MRUNALINI GADKARI

About Author

Birth Date : 12/01/1949


AFTER GRADUATING WITH HONORS IN GERMAN, GADKARI COMPLETED HIS MASTERS IN MARATHI. KAVIVARYA BA.BH. HE DID HIS M.PHIL BY PRESENTING A THESIS ON BORKAR AND RABINDRANATH TAGORES POEMS ON NATURE : A COMPARATIVE STUDY. RECEIVED THE POETRY OF RABINDRANATH TAGORE AND CONTEMPORARY MARATHI POETRY WAS THE SUBJECT OF HIS PH.D. HE WAS INVOLVED IN A PROJECT TO TRANSLATE THE ENGLISH BIBLE INTO MODERN MARATHI IN COLLABORATION WITH THE MARATHI DEPARTMENT OF PUNE UNIVERSITY AND THE WORLD BIBLE TRANSLATION CENTER.

जर्मनमधून पदवी (ऑनर्स) प्राप्त केल्यानंतर गडकरी यांनी मराठीतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. कविवर्य बा.भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील निसर्ग : एक तौलनिक अभ्यास या विषयावर शोधनिबंध सादर करून त्यांनी एम.फिल. प्राप्त केली. रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि समकालीन मराठी कविता हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता. पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि वर्ल्ड बायबल ट्रान्स्लेशन सेंटर यांच्या सहकार्याने इंग्रजी बायबलचा आधुनिक मराठीत अनुवाद करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. विविध नियतकालिकांमधून त्यांचे लेखन व त्यांनी अनुवादित केलेले साहित्य प्रकाशित झाले आहे. शिष्यवृत्त्या व पारितोषिके : पीएच.डी.साठी कै. गजानन विश्वनाथ साळवेकर शिष्यवृत्ती एम.फिल. साठी डॉ. सुहासिनी लद्दू पारितोषिक निर्बाचित कलाम या पुस्तकाला गाडगीळ भगिनी पुरस्कृत मातृ-पितृ पुरस्कार आमार मेयेबेला या पुस्तकाला डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत जी.ए. कुलकर्णी पुरस्कार देवदास या कादंबरीच्या अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार पश्चिम बंगाल सरकारमान्य, शरद समिती चा शरद पुरस्कार, १९६० महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी.ए. कुलकर्णी पुरस्कार, २०११.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 13 total
AAMAR MEYEBELA Rating Star
Add To Cart INR 295
ALO-ANDHARI Rating Star
Add To Cart INR 160
DEVDAS Rating Star
Add To Cart INR 120
KABULIWALA ANI ITAR KATHA Rating Star
Add To Cart INR 130
KABULIWALYACHI BANGALI BAYKO Rating Star
Add To Cart INR 140
KRANTIYOGINI BHAGINI NIVEDITA Rating Star
Add To Cart INR 450
MEE DHARMIKTA SHIKVITO DHARM NAHI Rating Star
Add To Cart INR 140
NASHTYA MAEYER NASHTYA GADYA Rating Star
Add To Cart INR 250
NIRBACHIT KALAM Rating Star
Add To Cart INR 170
NIRBACHIT KAVITA Rating Star
Add To Cart INR 70
PHERA Rating Star
Add To Cart INR 125
POSTMASTER ANI ITAR KATHA Rating Star
Add To Cart INR 160
12

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.