* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745163
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHYAM BHURKE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"A COLLECTION OF STORIES, SHORT AND SWEET, THIS BOOK HELPS US TO ENJOY LITTLE MOMENTS IN DAY-TO-DAY LIFE. WHAT WILL HAPPEN IF THE WAGES ARE STOPPED FOR THE BANK EMPLOYEES? INSTEAD, THEY WILL HAVE TO COLLECT DEPOSITS WHICH WILL FURTHER DECIDE THEIR REMUNERATION. WHEN A CIRCULAR IS ISSUED, THERE IS A LOT OF CONFUSION WHICH IS SKETCHED IN THE STORY; ‘BANKETLE PAGAR BAND- NO WAGES FOR THE BANK EMPLOYEES’. ‘GRUHININNA HAKKACHI SUTTI- AN ENTITLED LEAVE FOR THE HOUSEWIFE’ THIS STORY TELLS US ABOUT THE AUTHOR’S WIFE WHO IS UNABLE TO UTILISE THE LEAVE IN A BETTER WAY. ANOTHER STORY IS BASED ON THE CONCEPT THAT ALL THE BANK EMPLOYEES ARE VERY SENIOR CITIZENS. THE NAME OF THE STORY IS HENCE ‘VAYOVRUDHHANCHI BANK-VERY OLD PEOPLE AS BANK EMPLOYEES’. ‘MOVERS AND SHAKERS IN BANK’ IS ANOTHER STORY BASED ON BANKING. THE EMPLOYEES DECIDE TO ARRANGE A REALITY SHOW BASED ON THE T.V. REALITY SHOW, MOVERS AND SHAKERS. SHEKHAR SUMAN AGREES TO ATTEND IT. THE STORY REVEALS THE MANY INCIDENCES PRIOR TO THE SHOW AND DURING THE SHOW. ‘AGATYSHIL GRAHAK- HOSPITABLE CUSTOMER’ IS A STORY BASED ON THE AUTHOR’S EXPERIENCE IN GHUKANI BUDRUK, A SMALL VILLAGE WHERE HE IS TRANSFERRED FOR 15 DAYS. ‘BANKET CHIMAN- CHIMAN IN BANK’, THIS STORY TELLS US ABOUT THE BEHAVIOUR OF BANK EMPLOYEES TOWARDS THE CUSTOMERS. ONE OF THE CUSTOMERS HOWEVER, TAKES REVENGE ON THEM. ‘CASH MANTRA’ TELLS US ABOUT THE BANK EMPLOYEE WHO HAS STOLEN 3000 RS. FROM THE BANK CASH. OTHER EMPLOYEES COME TOGETHER AND FIND WAYS TO MAKE HIM ADMIT OF HIS CRIME. ‘LOKA SANGE …-WHILE SHARING KNOWLEDGE WITH OTHERS…’, THIS STORY REVEALS THE WRITER’S WIFE’S READY-WITTEDNESS. AS THE WRITER IS TRYING TO LECTURE HER ABOUT HOW TO BEHAVE WITH PEOPLE, SHE TEASES HIM AND MAKES FUN. NATVASARKHI PREMAL BANK- A BANK AS LOVING AS A GRANDCHILD’, THIS STORY CASTS LIGHT ON THE EMOTIONAL RELATION THAT THE EMPLOYEES HAVE WITH THEIR CUSTOMERS. KALE SIR IS ONE OF THE BANK CUSTOMERS. AN ERROR ON THE BANK’S PART GIVES HIM A LOT OF HEADACHE. FINALLY, AN IRRITATED KALE, A CUSTOMER OF PAST 20 YEARS, CLOSES HIS ACCOUNT WITH THEM. LATER, HE AGAIN REOPENS THE ACCOUNT. SANJAY KADAM IS RUNNING A COLUMN IN A MAGAZINE -‘ME ASA AHE-I AM THAT’. THROUGH THIS, HE INTERVIEWS IMMINENT PERSONALITIES. READERS ENJOY THIS PARTICULAR COLUMN. HE RECEIVES LOT OF LETTERS FROM THEM. ONCE, A READER WRITES HIM THAT HIS INTERVIEWS HAVE BECOME QUITE MONOTONOUS. TO BRING IN CHANGE, SANJAY INTERVIEWS A VERY POOR PERSON. THE ANSWERS HE GETS FROM THIS MR. NOBODY, TELLS HIM A LOT MANY SECRETS ABOUT LIFE. THE STORY IS APTLY NAME AS ‘GARIBACHI SHRIMANT MULAKHAT-A RICH INTERVIEW OF THE POOR’. ‘MUDAT THEV-FIXED DEPOSIT-A CONVOCATION’ THIS STORY IS BASED ON NANA WHO IS RETIRED. HE IS TRYING HIS BEST TO MAKE PEOPLE AWARE OF THE BENEFITS OF GOOD HANDWRITING. ONCE, A B.COM. PASSED STUDENT APPROACHES THE UNIVERSITY AS HIS NAME IS MISSPELT ON HIS DEGREE CERTIFICATE. HE EXPRESSES HIS DISAPPOINTMENT REGARDING THIS. NANA ONCE RECEIVES HIS FDR FROM THE BANK. HE IS UNABLE TO TOLERATE THE PATHETIC HANDWRITING ON IT. THIS IS THE SAME PERSON WHO HAS APPROACHED THE UNIVERSITY FOR THE MISSPELT NAME. ‘SCENTED TOKEN’ IS A STORY OF A YOUNG BANK EMPLOYEE WHO IS ATTRACTED TOWARDS A YOUNG COLLEGE GIRL. ‘AJAB VASULI-WEIRD RECOVERY’ IS A STORY BASED ON RAMBHAU. HE IS A GOLDSMITH. BUT, AS HE IS UNABLE TO GET ANY WORK, HE TAKES LOAN FROM THE BANK AND BUYS A WELDING MACHINE. WHILE WORKING ON THIS MACHINE, HE LOSES HIS VISION WHILE WELDING. HE IS UNABLE TO REPAY THE LOAN. THE BANK COMES FOR RECOVERY. THE MANAGER HOWEVER, AVOIDS ANY IMPOUNDMENT. HE WORKS ON A WAY WHERE THE GOLDSMITH WILL BE ABLE TO REPAY THE LOAN. "
"‘गोष्टींचं एटीएम’ हा हलक्याफुलक्या, खुसखुशीत कथांचा संग्रह आहे. दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा या कथा आहेत. ‘बँकेतले पगार बंद’ असं सर्क्युलर निघालं तर काय होईल, असं कल्पनाचित्र ‘बँकेतले पगार बंद!’ या कथेत रेखाटलं आहे. बँकेत पगार न मिळता कोणता कर्मचारी किती ठेवी गोळा करेल यावर त्याचं कमिशन ठरेल, असं सक्र्युलर निघतं आणि मग काय गमतीजमती होतात, ते या कथेत सांगितलं आहे. ‘गृहिणींना हक्काची सुट्टी’ या कथेत गृहिणींना कायद्याने हक्काची सुट्टी मिळते; पण लेखकाची बायको त्या सुट्टीचा कसा बोजवारा उडवते, याचं मनोरंजक चित्रण या कथेतून केलं आहे. बँकेत जर सगळे वयोवृद्धच कर्मचारी असतील तर काय होतं, याचं खुसखुसशीत चित्रण वाचायला मिळतं ‘वयोवृद्धांची बँक’ या कथेतून. असंच खुसखुशीत चित्रण असलेली आणखी एक कथा म्हणजे ‘बँकेत मूव्हर्स अ‍ॅन्ड शेकर्स’. टीव्हीवर गाजत असलेला ‘मूव्हर्स अ‍ॅन्ड शेकर्स’ हा रिअ‍ॅलिटी शो बँकेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सादर करायचा, असं बँक कर्मचारी ठरवतात. तो रिअ‍ॅलिटी शो पाहण्यासाठी शेखर सुमन यायचं कबूल करतात. त्या शोची पूर्वतयारी करताना आणि प्रत्यक्ष तो शो करताना, काय काय गमती घडतात, याचं रंजक शैलीत वर्णन केलं आहे. ‘अगत्यशील (?) ग्राहक’ ही आणखी एक रंजक कथा. घुकणी बुद्रुक नावाच्या खेडेगावात पंधरा दिवसांसाठी लेखकाची बदली होते. तिथे गेल्यावर लेखकाला जे मजेदार अनुभव येतात, ते लेखकाने हलक्यफुलक्या शैलीत सांगितले आहेत. बँकेत आलेल्या ग्राहकाला बँक कर्मचारी कशी वागणूक देतात आणि एखादा खातेदार त्याचं उट्टं कसं काढतो, याचं मनोरंजक चित्रण केलं आहे ‘बँकेत चिमण’ या कथेत. तर ‘कॅश मंत्र’ या कथेत बँकेतीलच एक कर्मचारी बँकेच्या कॅशमधील तीन हजार रुपये लांबवतो. त्याच्याकडून त्याचा कबुलीजबाब घेण्यासाठी अन्य कर्मचारी काय क्लृप्ती योजतात, याची ही हकिगत आहे. ‘लोका सांगे...’ ही कथा आहे लेखकाच्या पत्नीच्या हजरजबाबीपणाची. लोकांशी कसं वागावं यावर बायकोला व्याख्यान देत असताना बायको लेखकाची कशी विकेट घेते, याचं हलक्याफुलक्या चित्रण या कथेत आहे. खातेदार आणि बँक यांच्यातील नात्याचं हळुवार दर्शन घडवलंय ‘नातवासासारखी प्रेमळ बँक’ या कथेतून. काळे सर हे बँकेचे ग्राहक असतात. बँकेच्या एका चुकीमुळे त्यांना मनस्ताप होतो आणि वीस वर्षांपासून बँकेत असलेलं खातं ते बंद करून टाकतात; पण बँकेशी त्यांचे परत ऋणानुबंध जुळतात, असं या कथेचं कथानक आहे. एका साप्ताहिकात ‘मी असा आहे’ हे नामवंतांच्या मुलाखतीचं सदर संजय कदम चालवत असतो. वाचकांचा उदंड प्रतिसाद या सदराला मिळत असतानाच एका वाचकाचं त्यांना पत्र येतं. त्या पत्रात त्याने मुलाखतींमधील तोचतोपणावर टीका केलेली असते. म्हणून संजय कदम एका सामान्य, गरीब माणसाची मुलाखत घेतो आणि त्याच्याकडून मिळालेली प्रश्नांची उत्तरं संजयला बरंच काही सांगून जातात, असा आशय आहे, ‘गरिबाची श्रीमंत मुलाखत’ या कथेचा. ‘मुदत ठेव - एक पदवीदान’ या कथेतील नाना निवृत्तीनंतर अक्षर सुधारण्याचं महत्त्व लोकांना पटवून देण्याचं काम करत असतात. एक बी. कॉम. झालेला विद्यार्थी त्याच्या पदवी प्रमाणपत्रावरील त्याच्या आडनावाचं स्पेलिंग दुरुस्त करण्यासाठी येतो आणि विद्यापीठाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतो. नानांना जेव्हा बँकेतून त्यांची मुदत ठेव पावती मिळते, तेव्हा त्यावरील गलिच्छ अक्षर पाहून नाना व्यथित होतात. त्या पावतीवरचं अक्षर त्यांच्याकडे आलेल्या त्या विद्यार्थ्याच असतं, अशा साध्या प्रसंगांतून साकारलेली ही कथा आहे. ‘सेंटेड टोकन’ या कथेत बँकेत येणाऱ्या एका कॉलेजवयीन तरुणीकडे आकृष्ट झालेल्या तरुण बँक कर्मचाऱ्याच्या भावनांचं दर्शन घडवलं आहे. रामभाऊंचा सोनारकामाचा धंदा बंद पडतो. म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन ते वेल्डिंग मशिन घेतात; पण वेल्डिंगचे काम करताना त्यांचा एक डोळा जातो. त्याचा परिणाम होऊन वेल्डिंगचा धंदाही बंद पडतो. बँक कर्ज वसूल करण्यासाठी त्यांच्या घरावर जप्ती आणायचं ठरवते; पण बँकेचा मॅनेजर ही जप्ती टाळतो आणि कर्जफेडीचा एक नवीन मार्ग त्यांना उपलब्ध करून देतो, असं कथानक आहे, ‘अजब वसुली’ या कथेचं. तर अशा या खुसखुशीत, हलक्याफुलक्या कथा वाचनीय आहेत. "

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GOSHTICHEATM #GOSHTICHEATM #गोष्टींचंएटीएम #SHORTSTORIES #MARATHI #SHYAMBHURKE #श्यामभुर्के "
Customer Reviews
  • Rating StarBhagyashri Hire

    खूप अप्रतिम आहे आणि मजेदार सुद्धा.

  • Rating StarDAINIK SAKAL 08-04-2018

    प्रा. श्याम भुर्के यांनी लिहिलेल्या विनोदी कथांचा हा संग्रह. भुर्के यांनी अनेक वर्षं बँकेत काम केलं. त्यामुळे बँकेशी संबंधित या सगळ्या कथा आहेत. बँकेतल्या गंमतीजमती, तिथले ग्राहक, खास वातावरण अशा सगळ्या गोष्टी या कथांमध्ये येतात. भुर्के यांना स्वत:लाी बँकेत अनेक नमुने भेटले, अनेकांचं निरीक्षण करता आलं, अनेकांचे किस्से त्यांनी ऐकले. त्यातून तयार झालेलं हे रंजक विश्व. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - 29-12-2017

    बँक हा प्रत्येकाच्या जीवनात या ना त्या कारणाने येणारा घटक आहे. विविध कारणांनी नियमित बँकेत जाणाऱ्यांची संख्या आजही जास्तच आहे. बँकेतील मोठमोठाली रांग, तिथले कर्मचारी, कामाचा वेग, कामाचे नियोजन अशा अनेक बाबींवर चाय पे चर्चा होत असते. पण बँकेत काम करणा्यांचे अनुभव आणखी काही वेगळे असू शकतात. असे खुमासदार अनुभव कथास्वरूपात ‘गोष्टींचं एटीएम’ या पुस्तकातून वाचायला मिळतील. लेखक प्रा. श्याम भुर्के यांनी बँकेत अडतीस वर्षे नोकरी केल्यामुळे या पुस्तकातील अनेक कथांना बँकेची पार्श्वभूमी आहे. अशा खुसखुशीत गोष्टी वाचून करमणूक होते. ...Read more

  • Rating StarNews Paper review

    खुसखुशीत शैलीतील हलक्यापुâलक्या कथा.... श्याम भुर्वेâ हे साहित्यप्रेमी व्यक्तिमत्त्व. बँकेसारख्या नोकरीतही त्यांनी हे साहित्यप्रेम जपलं. वाचन, लेखन, सादरीकरणातून ते वृद्धिंगत केलं. जीवनाकडे हसतखेळत बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या ‘खुमासदार अत्र’, ‘आनंदाचं पासबुक’ इ. पुस्तकांतून अधोरेखित झाला आहे. अशाच दृष्टिकोनातून साकारलेल्या कथांचा संग्रह आहे, ‘गोष्टींचं एटीएम.’ दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा या कथा आहेत. ‘बँकेतले पगार बंद’ असं सक्र्युलर निघालं तर काय होईल, असं कल्पनाचित्र ‘बँकेतले पगार बंद!’ या कथेत रेखाटलं आहे. बँकेत पगार न मिळता कोणता कर्मचारी किती ठेवी गोळा करेल यावर त्याचं कमिशन ठरेल, असं सक्र्युलर निघतं आणि मग काय गमतीजमती होतात, ते या कथेत सांगितलं आहे. ‘गृहिणींना हक्काची सुट्टी’ या कथेत गृहिणींना कायद्याने हक्काची सुट्टी मिळते; पण लेखकाची बायको त्या सुट्टीचा कसा बोजवारा उडवते, याचं मनोरंजक चित्रण या कथेतून केलं आहे. बँकेत जर सगळे वयोवृद्धच कर्मचारी असतील तर काय होतं, याचं खुसखुसशीत चित्रण वाचायला मिळतं ‘वयोवृद्धांची बँक’ या कथेतून. असंच खुसखुशीत चित्रण असलेली आणखी एक कथा म्हणजे ‘बँकेत मूव्हर्स अॅन्ड शेकर्स’. टीव्हीवर गाजत असलेला ‘मूव्हर्स अॅन्ड शेकर्स’ हा रिअॅलिटी शो बँकेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सादर करायचा, असं बँक कर्मचारी ठरवतात. तो रिअॅलिटी शो पाहण्यासाठी शेखर सुमन यायचं कबूल करतात. त्या शोची पूर्वतयारी करताना आणि प्रत्यक्ष तो शो करताना, काय काय गमती घडतात, याचं रंजक शैलीत वर्णन केलं आहे. ‘अगत्यशील (?) ग्राहक’ ही आणखी एक रंजक कथा. घुकणी बुद्रुक नावाच्या खेडेगावात पंधरा दिवसांसाठी लेखकाची बदली होते. तिथे गेल्यावर लेखकाला जे मजेदार अनुभव येतात, ते लेखकाने हलक्यपुâलक्या शैलीत सांगितले आहेत. बँकेत आलेल्या ग्राहकाला बँक कर्मचारी कशी वागणूक देतात आणि एखादा खातेदार त्याचं उट्टं कसं काढतो, याचं मनोरंजक चित्रण केलं आहे ‘बँकेत चिमण’ या कथेत. तर ‘कॅश मंत्र’ या कथेत बँकेतीलच एक कर्मचारी बँकेच्या कॅशमधील तीन हजार रुपये लांबवतो. त्याच्याकडून त्याचा कबुलीजबाब घेण्यासाठी अन्य कर्मचारी काय क्ऌप्ती योजतात, याची ही हकिगत आहे. ‘लोका सांगे...’ ही कथा आहे लेखकाच्या पत्नीच्या हजरजबाबीपणाची. लोकांशी कसं वागावं यावर बायकोला व्याख्यान देत असताना बायको लेखकाची कशी विकेट घेते, याचं हलवंâपुâलवंâ चित्रण या कथेत आहे. खातेदार आणि बँक यांच्यातील नात्याचं हळुवार दर्शन घडवलंय ‘नातवासासारखी प्रेमळ बँक’ या कथेतून. काळे सर हे बँकेचे ग्राहक असतात. बँकेच्या एका चुकीमुळे त्यांना मनस्ताप होतो आणि वीस वर्षांपासून बँकेत असलेलं खातं ते बंद करून टाकतात; पण बँकेशी त्यांचे परत ऋणानुबंध जुळतात, असं या कथेचं कथानक आहे. एका साप्ताहिकात ‘मी असा आहे’ हे नामवंतांच्या मुलाखतीचं सदर संजय कदम चालवत असतो. वाचकांचा उदंड प्रतिसाद या सदराला मिळत असतानाच एका वाचकाचं त्यांना पत्र येतं. त्या पत्रात त्याने मुलाखतींमधील तोचतोपणावर टीका केलेली असते. म्हणून संजय कदम एका सामान्य, गरीब माणसाची मुलाखत घेतो आणि त्याच्याकडून मिळालेली प्रश्नांची उत्तरं संजयला बरंच काही सांगून जातात, असा आशय आहे, ‘गरिबाची श्रीमंत मुलाखत’ या कथेचा. ‘गोष्टींचं एटीएम’ या कथासंग्रहातील या काही कथा. याव्यतिरिक्त अन्यही कथा या कथासंग्रहात आहेत. अगदी साध्या साध्या प्रसंगातून साकारलेल्या या कथा वाचकाच्या चेहयावर हसू आणतात. बहुतेक कथांना बँकेची पाश्र्वभूमी आहे. मध्यमवर्गीय माणसाचं नेमवंâ चित्र या कथा उभं करतात. साधी, सरळ भाषा आणि अधूनमधून पेरलेले किस्से यामुळे या पुस्तकाची वाचनीयता वाढते. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते वाचूनच खाली ठेवलं जातं. कथा हलक्या फुलक्या शैलीतील असल्या तरी त्या अंतर्मुखही करतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more