Poornima Deshpande उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन संवादु अनुवादु वाचन करत आहे. पुस्तक अतिशय सुंदर, मिश्कील विनोदी वाचकांना अंतर्मुख करते.
Siddhi Joshi प्रत्येक लेखकांची एक वेगळीच शैली असते. आणि त्याच शैलीमुळे त्या पुस्तकाचं ही वेगळच अस्तित्व तयार होऊन वाचकांसाठी ते पुस्तकं स्वतःहूनच त्याची गोष्ट डोळ्यांसमोर उभी करतो आणि आपण बसल्याजागी त्या पुस्तकात असलेल्या ठिकाणी जाऊन त्या माणसांना प्रत्यक्ष पाहूनयेतो.असच आज झालं माझ्याबाबतीत.
मी सकाळी एक पुस्तकं वाचायला घेतलं आणि बंगलोर ते लंडन ते अमृतसर असा प्रवास केला.सुधा मुर्ती ह्यांचे लेखन आणि प्रा. ए.आर.यार्दी ह्यांनी केलेला अनुवाद ह्या पुस्तकला एक अशी ताकद देऊन जातो आणि ती ताकद म्हणजे सहज सोप्प्या शब्दात केलेले वर्णन जे वाचकाचा आणि पात्रांचा थेट संवाद साधण्यात मदत करतो. एक मुकेश नावाचं पात्र ज्या पद्धतीने स्वतच्या अस्तित्त्वा बद्दल असलेला गुंता एक एक पाऊल टाकून सोडवतो. हे आपल्याला नकळत आपल्या आयुष्यात संयम हा किती महत्वाचा आहे हे शिकवून जातो. ह्या पुस्तकातला प्रत्येक शब्द एक वेगळाच उत्साह देऊन जातो आणि आपण हे पुस्तक शेवटपर्यंत वाचून मगच खाली ठेवतो. ह्या पुस्तकाने मला मी कशी असायला पहिजे हे शिकवलं.
- सिद्धी🙂 ...Read more