DEEPAK CHOPRA

About Author

Birth Date : 22/10/1946


DEEPAK CHOPRA IS THE AUTHOR OF MORE THAN FIFTY BOOKS, BOTH NON-FICTION AND FICTION. THEY HAVE BEEN TRANSLATED INTO OVER THIRTY-FIVE LANGUAGES AND INCLUDE THE HUGE INTERNATIONAL BESTSELLER AGELESS BODY, TIMELESS MIND.

दीपक चोप्रा हे माउंट सिनाइ येथे मूत्रविकारशास्त्राचे (युरॉलॉजीचे) आनुषंगिक प्राध्यापक आहेत, सेंटर फ्लोरिडामधील विद्यापीठांतर्गत औषध या विषयाचे प्राध्यापक आहेत, तर कॅलिफोर्निया विद्यापीठात सॅन दियागोमध्ये कौटुंबिक आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्याचे प्राध्यापक आहेत, तसेच गॅलप ऑर्गनायझेशनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून सेवा प्रदान करतात. ‘द चोप्रा फाउंडेशन’चे, तसेच चोप्रा ग्लोबल या संस्थेचेही ते संस्थापक आहेत. त्यांनी ९०पेक्षाही जास्त पुस्तकांचे लेखन केले असून, त्यांचे त्रेचाळीस भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. यामधली अनेक पुस्तके न्यू यॉर्क टाइम्स बेस्ट सेलर ठरली आहेत. मागील तीन दशकांपेक्षा अधिक कालखंडापासून ते ध्यानधारणा या विषयात आघाडीवर आहेत़ त्यांची अनेक पॉडकास्टदेखील आली आहेत, यामध्ये डेली ब्रेथ (कॅडेन्स १३) या पुरस्कारप्राप्त पॉडकास्टचादेखील समावेश आहे. टाइम मॅगझीन यांनी ‘या शतकातील पहिल्या शंभर श्रेष्ठ आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांपैकी एक’ असे डॉ. चोप्रा यांचे वर्णन केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE ULTIMATE HAPPINESS PRESCRIPTION Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more