* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STONES INTO SCHOOLS
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184984354
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
  • Available in Combos :SAVITRIBAI PHULE JAYANTI OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FROM THE AUTHOR OF THE PHENOMENAL NO.1 BESTSELLER THREE CUPS OF TEA, THE CONTINUING STORY OF THIS DETERMINED HUMANITARIAN`XS EFFORTS TO PROMOTE PEACE THROUGH EDUCATION. IN THIS DRAMATIC FIRST-PERSON NARRATIVE, GREG MORTENSON PICKS UP WHERE THREE CUPS OF TEA LEFT OFF IN 2003, RECOUNTING HIS RELENTLESS, ONGOING EFFORTS TO ESTABLISH SCHOOLS FOR GIRLS IN AFGHANISTANX HIS EXTENSIVE WORK IN AZAD KASHMIR AND PAKISTAN AFTER A MASSIVE EARTHQUAKE HIT THE REGION IN 2005X AND THE UNIQUE WAYS HE HAS BUILT RELATIONSHIPS WITH ISLAMIC CLERICS, MILITIA COMMANDERS, AND TRIBAL LEADERS EVEN AS HE WAS DODGING SHOOTOUTS WITH FEUDING AFGHAN WARLORDS AND SURVIVING AN EIGHT-DAY ARMED ABDUCTION BY THE TALIBAN. HE SHARES FOR THE FIRST TIME HIS BROADER VISION TO PROMOTE PEACE THROUGH EDUCATION AND LITERACY, AS WELL AS TOUCHING ON MILITARY MATTERS, ISLAM, AND WOMEN &NDASHX ALL WOVEN TOGETHER WITH THE MANY RICH PERSONAL STORIES OF THE PEOPLE WHO HAVE BEEN INVOLVED IN THIS REMARKABLE TWO-DECADE HUMANITARIAN EFFORT
ग्रेग मॉर्टेन्सन यांची ‘सेंट्रल एशिया इन्स्टिट्यूट’ ही सेवाभावी संस्था गेली सोळा वर्षं पाकिस्तानातील व अफगाणिस्तानातील दुर्गम, उपेक्षित कोपऱ्यांमध्ये शाळा बांधून देऊन मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य करीत आहे. या देशांमधील दहशतवाद्यांच्या बंडखोरीला शह देऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी ‘शिक्षण’ – विशेषत: स्त्रीशिक्षण – ही गुरुकिल्ली आहे, असा या संस्थेचा ठाम विश्वास आहे. अमेरिकन देणगीदारांनी सढळ हाताने दिलेल्या देणग्यांचा या सत्कार्यासाठी विनियोग करताना या संस्थेने विविध प्रकल्पांच्या जागेवरील स्थानिक लोकांशी विश्वास व आदरावर उभारलेले जिव्हाळ्याचे नातंसुद्धा जोडले आहे. उमद्या वृत्तीने, चिकाटीने व विनयशीलतेने केलेल्या या कार्याचा मनमोहक आलेख म्हणजेच हे पुस्तक! प्रचंड अस्थिरता व हिंसाचारांनी बुजबुजलेल्या देशात जिवावर उदार होऊन या सत्कार्यासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांची ही हृद्य, प्रेरणादायी व थरारक कहाणी मानवी मनाच्या थोरवीचे विविध पैलू दाखवून वाचकाला स्तिमित करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#STONESINTOSCHOOLS #STONESINTOSCHOOLS #स्टोन्सइनटूस्कूल्स #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNITIKANE #सुनीतिकाणे #GREGMORTENSON "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 18-12 -2016

    एका वशाची कहाणी… अफगाणिस्तानातली गुंतागुंतीची लढाई अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्यापुढच्या परराष्ट्रीय संबंधाबाबतचं सर्वात निकडीचं आव्हान ठरली आहे. या चिघळत्या पार्श्वभूमीवर अटलांटिक कौन्सिलचे धोरणी विचारवंत अफगाणिस्तान हा देश रसातळाला पोहोचला असल्याे अहवाल प्रसिद्ध करीत आहेत. देशापुढे निःसंशयपणे प्रचंड समस्या उभ्या आहेत. भीषण व वाढती बंडखोरी सुव्यवस्थेच्या आणि प्रगतीच्या प्रयत्नांच्या आड येते आहे. अफूच्या बोंडांचं तुफान पीक काढलं जात आहे. पराकोटीचं दारिद्रय आहे. गुन्हेगारी आहे, बेघर लोक आहेत. बेकारांची प्रचंड संख्या आहे. स्वच्छ पाण्याची टंचाई आहे. स्त्रियांच्या दर्जाबाबतचे प्रश्न सुटलेले नाहीत तर दुसरीकडे नागरिकांचं सरंक्षण करून त्यांना प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी मध्यवर्ती सरकार धडपडतं आहे. पण ११ सप्टेंबर २००१ नंतर अफगाणिस्तानात काही आशादायक घटनाही घडलेल्या आहेत आणि त्यातली सर्वात महत्त्वाची आहे शिक्षण क्षेत्रातली! अफगाणिस्तनात सकारात्मक, चिरंतर-स्वरूपी बदल घडविण्यासाठी शिक्षण हा कळीचा मुद्दा आहे, हे विधान आपण मान्य केलं, तर या वर्षी अफगाणिस्तानात जवळजवळ पंच्याऐंशी लाख मुलं शाळेत जाऊ लागतील आणि त्यातील ४० टक्के मुली असतील ही गोष्ट अत्यंत उमेद देणारी आहे, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही! या गोष्टीचं महत्त्व ग्रेग मॉर्टेन्सन चांगलंच जाणतात. त्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्थापन केलेल्या १३१ शाळांमध्ये ५८ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध होतं आहे. केवळ एका मुलानं शिक्षण घेतलं तरी त्याचा किती खोलवर परिणाम होतो आणि त्याची व्याप्ती किती दूरगामी असते हे त्यांच्याएवढं कुणीही जाणत नाही. अफगाणिस्तानातलं अमेरिकेचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ग्रेट मॉर्टेन्सहून अधिक पल्ला गाठू शकलेली नाही. या विनयशील, मृदूभाषी सद्गृहस्थानं अमेरिकी लष्कराला दाखवून दिलं आहे, की त्यांच्या मनमिळावू स्मितानं आणि स्नेहाच्या हस्तांदोलनानं हृदयं काबीज करण्याची लढाई कशी खेळली आणि ती कशी जिंकली. ग्रेग याचं तत्त्वज्ञान गुंतागुंतीचं नाही. त्यांचा अगदी प्रामाणिक विश्वास आहे, की अफगाणिस्तानातला तंटा सरतेशेवटी बंदुकी आणि हवाईहल्ल्यांना नव्हे, तर पुस्तकं, वह्या, पेन्सिली या आर्थिक प्रगतीकडे नेणाऱ्या साधनांनी जिंकला जाणार आहे. त्यांचं कळकळीचं सांगणं आहे, की अफगाण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं, म्हणजे देशाच्या भविष्याचं दिवाळं फुंकणं आणि कधी काळी अफगाणिस्तान अधिक सुबत्तेचं आणि अधिक प्रगतीशील राष्ट्र बनू शकेल, ही शक्यता नष्ट करणं आहे. ग्रेग मार्टिन्सनविरुद्ध फतवा काढला गेला असला आणि तालिबान आणि इतर दहशतवाद्यांकडून त्यांना धमक्या येत असल्या, तरीही अफगाणिस्तानाबाबत असं घडू नये, यासाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे त्यांनी मुली आणि तरुण स्त्रियांना शिक्षण देण्याचा जोमानं प्रयत्न केला आहे. ज्या भागात आई-वडील मुलींना नेहमीच शाळेबाहेर ठेवत आलेले आहेत आणि तिथल्या परंपरागत प्रथांनी स्त्रियांच्या शिकण्याच्या नव्हे! परंतु खेड्या खेड्यांमध्ये ग्रेगनी तिथले धर्मगुरू आणि वडीलधाऱ्यांचं मन वळवून त्यांच्याद्वारे मुलींना शाळेत धाडण्याबद्दल आई-वडिलांचं मतपरिवर्तन घडवलं आहे. यामागचं कारण असं आहे, की माझ्याप्रमाणेच ग्रेग यांचा अगदी ठाम विश्वास आहे, की अफगाणिस्तानाचा उत्कर्ष होण्यासाठी तिथल्या स्त्रियांचाही सहभाग प्रगतीच्या मोहिमेत अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्त्रियांना शालेय शिक्षण लाभलं पाहिजे आणि देशाच्या पुनर्रचनेत तसंच विकासात त्यांचं शिक्षण हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे. ते एखाद्या मंत्राप्रमाणे सतत जप करत असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला शिक्षण देता तेव्हा तुम्ही केवळ एका व्यक्तीला शिक्षण देता; पण जेव्हा तुम्ही एका मुलीला शिक्षण देता, तेव्हा तुम्ही एका सामाजिक गटाला प्रशिक्षित करत असता. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सारं ग्रेगनी मनमोहकपणे, उमद्या वृत्तीनं, चिकाटीनं आणि विनयशीलतेनं केलेलं आहे. त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं. विश्वास आणि आदरावर उभारलेलं नातं गावातल्या पुढाऱ्यांबरोबर जोडलं आणि त्यांचं भविष्य घडवण्यात लोकांना सामील करून घेतलं. स्थानिक संस्कृतीतला विनय, अगत्य, ज्येष्ठांबद्दलचा आदर शिकून घेण्यासाठी त्यांनी वेळ खर्च केला आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातलं इस्लामचं महत्त्व आदरपूर्वक समजून घेतलं. अमेरिकन लष्करानं खेड्यातल्या ज्येष्ठांशी आणि टोळ्यांच्या नेत्यांशी चांगले संबंध जोडण्याबाबत सल्ला मसलतीसाठी ग्रेग यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यात आश्चर्य ते काय! ते त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतील. आपण सारेच शिकू शकू! ग्रेग, आपण जे करत आहोत, त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! ...Read more

  • Rating StarDainik Aikya 18-12-16

    दहशतीतल्या शिक्षणसंघर्षाची कथा.. अफगाणिस्तानातली गुंतागुंतीची लढाई अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्यापुढच्या परराष्ट्रीय संबंधाबाबतचं सर्वात निकडीचं आव्हान ठरली आहे. या चिघळत्या पार्श्वभूमीवर अटलांटिक कौन्सिलचे धोरणी विचारवंत अफगाणिस्तान हा देश रसातळाल पोहोचला असल्याचे अहवाल प्रसिद्ध करीत आहेत. देशापुढे निःसंशयपणे प्रचंड समस्या उभ्या आहेत. भीषण व वाढती बंडखोरी सुव्यवस्थेच्या आणि प्रगतीच्या प्रयत्नांच्या आड येते आहे. अफूच्या बोंडांचं तुफान पीक काढलं जात आहे. पराकोटीचं दारिद्रय आहे. गुन्हेगारी आहे, बेघर लोक आहेत. बेकारांची प्रचंड संख्या आहे. स्वच्छ पाण्याची टंचाई आहे. स्त्रियांच्या दर्जाबाबतचे प्रश्न सुटलेले नाहीत तर दुसरीकडे नागरिकांचं सरंक्षण करून त्यांना प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी मध्यवर्ती सरकार धडपडतं आहे. पण ११ सप्टेंबर २००१ नंतर अफगाणिस्तानात काही आशादायक घटनाही घडलेल्या आहेत आणि त्यातली सर्वात महत्त्वाची आहे शिक्षण क्षेत्रातली! अफगाणिस्तनात सकारात्मक, चिरंतर-स्वरूपी बदल घडविण्यासाठी शिक्षण हा कळीचा मुद्दा आहे, हे विधान आपण मान्य केलं, तर या वर्षी अफगाणिस्तानात जवळजवळ पंच्याऐंशी लाख मुलं शाळेत जाऊ लागतील आणि त्यातील ४० टक्के मुली असतील ही गोष्ट अत्यंत उमेद देणारी आहे, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही! या गोष्टीचं महत्त्व ग्रेग मॉर्टेन्सन चांगलंच जाणतात. त्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्थापन केलेल्या १३१ शाळांमध्ये ५८ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध होतं आहे. केवळ एका मुलानं शिक्षण घेतलं तरी त्याचा किती खोलवर परिणाम होतो आणि त्याची व्याप्ती किती दूरगामी असते हे त्यांच्याएवढं कुणीही जाणत नाही. अफगाणिस्तानातलं अमेरिकेचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ग्रेट मॉर्टेन्सहून अधिक पल्ला गाठू शकलेली नाही. या विनयशील, मृदूभाषी सद्गृहस्थानं अमेरिकी लष्कराला दाखवून दिलं आहे, की त्यांच्या मनमिळावू स्मितानं आणि स्नेहाच्या हस्तांदोलनानं हृदयं काबीज करण्याची लढाई कशी खेळली आणि ती कशी जिंकली. ग्रेग याचं तत्त्वज्ञान गुंतागुंतीचं नाही. त्यांचा अगदी प्रामाणिक विश्वास आहे, की अफगाणिस्तानातला तंटा सरतेशेवटी बंदुकी आणि हवाईहल्ल्यांना नव्हे, तर पुस्तकं, वह्या, पेन्सिली या आर्थिक प्रगतीकडे नेणाऱ्या साधनांनी जिंकला जाणार आहे. त्यांचं कळकळीचं सांगणं आहे, की अफगाण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं, म्हणजे देशाच्या भविष्याचं दिवाळं फुंकणं आणि कधी काळी अफगाणिस्तान अधिक सुबत्तेचं आणि अधिक प्रगतीशील राष्ट्र बनू शकेल, ही शक्यता नष्ट करणं आहे. ग्रेग मार्टिन्सनविरुद्ध फतवा काढला गेला असला आणि तालिबान आणि इतर दहशतवाद्यांकडून त्यांना धमक्या येत असल्या, तरीही अफगाणिस्तानाबाबत असं घडू नये, यासाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे त्यांनी मुली आणि तरुण स्त्रियांना शिक्षण देण्याचा जोमानं प्रयत्न केला आहे. ज्या भागात आई-वडील मुलींना नेहमीच शाळेबाहेर ठेवत आलेले आहेत आणि तिथल्या परंपरागत प्रथांनी स्त्रियांच्या शिकण्याच्या नव्हे! परंतु खेड्या खेड्यांमध्ये ग्रेगनी तिथले धर्मगुरू आणि वडीलधाऱ्यांचं मन वळवून त्यांच्याद्वारे मुलींना शाळेत धाडण्याबद्दल आई-वडिलांचं मतपरिवर्तन घडवलं आहे. यामागचं कारण असं आहे, की माझ्याप्रमाणेच ग्रेग यांचा अगदी ठाम विश्वास आहे, की अफगाणिस्तानाचा उत्कर्ष होण्यासाठी तिथल्या स्त्रियांचाही सहभाग प्रगतीच्या मोहिमेत अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्त्रियांना शालेय शिक्षण लाभलं पाहिजे आणि देशाच्या पुनर्रचनेत तसंच विकासात त्यांचं शिक्षण हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे. ते एखाद्या मंत्राप्रमाणे सतत जप करत असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला शिक्षण देता तेव्हा तुम्ही केवळ एका व्यक्तीला शिक्षण देता; पण जेव्हा तुम्ही एका मुलीला शिक्षण देता, तेव्हा तुम्ही एका सामाजिक गटाला प्रशिक्षित करत असता. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सारं ग्रेगनी मनमोहकपणे, उमद्या वृत्तीनं, चिकाटीनं आणि विनयशीलतेनं केलेलं आहे. त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं. विश्वास आणि आदरावर उभारलेलं नातं गावातल्या पुढाऱ्यांबरोबर जोडलं आणि त्यांचं भविष्य घडवण्यात लोकांना सामील करून घेतलं. स्थानिक संस्कृतीतला विनय, अगत्य, ज्येष्ठांबद्दलचा आदर शिकून घेण्यासाठी त्यांनी वेळ खर्च केला आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातलं इस्लामचं महत्त्व आदरपूर्वक समजून घेतलं. अमेरिकन लष्करानं खेड्यातल्या ज्येष्ठांशी आणि टोळ्यांच्या नेत्यांशी चांगले संबंध जोडण्याबाबत सल्ला मसलतीसाठी ग्रेग यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यात आश्चर्य ते काय! ते त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतील. आपण सारेच शिकू शकू! ग्रेग, आपण जे करत आहोत, त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more