THE THREE STORIES, RAVIVAR, AKHERACHA SHABD AND LABORATORY, INCLUDED HEREIN WERE ORIGINALLY WRITTEN BY RABINDRANATH TAGORE DURING 1938-1940. CONSIDERING HIS LIFE-SPAN FROM 1861-1941, IT IS CLEAR THAT HE WROTE THEM AT THE END OF HIS LIFE. ALL THESE WERE LONG STORIES DIFFERING IN STYLE OF CARICATURES AND TECHNIQUES COMPARED TO HIS EARLIER WRITINGS.
THE MAIN CHARACTERS FROM THESE STORIES ARE SCIENTIST, ARTIST AND TECHNICIAN WHICH IS QUITE REMARKABLE. YET, WHAT WE RECALL THE BEST ARE THE CHARACTERS OF WOMEN IN EACH STORY, VIBHA, ACHIRA AND SOHINI. ALL THESE THREE ARE EXCEPTIONAL IN THEIR OWN WAY. WHILE ESTABLISHING RELATION WITH THE MALES THEY DECIDE UPON ITS LIMITATION AS WELL. THEIR INDEPENDENT NATURE GIVES THEM UNIQUE IDENTITY WHICH IS WHY THE TRIO IS SO DIFFERENT FROM THE CHARACTERS IN RABINDRANATH TAGORE’S EARLIER STORIES, HENCE THE NAME ‘TEEN SANGATINEE.’
‘तीन सांगातिणी’ या कथासंग्रहातील तीन कथा या रवीन्द्रनाथ टागोरांनी १९३८-१९४० या काळात लिहिल्या. रवीन्द्रनाथांचा १८६१-१९४१ हा जीवनकाल पाहता; या कथा त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरीला लिहिल्या. त्या तीनही दीर्घकथा त्यांच्या आधीच्या कथांच्या तुलनेत व्याQक्तरेखा आणि तंत्र या बाबतीत सर्वस्वी वेगळ्या आहेत.
‘तीन सांगातिणी’ या कथासंग्रहातील ‘रविवार’, ‘अखेरचा शब्द’ आणि ‘लॅबरेटरि’ यातील नायक हे शास्त्रज्ञ, कलावंत व तंत्रज्ञ आहेत. हे या कथांचे एक वैशिष्ट्यच म्हणायला हवे. पण लक्षात राहतात त्या या कथांतील नायिका विभा, अचिरा आणि सोहिनी. त्या आपापल्या परीने विलक्षण आहेत. त्या नायकांशी नाते प्रस्थापित करतात आणि त्या नात्याची मर्यादाही त्याच ठरवतात. त्यांच्या या स्वतंत्र वृत्तीमुळेच त्या लक्षणीय ठरतात आणि रवीन्द्रनाथांच्या या आधीच्या कथांमधील नायिकांपेक्षा उठून दिसतात. त्या ‘तीन सांगातिणी’ ठरतात ते यामुळेच!