग्लोनेमा, अ‍ॅस्पॅरॅगस, बिगोनिया रेक्स, मिसस डिसकलर, क्रोटान, होया बेला, मनीहोनस, मरांटा, मॉन्स्टेरा आदी अनेक झाडांविषयीची माहिती या प्रकरणात आहे. फर्न, पाम कॅटस्, सक्युलंटस्, कंदमुळांची फुलणारी झाडे असे विविध प्रकारही देण्यात आले आहेत. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ARDHADASHAK
ARDHADASHAK by MILIND MAHANGADE Rating Star
Rajendra Jadhav

Milind, absolutely great, you have touched all thoughts and feelings of those who are preparing for competitive exams. This book never let the reader to divert their mind. I think each reader can recall their past. This book will definitely help to tink, for those who are willing to appear for such competitive exams and their parents too. Once again congratulations and all the best. ...Read more

COMA
COMA by ROBIN COOK Rating Star
Sumit Deshmukh

सत्तरच्या दशकातली ही कथा आहे. बोस्टन शहरातील `मेमोरियल` हे एक प्रतिष्ठित व भव्य रुग्णालय. दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी सुद्धा मेडिकल च्या पाच विद्यार्थ्यांचा एक समूह तिथे प्रशिक्षणासाठी येतो. त्यांतलीच एक म्हणजे कथेची नायिका - सुसान. तिथे तिला अज्ञातव रहस्यमय कारणाने कोमात गेलेल्या रुग्णांच्या काही केसेस पाहायला मिळतात. बुद्धिमान सुसान तशी अभ्यासू असल्यामुळे व तसेच काही रुग्णांबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे तिच्या मनात अशा अज्ञात कारणाने कोमात जाणाऱ्या रुग्णांच्या केसेस बद्दल कुतूहल निर्माण होतं. आणि मग ती त्या प्रकरणांचा छडा लावायचा कसा प्रयत्न करते, तिला कोणकोणते अडथळे येतात आणि शेवटी भीषण वास्तव कसं समोर येतं ते सांगणारी ही रंजक कथा. कथेतील बरेच प्रसंग हे थरारक असले तरी पुढे काय होईल त्याचा अंदाज लागतो. तसेच मलपृष्ठावरील परिचय देणाऱ्या मजकुरामुळे रुग्ण कोमात का जातायत त्याचा थोडा अंदाज वाचकाला आधीच आलेला असतो. त्यामुळे रहस्याचा घटक थोडा कमी झालेला आहे. अनुवाद नेहमीप्रमाणे उत्तम. एकदा नक्कीच वाचण्यासारखी कादंबरी. अभिप्राय- 3.5/5 #थरारकथा ...Read more