* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663198
  • Edition : 19
  • Publishing Year : MARCH 1980
  • Weight : 120.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OUT OUR LIFE EACH ONE OF US ENVIES SOME ONE OR THE OTHER IN SOME FORM. EVERY ONE OF US ALWAYS HAVE A FEELING THAT SOMETHING THAT WE DESERVE THE MOST IS BEING GIVEN TO SOMEONE ELSE, WHO IS NOT SO DESERVING. THIS VERY THOUGHT KILLS US. THE FACT THAT THIS SECRET CANNOT BE SHARED WITH ANYONE IS WORSE THAN THE NAGGING FEELING ITSELF FOR THESE PEOPLE WHO ARE SUFFERING THE MOST WITH THE DISEASE OF ENVY, I OPENED A CLUB, `DILASA MANDAL` OR `RELIEF CLUB`; WITH THE ONLY INTENTION OF PROVIDING AN OUTLET FOR THE VENOM SO FILLED UP IN THEIR MIND. THE PEAK PERIOD OF THIS CLUB IS EITHER THAT OF THE `SAHITYA SAMMELAN AND NATYA SAMMELAN` OR THE PERIOD WHEN THE `SAHITYA PURASKARS` ARE AWARDED. BUT THE ONLY CONDITION FOR THE ADMISSION IS PEOPLE SHOULD BE REALLY JEALOUS OF SOMEONE, THOSE WITH NO JEALOUSY GET NO ADMISSION AT ALL. THE MOST SALIENT FEATURE OF VA PU`S WRITING IS THAT HE UNDERSTANDS ALL THE GOOD AND BAD FEELINGS IN EVERYONE`S MIND AND FURTHER TRIES TO PUT THEM INTO SIMPLE YET EFFECTIVE WRITINGS WITH HIS `MIDAS TOUCH`. HE CONSIDERS LIFE WITH EARNEST ZEAL, ENTHUSIASM AND A POSITIVE APPROACH. HE IS ALWAYS HOPEFUL IN THE MOST HOPELESS SITUATIONS. HE NOT ONLY PRESENTS THE VERY GOOD IN LIFE AROUND HIM BUT WITH THE SAME INTENSITY AND INTIMACY PRESENTS THE EVIL OF THOSE OTHERWISE INNOCENT MINDS, WHICH ASTONISHES THE READER EVERY TIME HE READS ONE OF VA PU`S STORIES. `INTIMATE` IS NO EXCEPTION TO THIS RULE.
अभिनव कल्पनांच्या सहाय्यानं मानवी स्वभावाचं बहुरंगी दर्शन, ‘‘... प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत, ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय, ह्याचं एक ठसठसणारं दु:ख तो कायम जवळ बाळगून असतो; आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी, की हे कुठं बोलता येत नाही! त्यासाठी मी ‘दिलासा मंडळ’ स्थापन केलं. मनातली सगळी मळमळ त्यानं इथं ओकायची..... याचे वर्गणीदार वाढण्याचा सीझन म्हणजे साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं, साहित्य पुरस्कार जाहीर होतात, तो काळ..... इथं ढोंगी माणसाला प्रवेश नाही. निखळ मत्सरी माणसं हवीत....’’ माणसानं मनात दडवून ठेवलेल्या अशा बऱ्यावाईट स्वाभाविक भावना उदार अंत:करणानं समजून घेणं आणि आपल्या खास नर्ममुलायम, मिस्कील शैलीत त्या आविष्कृत करणं, हा श्रेष्ठ कथालेखक वपु काळे यांच्या कथालेखनाचा महत्त्वाचा विशेष. मुळात जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच प्रसन्न, आशावादी व उदार आहे; आणि अवघड विकारांचाही धीटपणे आविष्कार करण्याचं त्यांचं कसब तर वाचकाला विस्मयचकित करतं. ‘इन्टिमेट’मधील प्रत्येक कथा याच कारणानं मनाला भिडते.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    तऱ्हेवाईक माणसांच्या अंत:करणातले निर्व्याज प्रांजपण... ‘इन्टिमेट’ या कथासंग्रहात फ्रॉम कमिशनर्स डेस्क, जावडेकर बोला, केव्हाही बोलवा, ड्रीम सिक्वेन्स, बिरबलाची आणीबाणी, प्रोव्हिजन, मोदी अँड मोदी, जे फॉर, आणि इन्टिमेट अशा नऊ कथा आहेत. वपु काळे यांच्य कथेतील माणसे चारचौघांसारखी सामान्य संसारीच असतात; पण ती काही बाबतीत चमत्कारिक किंवा तऱ्हेवाईकही वागणारी असतात. मात्र त्या तऱ्हेवाईपणामागे त्यांचे स्वत:चे असे खास तर्कशास्त्र असते; आणि वाचकांनाही ते पटण्यासारखे असते. कारण त्या त्या पात्रांच्या मानसिकतेचा उलगडा त्यामुळे होतो; त्या वर्तनामागचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण वा रहस्य त्यातून प्रकट होते. अशा रहस्याचा भेद करणे हे वपुंच्या कथाकथनाचे विलोभनीय बलस्थान असते. किंबहुना असे काहीतरी मानसशास्त्रीय व वर्तनशास्त्रीय वेगळेपण वाचक-श्रोत्यांच्या मन:पटलावर बिंबवण्यासाठीच वपु आपल्या कथा-कादंबऱ्यांचे डोलारे उभे करीत असतात. ‘इन्टिमेट’ या संग्रहातील कथांमध्ये अशी तऱ्हेवाईक वागणारी अनेक पात्रे भेटतात. शेजारी म्हणून नव्यानेच रहायला आलेल्या विचारे यांना पहिल्याच दिवशी पहाटे कथानिवेदक म्हणतो, ‘‘आज प्रथम माझे तोंड पाहत आहात. दिवस कसा गेला ते रात्री कळवा.’’ आणि रात्री बारा वाजता विचारे या ‘मी’ला गाढ झोपेतून उठवतात आणि मूठभर पेढे देतात; वर रोज पहाटे मला तुमचे दर्शन द्याल का असे विचारतात, कारण त्यांना तो दिवसा फारच शुभ गेलेला असतो. ‘‘रात्री असं रोज रोज उठवणार नसलात तर पहाटे दर्शन देईन असे ‘मी’ म्हणतो. आणि पुढे नऊ वर्षे रोज पहाटे हा शेजाऱ्याला दर्शन देण्याचा परिपाठ अविरत चालतो. (इन्टिमेट). हा मी म्हणजे कथानिवेदक ‘काळे’, म्हणजे कथाकथनकार वपु हेही कथेत स्पष्ट सांगण्यात येते. हे विचारे एके दिवशी आत्महत्या करतात. त्यांच्या मागे त्यांचे पत्र सापडते : ‘‘मी राजीखुशीनं आत्महत्या करीत आहे... गेले महिनाभर हा विचार मनात होताच. सौभाग्यवतीला मुद्दाम माहेरी पाठवलं आहे. माझ्या बाबतीत कोणतीही माझी माहिती माझे इन्टिमेट स्नेही काळे यांनी विचारावी.’’ या पत्रातील ‘इन्टिमेट’ हा शब्द काळे यांना छळत राहतो. विचारे यांनीच त्याबद्दल म्हटले होते, ‘‘मराठी भाषा रांगडी आणि कर्कश आहे. जीवश्च कंठश्च अशी ओळख करून देताना काहीतरीच वाटतं म्हणून साहेबाचा शब्द - इन्टिमेट - हा पळवावा.’’ मग वपुंना हा शब्द आता का छळतो? कारण खरोखर नऊ वर्षे शेजारी राहूनही आणि रोज पहाटे दर्शन सोहळा होऊनही आपल्याला विचारे यांच्याबद्दल फारशी माहिती नाही हे पोलीस चौकशी करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते. ... पण ही गोष्ट केवळ काळ्यांच्याच बाबतीत होते असे नव्हे. काळे दुसऱ्या शेजाऱ्याला विचारतात, ‘‘दळवी, तुम्ही सहा वर्षे काही मित्रांबरोबर रमी खेळताय. सांगा, किती मित्रांच्या बायकांची माहेरची नावं तुम्हाला माहीत आहेत?’’ तेव्हा दळवीही निरुत्तर होतात. जेलसी (मत्सर) या भावनेचा निचरा करणारी एक कथा वपुंनी लिहिली आहे. ‘जे फॉर’ मधील टिपणीस हा कथानिवेदकाचा शाळेपासूनचा वर्गमित्र. त्याचे वर्गशिक्षक त्याला म्हणतात, ‘‘या वयातच तुला कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही हे ठीक नाही... तू कायमचा दु:खी होशील. दुसऱ्यांचं वाईट चिंतितो, तो कधी यशस्वी होत नाही.’’ तो लेखकालाही सांगतो, ‘‘आपल्या सर्व वर्गबंधूमध्ये मीच जास्त यशस्वी होणार... माझा सिक्स सेन्स मला ते सांगतो.’’ टिपण्या बोलायचा तसं व्हायचं. चांगलं नाही; तर वाईट. त्यामुळं लोक त्याला टाळत... हा टिपणीस मोठेपणी लेखकाला भेटतो. व्हिजिटिंग कार्डवर टिपण्या असे टोपणनाव बघून लेखकाला हसू आवरत नाही. पासपोर्ट ऑफिसमध्ये तो बऱ्यापैंकी पदावर असतो. कार त्याला कशी परवडते असा प्रश्न लेखकाला पडतो. हा टिपण्या लेखकाला सांगतो,‘‘अन्न, वस्त्र, निवारा यासारख्याच माणसाच्या काही गरजा असतात. प्रेम, संताप, संशय या गोष्टी व्यक्त करता येतात. पण त्यांनाही मागं सारणारा एक विकार आहे. तो आतल्या आत दाबून जन्मभर हसण्याचं नाटक माणसांना करावं लागतं. मत्सर व्यक्त करायची संधी मिळाली तर अनेक लोकांना सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जाण्यापासून वाचवता येइल... माझं मुख्य सामाजिक कार्य त्याच्याशी संबंधित आहे. प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कोणाला तरी मिळतंय याचं एक ठसठसणारं दु:ख तो कायम जवळ बाळगून असतो; आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी की हे कुठं बोलता येत नाही. त्यासाठी मी एक दिलासा मंडळ स्थापन केलंय. आपल्याला मत्सर वाटतो हे सांगणाऱ्यांचंच हे मंडळ आहेत... साडेतीन हजार आमचे मेंबर्स आहेत. ही संस्था बुडणार नाही. कारण ही मत्सरावरच चालणारी संस्था आहे. इथे ढोंगी माणसाला प्रवेश नाही. निखळ मत्सर करणारी माणसं हवीत.’’ हा टिपण्या मत्सर व्यक्त करण्यासाठी जागा हवी म्हणून एक बार सुरू करतो. ड्रिंक्स घेतल्यावर माणसांचा संकोच कमी होतो. मत्सर व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून मानसशास्त्र व संज्ञापनशास्त्र यातील जाणकार स्टाफ तेथे नेमतो. बहुतेक माणसांचा मत्सर हा विनाकारण असतो. त्यांना मोकळेपणाने बोलायला मिळाले की ते नॉर्मलवर येतात. सकारण मत्सर करणाऱ्यांनाही दिलासा मंडळ न्याय मिळवून देते. उदाहरणार्थ, एखाद्याला प्रमोशन मिळायला हवे, पण त्यात कोणीतरी आडवा येत असतो. अशावेळी त्याच्या वतीने शब्द टाकणे. — आता स्वत: कथानिवेदकच प्रमोशनला ‘ड्यु’ असतो. आणि त्याची स्पर्धा त्याच्या चुलतभावाशीच असते. तेव्हा टिपण्याला एक नवा मेंबर मिळणे क्रमप्राप्तच ठरते. ही हकीकत आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याला सांगून नंतर निवेदक म्हणतो, ‘‘मला त्या टिपण्याचा विलक्षण मत्सर वाटतोय.’’ हे वाक्य उच्चारल्यावर त्याला एकदम हलकं वाटायला लागतं. आपण आणि टिपण्या यांच्यात काही फरक नाही असे जाणवते. ‘जे फॉर’ मध्ये अशा प्रकारे जेलसीकडे, मत्सराकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन वपु मांडतात. ट्रॅजेडीने कॅथार्थिस होते, तसेच या कथेने मत्सर या भावनेचे विरेचन होते, असे म्हणता येईल ‘मोदी अँड मोदी’ या गाजलेल्या कथेतील पारशी बॉस म्हणजे मोदी हा प्रेमळ आहे. बॉस म्हणून तो स्वत: भरपूर काम करतो, आणि कर्मचाऱ्यांकडून भरपूर कामाची अपेक्षा ठेवतो. आपल्या ऑफिसमधल्या मिस देशपांडेचे लग्न पैशामुळे लांबणीवर पडलेय हे कळताच तिला तीस हजार रुपये देऊन तिचे लग्न व्हावे अशी व्यवस्था करतो. पण नंतर तिच्याकडे एक चमत्कारिक मागणी करतो, ‘‘हनीमूनला गेल्यावर नवऱ्याबरोबर रात्री होणाऱ्या गप्पा टेप करून, त्याची कॅसेट आणून द्यायची.’’ नंतर तिला कळते की मोदीने मधुचंद्राच्या पहिल्या रात्रीच्या टेप्स इतर कर्मचाऱ्यांकडूनही घेतलेल्या आहेत. काहीजणांकडून नवराबायकोच्या भांडणाच्या टेप्सही घेतलेल्या आहेत.... या टेप्स मोदी कोणाला ऐकवत असेल असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. ....आणि शेवटी आपल्या पत्नीच्या मृत्यूने विदीर्ण झालेला मोदी या सर्वांच्या टेप्स परतही करतो. त्याबरोबर स्वत:च्या आवाजातली एक टेपही सर्वांना ऐकवतो. त्यात त्या सर्वांच्या टेप्सनी आपल्याला आनंद दिला, आयुष्यातल्या एका त्रुटीची पूर्तता या टेप्समुळे झाली असे म्हणून आभार मानलेले असतात. ही त्रुटी काय असेल? तर त्याची बायको ही मूकबधिर असते आणि त्याला पत्नीशी भांडण वा शृंगार, मुलांशी सुखसंवाद वगैरे करण्याची संधीच मिळालेली नसते... महापालिकेच्या रुग्णालयातील औषधांच्या चोऱ्या, विशिष्ट कंपन्यांच्या औषधांचीच शिफारस, भरमसाट औषध योजना, वगैरे बाबींचा पर्दा फाश ‘फ्रॉम कमिशनर्स डेस्क’ या कथेच्या माध्यमातून केला गेला आहे. त्यातही वपु मेडिसिन स्टोअर्सचे इनचार्ज पेंडसे यांची वैचित्र्यपूर्ण व्यक्तिरेखा रंगवतात. तोंडात चांदीचा चमचा म्हणजे ‘सिल्व्हर स्पून इन माउथ’ घेऊन काहीजण जन्माला येतात तसे पेंडसे वळलेल्या मुठीत एखादी कॅप्सुल घेऊन जन्माला आले असावेत असे लिखिते यांना वाटते. ते कायम स्टोअर्सच्या बेसमेंटमध्ये दिसतात. त्यांना स्वत:चं असं आयुष्य नसतंच. घरीही पेंडसे अबोलच असतात. फक्त सणावारी बोलतात, अशी त्यांची ख्याती. ‘‘फ्लॅटरी किंवा खोटं बोलणं यासाठी वाचेचा उपयोग करू नये,’ असे ते मानतात. ते पेंडसे औषधांच्या चोऱ्या वॉर्डबॉय किंवा कंपाउंडर नव्हे तर डॉक्टरमंडळीही करतात यावर प्रकाश टाकतात. महागडी औषधं फुकट मिळवून पेशंट ती घेऊन डॉक्टर्सना नेऊन देतात, अशीही उदाहरणे ते देतात... एका कटू सामाजिक समस्येचे कथेच्या माध्यमातून वपु असे सादरीकरण करतात आणि संबंधितांच्या डोळ्यात अंजन घालतात. जावडेकर नावाचे गृहस्थ वपुंना य. गो. जोशी – वि. वि. बोकील यांच्या पंक्तीत बसवून समाजासाठी निव्वळ लेखनापलीकडे आणखी काही करण्याची गरज आहे असे पत्राने कळवून भेटीची वेळ मागतात. जावडेकर आपल्या एकवीस वर्षाच्या मुलीसाठी स्थळ सुचवा असे त्यांना सांगतात. संसारात कुणाचं काय चुकतं हे सांगण्यात लेखकांनी आयुष्य घालवण्याऐवजी दोन अनुरूप व्यक्तींना एकत्र आणून आदर्श पतीपत्नीच्या जोड्या समाजासमोर पेश कराव्या असे जावडेकर म्हणतात तेव्हा त्या प्रयत्नातून एक नवेच सामाजिक वास्तव पुढे येते. .... शेवटी कथालेखक वपु म्हणतात, ‘‘जावडेकर, कथा ह्या वेदनेची होते. तुमच्या आमच्या क्षुल्लक मानापमानाची होत नाही.’’ मनस्वी जीवन जगू पाहणाऱ्या व्यक्तीची विशिष्ट मानसिकता किंवा सामाजिक वास्तवाचे एखादे अनोखे रूप वपुंच्या प्रत्येक कथेत दिसते. जीवनाबद्दलची आस्था, विविध व्यक्तींच्या संदर्भातील जिज्ञासा, संवाद साधण्याची मनोमन आवड या सर्वातून वाचकाला काहीतरी वेगळं सांगण्याची वपुंची कुशलता या कथांना वाचकांच्या भावजीवनात अढळपणे स्थानापन्न करते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 14-07-2002

    संवादोत्सुक कथा… कथा या वाङ्मयप्रकाराचा कौटुंबिक कथा हा जर एक उपप्रकार मानला, तर त्या कथांच्या सदंर्भात कथाकार व. पु. काळे यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. खास मध्यमवर्गीय संसारकथा म्हणजे व. पु असं समीकरण मांडायला अजिबात हरकत नाही, इतक्या विपुल संख्यनं व. पुं. नी ‘आंबटगोड’ कुटुंबकथा लिहिल्या. माणसांमध्ये वाढत चाललेला विसंवाद, एकलेपणा व. पुं. च्या कथांच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून येतं. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या पुस्तकांची नवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ‘मोदी अ‍ॅण्ड मोदी’ ही टी.व्ही.वर गाजलेली कथा ‘इन्टिमेट’ मध्ये आहे. या संग्रहाची ही चौथी आवृत्ती. ‘केव्हाही बोलवा’ ही कथा माणसाची दुसऱ्याच्या उपयोगी पडणारी वृत्ती महानगरी जीवनामुळे कशी झाकोळून जाते आहे, याचं दर्शन घडवते. व.पुं.चं मानवी स्वभावाचं निरीक्षण आणि अभ्यास किती पक्का होता. हे सांगणारी ‘जे फॉर...’ ही कथाही या संग्रहात आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more