* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353174057
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HOW SO EVER ONE TRIES TO FATHOM THE FACTS OF LIFE WHICH ARE NORMALLY UNSEEN AND YET ACTIVE BEHIND ARE UNREACHABLE.WE ENDEAVOUR TO UNDERSTAND THEM AND TRY TO ANALYSE THEM STILL THEY REMAIN A MYSTERY.WE TEND TO LABEL THEM AS SUPERNATURAL.MAY THESE BE EVENTS, PERSONS OR ATTITUDES WE DO COME ACROSS THEM IN OUR ROUTINE. THIS BOOK IS A COLLECTION OF STORIES FROM DIFFERENT WALKS OF LIFE OF VARIED CHARACTERS AND EVENTS VIVIDLY PORTRAYED BY DR CHHAYA MAHAJAN THE READER WILL REALISE THIS UNSEEN AND UNHEARD IN THE MINGLED YEARN
बऱ्या-वाईट अनुभवांचं आणि व्यक्तींचं व्यामिश्र चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘अज्ञात.’ माणसाची नियतीशरणता अधोरेखित करते ‘अज्ञात’ ही कथा... तर एका वृद्धाच्या मनातील भावकल्लोळ व्यक्त होतो ‘पत्र आलंय’ या कथेतून... शेतमजुराची व्यथा सांगते ‘मोकळं आकाश’ही कथा... तर एका कुष्ठरोग्याचं आक्रंदन टिपते ‘वास्तव’ ही कथा...एका वृद्ध आईच्या चिंतनरूपी भावना प्रकटतात ‘सावलीचा दाह’मधून. सूक्ष्म भावनांचं अस्वस्थ करणारं कथाविश्व.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #अज्ञात #छायामहाजन #व्हेटो #गुंजाइश #खिरपेंड #चारीभुरी #सावलीचा #दाह #मॉब #कैदाशीण #सुरास्त #वेदना #चिरेबंदी #पायरवदेवडी #पेव #धडपा #लाघवट #फोपशा #खवट #पायला #बेरकी #इरसाल #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #ADNYAT #CHHAYAMAHAJAN #VETO #GUNJAESH #KHIRPEND #CHARIBHURI #SAVLICHA #DAH #MOB #KAIDASHIN #SURASTA #VEDANA #CHIREBANDI #PAYARVDEVDI #PEV#DHADAPA #LAGHVAT #PHOPASHA #KHAVAT #PAYAL #BERAKI #ERASAL
Customer Reviews
  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स

    अज्ञात..... एक विस्तृत परीघ ..... डॉ. छाया महाजन ह्यांचा नवा कथासंग्रह वाचनात आला. वाचक कितीही सर्वश्रुत असला, सर्वज्ञानी मानला, तरीही मानवी मनाचे अनेक कंगोरे/विषय त्याला अज्ञातच राहतात. `असं का व्हावं ह्या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नसतं अशया अनेक जाणिवांना, विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा, ह्या कथा संग्रहात आहेत. काही कथांचे विषय जरी पूर्वी इतर लेखकांच्या कथांमधून वाचनात आलेले असले तरी लेखिकेचा असा स्वतःचा दृष्टीकोन, त्या कथांना `स्पेशल` करून टाकतो. `सावलीचा दाह` कथेतील वृद्ध आईच्या वाट्याला सून-मुलांकडून येणारी त्रयस्थ-तिरस्कृत वागणूक अनेकदा कथांमध्ये येऊन गेली असली तरी छायाताईंनी, मुलानं विचारलेल्या `परतफेडीला एनी लिमिट?` ह्या प्रश्नावर काढलेला तोडगा , वेगळा व स्पेशल आहे. `प्रत्येकाचा भोग व प्रारब्ध वेगळं, जे ज्याचं त्यालाच भोगू द्यावं` - हे गुरूंनी सांगितलेलं वाचन तिला संसाराच्या मायेतून अचानकपणे मोकळं करतं, मुक्त करतं ती कुठेहि जायला राहायला तयार होते. `निचरा` मधील देवदासींच्या मुलगी मोठी कलावंत होते, पण आपल्या भूतकाळापासून तिला फारकत घेता येत नाही. `भूतकाळाची लाज वाटू द्यायची नाही` गोष्टी सोप्या होतात,` हा उपाय कथेतील रामबाण ठरवत. उत्कृष्ट उतरलीये ती `वेदना चिरेबंदी` घरातल्या विधवा सुनेचा उपभोग , घरातल्याच जेष्टांनी घेणं, ह्या एके काळच्या परिस्थितीवर खूप लिखाणं झालं. पण छायाताईंनी त्या कथेत रंगवलेलं दुर्दैवं व वेदना, सबंध कथाभर वाचकांच्या मनाच्या चिंध्या करत राहत. `अज्ञात` कथेतला भविष्य सांगणारा पोपट `पत्र आलंय` मधला परदेशातल्या मुलाचं `येऊ नका म्हणणारं पत्र लपवणार बाप `सूरास्त` मधील शेजाऱ्याच्या लहानग्या नोकराचे नातवांप्रमाणे लाड करणारा वृद्ध `अस्मिता` मधील कामाच्या बदल्यात उपभोग घेऊ इच्छिणाऱ्या पीचडी च्या गाईडचं गलिच्छ वास्तव , ( त्या विरुद्ध तडफेने उभी राहिलेली विद्याथीनी ) , `प्रतीक्षा` मधील नोकरी करणारी त्यामुळे मुलाच्या अपेक्षेनुसार पारंपरिक कर्तव्य पार न पाडणारी ` आई `मोकळं आकाश` मध्ये सरकारं गुंड घालून मारपीट करून जमीन काढून घेतलेला हतभागी शिवाप्पा व सगळ्यात शेवटी वास्तव घटनेवर बेतलेली कुष्ठरोग्यांवरची कथा `वास्तव` लेखिकेचे सूक्ष्म निरीक्षण शक्तीतर जाणवतेच पण स्वतःला पटतील असे निष्कर्षही त्या काढतात. ते सर्व वाचकांना पटतील , भावतील अशीही काळजी घेतात. प्रवाही भाषेत लिहिलेला , स्वतःबरोबर घेऊन जाणारा हा मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित संग्र्ह वाचून लॉकडाऊनच्या काळात आलेली मरगळ एका झटक्यात दूर झाली. म्हणून वाचकांकरता हे छोटस परीक्षण डॉ. छाया महाजन ह्यांची विद्वत्ता नाव ख्याती लेखन, सर्वच समृद्ध आहे प्राचार्य म्हणून जरी त्या रिटायर झालेल्या असल्या तरी सर्वदूर ऑनलाईन कार्यक्रम करण्यातील त्यांची तडफ जाणवण्यासारखी आहे. दरवर्षी अनेक दिवाळी अंकातून त्या वाचकांच्या भेटीला यायच्याच . आता ह्या वर्षी दिवाळी अंक कोणत्या स्वरूपात निघताहेत व त्यातून त्या आपल्या भेटीला काय आणताहेत हे बघायचं. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 03-01-2021

    अज्ञाताच्या शोधाचे कथारूप... डॉ. छाया महाजन या मराठीतील महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांनी कथा, कादंबरी आणि ललितगद्य लेखनातून आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित केलेली आहे. निरनिराळ्या अनुभवांना सामावून घेणारे त्यांचे लेखण वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आहे. मानवीजीवनाचा विविध कोनातून शोध घेत, त्यांनी जगण्याच्या अनेक मिती साहित्यातून साक्षात केलेल्या आहेत. जीवनातील व्यमिश्रता आणि अलक्षित पेचांना त्यांनी मुखरित केला आहे. रूढ अर्थाने त्या स्त्रीवादी लेखिका नाहीत, परंतु भारतीय अवकाशात स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या दु:ख भोगाची अनेकविध रूपे त्यांच्या लेखनातून उजागर होतात. शमाजातील बहुस्तरीय जीवनजाणीवांना कवेत घेण्याचा प्रयत्न डॉ. महाजन यांच्या कथेने केलेला आहे. त्यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला ‘अज्ञात’ हा कथासंग्रहही याला अपवाद नाही. मानवी जीवन आणि त्यामधील आशयविश्व हे विस्तीर्ण आहे. त्याला अनेकविध संदर्भ आहेत. ते सर्वच संदर्भ साहित्यातून प्रकट करणे अशक्य आहे, तरीही केंद्रवर्ती आशयापेक्षा अलक्षित जाणीवविश्वाला प्रकट करणे, ही बाब नेहमीच साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. अशा ‘अज्ञात’ असणाऱ्या विषयांना कथारूप देण्याचा सातत्याने प्रयत्न डॉ. महाजन यांनी केलेला दिसतो. परिघाबाहेरच्या आशयाला कथेच्या कक्षेत सामावून घेणे, ही त्यांची लेखनप्रकृती आहे. हेच भान प्रस्तुत कथासंग्रहातूनही दिसते. अज्ञात, पत्र आलंय, मोकळं आकाश, वास्तव, सावलीचा दाह, निचरा, प्रतीक्षा, विस्कळित, सुरास्त, वेदना चिरेबंदी, अस्मिता अशा अकरा कथांचा समावेश या संग्रहात आहे. बेकारी, दारिद्र्य, नियती, सांस्कृतिक ताण, कौटुंबिक तणाव, नात्यातील तकलादूपणा, गुंडगिरी, भ्रष्टाचार, शेतकऱ्याची असहायता, भांडवली विकासाच्या नवप्रारूपाने सर्वसामान्य माणसांना आलेले क्षुद्रत्व, कुष्ठरोगी व्यक्तीच्या आयुष्याची शोकांतिका, वयोवृद्ध जगण्याची फरफट, देवदासींच्या वास्तव, नाचणाऱ्या स्त्रीबद्दलच्या समाजधारणा, लहान मुलांचे केले जाणारे शोषण, समाजाच्या दृष्टीने अनैतिक असणारे नातेसंबंध, अशा अनेकविध विषयांना मध्यवर्ती ठेवून या कथा आकाराला आल्या आहेत. या कथासंग्रहातील कथांमध्ये विषय-आशयाचे वैविध्य दिसते. वेगवेगळ्या समाजस्तरांच्या जाणीवा आणि वृत्ती-प्रवृत्तींना या कथांनी कवेत घेतले आहे. ही कथा बहुविध जीवनजाणिवा आणि त्यातील ताण्याबाण्यांना मुखरित करताना दिसते. या सर्वच कथा अंतर्मुख करायला लावणाऱ्या आणि मानवी वर्तन व त्या वर्तनामागील कार्यकारणभाव स्पष्ट करणाऱ्या आहेत. नागेश, अण्णा, बिरजूशेठ, शिवाप्पा, महादेव, सविता, हेमा, राजेश, रमणी यांसारखी अनेक सुष्ट-दुष्ट पात्रे आपल्या भवताली दिसणारी आहेत. त्यांचे नेमके रेखाटन डॉ. महाजन यांनी केले आहे. ही सर्व पात्रे आशयाला तोलून धरत, वास्तवाची प्रचिती देणारी आहेत. कथांच्या भाषेत प्रमाणभाषेतील वळणदारपण आहे; त्यामुळे वाचनीय सुलभताही आलेली आहे. चिंतनशीलता आणि वैचारिकता हा महत्त्वाचा गुणधर्म या कथांच्या भाषेचा आहे. मांडणीत रहस्यमयता असल्याने, ही कथा वाचकांना पकडून ठेवते. सर्वच कथांची सुरुवात उत्सुकता निर्माण करणारी आणि शेवट संदेशसूचक आहेत. निवेदन-मांडणी आणि रचनेच्या प्रयोगामुळेही हा संग्रह महत्त्वाचा ठरतो. आशय अभिव्यक्तीचे एकजीवीकरण आणि अज्ञाताच्या शोधाचे कथारूप म्हणून या कथासंग्रहाचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे. -केदार काळवणे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more