* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DOG BOY
  • Availability : Available
  • Translators : SWATI KALE
  • ISBN : 9788184984323
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FOUR-YEAR-OLD ROMOCHKA IS LEFT ALONE IN A DARK, EMPTY MOSCOW APARTMENT. AFTER A FEW DAYS, HUNGER DRIVES HIM OUTSIDE, WHERE HE SEES A LARGE, YELLOW DOG LOPING PAST AND FOLLOWS HER TO HER LAIR ON THE OUTSKIRTS OF THE CITY. DURING THE SEASONS THAT FOLLOW, ROMOCHKA CHANGES FROM A BOY INTO SOMETHING FAR WILDER.
गोर्बाचेव्हनंतरच्या काळात रशियातील बेसुमार लोकसंख्यावाढीमुळे अनेक भीषण प्रश्न निर्माण झाले. उपासमार, गरिबी यामुळे रशियातील लाखो मुले बेघर बनली. त्यातील काही बेवारस छोट्या मुलांचा सांभाळ चक्क रानटी कुत्र्यांनी केला. ‘रोमोचका’ या अशाच एका डॉगबॉयची कथा या कादंबरीत आहे. रानटी कुत्र्यांनी सांभाळ केलेल्या रोमोचकाचा मनुष्यत्वाकडून पशुत्वाकडे आणि पशुत्वाकडून पुन्हा मनुष्यत्वाकडे झालेला विलक्षण प्रवास इव्हा हॉर्नंग या लेखिकेने फार ताकदीने लिहिला आहे. ‘डॉगबॉय’ची चित्तथरारक कथा वाचकांना अक्षरश: खिळवून ठेवते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DOGBOY #DOGBOY #डॉगबॉय #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SWATIKALE #EVAHORNUNG "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 12-6-2015

    गोर्बाचेव्हनंतरच्या काळात रशियात बेसुमार लोकसंख्यावाढ झाली. या वाढीमुळे उपासमार, गरिबी असे अनेक भीषण प्रश्न निर्माण झाले. या गंभीर समस्यांमुळे रशियातील लाखो मुले बेघर झाली. अन्न, वस्त्र तर नाहीच पण त्यांना राहण्यास निवारा मिळणेही अशक्य होऊ लागले. पर्ायाने अशी बेवारस मुले रस्त्यांवर निवारा शोधू लागली, पण अशा बेवारस मुलांचा सांभाळ केला तो तिथल्या रानटी कुत्र्यांनी. अशी आगळीवेगळी कथा मांडली आहे ‘डॉग बॉय’ या पुस्तकात. रोमोचका या एका डॉग बॉयची कथा या कादंबरीत आहे. कुत्र्यांवर प्रेम असलेल्यांसाठी ही कादंबरी म्हणजे पर्वणीच आहे. कादंबरी वाचतानाच कुत्र्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. भूतदया वर्षानुवर्षे चघळला जाणारा विषय आहे. ‘डॉग बॉय’ या कादंबरीतल्या रोमांचक कथेच्या माध्यमातून या विषयाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. प्राणिजगताबद्दल आढळून येणारी आस्था या कादंबरीत प्रतिबिंबित होते. आजच्या युगात माणसामाणसांतील नात्यांविषयी खात्री देता येत नाही, पण प्राणी आणि माणूस यांच्यातील नाजूक धागा कादंबरीतून प्रकाशित होतो. पुढे काय होईल याबाबतची उत्सुकता टिकून राहते. मनावर खोलवर परिणाम करणारे, खिळवून ठेवणारे वास्तववादी चित्रण करणारी असे या कादंबरीचे वर्णन करता येईल. रोमोचकाचा मनुष्यत्वाकडून पशुत्वाकडे आणि पुन्हा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे झालेल्या प्रवासाची मांडणी प्रभावी झाली आहे. चित्तथरारक अशी ही कादंबरी वाचकांना नक्कीच खिळवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more