* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665109
  • Edition : 7
  • Publishing Year : JANUARY 1944
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE ARE VARIOUS REASONS BEHIND EVERY SOCIAL PROBLEM. ONE SIDE LIFE IS BECOMING MECHANIZED & MONEY-CENTRIC & ON THE OTHER SIDE BATTLE FOR EQUALITY HAS BEEN RISING UP STRONGLY. IN SUCH CRUCIAL TIME PROBLEMS OF LIFE COULDN’T BE SOLVED WITH SWEET DRAMATIC PHILOSOPHY. ONE SHOULD NOT SUPPORT THE UNETHICAL WAYS OF EARNING . OUR STRUGGLE IS NOT AGAINST THE MACHINE, BUT WE HAVE TO FIGHT AGAINST INEQUALITY .
आजच्या सामाजिक समस्या विविध कारणांनी निर्माण झालेल्या आहेत. एकीकडे जीवन यांत्रिक आणि म्हणूनच सर्वस्वी अर्थप्रधान होऊ पाहत आहे. दुसरीकडे समतेचे निशाण सर्व सामाजिक क्षेत्रांत जोरजोराने फडफडू लागले आहे. अशा वेळी जे जीवनविषयक कूटप्रश्न उत्पन्न होतात, त्यांची उत्तरे गोड, गुळगुळीत शेवट असणार्या गोष्टीनी, स्वप्नरंजनावर आधारलेल्या तत्त्वज्ञानाने किंवा आत्मवंचना करून घेणार्या सांस्कृतिक विचारांनी देता येणार नाहीत.....विषमतेवर आधारलेल्या सध्याच्या समाजरचनेतल्या अगदी ढोबळ अशा नीतिनियमांना सुद्धा पांयाखाली तुडवून जो पैसा संपादन केला जातो, त्याच्याकडे माणुसकीची चाड असणार्या समाजाने तिरस्कारानेच पाहिले पाहिजे......आपला झगडा यंत्राशी नसून विषमतेला अंधपणे साहाय्य करणार्या यांत्रिक संस्कृतीशी आहे...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #स्त्री आणि पुरुष
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 13-03-1996

    ‘समर्थ स्त्री’चे सुंदर चित्रण… ‘स्त्री आणि पुरुष’ हा वि. स. खांडेकर यांचा १९४४ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेला कथासंग्रह. या कथासंग्रहाची जानेवारी १९९६मध्ये प्रकाशित झालेली ही चौथी आवृत्ती. ‘स्त्री आणि पुरुष’ ही यातील शेवटची कथा. स्वत: लेखकाला आवडलेली ह अप्रतिम कथा. या कथेबद्दल ‘भूमिका’ या शेवटच्या प्रकरणात स्वत: वि. स. खांडेकरांनी इतके अर्थवाही, मार्मिक व मर्मग्राही लिहिले आहे, की १९९६ मध्ये मुद्दाम ‘स्त्रीवादी’ चळवळ ‘स्त्रीवादी’ भूमिका घेणाऱ्यांनी ही ‘भूमिका’ मुद्दाम आवर्जून व खुल्या दिलाने वाचावी अशी. तर ही कथा मुळात आहे तरी काय? माया ही सुसंस्कृत, तरल, सुशिक्षित आणि संवेदनक्षमाची तरुणी, वामन मल्हार जोशी तिचे कॉलेजमधले आदर्श प्राध्यापक. तिचे वडील स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतलेले सच्चो गांधीवादी शाळामास्तर. तीपण पदवीधर झाल्यावर माध्यमिक शाळेत शिक्षिका. तिचे सदानंदाशी लग्न होते. त्याला कारकुनाची नोकरी असते. पण तो त्याचवेळी शिकत शिकत व स्वबळावर मोठा होतो. तो व्यापाऱ्यांकडून सत्तेच्या, अधिकाराच्या जोरावर पैसे उकळू लागतो आणि बघता-बघता तीन-चार वर्षात बढती मिळून मोठा अधिकारी बनतो. मायाला नोकरी सोडायला लावतो. मायाच्या अंगावर सोन्याचे-मोत्याचे दागिने अन् घरात अनेक श्रीमंती वस्तू येऊ लागतात. हा पापाचा तर पैसा नाही ना, याने शंकित झालेली आणि आता दिवस गेलेली माया प्रकृती स्वास्थ्यासाठी खेड्यात जाते. तिला तिथे अज्ञानी, गरीब दु:खी लोकांचे जीवन जवळून बघता येते. एका शेतमजुराचा मुलगा स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश गोळीबारात बळी पडला. त्यावेळी आपण व सदानंद सुखी संसाराच्या मायेत पोहत होतो, या विचाराने व आपण वा. म. जोशी आणि आपले स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी बापाची मुलगी असूनही पापाचरणाच्या चैनीच्या संसारात बळी कशी गेलो, याचे ती दु:ख करते. एका बाजूल्या नवऱ्याबद्दलची प्रीती आणि पोटातल्या बाळाचे वात्सल्य व दुसऱ्या बाजूला काळ्या बाजाराला विकला गेलेला भ्रष्टाचारी, पापी असा आपला पती, या संभ्रमात ती सापडते. पण खेड्यात दिसणारी अमानुष दुश्ये तिच्या सामाजिक पावित्र्याच्या आदर्शाला जागृत करतात आणि तिच्यामधली मानवता तिला सदानंदाला सोडायला भाग पाडते. असा हा संक्षेपाने असलेला कथा भाग. ‘भूमिके’त या कथेची भलावण करताना वि. स. खांडेकरांनी सुशिक्षित, जागृत स्त्री सामाजिक पापाचरणाला कसे तोंड देऊ शकेल व भ्रष्टाचार दुराचार कसा दूर होऊ शकेल, याचे मोठे मनोहारी चित्रण १९५२ मध्ये रंगविले आहे. आजची स्त्री सुशिक्षित असूनही ती आपल्या पतीचे दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार थांबवू शकलेली नाही, हे आपण दैनंदिन पाहतो आहोत. या कथासंग्रहात एकूण पाच कथा आहेत. बहुतेक कथांमधील स्त्री ही वेगवेगळ्या नात्यांनी बद्ध आहे. ती सुशिक्षित आहे, घराचा उंबरठा ओलांडून नोकरी करणारी आहे (८ जून); पण तरी तिला संसार, पतिप्रेम, स्वत:चे मूल असणे या बाबींचीही स्वतंत्रतेबरोबरच अनिवार ओढ आहे. त्यामुळे तिच्या मनात द्वंद्व व कुतरओढ सुरू असते. ती स्वतंत्र स्वावलंबी होऊनही सुखी नाही. हे सिंधू या माध्यमिक शिक्षिकेच्या ‘८ जून’ या कथेतल्या व्यक्तिरेखेतून उमजते. ‘आईचा शब्द’ ही तर कॅरेल कॅपेक यांच्या ‘दि मदर’ या नाटकाच्या आधारे लिहिलेली कथा. एका बाजूला आपल्या एकुलत्या एक वाचलेल्या मुलाबद्दलचं ममत्व आईला. त्याला युद्धावर पाठवू देत नाही. मुलगा देशाच्या हाकेला ओ देणारा. आपल्या मुलाला ती आपल्याच नजरेखाली ठेवू पाहते. शेवटी तिच्या मनाची होणारी आत्यंतिक घालमेल. मुलगा तर आईचा होकाराच्या शब्दासाठी आसुसलेला. हे कथेत केलेलं भावभावनांचं अन् देशप्रेमाचं प्रतीक असलेलं रूपांतर फारच संवेदनशील झालंय. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या वि. स. खांडेकरांच्या या १९२९ ते १९४८ या कालखंडातील लिहिलेल्या कथा. स्त्री-पुरुष संबंधातील वेगवेगळ्या भूमिका साकार करणाऱ्या. आजही त्या अतिशय वाचनीय. कारण शाश्वत भावविश्वावर त्या आधारित म्हणून या कथासंगहाची ही चौथी आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more