* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MI KA NAHI ?
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982565
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 124
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE, AS A NORMAL HUMAN BEINGS, GET ALL THE FACILITIES AS A CITIZEN OF OUR COUNTRY, EVEN THESE TRANS GENDERS (HIJRA COMMUNITY) ARE ALSO HUMAN BEINGS AND CITIZENS OF OUR COUNTRY. BUT THEY ARE DEPRIVED OF MOST OF THE THINGS WHAT OUR CONSTITUTION AND SOCIETY HAS TO OFFER IN INDIA. THIS NOVEL BRINGS FORWARD THEIR GRIEVANCES IN FRONT OF SOCIETY AND IN DOING SO REQUESTS THE SOCIETY AND OUR CONSTITUTION TO ACCEPT THEM.
‘मी का नाही?’ हा प्रश्न विचारू धजणा-या तृतीयपंथी समाजाची ही कहाणी! या कादंबरीची नायिका असलेल्या नाझच्या वाट्यालाही हे दु:ख येते. पण तिचे वडील सोडून सगळे कुटुंब, विशेषत: तिची आई तिला भक्कम पाठबळ देते. या पाठबळाच्या जोरावर नाझ ‘हिजडा समाज’ स्थापन करते. यातून ती या समाजाला स्वावलंबी आणि सुसंघटित तर करतेच; पण प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांचे प्रश्नही सोडवते. हिजडा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक चळवळ उभारते. समाजात पदोपदी होणारा अपमान, टिंगलटवाळी यांना दाद न देता निर्भीडपणे स्वत:च्या प्रश्नांसाठी न्यायालयापर्यंत धडक मारते. ‘मी का नाही’ हा एक शोध आहे. तो किती भेदक आहे, हे कादंबरी वाचताना उमगत जाते. त्याचे उत्तर शोधताना वाचक अस्वस्थ तर होतोच; पण निरुत्तरही होतो!
उत्तेजनार्थ लिओ टॉलस्टाॅय पुरस्कार २०११ .

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MIKANAHI #MIKANAHI #मीकानाही #FICTION #MARATHI #PARUMADANNAIK #पारूमदननाईक "
Customer Reviews
  • Rating StarPUDHARI 18-9-2011

    मी का नाही? `मी का नाही?’ ही कादंबरी तृतीयपंथी समाजाची संघर्षकहाणी आहे. नाझ ही या कादंबरीची नायिका आहे. पारु मदन नाईक यांनी लिहिलेल्या या कादंबरीतील हा उतारा....... नाझ आईच्या नजरेला नजर देत म्हणाली, `आई. तुझ्या मायेचा मी पमर्द करणार नाही. आजवर कधी तुझ्याशी खोटं वागले नाही आणि यापुढेही तुझ्याशी खोटं बोलायला मला जमणार नाही. आई, तुझ्या मनात माझ्याबद्दल ज्या शंका आहेत, त्या मी जाणून आहे. आई मी सांगते, अगदी खरं सांगते, तुझी शपथ घेऊन बोलते. फक्त तु मन शांत ठेव.’ क्षणभर नाझ थांबली. जवळच्या बाटलीतलं पाणी तिनं ग्लासमध्ये घेतलं. पाण्याचे दोन घोट घेऊन तिनं ग्लास परत ठेवला आणि आईच्या नजरेला नजर देत बोलली, `आई, मी हिजडा आहे हा माझ्या नशिबाचा भाग आहे; पण माझ्या हिजडेपणाची लाज तू बाळगली नाहीस. तुझ्या अधिकारातच ह्या घरादारानं कधी माझा दु:स्वास केला नाही, हे मी कधीच विसरु शकत नाही. आई, संपूर्ण दिवसभर मी वेड्यासारखी काम करते; पण जसा अंधार पडू लागतो तसा अंगावर काटा येतो गं! मनात एक अनामिक भीती वावरु लागते. मन सैरभैर होऊन जातं. आई, त्या परमेश्वरानं या शरीरात अनेक भावना पेरुन ठेवल्या आहेत. कोणत्याक्षणी कोणती भावना या शरीराचा ताबा घेईल, हे सांगता यायचं नाही. आई, तुझ्यापाशी मन मोकळंच करायचं आहे. तू समजून घेणारी आहे. मला दोष देणार नाहीस, अशी खात्री आहे. आई, घरामध्ये तुम्हा सर्वांचं जगणं बघते. मनात एक प्रश्न सारखा सतावतो. मला ??? कधी उपभोगायला मिळेल का? याचं उत्तर मला कधी मिळत नाही. मी अधिक बैचेन होते.’ नाझ आईच्या नजरेला नजर देऊन बोलत होती. नाझच्या शब्दांनी आईची नजर व्याकूळ बनली होती. नकळत नाझची नजर खाली गेली. नि:श्वास सोडून ती बोलू लागली, `आई, जनावरांनाही शरीराची भूक आहे. अनावरपणे कुठंही उघड्यावर ती आपल्या शरीराची भूक भागवतात. मानवाला विचारांची देणगी मिळाली आहे. आपल्या संस्कृतीचा पगडा त्याच्या मनावर आहे. धर्माचे संस्कार मनाची जडणघडण करत असतात. प्रकृती आणि विकृतींवर संस्कारांनी मात करुन संस्कृतीनं आपल्या जीवनाला लाख मोलाचं समाधान दिलं आहे. आई मलाही भावना आहे. प्रकृती आणि विकृतीच्या उफाळणाऱ्या भावना मी सिगारेटच्या झुरक्यानं जाळू पाहते. दारुच्या नशेच्या पुरात त्यांना बुडवू पाहते. तुला वाटलं, नाझ व्यसनात बुडत चाललीय.’ नाझनं आईकडे पाहिलं. आईची नजर झुकली होती. नाझ बोलायचं थांबली म्हणून आईनं नजर वर केली. ती डबडबलेली नजर पाहत असता नाझ पुढे झाली, तर मला समजून घे. तुम्ही मला शिक्षण दिलं, संस्कार दिले; माझं मन घडवलं. स्वत:च्या हिजडेपणाची लाज न बाळण्याइतकं शहाणपण मला आलं. कुणालाच दोष न देता जे आहे त्याचा मी स्वीकार केला. घराण्याची इज्जत राखण्याचा मी आटोकाट प्रयत्न करते; पण आई, शेवटी मी एक माणूस आहे. सामान्य माणूस आहे. भावनांवर विजय मिळवणारा मी कोणी योगी नाही. अनावर होऊन केव्हातरी भावनेच्या पुरात मी गटांगळ्या खाते. मनाला आवरु शकत नाही आई! खरंच आवरु शकत नाही. खूप यातना सहन करते गं ऽ ऽ आई! तू माझी फक्त आई नाहीस. जीवाभावाची मैत्रिणही आहेस. तुझ्यापासून काय लपवू? कसली लाज बाळगू? `आई, बरं-वाईट कळतं मला. पण परमेश्वरानं हे जे जीवन दिलंय, त्याबरोबर स्त्रीचं मनही दिलंय, नटावं वाटतं म्हणून मेकअप करते. दररोज चेहऱ्यावर रेझर फिरवायचं. चेहरा गुळगुळीत करायचा. पुरुषपणाचं चिन्ह दिसू द्यायचं नाही. लिपस्टिक लावायची. संपूर्ण स्त्री नाही काही असूनही स्त्री बनण्याचा अट्टाहास करायचा! `आई, तुम्ही मला कॉस्मॅटिक सर्जरीसाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न केला. मी त्याला नकार दिला. मला माहीत होतं, डॅडीच्या ओळखीनं माझं लग्न झालं असतं. समाजात मी प्रतिष्ठेनं वावरले असते; पण ज्या घरात मी गेले असते त्या घराण्याला मी वारस देऊ शकले नसते. फसवणूक करुन आयुष्यभर मनाला बोचणी लावून जगण्यापेक्षा त्या वाटेला न गेलेलं बरं, नाही का? आई, ज्या समाजात आम्हा हिजड्यांची कुचेष्टा होते, त्याच समाजातील मोठेपणाची आव आणणारी, महागड्या गाड्या उडवणारी काही माणसं आमचा शोध घेत येतात. आमच्यावर हवा तेवढा पैसा उधळतात आणि....’ `बस्स कर नाझ!’ आई असह्य होऊन उद्गारली. `अगं, हे बोलवतं तरी कसं तुला?’ `का?’ नाझ हसली. `आई, सांगितलं ना तुला! तू माझी नुसती आई नाहीस, जीवाभावाची मैत्रीणही आहे. भयानक असलं तरी जे सत्य आहे, ते तुझ्याशिवाय कुणापुढे सांगायचं गं? आजवर मनात कोंडून ठेवलं. आज तूहून विषय काढलास, म्हणून हे कोंडलेलं सारं तोंडातून बाहेर पडलं. मला माहीत आहे, तुला हे ऐकवत नाही. तुझी लाडकी नाझ काय आहे हे तुला समजलं पाहिजे. हवं तर माझा तिटकारा येऊ दे तुला. रागानं दोन थपडा मारल्यास तरी मला काही वाटणार नाही.’ उसासा सोडून आई बोलली, `नाझ, खूप त्रास झालाय तुला. झोप. मलाही झोप आलीये.’ नाझला हसणं आवरलं नाही, डोळ्यांत पाणी येईपर्यंत ती हसत राहिली. ...Read more

  • Rating StarSAKAL SAPTARANG 23-10-2011

    `मी का नाही?’ याचं उत्तर द्यावेच लागेल! तृतीयपंथीयांच्या जीवनावर यापूर्वी शिवसेनेचे नेते कै. प्रमोद नवलकर यांनी लेखन केले आहे. तसेच इंग्रजीत या समाजाविषयी भरपूर लिखाण प्रसिध्द आहे. आता मदन पारु नाईक यांनी `मी का नाही?’ ही कादंबरी लिहिल आहे. वास्तविक ही कादंबरी नसून सत्य घटनेवर आधारित या समाजाच्या जीवनशैलीवर भाष्य करण्यात आले आहे. हा समाज पूर्णपणे उपेक्षित आहे. त्यांच्या जीवनाच्या काही सामाजिक, सांस्कृतिक जगण्याविषयीच्या ज्या समस्या आहेत, त्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे मत प्रारंभीच लेखकाने नोंदविले असून, ते योग्यच आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या आज १.३० कोटींच्या घरात आहे. विविध जाती-धर्माचे आणि पंथाचे लोक या महानगरीत वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात. यामध्ये तृतीयपंथीयांचाही समावेश आहे. या शहरात तृतीयपंथीयांच्या शेकडो वसाहती आहेत. चर्चगेट ते विरार आणि व्हीटी ते उल्हासनगरपर्यंत कुठेना कुठे तृतीयपंथी समूहाने राहताना दिसतात. हे लोक बहिष्कृताचे जीवन आजही जगत आहेत. त्यांच्याकडे समाज सहानुभूतीने पाहत नाही. ते अत्यंत हलाखीचे आयुष्य जगतात. कायद्याने त्यांना कोणतेच अधिकार दिलेले नाहीत आणि हेच अधिकार मिळविण्यासाठी `नाज’ नावाचा तृतीयपंथी पुढाकार घेतो. व्यवस्थेशी संघर्ष करतो. हिजडा समाजानेही शिक्षण घ्यावे, नोकरी करावी, वैद्यकीय उपचार व्हावेत, सामाजिक कार्य करावे, अनिष्ट चालीरीतींना तिलांजली द्यावी, हावभाव बदलावेत यासाठी कादंबरीतील नायक नाज (पाळण्यातील नाव नरेंद्र) समाजाशी संघर्ष करतो. मंत्रालयात आणि न्यायालयात लोक हिजडा म्हणून टिंगलटवाळी करतात. `तुम्ही कुठे न्यायाची भाषा करता? हिजड्यांना कुठला आला अधिकार?’ असे प्रश्न करणाऱ्या माणसाची नाजला कीव येते. काही वेळा हतबल नाजला आधार देते ती त्याची आई. वास्तविक पारु नाईक यांनी या पुस्तकातून समाजाला महत्वाचा संदेशही दिला आहे. कोणी कुठे जन्माला यावे हे कोणाच्या हातात नसते. इतर मुलामुलींप्रमाणे कुणाच्या तरी पोटी हिजडे जन्माला येतात; मात्र त्यांच्यात भेदभाव केला जातो. म्हणून नाज आईला प्रश्न विचारतो; ``आई, परमेश्वरानं नारी जातीला मातृत्व दिलं आणि वात्सल्याची नाड जोडली. हे खरं असेल तर आमच्यासारख्यांना पाहून ही वात्सल्याची नाड कशी तोडली जाते?’’ त्यावर आई म्हणते, ``नाज, वात्सल्य लोपत नाही. सामाजिक कुचेष्टेचा क्रूर राक्षस आड येतो. त्याला दूर करायचं धाडस मोजक्याच माता दाखवतात. हे धाडस नसलेल्या माता आतल्या आत कुढत असतात. उपजत वात्सल्य कधीच लोप पावत नाही.’’ नाज आणि त्याचा एक भाऊ एकाच आईच्या पोटी जन्माला येतात. नाज हिजडा असूनही आईनं त्याला कधीच अंतर दिलं नाही. एका प्रसंगात सद्गदित होऊन नाज आईला म्हणतो, ``आई, जगातल्या अभागी जिवांना तुझ्यासारख्या खंबीर माता मिळाल्या असत्या, तर किती बरं झालं असतं!’’ नाज आणि आईमधील संवाद लेखकानं उत्तमप्रकारे मांडला आहे. आज हा समाजही बदलतो आहे. सरकारही दखल घेत आहे. न्याय मिळत आहे. तरीही नाज समाजाला काही प्रश्न करतो. तो म्हणतो, ``माणसासारखीच माणसं आम्ही; पण समाजानं आम्हाला कधीच जवळ केलं नाही. हिजडा, किन्नर, खोजा अशा नावाचं ओझं आम्ही कसं सोसतो हे समाजाला कसं कळणार? आमच्यातील बुध्दिवंतांची बुध्दी कुजवली जाते. त्याची खंत कोणीही बाळगत नाही. रस्त्यावर टाळ्या वाजवून लोकांना अडवणारे आमचे घोळके दिसतात; पण ते असं का करतात, याचा विचार कुणी केलाय? आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो; मात्र तेथेही कुचेष्टाच होते.’’ ज्या समाजाचा आज लोक तिरस्कार करतात, त्या समाजाविषयी लेखकानं जिव्हाळा दाखविला आहे. पाच वर्षं या विषयासाठी खर्च केली आहेत. पुस्तकात कोणत्याही त्रुटी जाणवत नाहीत. एक ना एक दिवस हा समाजही बदलेल... मुख्य प्रवाहात येईल आणि आपल्या सर्वांची दृष्टी बदलेल, असं वाटतं. `मी का नाही?’ या प्रश्नाचं उत्तर मात्र एक ना एक दिवस समाजाला द्यावंच लागणार आहे. - प्रकाश पाटील ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.