* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KALYANI WAS BORN IN THIS UNDIVIDED NATION. INDIA SUCCEEDED IN DRIVING AWAY THE BRITISH, BUT AT THE COST OF ITS DIVISION. WHY DID THE HINDU GO OUT OF THEIR OWN COUNTRY WHILE SENDING AWAY THE MUSLIMS FOREVER FROM IT? THIS LAND NEVER BECAME THE MOTHERLAND OF THE MUSLIMS, IT ALWAYS REMAINED THE MOTHERLAND OF THE BENGALIS. THIS NATION WAS RAISED FROM THE BLOOD OF 30 MILLION PEOPLE. THE WAR AGAINST PAKISTAN IN THE YEAR 1971 TAUGHT A LESSON TO THAT COUNTRY WHO DIVIDED INDIA, WHO MADE BANGLADESH THE MOTHERLAND OF THE MUSLIMS, WHO WAS SO TREACHEROUS THAT MANY HAD TO LEAVE THEIR MOTHERLAND. THE WAR BROUGHT FORWARD THE TRUTH; THIS COUNTRY IS OF BENGALIS, NOT OF MUSLIMS. THE LANGUAGE IS IMPORTANT HERE, NOT THE RELIGION. KALYANI FELT LIKE STOPPING THE RICKSHAW AT ONCE. SHE WANTED TO SHOW AWAY THE SOIL STICKING ALL OVER HER BODY. THE LOVE FOR IT WAS NOT GOING TO ALLOW HER TO LOVE ANY OTHER LAND NOW. MAN LOVES ONLY ONE SOIL, IT IS SO OBVIOUS. KALYANI HAS COME TO HER MOTHERLAND. SHE WANTS TO FEEL THE SOIL, SMELL IT SHE WAS BORN FROM THAT SOIL, SHE WAS NOT BORN FROM ANY WOMB…..
.... या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं .... ह्या देशातून उर्दू बोलणाऱ्या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुंडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं? मुसलमानांची मायभूमी न होता, हा देश तर शेवटपर्यंत बंगल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभं केलाय. ज्यांनी भारताचे तुकडे केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुष्टपणामुळे या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसलमानांचा नाही; इथं भाषा महत्वाची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतरावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसऱ्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर! कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता कोण स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून.....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW 15-09-1996

    उत्कट अनुभूतीचा जिवंत आविष्काराचा फेरा... ‘लज्जा’ या कादंबरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आलेल्या तस्लिमा नासरिन या बंगाली लेखिकेची ‘फेरा’ ही लघुकादंबरी मानवी भावविश्वाचे प्रत्ययकारी चित्रण करण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे. मानवी भाभावानांच्या सूक्ष्म छटा या कादंबरीत समर्थपणे टिपलेल्या आहेत. मायभूमीपासून तुटलेल्या माणसाची जीवघेणी परवड, मायभूमीच्या मातीशी असलेले त्याचे नाते, त्या मातीची ओढ उत्कटपणे चित्रित करण्यात ही कादंबरी निश्चित यशस्वी ठरलेली आहे. फाळणीच्या पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मानवी मूल्यांचा होणारा ऱ्हास, धार्मिक विद्वेषांची माणसाच्या मनावर चढणारी पुटे, त्यातून लोप पावत जाणारी माणुसकी याचेही सुन्न करणारे दर्शन या कादंबरीतून घडते. माझ्या आवडत्या, सुंदर देशाची मूलतत्त्ववाद्यांनी केलेली भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवरील अधोगती पाहून आक्रोशणारे लेखिकेचे मन वाचकांना अस्वस्थ करते. त्याचबरोबर अंतर्मुख होऊन विचार करायलाही प्रवृत्त करते. बांगला देशातील मयमनसिंह येथे (पूर्वीच्या अखंड भारतात) एका हिंदू कुटुंबात जन्माला आलेली कल्याणी ही या कादंबरीची नायिका आहे. ‘आनंद मोहन’ या महाविद्यालयात शिकणाऱ्या कल्याणीचे तिच्याच वर्गातील एका गावंढळ तरुणावर बादल) प्रेम बसते. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं पाहण्यातच तिचे दिवस जात असतानाच तिच्या जीवनात भयंकर वादळ येते. भारत-पाकिस्तानची फाळणी होणार, येथे आपल्या कुटुंबाला जगणे कठीण होणार म्हणून एके दिवशी अचानकपणे कल्याणीचे वडील (हरिनारायण राय) आपल्या मुलांना कलकत्त्याला पाठविण्याचा निर्णय घेतात. आपले गाव, तेथील निसर्ग, जीवलग मित्र-मैत्रिणी यांना सोडून जाणे कल्याणीच्या जीवावर आलेले असते. ती दडून बसण्याचा प्रयत्न करते, पण तिला तेथून पाठविले जाते. ती आपल्या भावंडांसह मामा-मामीकडे कलकत्त्याला येते येथे तिला मोलकरणीसारखी वागणूक मिळते. नातेवाईकांच्या वासनेने बरबटलेल्या नजरांना सामोरे जावे लागते. तिथे ती घरची काम करून महाविद्यालयात शिक्षण घेते. खासगी नोकरी करते. कलकत्त्यामध्ये तिचा परिचय अनिर्वाण या भारतीय तरुणाबरोबर होतो. परिचयाचे रूपांतर प्रेमात होते. बादल आणि आपले गाव, तेथील ब्रह्मपुत्रा नदी, तळे, विविध फळांची झाडं, हे तिच्या संवेदनशील मनावर कोरलेलेच असते. ते विसरणे तिला अशक्य होते. मामा-मामींच्या जाचातून सुटण्यासाठी, नातेवाईकांच्या वासनांध नजरातून बचाव करण्यासाठी एक उपचाराचा भाग म्हणून कोर्टात जाऊन ती अनिर्वाणबरोबर लग्न करते. त्यांचा संसार सुरू होतो. मात्र तिच्या डोक्यातून आपला देश, आपला गाव, तेथील माती, मित्र-मैत्रिणी यांच्या आठवणी तीव्रतेने येत असतात. तीस वर्षे ती या आठवणीवरच दिवस ढकलत असते. तिला दोन मुलं होतात. दरम्यान तिचे आई-वडील दोघेही मरण पावतात. आता तेथे आपले कोणीही राहिले नाही याची खंत तिला दिवसेंदिवस अस्वस्थ करते. आपल्या मैत्रिणींकडे जावे, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, असा विचार करून ती कशीतरी पतीची परवानगी घेऊन सहा-सात वर्षांच्या दीपनला सोबत घेऊन तीस वर्षानंतर ती बांगला देशातील मयमनसिंहला येते. पूर्वीचे वैभव तसेच असेल, आपले धर, ब्रह्मपुत्रा नदी, तळो, नारळ, पेरू, जांभळाची झाडं, मैत्रिणी पाहायला मिळतील. आपल्या मातीत काही दिवस तरी विसावता येईल अशी कितीतरी स्वप्नं घेऊन ती आलेली असते. मयमनसिंहला आल्यानंतर मात्र तिची घोर निराशा होते. तिचे घर सरकारने जप्त केलेले असते. ते घर पाडून तेथे सिंमेटची इमारत उभी केलेली असते. झाडं तोडलेली असतात. नदी आटलेली असते. नदीचे रूपांतर नाल्यात झालेले असते. तिला तेथे कोणी ओळखत नाही. तिचे म्हणून तिथे काहीच नसते. आपले घर असलेल्या जागेवर ती व्याकूळ मनान रेंगाळते. मूठभर माती उचलून घेते. तिच्या घरासमोरचे जांभळाचे झाड मात्र अद्याप असते. असंख्य आठवणी दाटून येतात. ती त्या झाडाला कवटाळून ओक्साबोक्सी रडते. जमलेली माणसं वेडी म्हणून मिला हिणवतात. तिची टिंगल करतात. तिची बालमैत्रीण शरिफदेखील तिला ओळखत नाही. तिला भेटण्यासाठी तर ती एका देशातून दुसऱ्या देशात आलेली असते. तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा होतो. ब्रह्मपुत्रा नदीप्रमाणे या माणसांची मनंही आटलेली आहेत, असे तिला वाटते. ती हिंदू आहे म्हणून तेथील माणसं तिच्याकडे तिरस्काराने पाहतात. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी झपाटल्यासारखे ती तिच्या आवडत्या गावातून भटकते. ‘आनंद मोहन’ महाविद्यालयात आल्यानंतर तेथील सर्वच बदललेलं तिला दिसतं. तिचा प्रियकर बादल मुक्ती लढ्यात एक पाय घालवून अपंग झाल्याचे तिला समजते. बादलने आपल्या देशासाठी काही तरी केले याचा तिला अभिमान वाटतो. त्याचबरोबर त्याच देशाचा होणारा ऱ्हास पाहूनही ती खंतावते. तेथील लहान मुलांना, तरुणांना हिंदूद्वेषाचे आणि नमाजपठणाचे शिक्षण कसे दिले जाते. ते पाहून तिचे अंत:करण तीळ तीळ तुटते. पंधरा दिवसांसाठी आपल्या देशात राहायला गेलेली कल्याणी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच निराश मनाने आणि भरल्या अंत:करणाने परत येण्यासाठी निघते. या कादंबरीत लेखिकेने कल्याणीच्या भावजीवनाचे विविध छटांसह चित्रण केलेले आहे. हे भावविश्व त्या नायिकेपुरतेच मर्यादित राहात नाही तर मायभूमीपासून, मातीपासून तुटलेल्या माणसाचे ते प्रातिनिधक चित्रण बनते. मानवी भावभावानांचा जिवंत आणि ज्वलंत आविष्कार या कादंबरीचा गाभा आहे. सरळ, साध्या अंत:करणाला भिडणाऱ्या निवेदनामुळे या कादंबरीचा परिणामकारकता वाढते. आठवणीच्या रूपाने निवेदन तंत्र वापरल्याने कथानकात काही ठिकाणी अवरोध निर्माण झाल्यासारखे वाटते. लहान लहान उदाहरणांमधून लेखिकेने मानवी मनाच्या बदलांचे प्रभावी चित्रण केलेले आहे. लहान मुलांच्या मनावर हिंदू लोकांविषयी द्वेष कसा बिंबविला जातो. त्याचे अतिशय समर्पक उदाहरण लेखिकेने दिलेले आहे. काळ्या मुंग्या म्हणजे मुसलमान आणि तांबड्या मुंग्या म्हणजे हिंदू. काळ्या मुंग्यांना सोडून द्यायचे आणि तांबड्या मुंग्यांना मारायचे. या लहान मुलांच्या मुंग्या-मुंग्याच्या खेळाचे उदाहरण सूचकपणे आणि मार्मिकपणे दिलेले आहे. फाळणीमुळे केवळ भूप्रदेशच विभागला गेला नाही तर माणसा-माणसांची मनेही विभागली गेली आहेत, याचे विदारक चित्रण या कादंबरीत केलेले आहे. देश, प्रांत, प्रदेश येथील समानपणे बदलत जाणाऱ्या आणि वाह्यात बनत चाललेल्या तरुण पिढीसंबंधीचे वास्तव निरीक्षणही लेखिकेने स्पष्टपणे नोंदविलेले आहे. या कादंबरीतील नायिकेने उपस्थित केलेले, माणसांपेक्षा धर्म, देश, भाषा यालाच अधिक महत्त्व द्यावे का? माणूस धर्माचा गुलाम का बनतो? माणुसकीपासून दूर का जातो? यासारखे प्रश्न वाचकांना अस्वस्थ तर करतातच पण विचार करायलाही भाग पाडतात. उत्कट अनुभव आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या बदलत्या वास्तवाचा वेध यामुळे या कादंबरीला कलात्मक उंची प्राप्त झालेली आहे. ही छोटीशी कादंबरी प्रांताच्या धर्माच्या, भाषेच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून व्यापक मानवतेचा विचार करते म्हणूनच तिचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या कादंबरीचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला मराठी अनुवादही सहज ओषवत्या भाषेत आहे. हा अनुवाद लेखिकेच्या भूमिकेला, कथानकाला न्याय देणारा असाच झाला आहे. जेथे आवश्यकता आहे आणि आशयाची गरज आहे, तेथे तेथे मूळ बंगाली शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. त्यांचा मराठी अर्थही दिलेला आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचनीय झालेली आहे. बदलते वास्तव प्रसंग चित्रणातून साकार करण्याचे लेखिकेचे कौशल्ये वाखाणण्यासारखे आहे या कादंबरीच्या अनुवादाने मराठी साहित्यात निश्चितच महत्त्वाची भर टाकलेली आहे. -प्रा. दादासाहेब मोरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more