* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664812
  • Edition : 21
  • Publishing Year : JANUARY 1973
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOU WAIT IN THE QUEUE PATIENTLY FOR HOURS TOGETHER. BE IT THE QUEUE FOR MILK OR RATION OR SUGAR, OR TICKETS AT A CINEMA HALL OR BUS & YET NEVER LOSE YOUR PATIENCE. YOU END UP CATCHING A MOVING TRAIN, YOU RISK YOUR LIFE TO AVOID THE LATE MARK, YOU LISTEN TO THE TORTURE AND UNAVOIDABLE CRITICISM FROM YOUR BOSS, YOU DRINK THE TASTELESS CANTEEN TEA, YOU FACE MANY TROUBLES AT YOUR HOME FRONT, YOU TOLERATE EVERYTHING, YOU STAND FIRMLY AGAINST THE MANY HOLLOW THINGS IN YOUR LIFE, YOU TOLERATE THE WALK-OUTS, THE CURFEW, THE HUNGER STRIKE ...EVERYTHING. STILL YOU LAUGH, YOU MAKE OTHERS SMILE, YOU PLAY CARDS IN THE TRAIN WHILE STANDING, YOU TALK ABOUT YOUR POLITICAL VIEWS EARNESTLY, YOU TRY TO CHEAT OTHERS INNOCENTLY JUST FOR THE SAKE OF THE PLEASURE, YOU ENJOY THE BAIT FOR THE TASTELESS CUP OF TEA. YOU ARE SIMPLY GREAT ...YOU ARE A TRUE `KARMACHARI`- AN EMPLOYEE. IN NO WAY THIS IS A COLLECTION OF SHORT STORIES. PRECISELY SPEAKING, IT IS A MIRROR IN WHICH EVERYBODY PEEPS, BE IT THE PEON OR THE HEAD-CLERK, BE IT THE FIRST DAY OF SOMEONE`S JOB OR THE LAST DAY OF SOMEONE`S CAREER, IT TEACHES EVERYBODY TO LOVE ALL, TO SHARE ALL YOUR GOOD THINGS WITH OTHERS.
"तुम्ही दुधाच्या, रेशनच्या, साखरेच्या, तिकिटांच्या, बसच्या रांगेत तासन् तास उभे राहता. चालती गाडी पकडता. लोकलला लोंबकळता. लेटमार्क चुकवण्यासाठी जीव गहाण टाकता. साहेबाची बोलणी खाता. कँटिनचा बेचव चहा पिता. संसारात तर नाना आपत्ती सहन करता. आज हे नाही. उद्या ते नाही. मोर्चा, हरताळ, संचारबंदी, उपोषण सगळं हलाहल पचवता. तरीही तुम्ही हसता. हसवता. गाडीत उभ्या उभ्या पत्ते खेळता. राजकारणावर हिरिरीने बोलता. एखाद्याला मोरु बनवून आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करता. बेचव चहाच्या पैजेवरही खुष होता. यू आर सिम्पली ग्रेट! असे तुम्ही जातिवंत कर्मचारी हा कथासंग्रह म्हणायचा. नाही, पण ते काही खरं नाही. हा आहे आरसा. सर्वांना प्रेम करायला लावणारा आरसा. उद्या रिटायर्ड होणारा हेडक्लार्क पण लिफ्ट मजल्यावर जाता जाता तिथल्या आरश्यात डोकवतो,तसाच हा आरसा.
Video not available
No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHHARPERCOLLINS INDIA https://harpercollins.co.in/product/karmachari/
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarShourya Sutar

    प्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्यांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतहीघडुन गेले आहे अस वाटत..! ...Read more

  • Rating Starसदा कऱ्हाडे

    व. पु. काळे यांचा ‘कर्मचारी’ हा संग्रह उल्लेखनीय आहे. मध्यमवर्गीय समाजातील जे स्त्रीपुरुष मुंबईत नोकऱ्या करतात त्यांच्या सुखदु:खांचा पट येथे चित्रित केला आहे. आज महागाई फार भडकलेली आहे. जागेचा प्रश्न अत्यंत कठीण आहे. प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी नवराबयको या दोघांनाही नोकरी करणे अपरिहार्य होऊन बसले आहे. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हे रोजचे प्रदीर्घ प्रवास, जेवणाचे हाल, ऑफिसमध्ये गेल्यावर लहान मुले कोठे ठेवावीत इ. अनेक प्रश्नांमुळे कर्मचारी गांजून गेला आहे. मनातली स्थाने, कठोर वास्तव परिस्थिती, तडजोडी, कुटुंबातल्या व्यक्तींचे गैरसमज, वाढत्या जबाबदाऱ्या आणि शारीरिक शिणवटा या असह्य ओझ्याखालचे तरीही आनंदी वृत्तीने जगू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन वपुंनी मोठ्या मार्मिक, भेदक, प्रवाही शैलीत रेखाटले आहे. या कथांमध्ये कोठेही तोचतोचपणा येत नाही. पुनरुक्ती होत नाही. त्याचप्रमाणे या कथांत खोटा गहिवर किंवा अतिशयोक्त पेचप्रसंगही नाहीत. काही ठिकाणी थोडे चटपटीत, चलाख लेखनही आहे; पण एकंदरीत लेखकाने निकटवर्ती जीवनांनुभवाची स्पंदने सशब्द करून मध्यमवर्गीयांचे जीवन किती अशांत आणि अस्वस्थ आहे हे यशस्वी रीत्या दाखवून दिले आहे. ...Read more

  • Rating Starसौ. चित्रा प्रधान

    दर्जेदार चित्रवेधक साहित्य… मुंबापुरी ही बहुरंगी नि बहुढंगी नगरी आहे. ह्या नगरीत नाना तऱ्हेचे लोक राहतात, त्यांची नाना तऱ्हेची स्वभाव वैशिष्ट्ये असतात. अशा लोकांच्या व्यक्तिरेखा कागदावर रेखाटणे एक महाकठीण काम. कोणी एखादं दुसऱ्या व्यक्तीचे वा फारतर दन चार व्यक्तींचे रेखाटन आपल्या साहित्यात करील पण कथालेखक श्री. व. पु. काळे यांनी अशा एक-दोन ना अनेकांचे व्यक्तिचित्रण आपल्या ‘कर्मचारी’ ह्या संग्रहातील कथांत उत्कृष्ट पणे केलेले आढळेल. व. पुं. च्या त्या साऱ्या व्यक्ती हरघडीच्या जीवनातील आहेत. कोणत्याही कचेरीत, त्यांनी रंगविलेली पात्रे हमखास सापडतील. त्या रंगविताना काळे ह्यांनी त्यांच्या नजरेसमोर आलेल्या परिचित अपरिचितांचे किती सूक्ष्म निरीक्षण केले आहे त्याची तेव्हाच कल्पना येईल. त्यांचे विचार, त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे हेवेदावे अशा अनेक अंगांचे बारकावे त्यांत पाहावयास मिळतील. ह्या कथा वाचताना त्यातला तो लहानग्या देवयानीवर असीम प्रेम करणारा देवस्थळी, चमत्कारिकपणे संबंध तोडून वागणारा वकील लांबडे, मुलाच्या मृत्यूनंतरही लगेच ऑफिसात येणारा स्थितप्रज्ञ कारखानीस, स्वत:च्या घरासाठी शिस्त व टापटीपीवर भर देता देता जीवन म्हणजे सहज मानू लागलेला सातवळेकर, भांडण्याच्या कलेत पारंगत झालेला जोशी, साहेबांच्या कच्छपि गेलेली वंदना सामंत, लाचखाऊ गोखले आणि कितीतरी व्यक्तिरेखा जणू आपल्यासमोर वापरत आहेत असा भाग होतो. इतक्या त्या जिवंतपणे आपल्यापुढे उभ्या करण्याचे सामर्थ्य काळ्यांनी आपल्या लेखणीच्या साह्याने दाखवून दिले आहे. त्या सर्व रेखाटतात मध्यमवर्गीय माणसाच्या विविध समस्या त्यांनी लीलया हाताळल्या आहेत. त्यांच्या संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे, त्यांच्या सुखदु:खांशी ते एकरूप झाले आहेत. त्यांच्या लेखनशैलीत साधेपणा आहे, मनमोकळेपणा आहे, ललित आहे नि औत्सुक्यवर्धनांची किमयाही आहे. एकदा कथा वाचण्यास प्रारंभ केल्यानंतर ती पूर्ण केल्याविना राहवत नाही आणि मग लगेच मन धाव घेते पुढच्या व्यक्तिचित्राकडे आता ह्या कर्मचाऱ्यात अनेकजण आहेत पण कोणत्याही दोन कथात पुनरुक्तीचा लवलेशही नाही. प्रत्येकीचा साज वेगळा, ढंग वेगळा, रचना वेगळी, प्रारंभ वेगळा नि शेवटही वेगळा- बहुतांश परिणामकारक. ...Read more

  • Rating StarAditya Kelkar

    तुम्ही दुधाच्या ,रेशनच्या , साखरेच्या , तिकिटांच्या ,बसच्या रांगेत तासन तास उभे राहता . चालती गाडी पकडता . लोकलला लोंबकळता . लेट मार्क चुकवण्यासाठी जीव गहाण टाकता . साहेबाची बोलणी खाता . कॅन्टीन चा बेचव चहा पिता. संसारात तर नाना आपत्ती हन करता आज हे नाही , उद्या ते नाही . मोर्चा , हरताळ , संचारबंदी , उपोषण सगळं हलाहल पचवता तरीही ..... तुम्ही हसता , हसवता . गाडीत उभ्या उभ्या पत्ते खेळता . राजकारणावर हिरीरीने बोलता . एखाद्याला मोरू बनवून आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करता. बेचव चहाच्या पैजेवरही खुश होता . यु आर सिम्पली ग्रेट ! असे तुम्ही जातिवंत "कर्मचारी " हा कथासंग्रह म्हणायचा नाही , पण ते काही खरं नाही . हा आहे आरसा ! सर्वाना प्रेम करायला लावणारा आरसा . उद्या रिटायर्ड होणार हेड क्लार्क पण लिफ्ट मजल्यावर जाता जाता तिथल्या आरशात डोकावतो . तसाच हा आरसा ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more