* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: SUNDAR AAPLI FALBAUG
 • Availability : Available
 • ISBN : 9788177666819
 • Edition : 5
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 144
 • Language : MARATHI
 • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
Quantity
N/A
प्रत्येकाला कोणतातरी छंद असणं आवश्यक असतं. छंदातून आपल्याला आनंद मिळतो. - आणि हा आनंदच सदैव प्रेरणा देत असतो. बागकामाचा छंद असाच आहे. आपण राहता त्या बंगल्याभोवतालची किंवा सोसायटीमध्ये मोकळी जमीन असेल, तर बाग नक्की करा. आजकालच्या धावपळीच्या आणि भेसळीच्या जीवनात एखादी वस्तू शुद्ध स्वरूपात मिळणं फार अवघड झालं आहे. आपण आपल्या परिसरात भाजीपाला आणि फळझाडांची जोपासना केली, तर वस्तू आणि निर्भेळ आनंद मिळविता येईल. तसंच, असा भाजीपाला आणि फळ ताजी-ताजी खाल्ल्यानं त्यातील जास्तीत जास्त जीवनसत्वं आणि प्रथिनंही शरीराच्या आरोग्याला अधिक पोषक ठरतील. बागकाम केल्यावर आपला रिकामा वेळ तर सत्कारणी लागतोच. शिवाय त्यातून काही प्रमाणात आपण निसर्गाशी जवळीक साधतो आणि त्यातून निर्मितीचा आनंद मिळतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SUNDARAAPLIFALBAUG #SUNDARAAPLIFALBAUG #सुंदरआपलीफळबाग #TECHNOLOGYENGINEERINGAGRICULTURE #MARATHI #A. B.PATIL #ए.बी.पाटील "
Customer Reviews
 • Rating StarMAHARASHTRA TIMES 04-12-1994

  ‘सुंदर आपली फळबाग’ या पुस्तकात आ. बा. पाटील यांनी पालेभाजी, फळभाजी आणि काही फळे यांची लागवड कशी करायची, याची उपयुक्त माहिती दिली आहे. ही माहिती मुख्यत्त्वे करून शहरी जीवनातील घराभोवतीच्या थोड्याशा जमिनीतील लागवडीसाठी किंवा कुंड्यांतील लागवडीसाठी आहे.खते, लागवडीची रचना या गोष्टी मोठ्या प्रमाणावरील लागवडीसाठी काही अशी उपयुक्त करू शकल्या, तरी पुस्तक लिहिण्यामागे तसा हेतू असल्याचे दिसून येत नाही. यात प्रारंभी बागेची उपयुक्तता, आखणी अशी माहिती असून पुढे झाडांच्या वाढीसाठीच्या पाणी, छाटणी, खते अशा आवश्यक गोष्टींविषयी सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे, त्यानंतर भाजीपाला, फळभाज्या, वेली, फळझाडांची तपशिलवार मुद्देसूद माहिती आहे. झाडांची काळजी कशी घ्यायची, यावरही एक तपशिलवार प्रकरण आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ARDHADASHAK
ARDHADASHAK by MILIND MAHANGADE Rating Star
Rajendra Jadhav

Milind, absolutely great, you have touched all thoughts and feelings of those who are preparing for competitive exams. This book never let the reader to divert their mind. I think each reader can recall their past. This book will definitely help to tink, for those who are willing to appear for such competitive exams and their parents too. Once again congratulations and all the best. ...Read more

COMA
COMA by ROBIN COOK Rating Star
Sumit Deshmukh

सत्तरच्या दशकातली ही कथा आहे. बोस्टन शहरातील `मेमोरियल` हे एक प्रतिष्ठित व भव्य रुग्णालय. दरवर्षी प्रमाणे त्यावर्षी सुद्धा मेडिकल च्या पाच विद्यार्थ्यांचा एक समूह तिथे प्रशिक्षणासाठी येतो. त्यांतलीच एक म्हणजे कथेची नायिका - सुसान. तिथे तिला अज्ञातव रहस्यमय कारणाने कोमात गेलेल्या रुग्णांच्या काही केसेस पाहायला मिळतात. बुद्धिमान सुसान तशी अभ्यासू असल्यामुळे व तसेच काही रुग्णांबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीमुळे तिच्या मनात अशा अज्ञात कारणाने कोमात जाणाऱ्या रुग्णांच्या केसेस बद्दल कुतूहल निर्माण होतं. आणि मग ती त्या प्रकरणांचा छडा लावायचा कसा प्रयत्न करते, तिला कोणकोणते अडथळे येतात आणि शेवटी भीषण वास्तव कसं समोर येतं ते सांगणारी ही रंजक कथा. कथेतील बरेच प्रसंग हे थरारक असले तरी पुढे काय होईल त्याचा अंदाज लागतो. तसेच मलपृष्ठावरील परिचय देणाऱ्या मजकुरामुळे रुग्ण कोमात का जातायत त्याचा थोडा अंदाज वाचकाला आधीच आलेला असतो. त्यामुळे रहस्याचा घटक थोडा कमी झालेला आहे. अनुवाद नेहमीप्रमाणे उत्तम. एकदा नक्कीच वाचण्यासारखी कादंबरी. अभिप्राय- 3.5/5 #थरारकथा ...Read more