YASHODHARA KATKAR

About Author

Birth Date : 23/04/1954


YASHODHARA KATKAR HAS EMERGED AS A PROLIFIC WRITER IN THE POST-MODERNIST ERA OF MARATHI LITERATURE IN THE 21ST CENTURY .WITH A M.A. FROM UNIVERSITY OF MUMBAI AND PG DIPLOMA IN TOURISM MANAGEMENT, SHE MADE IT HER MISSION TO MENTOR STUDENTS THROUGH VOCATIONAL EDUCATION-TRAINING STREAM TO SET THEM ON CAREER PATHS IN TRAVEL, HOSPITALITY AND TOURISM INDUSTRY. WITH AN EYE FOR CONTEMPORARY ISSUES ,SHE CHOOSES TO WRITE ABOUT HUMAN STRUGGLES ,RELATIONSHIPS AND MOODS IN CURRENT TIMES .HER DIVERSE LITERARY WORKS INCLUDE A COLLECTION OF AUTIBIOGRAPHICAL ESSAYS ‘BANJARYACHE GHAR’ , PORTRAITS OF EMINENT PERSONALITIES CLOSE TO HER ‘ APOORVA ,ALAUKIK ,EKMEV’ , A COLLECTION OF SHORT STORIES ‘THIRD PERSON ‘ , ‘SWAYAM SHIKSHIT ,SWAYAM PRAKASHIT ‘ FOCUSSING ON RURAL WOMEN OF MARATHWADA AND ‘MOOLMANTRA CAREERECHA ‘ , OUTLINING VOCATIONAL/CAREER GUIDANCE FOR SCHOOL DROP-OUTS AND SSC /HSC STUDENTS . A VORACIOUS READER AND FILM BUFF, SHE CONTRIBUTES BOOK AND FILM REVIEWS AND IS CURRENTLY CONTRIBUTING ‘MANASKANYA BIMALDANCHYA ‘, FOR A LEADING MARATHI DAILY, BASED ON THE PORTRAYAL OF WOMEN IN THE FILMS MADE BY THE LEGENDARY PRODUCER –DIRECTOR, BIMAL ROY. A NOVEL FOCUSING ON THE UPS AND DOWNS IN THE INDIAN ART WORLD IS ALSO IN PROCESS. YASHODHARA IS THE RECIPIENT OF ‘SENIOR RESEARCH FELLOWSHIP ‘ BY CCRT ,MINISTRY OF CULTURE ,GOVT OF INDIA ,FOR 2017-19. SHE CHOSE THE TOPIC, ‘A STUDY OF MARATHI ‘NAVKATHA’ AND THE CONTRIBUTION OF AUTHOR ARVIND GOKHALE TO IT ’ , TO HIGHLIGHT THE HUGE CONTRIBUTION MADE BY GOKHALE AND CORRECT THE PERSPECTIVE ABOUT HIS RIGHTFUL PLACE IN THE HISTORY OF INDIAN LITERATURE . AMONG THE AWARDS AND ACCOLADES RECEIVED , ‘SWAMIKAAR RANJIT DESAI PURSKAR’ , ‘RAMSHETH THAKUR PURSKAR FOR THE BEST SHORT STORY WRITER OF THE YEAR ’ AND THE PRESTIGIOUS ‘BHAIRURATAN DAMANI PURASKAR’ ARE THE CLOSEST TO HER HEART .

समकालीन मराठी साहित्यातील आघाडीच्या लेखिका. मुंबई विद्यापीठातून एम.ए. आणि प्रवास-पर्यटन व्यवस्थापन विषयक पदव्युत्तर पदविका घेतल्यानंतर व्यवसायाभिमुख शिक्षण-प्रशिक्षण क्षेत्रात अध्यापक म्हणून दीर्घ काळ कार्यरत. त्यांनी नव्याने उदयाला येणाऱ्या या क्षेत्रात अध्यापन, त्या अनुषंगाने लेखन-समुपदेशन, व्यवस्थापन आणि जनसंपर्क अशा विविध उच्चपदस्थ जबाबदाऱ्या सांभाळल्या. शिक्षण, साहित्य, कला आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांत अंगभूत रुची आणि अभ्यास असल्याने त्यांचे लेखनही त्या अनुषंगाने कथा, व्यक्तिचित्रणे, ललितबंध, चित्रपटविषयक लेख, करिअर मार्गदर्शनपर लेखन, मराठी विश्वकोशासाठी नोंदी आणि अनुवाद अशा अनेक साहित्यप्रकारांत बहरत गेलेले दिसते. त्यांच्या कथासाहित्यात महानगरी स्त्रीच्या जीवनातले ताणतणाव, भावच्छटा, एकाकीपण आणि तिची ससेहोलपट अशी वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमध्ये ‘बंजाऱ्याचे घर’ (आत्मकथनात्मक ललितबंध), ‘अपूर्व, अलौकिक, एकमेव’ (व्यक्तिचित्रणे), ‘स्वयम शिक्षित, स्वयम प्रकाशित’ (मराठवाड्यातील ग्रामीण महिलांच्या चळवळींच्या कहाण्या) आणि ‘मूलमंत्र करिअरचा’ (१०वी – १२वीच्या विद्याथ्र्यांसाठी मार्गदर्शन) तसेच ‘थर्ड पर्सन’ (कथासंग्रह) यांचा समावेश आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या २०१७-१९च्या ‘सीनिअर रिसर्च फेलोशिप’च्या मानकरी. ‘स्वामी’कार रणजित देसाई पुरस्कार’, ‘रामशेठ ठाकूर सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार’ आणि ‘भैरूरतन दमाणी पुरस्कार’ यांनी सन्मानित.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
APURVA, ALOUKIK, EKMEV Rating Star
Add To Cart INR 260
BANJARYACHE GHAR Rating Star
Add To Cart INR 190
KAMBAKTH NINDAR Rating Star
Add To Cart INR 250
KYA HAAL SUNAVA Rating Star
Add To Cart INR 450
THIRD PERSON Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.