* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHAND BAGECHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985207
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : MARATHI
  • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF YOU HAVE A SMALL GARDEN IN THE SMALL COURTYARD IN FRONT OF THE BUNGALOW OR DOOR, THEN IT FEELS GREAT. SO MUCH SO, EVEN IN THE FLAT GALLERY, IN THE WINDOW GRILLS OR IN A CORNER OF THE HOUSE, IF YOU PLANT A SPIDER OR A FLOWER GARDEN, THE BEAUTY OF THE HOUSE INCREASES AND IS LAVISH. BUT THEN, THE QUESTION IS, HOW TO PREPARE A GARDEN IN SPACE? WHAT DO YOU WANT TO DO? AND ONCE THE GARDEN IS READY, HOW TO MAINTAIN IT PROPERLY, HOW TO TAKE CARE OF IT? YOU WILL FIND ANSWERS TO ALL OF THE ABOVE QUESTIONS IN THIS BOOK. THIS INCLUDES VARIOUS TYPES OF GARDEN, HOW TO CHOOSE THE PLANTS ACCORDING TO THE SPACES, HOW TO DO BONSAI, HOW TO USE FERTILIZER-PESTICIDES, VARIOUS TYPES OF FLOWERING, ETC. THEREFORE, THIS BOOK WILL DEFINITELY BE USEFUL FOR NATURE-SEEKERS, AS WELL AS FOR
बंगल्याच्या अंगणात किंवा दारासमोरच्या लहानशा जागेत छोटीशी बाग असेल तर छान वाटतं. इतकंच काय, तर अगदी फ्लॅटमधल्या गॅलरीत, खिडक्यांच्या ग्रिल्समध्ये किंवा घराच्या एखाद्या कोप-यात, जागेनुसार एखादं रोप किंवा फुलझाडं लावल्यास घराची शोभा तर वाढतेच व प्रफुल्लितही वाटतं. पण मग प्रश्न पडतो की, जागेनुसार बाग तयार करायची कशी? त्यासाठी काय तयारी करायची? आणि एकदा का बाग तयार झाली की, ती नीट कशी ठेवायची, तिची काळजी कशी घ्यायची? वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील. यात बागांचे विविध प्रकार, जागेनुसार झाडांची निवड कशी करावी, बोन्साय कसे करावे, खतं-कीटकनाशकं कशी वापरावीत, पुष्परचनेचे विविध प्रकार कोणते इत्यादी विषयांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी, तसेच जिज्ञासूंसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHANDBAGECHA #CHANDBAGECHA #छंदबागेचा #TECHNOLOGYENGINEERINGAGRICULTURE #MARATHI #SUNITIMANGESHDESHMUKH #सुनीतीमंगेशदेशमुख "
Customer Reviews
  • Rating Starरमेश मोहिते

    आप्तस्वकियांचा अकाली मृत्यू, व्यवसायातील अपयश, अपेक्षाभंग, सेवानिवृती नंतरचे रिकामेपण आदि कारणामुळे आलेले नैराश्य या समस्येची उकल करणारे सलग सहा पुस्तक परिचय करून दिल्यानंतरही, समस्या निवरणाचा अजूनही एक पर्याय सुचवू इच्छितो तो म्हणजे, आपल्या आवडीच्य एखाद्या छंदात गुंतून राहणे. सेवानिवृती नंतर मी बागकामात गुंतवून घेतल्यामुळे, बागकाम संदर्भातीलच एखाद्या पुस्तकाचा परिचय करून देवून या अभियानातील माझ्या सहभागाची सांगता करण्याचे ठरविले. या संदर्भातील बरीच पुस्तके वाचली होती पण आजवर परिचय करून दिलेल्या पुस्तकांच्या तुलनेत ती फारसी भावली नाहीत. शेवटी आपल्या ग्रुपवरील,या क्षेत्राशी निगडीत असलेल्या बावचकर सरांशी संपर्क साधला, त्यांनी संगितलेल्या क्लू वरुन हे पुस्तक काल, कोविड बंद काळात, दस्तुतखुद्द लेखिके कडूनच मिळविले. मी कृषिपदवीधर असल्यामुळे बागकाम या क्षेत्राची थोडीफार माहिती असली तरीही, आज सौ. सुनीति देशमुख यांचे ” छंद बागेचा ” हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र, मी ,आमच्याच बागेत किती चुका केल्या आहेत हे लक्षात आले. केवळ पुस्तकी ज्ञानावरच कोणत्याही क्षेत्रात लगेचच प्रावीण्य प्राप्त होत नसले तरीही, संबंधित विषयाची माहिती वाचून, त्या क्षेत्रात गोडी निर्माण झा/केली तर आपण, अगदी राष्ट्रीय स्तरापर्यन्त आपली ओळख निर्माण करू शकतो याचे उदाहरण म्हणजे या पुस्तकाच्या लेखिका. पण,“अति परिचयात अवज्ञा” असे काहीसे, लेखिके बाबत झाल्याकडून झाले. नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची सुधारित तिसरी आवृति २०१८ मध्ये, मेहता पब्लिसिटी हाऊस सारख्या नामांकित प्रकाशन संस्थेने प्रकाशित करूनही, हे पुस्तक काल पर्यन्त मलाही परिचित नव्हते. कदाचित लेखिकेचे , बोनसाय(वामनवृक्ष), बोनसाय म्युरल, ट्रे लँडस्केप, रॉक प्लांटिंग, पुष्परचना,इकेबाना, जपानी बगीचा आदिच्या कार्यशाळा, व्याख्याने आणि लेख हे फक्त, आर्थिक उच्चत्तरातील लोकांसाठीच आहेत असा गैरसमज करून घेतल्यामुळे हे झाले असावे. विशेष म्हणजे लेखिकेस, आपल्या घराभोवतालची बाग तसेच वर नमूद केलेल्या सर्व नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी, कैकवेळा मिळालेल्या पारितोषक वितरण समारंभात, विविध संस्थांनी दिलेल्या सन्मानपत्र सोहळ्यात प्रत्यक्ष हजर राहूनही माझ्या कडून हे घडले आहे. असो. चार विभागात विभागलेल्या या पुस्तकाच्या पहिल्या विभागात, बागेचा इतिहासात, ज्यात बुद्ध, महावीर, रामायण,महाभारत काळातील पुष्पवाटिका, पासून शालीमार, मुगल गार्डन,ते अद्ययावत बागांची माहिती, बागेची आखणी (ले आऊट) कशी असावी, लॉन, गच्चीवरील बाग, वॉटर फॉल, रोपवाटिका,अभिवृद्धी- कलम करून नवी रोपे बनविण्याची कला, वॉटर गार्डन, किचन गार्डन, रॉक गार्डन, बागेत वापरायच्या हत्यारांचा परिचय (हा परिचय हत्यारे खरेदी करण्यापूर्वीच होणे आवश्यक आहे), हंगामी फुलझाडे, ऑकिड, नेचे, इनडोअर प्लांट (सावलीतील बाग) शिंकाळी (हँगिंग्ज) तयार करणे, निवडुंग, शुष्क काष्ट (ड्रिफ्ट वूड) तबक बाग (डिश गार्डन),बॉटल गार्डन आदि थोड्याफार ओळखीच्या किंवा अजिबात माहित नसलेल्या विषयांची खूप सोप्या भाषेत माहिती सांगितली दिली आहे. माझ्या मते हे पुस्तक इतक्याच माहितीसह, याच किमतीत, जरी मिळाले, तरीही ,पैसे वसूल झाले असे म्हणता आले असते. दुसर्या विभागात लेखिकेच्या आवडत्या-बोनसाय,बोनसाय म्युरल, ट्रे लँडस्केप, रॉक प्लांटिंग, ट्रे वॉटर गार्डन या विषयाची सविस्तर माहिती आहे. लक्षपूर्वक आणि चिकाटीने करायचे हे काम एकदा जमले की तुम्ही या क्षेत्रातील “मास्टर” झालात असे समजायला हरकत नाही. तिसर्या विभागात- पुष्प रचना,इकेबाणा, पाश्चिमात्य/भितीवरील/पाण्यावरील पुष्प रचना, काळजीपूर्वक समजावून घेवून करू लागलात की हाच छंद व्यवसाय म्हणूनही जमून जाईल/गरजूना सुचवू शकाल. आजकाल शहरी भागात या व्यवसायास मागणी असून, मागणी करणारा वर्ग सधन असल्या मुळे फीच्या रूपाने अर्थार्जन ही होईल. चौथ्या विभागात- पर्यावरणाचे र्हासपर्व,औषधी वनस्पती,रासायनिक खते आणि किटक नाशकांचे दुष्यपरिणाम ,गांडूळ खत निर्मिती,घरा जवळ लावायचे वृक्ष,रोपवाटिका,बागेतील अवजारे आणि काही उपयुक्त माहिती तक्ते दिले आहेत. या पैकी रोप वाटिका या व्यवसायास खूप स्कोप असुन,जवळ जवळ सर्व भारतात,विशेषत: दक्षिण व पुर्व भारतात,लागणार्या रोपा पैकी बहूतेक रोपे ही बेंगलोर परिसर आणि द.गोदावरी जिल्ह्यात तयार होतात. थोडक्यात सांगायचे तर सार्वजनिक, व्यवसायभिमुख आणि घरगुती अशा बागेच्या तीन प्रकारा पैकी घरगुती बागेचे , फ्लॅट धारकांसाठी कुंडीतील,हँगिंग आणि गॅलरीतील बागकाम. रो हाऊस,छोटीघरे असणार्याना, फ्लॅट धारकांचे सर्व प्रकार शिवाय टेरेस गार्डन. आणि घराभोवती जागा असणार्यांसाठी वरील दोन्ही प्रकारा शिवाय परसबाग,कुंपन,मोठे वृक्ष लागवड आदीचा समावेश. असे तीन प्रकार पाडता येतील.या तिन्हीही प्रकारच्या घरात राहणार्याना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. मी वाचलेल्या अशा आशयाच्या पुस्तकांत हे सर्वाधिक माहितीपूर्ण पुस्तक आहे. ”कोल्हापूर बोनसाय क्लब” च्या अध्यक्षा असलेल्या सौ.देशमुख यांच्या बागकामा संदर्भातील प्रत्यक्ष आणि ऑन लाइन कार्यशाळाही सतत सुरू असतात. पुस्तकातील माहितीच्या आधारे प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करून, आपल्या अनुभवातूनच पूर्णत्वाकडे जाण्यासाठी, ,याहून उत्तम हंगाम/वेळ असणार नाही . तसेच या निमीत्त कोरोंना काळातील बंदीवासही सत्कारणी लागेल . ...Read more

  • Rating Star LOKPRABHA 4-9-2015

    बागकामाची हौस व छंद यातून वनस्पती संवर्धनाचे शिक्षण घेणे आणि अनेक कार्यशाळा व क्लासेस घेत, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचे सामाजिक कार्य लेखिका सुनीती देशमुख यांनी ‘छंद बागेचा’ हे पुस्तक लिहून केले आहे. अनेक प्रकारच्या उद्यानपद्धतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास,विकास आणि मार्गदर्शन करत अनेक निसर्गसंवर्धक त्यांनी निर्माण केलेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वैदिक काळापासून ते प्रागैतिहासिक काळापर्यंत म्हणजेच इ. स. पूर्व ५०० ते आत्तापर्यंतच्या काळात उद्यानकलेवर विभिन्न धर्म, संस्कृतीचा प्रभाव पडल्यामुळे त्यात कसे परिवर्तन होत गेले याचे सविस्तर वर्णन ‘बागेचा इतिहास’ या लेखात केले आहे. हिरवळ म्हणजेच कुठल्याही बागेचे हृदय. हिरवळ कशा प्रकारची असावी, त्यासाठी कोणते खत वापरावे, हिरवळीची काळजी कशी घ्यावी, तसेच जुन्या हिरवळीला पुनरुज्जीवित कसे करावे याचे मार्गदर्शन ‘हिरवळ (लॉन)’ मध्ये वाचायला मिळते. कमीत कमी जागेत गच्चीवरील बाग कशी तयार करावी? ती आकर्षक दिसण्यासाठी धबधबा कसा तयार करावा? गच्चीवरील बागेत कोणती झाडे लावावीत? छोट्या रोपांसाठी रोपवाटिका कशी असावी? अभिवृद्धी म्हणजेच रोप कसे तयार करावे? त्याची निगा कशी राखावी? या सर्व प्रश्नांची उकल केली आहे. तसेच अश्मउद्यान म्हणजेच रॉकगार्डनच्या सजावटीचे मार्गदर्शन, बागेत वापरायच्या अलंकारांची (अ‍ॅक्सेसरीज) माहिती, हंगामी फुलझाडांची माहिती व त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, ऑर्किडच्या फुलांची, रोपांची माहिती. इनडोअर प्लँट्स, त्यांची काळजी कशी घ्यायची, हँगिग्जबद्दलची माहिती आहे. कॅक्ट्स व सक्युलंट या निसर्गातील दोन सुंदर पण अंधश्रद्धेमुळे दुर्लक्षिलेल्या झाडाच्या प्रकारांची माहिती. त्यांच्या पोटजातीची माहिती, त्याचबरोबर हे दोन्ही प्रकार जगवण्यासाठी घ्यावयाची काळजी वर्णन केली आहे. शुष्क काष्ठ (ड्रिप्टवूड) म्हणजेच झाडाचा वाळलेला भाग. जंगलातील मेलेल्या झाडाची खोडे, मुळं, फांद्या यांवर खूप दिवस ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक घटकांची प्रक्रिया होऊन विविध आकारांची शुष्क काष्ठे तयार होतात. हे नैसर्गिक ठोकळे बागकामासाठी कसे वापरावे? त्यांची निगा कशी राखावी? त्यात कुठल्या प्रकाराची झाडे लावावी? तबकातील बाग म्हणजेच डिश गार्डन कसे तयार करावे? तसेच काचहंडीतील बगिचा बॉटल गार्डन कसा असावा? या सर्वांची सचित्र माहिती विभाग एकमध्ये दिली आहे. विभाग दोनमध्ये निसर्गाच्या सहवासाच्या आवडीपोटी मोठ्या झाडांना ‘बटुरुप’ देऊन निसर्गातील मोठ्या झाडांना आपल्या बाल्कनीत किंवा बैठकीत आणण्याच्या प्रकाराला ‘बोन्साय’ असे म्हणतात. त्याची सविस्तर माहिती लिहिली आहे. मूळची चीनमध्ये उगम पावलेली ही कला जपानला जाऊन कशी विकसित झाली? याची माहिती. त्याचप्रमाणे भित्तिचित्र म्हणजेच बोन्साय म्युरल, तबकातील देखावा म्हणजेच ट्रेलॅण्डस्केप, दगडावरील झाडे म्हणजे रॉक प्लॉंटिंग, तबकातील जलोद्यान म्हणजेच ट्रे वॉटर गार्डन या विविध प्रकारांत कोणत्या प्रकारची झाडे कशा पद्धतीने लावावी? त्यासाठी कशा प्रकारचे साहित्य वापरावे तसेच नंतर त्याची काळजी कशी घ्यावी यावे विस्तृत मार्गदर्शन केले आहे. विभाग तीनमध्ये सर्व प्रकारच्या पुष्परचनांची माहिती कलात्मकरित्या दिली आहे. भारतीय नृत्यप्रकाराचे हावभाव घेऊन त्या आधारे करता येणाऱ्या पुष्परचनेसाठी सचित्र माहिती दिली आहे. त्याचबरोबर इकेबाना पाश्चिमात्य शैलीची पुष्परचना, भिंतीवरील पुष्परचना, पाण्यावरचा गालिचा, फुले ताजी ठेवण्याच्या युक्त्या, त्याचबरोबर ड्रायप्लॉवर डेकोरेशनचे मार्गदर्शन केले आहे. विभाग चारमध्ये पर्यावरणाचे ऱ्हासपर्वअंतर्गत मानवनिर्मित प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम, त्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय दिले आहेत. परसबागेतील औषधींमध्ये घरातील कुंडीत व बागेत लावता येणाऱ्या विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, त्यांचा विविध आजारांवरील उपयोग याची यादी दिली आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचे दुष्परिणाम कसे टाळावे यावर मार्गदर्शन केले आहे. जैविक व वनस्पतीजन्य किटकनाशकांची उपयुक्त माहिती दिली आहे. गांडूळखत कसे तयार करावे? त्यासाठीच्या साहित्यापासून कृती आणि संवर्धनाची माहिती सचित्र दिली आहे. घराजवळील बागेत नारळ, आंबा यांसारखे मोठे फलवृक्ष कसे लावावे? त्यासाठी जागा किती व कशी असावी? त्या त्या वृक्षासाठी लागणारे हवामान, जमीन, त्याच्या जाती, लागवडीची पद्धत, त्यासाठी वापरायचे खत, त्याला लागणाऱ्या किडींचे प्रकार व त्यासाठी कसे नियंत्रण करावे याची विस्तृत माहिती दिली आहे. रोपवाटिका म्हणजेच नर्सरी कशी असावी? त्याची जोपासना कशी करावी? याचे मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर या बागकामासाठी लागणाऱ्या अवजारांची सूची व त्यांचा उपयोग दिला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी होळीच्या सणाला जी वृक्षतोड होते त्याला पर्याय म्हणून घरच्या घरी छोट्याशा ताटलीत होळी कशी रचावी याचे अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपण झाडे लावण्यास नक्कीच उद्युक्त होऊ आणि हरितक्रांतीला हातभार लावू यात तिळमात्र शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more