* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983647
  • Edition : 7
  • Publishing Year : 1971
  • Weight : 220.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BIRDS ARE CLASSIFIED. IN THE SAME WAY WE CAN CLASSIFY THE AUTHORS. THOSE WHO SCRIBBLE WITH BLACK ON WHITE PAPERS. AUTHORS SPECIALIZING MYTHOLOGY: LIKE THE CRANE; AUTHORS SPECIALIZING HISTORICAL WRITING: LIKE THE PAURANIK; AUTHORS SPECIALIZING HUMOUR: LIKE THE PARAKEET; AUTHORS SPECIALIZING MIDDLE CLASS: LIKE THE PIGEON; AUTHORS SPECIALIZING SLUMS: LIKE THE KING EAGLE; AUTHORS SPECIALIZING RURAL WRITINGS: LIKE THE COUNTRY HEN; AUTHORS SPECIALIZING IN CHILDREN’S BOOK: LIKE A FIST; AUTHORS IN GENERAL: LIKE THE TITVI, THE LAPWING;
पक्ष्यांचे जसे वर्गीकरण केले जाते, तसे ‘पांढऱ्यावर काळे’ करणाऱ्या लेखकांचेही होऊ शकते; ते असे पौराणिक लेखक : क्रौन्च पक्ष्याएवढा ऐतिहासिक लेखक : पौराणिकाएवढा विनोदी लेखक : राघूएवढा मध्यमवर्गीय लेखक : कबुतराएवढा झोपडपट्टी लेखक : राजगिधाडाएवढा ग्रामीण लेखक : गावठीकोंबडी एवढा बाल-लेखक : मुठीएवढा भरड (खरड) लेखक : टिटवीएवढा
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    या पुस्तकात माडगूळकर यांनी आपल्या जीवनातील प्राण्यांचे अनुभव सांगितले आहे. देवाचे रूप असणारा कासव हा त्यांना कसा मिळाला, त्यांच्या बायकोने त्याला ठेवलेल्या बादलीतून न बघता संडासात फेकून दिले, मग शोधाशोध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सापडतो. आणि त्यांा जिम नावाचा कुत्रा हा त्यांना जीव लावून अकाली कसा गेला, हे माडगूळकर यांनी सांगितले आहे शंकर वैदू‌ नावाच्या माणसाने त्यांना दोन ससे आणून देतो, ते ससे जंगली जनावरे असल्या कारणाने जीवाला लावून घेतात व मरतात . बारा हत्यारी रखवालदार पैकी एक बळी रामोशी होता, त्यांनेच लेखकांना रानामाळाची गोडी लावली. पुढे त्यांनी भारत स्वातंत्र्यासाठी भाग घेतलेल्या चळवळीत त्यांना आलेली अडचण, ते कसे सुखरुप बाहेर पडले, हे व त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी या पुस्तकात त्यांनी सांगितले आहे. ...Read more

  • Rating StarUnmesh Khanwale

    काही पुस्तकांच्या निर्मिती कथा खुप विलक्षण असतात. "आई आजारी आहे, त्वरित भेटीला ये" असा निरोप व्यंकटेश माडगूळकरांना मिळाला आणि ते लगेच पुण्याहून माडगूळला जायला निघाले. माडगूळला जातांना आटपाडीहून जावे लागे. पण बसस्थानकावर पोचल्यावर रात्रीची बस कधीच िघून गेली होती. आता पुढची बस एकदम पहाटेच. त्या बस स्टॅन्डवर वेळ जाता जात नव्हता. पिशवीत कागद-पेन होतं. तेंव्हा त्या मधल्या काळात त्यांनी "पांढऱ्यावर काळे" हे पुस्तक लिहून पुर्ण केले. "पांढऱ्यावर काळे" हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरील ३७ खुमासदार लेखांचा संग्रह आहे. पाळीव प्राण्यांचे आलेले गमतीशीर अनुभव, सिनेमा/नाटक लेखक म्हणून जागवलेल्या आठवणी, शिकारीतले थरारक अनुभव आणि इतर बऱ्याच दर्जेदार लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. या सगळ्या आठवणी सत्य घटनेवर आधारित आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर "मी गोष्टी कशा लिहतो" हा लेख. लेखकाचे मामा एकदा पुण्याला त्यांच्या घरी येतात आणि त्यांना लिहीत असलेलं बघून सहज म्हणतात की कसं काय सुचतं तुला असं लिहायला? मी आता बारामतीला जातोय, उद्या परत पुण्याला आल्यावर आपण यावर बोलूया. मामा जाताना मुलांना खेळण्यासाठी, आपलं कुत्र्याचं लहान पिलू सोबत ठेवून जातात. पण मग ते पिलू घरांत काय काय धुमाकूळ घालतं याचं भन्नाट वर्णन वाचताना आपल्या देखील मनांत विचार येतो खरंच कसं काय सुचतं असं लिहायला. सुरुवातीला कथा लिहितांना माडगूळकरांनी एक नाटक लिहिले. मात्र ते पहिले नाटक पूर्णपणे कोसळले. आता नाटक आयुष्यात कधी लिहायचे नाही हे मनाशी पक्के ठरवले असतांना, थोड्याच वर्षांनी एका संस्थेने तेच नाटक "तु वेडा कुंभार" नावाने राज्य नाट्य-स्पर्धेसाठी बसवले आणि दणक्यात यशस्वी केले. हा सगळा अनुभव त्यांनी "नाटक" या कथेत मिश्कीलपणे सांगितलाय. कथालेखक म्हणून प्रसिद्ध होत असतांना त्यांना एका सिनेमा निर्मात्याने एक कादंबरी आणून दिली आणि त्यावर सिनेमाची कथा-पटकथा बनवायला सांगितली. कादंबरी माडगूळकरांना विशेष आवडली नाही आणि हा सिनेमा चालणार नाही असं त्यांनी निर्मात्याला सांगितलं. त्याने "तुम्ही लिहा हो माडगूळकर. धंद्याचं गणित मी बसवतो", असं सांगितलं. हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित "सांगत्ये ऐका" या नावाने बनलेला तो सिनेमा धो-धो चालला. या सिनेमासाठी केलेलं हे काम "पटकथा" नावाच्या लेखात सांगताना एकंदरीत सिनेमा जगतातील अनुभव त्यांनी झकास मांडलेत. प्रत्येक वाचकाला आपल्या आवडत्या लेखकाची एकदा तरी भेट घडावी असं वाटत असतं. एकदा एक अवलिया माणूस लेखकाला भेटतो, त्याला घरी येण्याचं आमंत्रण देतो. लेखक तिकडे गेल्यावर मात्र हा माणूस "माडगूळकर, श्रेष्ठ साहित्यिक दरवेळी उच्च प्रतीची साहित्य निर्मिती करत नसतो. तुमच्या बाबतीत, खरं म्हणजे माणदेशी माणसं लिहून तुम्ही मरायला हवं होतं. अर्थात साहित्यिक म्हणून. असे हजार वर्षे जगलात तरी आम्हाला आनंदच आहे" असं म्हणून लेखकाचीच शिकवणी घेतो. "पाहुणचार" नावाच्या लेखांत हा भेटीबाबतचा अनुभव म्हणजे अगदीच झकास! यातील कथा\ललित हे खुप ओघवत्या, सहज भाषेत लिहल्या आहेत. उगीच शब्दबंबाळ करणारे अनुभव नाही, अलंकारिक भाषा, उसनं-उधारीचे तत्वज्ञान शिकवणं नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः बद्दलचा बडेजाव नाही. वाचकाला प्रत्येक घडलेल्या घटनांमध्ये, आपण एक साक्षीदार असल्यासारखं ती गोष्ट पुन्हा स्वतः अनुभवतोय असंच वाटतं. शेवटी व्यंकटेश माडगुळकरांनी सांगितल्याप्रमाणे चांगला लेखक हा मुळात असतो, तो तयार होत नाही. जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो तितक्याच स्वाभाविकपणे त्याच्याकडून लेखन होतं. जमिनीचे कवच फोडून वर येणाऱ्या केळीच्या त्या कोंभातच याचं आश्वासन असतं. हे पुस्तक वाचतांना आपल्याला सारखा याचा अनुभव येतो. वाचकहो, हे पुस्तक वाचतांना मी अनुभवलेला आनंद या पोस्टद्वारे तुमच्यापर्यंत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तो कसा मांडला गेला हे मला माहित नाही कारण पुलं, वपु, माडगूळकरांसारखे लेखक असे शब्दात मांडता येत नाही. आपण फक्त वाचण्यातील आनंद अनुभवायचा असतो. :-) - उन्मेष खानवाले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती