* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: OCTOPUSSY AND THE LIVING DAYLIGHTS
  • Availability : Notify Me
     
  • Translators : JAYMATI DALVI
  • ISBN : 9788177665864
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 88
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
`M` CAST A COLD GLANCE OVER THE TABLE. FOR SURE, IT MUST BE A VERY DIFFICULT TASK AND AS BOND WAS WITH THE OO SECTION, HE WAS SELECTED TO ACCOMPLISH IT. `YOU MUST FINISH THIS SOLDIER WHO IS FIRING FROM HIS HIDEOUT AND THAT TO BEFORE HE SUCCEEDS IN KILLING THE AGENT 272, HAVE YOU UNDERSTOOD THIS PROPERLY?` OH! THIS WAS A PLAIN MURDER THEN. JAMES BOND, BRITISH SECRET SERVICE AGENT, 007; HE HAS TO UNDERTAKE SUCH RUTHLESS TASKS AS A PART OF HIS INTERNATIONAL MISSIONS. BE IT FINDING THE MAJOR CARRYING THE TERRIBLE SECRETS TO CARIBBEAN OR FINDING THE RUSSIAN SECRET AGENT WHO WAS BIDDING FOR THE EGG-SHAPED FIGURE BY FABERGE DURING THE AUCTION AT SODEBEE, OR BE IT THE RUTHLESS SHOOTING AT AN UNLIKELY ASSASSINATOR BY A SOLDIER WHO HAS ALREADY SHOOT MANY FROM THE GULLIES OF EAST AND WEST BERLIN; BOND ALWAYS ACCOMPLISHED HIS MISSIONS SUCCESSFULLY. IAN FLAMING GIVES A DETAIL AND ELABORATE REPORT OF JAMES BOND`S OPERATIONS, THOROUGHLY.
एम्ने थंडपणे टेबलापलीकडे दृष्टी टाकली. हे एक निष्ठुर काम असणार होतं आणि बाँड डबल ओ सेक्शनमध्ये असल्यामुळे त्या कामासाठी त्याची निवड झाली होती. ‘या लपून गोळीबार करणा-या सैनिकाला तू ठार केलंच पाहिजे. आणि तेही त्याने एजंट २७२ ला टिपण्याआधी. नीट समजलास नं?’ म्हणजे, हा चक्क खून होता तर... जेम्स बाँड, ब्रिटिश गुप्तहेर ००७, याला आंतरराष्ट्रीय हेरगिरी करताना अशीच निर्दय कामे करावी लागत. वॅÂरिबियनला स्वत:बरोबर भयंकर रहस्य नेणाऱ्या द्वाड मेजरला शोधणे असो, सोदेबीच्या लिलावाच्या दालनात पॅÂबर्जेच्या अंडाकृतीला गुप्तपणे बोली बोलणारा रशियन गुप्तहेर ओळखून काढणे असो, किंवा पूर्व व पश्चिम बर्लिनमधील गल्लीत लपून गोळीबार करणाऱ्या सैनिकाने अत्यंत निर्घृणपणे एका असंभाव्य मारेकऱ्यावर गोळ्या झाडणं असो, बाँड नेहमीच आपली भूमिका योग्य प्रकारे बजावतो. ‘००७ च्या गुप्त रिपोर्टबद्दल पूर्ण माहिती असलेल्या अधिकाऱ्याप्रमाणे इयान फ्लेमिंग, एकमेकांविरुद्ध करण्यात येणाऱ्या गुप्त हेरगिरीच्या क्लिष्ट प्रकरणांचा छडा लावतो!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #OCTOPUSSY #OCTOPUSSYANDTHELIVINGDAYLIGHTS #ऑक्टोपसी #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #JAYMATIDALVI #IANFLEMING "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 12-03-2006

    चार बॉण्डपटांचे दर्शन... इयान फ्लेमिंग या इंग्लिश लेखकाने रहस्यमय, साहसी व उत्कंठावर्धक कादंबऱ्यांमध्ये अजरामर केलेल्या ‘००७ जेम्स बाँड’ या महानायकाने वाचनप्रेमी जगाला जणू वेड लावेल. १९५२मध्ये इयानने ‘कॅसिनो रोयॉल’ ही रहस्यमय कादंबरी लिहिली अन् बघताबघता तिच्या हजारो प्रती खपल्या. त्यातला देखणा साहसवीर म्हणजे ‘जेम्स बॉण्ड!’ तो सत्यसृष्टीतला खराखुरा नायक असल्याप्रमाणे लोक त्याच्या प्रेमात पडले. विशेषत: तरुणी! त्यानंतर त्याच्या कादंबरीवर आधारित ‘डॉ. नो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला अन् त्यात बॉण्डची भूमिका साकारणारा ‘सीन कॉनरी’ हा नट एकदम प्रकाशझोतात आला. त्यानंतर आलेल्या सर्वच बॉण्डपटाने जगातील चित्रपटप्रेमी लोकांवर मोहिनी घातली. ती भूमिका साकारणाऱ्या सीन कॉनरी, रॉजर मूर व अलीकडील पिअर्स ब्रॉसनन या नटांना अमाप लोकप्रियता लाभली. हा लेखकाच्या लेखणीचा व प्रतिभेचा चमत्कार मानायला पाहिजे. पाश्चात्त्य लेखकांनीसुद्धा ‘अभिजात रहस्यकथा साहित्य’ म्हणून इयानला खूप उच्च स्थान दिले. मूळ लेखक स्वत: नाविक दलाच्या गुप्तचर खात्याच्या संचालकाचा खासगी सचिव म्हणून काम करता करता कमांडरपदापर्यंत पोहोचल्याने गुप्तहेर खाते व गुप्तहेर यांच्या कामाविषयी त्यांना सखोल व सूक्ष्म ज्ञान मिळाले. त्यामुळेच सर्व ब्रॉण्डपट आकर्षक व उत्कंठावर्धक झाले. साऱ्या जगात त्यांचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. या पुस्तकात एकूण चार बॉण्डपटाच्या कथा आहेत. ऑक्टोपसी, पुनर्जन्माची पहाट, संपत्ती एका कुलीन स्त्रीची व ००७ न्यूयॉर्कमध्ये, असे हे चार चित्रपट ‘ऑक्टोपसी’ ही कथा मेजर डेक्स्टर स्मिथ याची आहे. तरुणपणी तो ओ.बी.ई. रॉयल मरीन्समधील धाडसी, उमदा, रुबाबदार असा अधिकारी होता. युद्धानंतर जर्मनीतल्या म्यूनिकच्या ‘मिसलेनिअस ऑबजेक्टिव्ह ब्युरो’ वर ब्रिटिश प्रतिनिधी म्हणून सहा महिने नोकरी करून सैन्यदलातून तो मुक्त झाला. मुक्ततेपूर्वी त्याने गुप्त बातमी काढून जर्मन रईस बँकेतील कोट्यवधी रुपयांची संपतती, सोन्याच्या लगडी हडप करून केनसिंग्टन येथील मावशीच्या घरच्या तळघरात लपून ठेवली होती. हे अत्यंत जीवघेणे, जोखमीचे व धोकादायक काम त्याने ओबरहाजर या गिर्यारोहकाच्या साहाय्याने पार पाडले होते. पण काम संपल्यावर त्याला गोळ्या घालून हिमनदीच्या मोठ्या भेगेत ढकलून दिले होते. अनेक वर्षांनी सापडलेल्या त्याच्याच प्रेतावरून बाँडने जमेका येथे अज्ञानात पण अत्यंत ऐषोआरामी जीवन जगत असलेल्या मेजर स्मिथचा माग काढला होता. मेजरने स्वत: पाळलेल्या ‘ऑक्टोपसी’ या जलचराप्राण्याकडून स्वत:चा अंत करून घेतला. या चित्रपटाचा काही भाग जयपूरमध्ये चित्रित झाला होता व त्यातला बाँड होता रॉजर मूर. दुसरी कथा आहे, ‘पुनर्जन्माची पहाट’ युद्धानंतर भूमिगत झालेल्या नं. २७१ या सैनिकाची. तो आता अ‍ॅटोमिक व रॉकेटस् माल घेऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून त्याला ब्रिटिश हेरखात्याची मदत हवी होती. अर्थातच हेरखात्याने ही कामगिरी बॉण्डवर सोपविली होती. केजीबीच्या प्राणघातक हल्ल्यातून स्वत:ला वाचविण्याची विनंती त्या सैनिकाने सांकेतिक भाषेत ब्रिटिश हेरखात्यास कळविले होते. केजीबी व पूर्व जर्मनीचे सुरक्षा सैन्यही त्या भूमिगत सैनिकाच्या मागावर होते. येत्या तीन दिवसात सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान कोणत्याही क्षणी तो पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत पलायन करणार होता. कोणत्याही क्षणी तो केजीबीच्या निष्णात ट्रिगरकडून मारला जाणार होता. त्याचा बळी जाण्यापूर्वीच त्या ट्रिगरचा बळी घेण्याची कामगिरी बॉण्डवर सोपविली होती अन् त्यासाठी बॉण्डजवळ फक्त तीन सेकंदांचा अवधी होता. तिसऱ्या दिवशी भयनाट्य घडले. बॉण्डने कामगिरी फत्ते केली. त्याच्या साथीदाराने बॉण्डला आश्चर्याने विचारले, ‘ट्रिगरला ठार मारण्याऐवजी त्याचा पाय फक्त तू जेरबंद केलास, असे का?’ स्थिर नजरेने त्याच्याकडे पाहत बॉण्ड म्हणाला, ‘कारण तो ट्रिगर म्हणजे एक स्त्री होती.’ आश्चर्याचा दुसरा धक्का पचवीत साथीदार म्हणाला, ‘...पण याचा परिणाम?’ बॉण्ड म्हणतो, ‘ओ ओ खात्यातून मला काढण्यात येईल इतकेस!’ असा हा अत्यंत चतुर, हुशार, उमदा व कर्तवय बजावीत असतानाही काही नीतीनियम पाळणारा जेम्स बॉण्ड! रसिकांचा अत्यंत लाडका नायक! त्या शार्पशूटला म्हणजे ट्रिगरला बॉण्डमुळे पुनर्जन्म मिळाला म्हणून चित्रपटाचे नाव ‘पुनर्जन्माची पहाट’. तिसरी कथा आहे ती एका अतिशय मौल्यवान अशा पाचूच्या गोलाची. फॅबर्जे या कंपनीच्या कारागिरीचा तो अत्यंत अप्रतिम असा नमुना होता. ते मौल्यवान पार्सन पॅरिसहून आले मारिया फुडेन्स्टिनच्या नावाने. ती त्या पाचूच्या गोळ्याची एकमेव वारस होती. त्याचा लिलाव लावून ती रक्कम मारियाला देण्याचे केजीबीने ठरविले होते. कारण मारिया ही त्याच्यासाठी जांभळ्या सांकेतिक लिपीचे पर्पल सायफर काम करत होती. या लिलावात अधिकाधिक बोली लावून त्या गोळ्याचा मालक बनलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याची कामगिरी बॉण्डवर हेरखात्याने सोपविली होती. लिलाव उघडपणे न होता सांकेतिक मार्गाने होणार असल्यामुळे हजारो लोकांतून त्या व्यक्तीचा शोध घेणे ही फार कठीण कामगिरी होती; पण बॉण्डला ‘अशक्य’ हा शब्द माहीत नसल्याने यातही तो यशस्वी होतो चौथ्या कथेत काही दम नाही. संपूर्ण कथा केवळ पाचसहा पानांत उरकली आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या युनायटेड नेशन्स संबंधित केजीबीच्या रशियन गुप्तहेराबरोबर काम करणाऱ्या एका युवतीला एक निरोप देणे एवढेच बॉण्डला करायचे होते, त्यासाठी स्थळ, वेळ व दिवस ‘एम’ने ठरविलेले असते. संपूर्ण कथेत बॉण्डचे न्यूयॉर्कमधील श्रीमंती थाटाचे जीवन, त्याची आलिशान कार, त्याची खरेदी व त्याचे स्वत:शी असंबद्ध बडबडणे याचेच वर्णन आहे. कथेतील शेवटचे वाक्य ‘त्या इंग्लिश मुलीच्या रडारड व आत्महत्येच्या धमकीमुळे ही भेट बेचव झाली आणि ही न्यूयॉर्कचीच चूक होती. सेंट्रल पार्क झूमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचे घरच नाही! या त्रुटीला सर्व श्रेय देणे शक्यच नाही’ या कथेच्या या शेवटच्या वाक्यातून ज्याने त्याने अर्थ काढायचा. पुस्तकाने शीर्षक पाहून ते वाचण्याची उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण होते; पण असंबद्ध भाषारचना व शब्दरचना, संदर्भहीन तुटकतुटक वाक्ये, सलग ओघवत्या भाषेचा अभाव, अनाकलनीय वाक्यरचना यामुळे वाचनातील रंगतच निघून जाते. शब्दश: भाषांतर केल्याचा हा परिणाम असावा. स्वैर अनुवाद हा भाषांतरित भाषेला न्याय देतो; पण काहीच माहिती नसण्यापेक्षा चार चित्रपटाचे थोडेफार कथानक या पुस्तकामुळे माहीत होते, हेही नसे थोडके! सर्वांत शेवटी मराठीत भाषांतर केलेल्या इंग्रजीमल्या कादंबऱ्यांची यादी दिलेली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ मनोवेधक आहे. -डॉ. चंद्रकांत चव्हाण ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more