* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAZI VATACHAL : METCALFE HOUSE TE RAJBHAVAN
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745040
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 460
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MAZI VATCHAL: METCALFE HOUSE TE RAJBHAVAN: (1952-1989):THE EX-ADMINISTRATIVE OFFICER AND THE EX-GOVERNOR OF ARUNACHAL PRADESH, MR. RAM PRADHAN, PORTRAYS HIS CAREER FOR THE READERS. THIS IS AN ACCOUNT OF HIS JOURNEY THROUGHOUT. BORN IN DADAR, MUMBAI, ON 27TH JUNE 1928, MR. PRADHAN HAD A COMFORTABLE CHILDHOOD IN MUMBAI. HIS FATHER WAS A CLERK IN MILITARY ACCOUNTS DEPARTMENT. HIS MOTHER WAS FROM NAGOTHANE. LATER, HIS FATHER WAS PROMOTED AS A SUPERINTENDENT AND WAS TRANSFERRED TO DELHI. THEREAFTER, THE FATHER WAS TRANSFERRED TO PUNE AS AN ASSISTANT ACCOUNT GENERAL. RAM’S SCHOOLING WAS COMPLETED IN NEW ENGLISH SCHOOL. HE SOUGHT DEGREE IN ARTS WITH MATHS AS HIS SPECIALIZATION FROM THE FERGUSSON COLLEGE. WITH NEW DREAMS AND AIMS, HE JOINED MUMBAI UNIVERSITY. HE ENROLLED FOR M.A., STATISTICS. MEANWHILE, HIS MOTHER BECAME SERIOUS AND PASSED AWAY. HE HAD TO LIVE HIS EDUCATION HALF WAY. HE JOINED GOKHALE INSTITUTION FOR POLITICAL SCIENCE AND ECONOMICS. HE PARTICIPATED IN THE NATIONAL SAMPLE SURVEY CONDUCTED BY THE SAME. MEANWHILE, HE DECIDED TO APPEAR FOR THE COMPETITIVE EXAMS. AS HE SUCCESSFULLY COMPLETED THE I. C. S. HE WAS ADMITTED TO THE METCALFE HOUSE. THERE WAS NO TURNING BACK NOW. THIS BOOK REVEALS HIS JOURNEY. AS A PART OF TRAINING, MANY EMINENT PERSONALITIES WOULD OFTEN VISIT THE I. C. S. TRAINEE OFFICERS. THE LECTURES DELIVERED BY THEM WERE TREASURE HOUSES OF WISDOM. VISITING NEARBY VILLAGES AND PLACES HELPED THE TRAINEES TO LEARN MORE ABOUT THE DAY-TO-DAY LIFE OF CIVILIANS AND THE CHALLENGES AND PROBLEMS ACCOMPANIED. APART FROM THIS, THERE WERE MANY THINGS LEARNT AND UNDERSTOOD DURING THIS PERIOD. MR. PRADHAN ELABORATES THEM FOR THE READERS. A STAY WITH THE MILITARY UNITS WAS QUITE MEMORABLE FOR HIM. IT WAS ALSO A PART OF THE TRAINING. HIS LIFE WAS ONCE AT STAKE DURING THIS TRAINING. HE ROAMED THROUGHOUT THE COUNTRY DURING THIS TRAINING. AT THE END OF IT, HE PARTICIPATED IN THE FLAG HOISTING CEREMONY ON 15TH AUGUST AND THE PARADE ON 26TH JANUARY. THIS PRESENTED HIM WITH THE OPPORTUNITY OF BEING IN THE COMPANY OF MILITARY OFFICERS FROM NAVY, ARMY AND AIR FORCE AS WELL. HE ALSO TOOK THE DECISION OF TYING THE KNOT WITH THE GADKARI’S DAUGHTER. THIS MEMOIR INCLUDES SOME LETTERS WRITTEN BY HIM TO HIS FATHER AND BROTHERS. HIS FIRST POSTING WAS IN MUMBAI WHERE HE JOINED THE STATE GOVERNMENT. HE MET MANY EMINENT PERSONALITIES, LEADERS AND HIGH-RANKING OFFICERS. LATER, HE TOOK CHARGE AT AHMEDABAD AS THE COLLECTOR. THE VARIOUS EXPERIENCE GIVE US A GLIMPSE OF HIS TENURE THERE. AT EVERY PLACE THAT HE WAS TRANSFERRED TO, HE WAS ABLE TO ESTABLISH GOOD RELATIONS AND GAIN RESPECT. HE WAS ABLE TO TRAVEL TO THE INTERIOR PARTS WHERE HIS WIFE ALWAYS ACCOMPANIED HIM. LIFE WAS ENRICHED WITH MORE EXPERIENCES.
‘माझी वाटचाल : मेटकॉफ हाउस ते राजभवन (१९५२ – १९८९)’ हे माजी सनदी अधिकारी आणि अरुणाचलचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचं आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रातून त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक वाटचालीचा आढावा घेतला आहे. प्रधान यांचा जन्म २७ जून १९२८ रोजी मुंबईत दादर येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय मिलिटरी अकाउन्ट्समध्ये क्लार्वÂ होते. त्यांचे आजोळ नागोठाणे येथे होते. राम प्रधान यांचं मुंबईतील बालपण, त्यानंतर त्यांच्या वडिलांना सुपरिंटेन्डंट पदावर बढती मिळून त्यांची दिल्लीला झालेली बदली, त्यानंतर दिल्लीतील वास्तव्याचे अनुभव, असिस्टंट अकाउन्ट जनरल म्हणून त्यांच्या वडिलांची दिल्लीहून पुण्याला झालेली बदली, पुण्यात न्यू इंग्लिश स्वूÂल, नानावाडा येथे त्यांचं झालेलं शालेय शिक्षण, त्यानंतर फग्युर्सन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण, गणित घेऊन बी. ए. केल्यानंतर मुंबईला एम. ए. (संख्याशास्त्र )साठी घेतलेला प्रवेश; पण आईच्या आजारपणामुळे एम.ए. अध्र्यावरच सोडावं लगणं, त्यानंतर आईचा झालेला मृत्यू, त्यानंतर गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत नॅशनल सॅम्पल सव्र्हेच्या प्रकल्पात काम करण्यासाठी रुजू होणे, त्याचदरम्यान स्पर्धा परीक्षेला बसण्याचा घेतलेला निर्णय आणि आय.सी.एस. झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी दिल्लीच्या मेटकॉफ हाऊसमध्ये मिळालेला प्रवेश या टप्प्यापर्यंतची वाटचाल सुरुवातीला प्रधानांनी सांगितली आहे. यानंतर आय.सी.एस. प्रशिक्षणादरम्यानचे अनुभव त्यांनी कथन केले आहेत. त्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना व्याख्यान द्यायला आलेले नामवंत उच्चपदस्थ, त्यापैकी लक्षात राहिलेल्या व्यक्ती आणि त्यांची व्याख्यानं, प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून दिल्लीच्या आसपासच्या विविध गावांना दिलेल्या भेटीतून प्रशासकीय अधिकाNयांसमोर कोणती आव्हानं असतात, याचा आलेला प्रत्यय आणि प्रशिक्षणातील इतर बाबींबाबतही त्यांनी तपशीलवारपणे लिहिलं आहे. प्रशिक्षणाचाच भाग म्हणून भारतीय सैन्याबरोबर घालवलेल्या काही दिवसांबाबतही त्यांनी तपशीलाने लिहिलं आहे. त्यादरम्यान त्यांच्यावर ओढवलेल्या जीवघेण्या संकटांबद्दल त्यांनी सांगितलं आहे. प्रशिक्षणासाठी केलेल्या देशाटनाचे विविध अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात १५ ऑगस्टचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम आणि २६ जानेवारीची परेड यासाठी तिन्ही सैन्यदलांच्या अकिाNयांबरोबर केलेलं काम, संसद भवनात घालवलेले काही दिवस, प्रशिक्षण सुरू असतानाच गडकNयांच्या मुलीशी विवाह करण्याचा घेतलेला निर्णय इ. घटनांबाबत त्यांनी लिहिले आहे आणि त्यांच्या वडिलांना आणि भावंडांना त्यांनी लिहिलेल्या पत्रांचाही त्यांनी समावेश केला आहे. प्रशिक्षण संपल्यानंतर ते मुंबईला राज्य सरकारच्या सेवेत रुजू झाले. त्या सेवेत आलेले अनुभव आणि ती सेवा बजावत असताना भेटलेल्या महत्त्वाच्या आणि इतर व्यक्ती यांच्याबाबत त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर अहमदाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. तसेच तेथील वास्तव्यात भेटलेल्या व्यक्तींविषयी, त्यातील काहींशी जुळलेल्या ऋणानुबंधांविषयीही त्यांनी लिहिले आहे. छोट्या गावांमध्ये कामासाठी केलेली भटवंÂती, भटवंÂती करत असताना पत्नीबरोबरचे सहजीवन आणि त्या भटवंÂतीतील वेगवेगळे अनुभव याबद्दल त्यांनी निवेदन केलं आहे.
*श्रीमंत गंगाबाई वाचन मंदिर आजरातर्फे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कार 2017.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MAZIVATACHAL:METCALFEHOUSETERAJBHAVAN #MAZIVATACHAL:METCALFEHOUSETERAJBHAVAN #माझी वाटचाल : मेटकॉफहाऊसतेराजभवन #AUTOBIOGRAPHYMARATHI #RAMPRADHAN #रामप्रधान "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 22-11-2019

    सनदी सेवेचा विस्तृत आलेख... मजी सनदी अधिकारी तसेच अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचे आत्मचरित्र वाचताना वाचक एका सरळ रेषेत पुढे जातो. त्यांचे अनुभव त्रयस्थपणे वाचताना 37 वर्षांच्या कालखंडातील घटनाघडामोडींचा आलेखच मांडला जातो. जन्म,शिक्ण, भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण, नोकरीची सुरुवात ते सेवानिवृत्तीपर्यंतचा प्रवास त्यांनी या पुस्तकात कथन केला आहे. सांगोपांग कथन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. प्रधान यांची `माझी वाटचाल : मेटकॉफ हाऊस ते राजभवन` हे पुस्तक नऊ भागात लिहिले आहे. त्यांच्या शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालय शिक्षणापर्यंतचा मनोरंजक आलेख त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. म्हणजे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे, त्याची सुरवातीला माहिती नव्हती प्रधान घराण्यात त्यांच्या अर्धे कॉलेजात कोणीही गेलं नव्हतं. त्यामुळे कोणत्या कॉलेजात गेलं की आपल्याला चांगलं शिक्षण मिळेल हे माहित नव्हते. पण त्यांच्याच लक्ष्मीबाई प्रधान यांचे चिरंजीव म्हणजेच राम प्रधान यांच्या काकांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात इंटर सायन्सपर्यंत शिक्षण घेतलेले होते. त्यामुळे त्यांचा आग्रह होता की राम यांनीही फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घ्यावा. परंतु लेखकाने त्याआधीच स.प. महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेऊन पैसे देखील भरले होते. राम यांच्या काकांना हा प्रकार आवडला नाही. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेण्याचा आग्रह धरला. तरीही लेखकाने फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेईन पण कला शाखेतच घेईन असा उलट आग्रह धरला तो मिळविलाही. त्यामुळे प्रवेशावरून दोघांचेही समाधान झाले. या पुस्तकात राम प्रधान यांनी एक सिद्धांत सांगितलेला आहे आणि तो सिद्धांत त्यांनी स्वतःच्या जीवनात कृतीतही उतरवला आहे. दर गुरुवारी विधी महाविद्यालयात न्याय, प्रशासन आणि शिक्षण क्षेत्रातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींना भेटण्याची संधी असते. लेखक तरुण आणि त्यांचे मित्रही त्यांच्याच वयाचे. त्यात आणखी काहीजण होते. म्हणजे ही तरुण मंडळी सर रघुनाथराव परांजपे (ऑस्ट्रेलियातील तत्कालीन भारतीय उचयुक्त), एस. बी. ढवळे (निवृत्त प्रशाकीय अधिकारी), प्रा. आर. पी. पटवर्धन अशा त्या क्षेत्रातील मातब्बरांशी चर्चा करीत असत. चार ते सहा निवडक विद्यार्थ्यांना चहापानासोबत शिष्टाचार तसेच इंग्रजीत संभाषण कसे करावे, याची माहिती देत असत. यात श्रीकृष्ण मोहन परांजपे आणि दत्तात्रेय सोमण यांचाही समावेश होता. त्यामुळे तरुणांचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला. परंतु त्यांच्यातील काही परीक्षार्थी या बैठकीतून कमी होत गेले. या `म्हाताऱ्या` व्यक्तींबरोबर वेळ घालवणे निरर्थक आहे आणि त्यातून शिकण्यालायक काही नाही असे त्यांना वाटले. परंतु लेखक म्हणतात माझी भावना निराळी होती. या नामवंत व्यक्तींबरोबर वेळ घालवणे ही एक अपूर्व संधी निर्माण झाली होती. मी नियमितपणे या बैठकींना जात असे. त्याव्यतिरिक्त सर रघुनाथ परांजपे आणि न्या. ढवळे यांनाही मी एकट्याने घरी जाऊन भेटू लागलो आणि त्यांच्या संगतीत तासनतास घालवू लागलो. प्रत्येक गोष्ट ही कधीही कमी वा मोठी नसते ती मनापासून शिकली तर तिचा व्यक्तिमत्व विकासाला हातभार लागतो. हे लेखक या प्रसंगातून सांगण्याचा प्रयत्न करतात. लेखकाची निवड भारतीय प्रशासकीय सेवेसाठी झाली. त्यांच्या मुलाखतीसाठी ३ जानेवारी १९५३ ही तारीख निश्चित झाली होती. निवृत्त आयसीएस अधिकारी आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले केंद्रीय गृहसचिव आर. एन. बॅनर्जी हे त्यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. लेखक सांगतात `त्यांना सामोरे जाण्याची भीतीच वाटत होती. मुलाखतीला आलेल्या उमेदवारांच्या अंगावर ओरडून त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करत त्यांना `फाडून खाण्या`बद्दल बॅनर्जी यांची ख्याती होती. त्यादिवशी दुपारी पाच बळीचे बकरे वाट पाहत बसले होते. पहिले दोन उमेदवार दहाच मिनिटात पडलेल्या चेहऱ्याने बाहेर आले. खोलीत प्रवेश करताच मला अध्यक्षांचा सर्वश्रुत कोपीष्टपणाचा अनुभव आला. ते ज्या ठिकाणी बसले होते त्याच्या बरोबर मागे एक काचेची बंद खिडकी होती. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशामुळे मला त्यांचा चेहराच दिसत नव्हता. मला एका दीर्घवर्तुळाकार मेजाच्या एका टोकाला असलेल्या खुर्चीवर बसायला सांगणाऱ्या मोठ्या आणि जोरदार आवाजातला आदेशच फक्त ऐकू आला. दुसऱ्या टोकाला बसलेले बॅनर्जी माझ्याकडे रागाने पाहात माझे खच्चीकरण करू पाहात होते. त्यांच्याबरोबर इतर आठ जण होते. चार जण त्यांच्या डाव्या बाजूस तर इतर कार जण त्यांच्या उजव्या बाजूस बसले होते. अचूक उत्तर माहित नसेल तर `मला माहित नाही ` असे सांगणेच योग्य ठरेल असे मला पुण्यात बजावण्यात आले होते. अध्यक्ष्यांच्या पहिल्या चार - पाच प्रश्नांना मी हेच उत्तर दिले. अध्यक्ष रुद्रावतार धारण करत मग, तुम्हाला काय माहित आहे ते सांगा ! असे म्हणत माझ्या अंगावर ओरडले. मात्र बॅनर्जी यांचा राग नंतर निवला आणि त्यांनी त्यांच्या सहकार्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. लेखकाची केंद्रीय लोकसेवा आयोगाची निवड झाली. लेखकाने या सेवेसाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा उल्लेख या पुस्तकात केलेला आहे. त्यात बुद्धिकौशल्य,नेतृत्वगुण, प्रसंगावधान, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, सचोटी, वक्तशीरपणा, कार्यक्षमता, कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची आणि कष्ट करण्याची तयारी, सहनशीलता, बिकट परिस्थितीतही कणखर राहण्याची वृत्ती या गुणांचा समुच्चय ज्याच्यात झाला आहे तो या सेवेसाठी लायक आहे, असे लेखक सूचित करतात. यातील एक उदाहरण देताना ते लिहितात, अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि गोखले अर्थशास्त्र संस्थेत नोकरी करण्याऱ्या मधुकर नामजोशीने माझ्यासोबत परीक्षा दिली होती. आय ए एस परीक्षेच्या इतिहासातील त्याचे उदाहरण असामान्य असावे. लेखी परीक्षेत त्याला सर्वात कमी गुण मिळाले होते आणि मुलाखतीत त्याला सर्वाधिक गुण मिळाले होते. मुलाखतीत त्याला ४०० पैकी ४०० गुण मिळाले होते. त्यामुळे त्याचे नाव यशस्वी झालेल्या पहिल्या दहा उमेदवारांच्या यादीत झळकले. भारतीय विदेश सेवेतील प्रवेशासाठी या स्थानाचा विचार केला जाणार होता. त्यासाठी आधी परराष्ट्र व्यवहार खात्याचे महासचिव सर गिरिजाशंकर बाजपाई आणि त्यानंतर परराष्ट्र खाते संभाळण्याऱ्या खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्याची मुलाखत घेतली होती. नामजोशी त्यांना पसंत पडले आणि त्यांची विदेश सेवेत निवड झाली. राम प्रधान यांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभव वाचताना ते आव्हानात्मक आहेत, हे जाणवत राहतं. हे काम करताना `वर्कहोलिक` असणं म्हणजे काय, मानेवर पट्टी ठेऊन कसं काम केलं असेल ते जाणवत राहतं. प्रधान यांच्या कारकिर्दीतले अनेक प्रसंग आपल्याला विचारप्रवृत्त करतात. प्रधान यांची सहजशैली वाचकावर गरुड करतेच; पण भारतीय राजकारण, शिक्षण, समाजकारण, परराष्ट्र आणि अर्थ यासह विविध क्षेत्रातील माहिती मिळते. -(गोविंद डेगवेकर) ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 21-01-2018

    युगांतराच्या कालखंडाचा दस्तावेज... प्रशासन सेवेतील सर्वोच्च स्तरावर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले अधिकारी बहुधा प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात नसतात. किंबहुना, त्यांनी आपली कामे पडद्याआड राहूनच करावी असे लोकशाही प्रशासनाचे सर्वमान्य संकेत आहेत. कित्येकदा ऐतहासिक स्वरूपाची कामगिरी हे अधिकारी बजावतात. अशा काही मोजक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये राम प्रधान यांचा समावेश होतो. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, राजीव गांधी यांच्यासारख्या नेत्यांचा गाढा विश्वास त्यांनी संपादन केला होता, तो त्यांच्या अंगभूत गुणांच्या बळावर! त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, अभ्यासू कार्यशैली आणि चातुर्य या बाबी निर्विवाद होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्या नि:पक्षपाती ध्येयनिष्ठेविषयीही कधीच शंका उपस्थित झाल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या ‘वादळमाथा ते १९६५ भारत-पाक युद्ध’ या पुस्तकात त्यांच्या आत्मचरित्राचा काही अंश ओघाने येऊन गेला आहे. तथापि ते पुस्तक प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण यांच्या संरक्षणमंत्रिपदावरील कामगिरीविषयी आहे. ज्याला खऱ्या अर्थाने आत्मकथन म्हणता येईल असे त्यांचे नवे पुस्तक म्हणजे ‘माझी वाटचाल - मेटकॉफ हाऊस ते राजभवन (१९५२-१९८९)’! राम प्रधान यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे १९५२ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. तेव्हापासून सेवानिवृत्तीपश्चात १९८९ मध्ये त्यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाली, तोपर्यंतचा विस्तृत अनुभवपट त्यांनी या आत्मचरित्रात उलगडला आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचे गृहसचिव आणि मुख्य सचिव, तसेच केंद्र शासनाचे गृहसचिव या पदांवरील त्यांची नेत्रदीपक कामगिरी मराठीजनांना परिचित आहे. १९६२ मधील चीन युद्धानंतर यशवंतराव चव्हाण यांची देशाच्या संरक्षणमंत्रिपदी निवड झाली. तेव्हा आपल्यासमवेत काम करण्यासाठी ते प्रधानांना दिल्लीला घेऊन गेले. प्रधानांच्या संरक्षण मंत्रालयातील कार्यकाळविषयीही थोडीफार माहिती महाराष्ट्राला आहे. तथापि अन्य काही महत्त्वाच्या पदांवरही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ज्यात सुमारे दहा वर्षे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाणिज्यविषयक काम केले, त्याचा समावेश होतो. ‘माझी वाटचाल’ या पुस्तकात त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवांचे विवेचन आले आहे. युनो किंवा युएनसीटीडी यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे कामकाज कसे चालते, आणि तेथे जाऊन एखाद्या देशाच्या प्रतिनिधीला कोणकोणत्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात याची माहिती या पुस्तकात मिळते. तीच बाब नौकानयन विभागांसंबधी. सामान्यत: भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याला अशा भूमिका निभावण्याचे पूर्वप्रशिक्षण नसते. अगदी नवे, महत्त्वाचे आणि काहीशा तांत्रिक स्वरूपाचे विषय समर्थपणे हाताळून तेथेही आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवताना लेखकाने किती परिश्रमपूर्वक अभ्यास केला असेल याची कल्पना हे पुस्तक वाचल्यावर वाचक करू शकतो. राज्यात आणि केंद्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना भिवंडीची दंगल असो, दत्ता सामंतप्रणीत गिरणी कामगार संप असो किंवा पंजाब, आसाम आणि मिझोरामविषयक ऐतिहासिक करार असोत; अशा अनेकविध प्रसंगांत उद्भवलेली आव्हाने आणि आलेले अनुभव आदी कित्येक घडामोडींचा तपशील प्रधान यांनी तटस्थपणे मांडला आहे. या सर्व प्रसंगांतील त्यांची कामगिरी नेत्रदीपक होती. तरीही विवेचनात आत्मप्रौढीचा वास कोठेही येणार नाही याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या पुस्तकाची वाचनीयकता आणि विश्वासार्हता कित्येक पटीने वाढली आहे. प्रधान यांचा प्रशासन सेवेतील सुरुवातीचा प्रशिक्षण कालावधी आणि (आताच्या) गुजरात प्रांतातला कार्यकाळ ही प्रकरणे वाचताना वाचक नकळतपणे इतिहासात काही दशके मागे जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रशासनाची कार्यपद्धती बव्हंशी ब्रिटिश पठडीतलीच होती. परंतु नव्या जमान्यातील वास्तवाला समोरे जाताना अधिकाऱ्यांना किती जाणीवपूर्वक पावले उचलावी लागत होती. याचे मनोज्ञ चित्र लेखकाने सहजगत्या रेखाटले आहे. प्रशासन सेवेच्या दृष्टीने पाहता हे एक युगांतर होते. अशा कसोटीच्या काळात नवे मापदंड निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासन सेवेत नव्याने प्रवेश केलेल्या अधिकाऱ्यांवर येऊन पडली होती. त्यांची प्रगल्भता, विकासविषयक मानसिकता स्वीकारण्याची तयारी आणि तारतम्य या सर्वांची ती परीक्षा होती. या संक्रमणावस्थेत लेखकाने आपली जडणघडण कशी केली, हे वाचताना आपण थक्क होऊन जातो. आजच्या पिढीतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे सर्व उद्बोधक वाटावे. आपल्या भूमिका बदलत्या काळानुसार कशा सतत तपासून पाहाव्या लागतात आणि नवी कौशल्ये कशी आत्मसात करावी लागतात, याचा एक वस्तुपाठ नव्या प्रशासकांसमोर या आत्मकथनातून मांडला गेला आहे. कोल्हापूरच्या बाजार समितीची स्थापना किंवा राजा दिनकर केळकर संग्रहालयाची पुनर्रचना असो, लेखकाच्या उपक्रमशीलतेची अशी कित्येक उदाहरणे जागोजागी आपल्यासमोर येतात. आपल्या कार्यसूचित समाविष्ट नसलेली जनहिताची अनेक कामे सहजगत्या करणे कुशल प्रशासकाला शक्य असते. मात्र त्यासाठी पुढाकार घेणे आणि सर्वसंबंधितांची मने विधायक कार्यासाठी वळवून घेणे महत्त्वाचे असते याची प्रचीती लेखक आणून देतो. प्रशासन हा विषय तसे पाहू गेल्यास काहीस क्लिष्ट असला तरी तो सोपा आणि रंजक करून मांडण्याची हातोटी लेखकाकडे आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आहे. त्यामुळेच हे आत्मकथन अत्यंत वाचनीय झाले आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनातील ताणतणाव किंवा चढउतारांविषयी लेखकाने हात काहीस आखडता घेतला आहे, असे मात्र जाणवते. विशेषत: कटु अनुभवांविषयी विस्ताराने न लिहिणे हेही अपघाताने घडलेले नाही, तर सहेतुकपणे आहे. देशाच्या इतिहासातील काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचा दस्तावेज, असे अनन्यसाधारण महत्त्व प्रधान यांच्या या आत्मकथनाला आहे. भावी काळातील संशोधक- वाचकांना हे अमोल साधन यानिमित्ताने त्यांनी उपलब्ध करून दिले आहे यात शंका नाही. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य किंवा मुंबईत झालेल्या अतिरकेी हल्ल्यांच्या चौकशी समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांना आलेले अनुभवही कुतूहलजनक आहेत. त्याविषयी त्यांनी आत्मचरित्राच्या दुसऱ्या खंडात अधिक मोकळेपणाने लिहावे अशीच अपेक्षा वाचक ठेवतील. त्यानिमित्ताने सद्य:स्थितीतील राजकारण, प्रशासन आणि सामाजिक उलाढाली यांबाबबतचे त्यांचे परिपक्व चिंतन आणि भाष्य वाचकाच्या हाती पडावे अशी अपेक्षा आहे. -प्रभाकर (बापू) करंदीकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 12-11-2017

    तत्कालीन केंद्रीय गृह सचिव, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचं हे आत्मकथन. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे प्रधान आयएएस झाले. दिल्लीत मेटकॉफ हाऊसमधल्या प्रशिक्षणानंतर त्यांची जी वाटचाल सुरू झाली, ती अनेक वळणं घेत अरुणाचलमधल्या रजभवनात येऊन पोचली. हा सारा रोमांचकारी, अनेक तपशीलांनी भरलेला, अनेक व्यक्तींचं चित्रण करणारा प्रवास प्रधान यांनी या पुस्तकात मांडला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी अशा अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं. स्थानिक स्वरूपाच्या घटनांपासून आंतरराष्ट्रीय समस्यांपर्यत अनेक गोष्टीचा सामना करावा लागला. त्यावेळची स्थिती, निर्णयांमागचं तर्कशास्त्र, मानसिकता अशा अनेक गोष्टी प्रधान पुस्तकातून मांडतात. त्या काळचा सगळा राजकीय, सामाजिक पटच त्यामुळं उभा राहतो. ...Read more

  • Rating StarDivya Marathi 10-11-17

    प्रशासन किंवासनदी अधिकाऱ्याचा देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग असताे. बुद्धिकाैशल्य, नेतृत्वगुण, प्रसंगावधान, याेग्य निर्णय घेण्याची क्षमता, सचाेटी, वक्तशीरपणा, कार्यक्षमता, काेणतीही जबाबदारी स्वीकारण्याची अाणि कष्ट करण्याची तयारी, सहनशीलता, बिकट पिस्थितीतही कणखर राहण्याची वृत्ती असे गुण सनदी अधिकाऱ्याकडे असणे अपेक्षित असते. अशाच गुणांचा समुच्चय असलेले माजी सनदी अधिकारी अाणि अरुणाचलचे माजी राज्यपाल राम प्रधान यांचं अात्मचरित्र `माझी वाटचाल : मेटकाॅफ हाऊस ते राजभवन (१९५२-१९८९)` या अात्मचरित्रातून त्यांनी त्यांच्या व्यावसायिक अाणि काैटुंबिक जीवनातील अनुभव कथन केले अाहेत. १९५२ ते १९८९ म्हणजे जवळ जवळ ३८ वर्षांच्या कालखंडातील हे अनुभव अाहेत. त्यांचा जन्म, शिक्षण, अायएएसचं प्रशिक्षण, नाेकरीची सुरुवात ते सेवानिवृत्तीपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास त्यांनी सांगितला अाहे. एक कुशल सनदी अधिकारी म्हणून त्यांचा हा अनुभवपट अतिशय विस्तृत अाहे. १९६० ते १९६५ या काळात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून काम करताना नवीन महाराष्ट्राच्या जडणघडण कार्यात प्रधान यांना काम करण्याची संधी मिळाली. त्याचे काही अनुभव त्यांनी या पुस्तकात दिले अाहेत. तसेच यशवंतरावजी संरक्षणमंत्री असताना `भारतीय संरक्षण दलाची पुनर्रचना` यासारख्या महत्त्वाच्या कार्यातही त्यांचा भाग हाेता याबद्दलही त्यांनी पुस्तकात अनुभव रेखाटले अाहेत. जिनिव्हा येथे त्यांनी भारताचे केलेेले प्रतिनिधित्व, युनाेमध्ये संचालकपदावर असताना अविकसित देशांना वाणिज्य विकास क्षेत्रांमध्ये सल्लागार म्हणून पाहिलेले काम, राज्याचे गृहसचिव, मुख्य सचिव, भारताचे गृहसचिव याच काळात पंजाब, अासाम मिझाेरामचे करार असा सर्व कार्यपटल त्यांनी उलगडला अाहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more