PRADNYA OAK

About Author

Birth Date : 25/12/1951


MRS.PRADNYA OAK, BORN ON DECEMBER 25TH 1951 AT PUNE, COMPLETED GRADUATION IN ECONOMICS.SHE WORKED AS AN ANNOUNCER AT ALL INDIA RADIO-PUNE (AAKASHWANI) FOR 16 YEARS & CONTRIBUTED IMMENSELY BY WRITING, PRODUCING RADIO DRAMAS, DOCUMENTARIES, FEATURES, SERIALS..BASED ON LIFE & CONTRIBUTION OF SWAMI VIVEKANANDA,MAHARASHTRAS SOCIAL REFORMERS OF 19TH & 20TH CENTURIES, FELICITATION DOCUMENTARY ON 75TH BIRTH ANNIVERSARY OF PU.LA.DESHPANDE.SHE ALSO SCRIPTED, PARTICIPATED & PRODUCED A TALK SHOW ON LATE AACHARYA ATRE. (ATRE NAVACH WADAL.) SHE WROTE & PARTICIPATED IN ANOTHER TALK SHOW..VISHWAWAMA BASED ON LIVES & CONTRIBUTIONS OF WOMEN FROM FOREIGN COUNTRIES (19TH & 20TH CENTURIES).FOR MEHTA PUBLISHING HOUSE, SHE TRANSLATED 5 BOOKS OF OSHO FROM ENGLISH/HINDI TO MARATHI.ALSO TRANSLATED 2 BOOKS.. CHICKEN SOUP.. INTO MARATHI.MRS.OAK CONDUCTS CLASSES FOR SOFT SKILL IN MARATHI COMMUNICATION.SHE CONTINUES TO CONTRIBUTE TO VARIOUS MARATHI DAILIES & WEEKLIES ON DIFFERENT SUBJECTS.

प्रज्ञा ओक या अर्थशास्त्राच्या पदवीधर आहेत. आकाशवाणीवर जवळ जवळ सोळा वर्षं त्या निवेदक म्हणून कार्यरत होत्या. त्याचबरोबर आकाशवाणीसाठी त्यांनी विपुल लेखन केलं. नभोनाट्य, डॉक्युमेंटरीज, श्रुतिका इत्यादीचा त्यात समावेश होता. पु.लं.च्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘माणसातला साहित्यिक आणि साहित्यातील माणूस’ हा दोन भागांतला कार्यक्रम त्यांनी आकाशवाणीसाठी केला, नंतर तो रंगमंचावरही आणला. सुरेश अलूरकरनिर्मित ‘अष्टपैलू अत्रे’ या आठ ध्वनिफितींच्या संपादनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ‘बटाट्याची चाळ’ या ध्वनिफितीचं संपादन, ‘अत्रे नांवाचं वादळ’ या रंगमंचीय कार्यक्रमाचं लेखन आणि सादरीकरण (शैला मुकुंद, दिलीप ओक यांच्यासह), दीडशे वर्षांपूर्वीच्या कर्तबगार स्त्रियांचा रंगमंचीय आलेख मांडणर्या ‘विश्ववामा’ या कार्यक्रमाचं लेखन, ‘बोलू ऐसे’ या कार्यक्रमाचं संहितालेखन-सूत्रसंचालन त्यांनी केलं. व्यक्तिमत्त्व विकासाचं सखोल प्रशिक्षण देणारी कार्यशाळा त्या बारा वर्षं घेत होत्या. वर्तमानपत्रे, मासिके यांसाठीही त्यांनी लेखन केलं. अनेक ध्वनिफितींना तसेच प्रसिद्ध कार्यक्रमांना त्यांनी ‘आवाज’ दिला. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’साठी ओशोंच्या पाच पुस्तकांचा, तसेच ‘चिकन सूप फॉर...’ मालिकेतल्या दोन पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 9 of 9 total
AIKA SANTANO Rating Star
Add To Cart INR 160
BOOKMARK Rating Star
Add To Cart INR 195
CHICKEN SOUP FOR THE PARENTS SOUL Rating Star
Add To Cart INR 250
CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 2 Rating Star
Add To Cart INR 280
DHARMA…KABIRANCHYA MANATALA Rating Star
Add To Cart INR 250
NAVI PAHAT Rating Star
Add To Cart INR 195
PREMRAS... KABIRANCHA! Rating Star
Add To Cart INR 160
SAKSHATKARACH DENGI Rating Star
Add To Cart INR 200
SWATAHCHA SHODH Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.