* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MINISTRY OF UTMOST HAPPINESS
  • Availability : Forthcoming
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 0
  • Edition : 0
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 0
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
THE MINISTRY OF UTMOST HAPPINESS TAKES US ON A JOURNEY OF MANY YEARS – THE STORY SPOOLING OUTWARDS FROM THE CRAMPED NEIGHBOURHOODS OF OLD DELHI INTO THE BURGEONING NEW METROPOLIS AND BEYOND, TO THE VALLEY OF KASHMIR AND THE FORESTS OF CENTRAL INDIA, WHERE WAR IS PEACE AND PEACE IS WAR, AND WHERE, FROM TIME TO TIME, ‘NORMALCY’ IS DECLARED. ANJUM, WHO USED TO BE AFTAB, UNROLLS A THREADBARE CARPET IN A CITY GRAVEYARD THAT SHE CALLS HOME. A BABY APPEARS QUITE SUDDENLY ON A PAVEMENT, A LITTLE AFTER MIDNIGHT, IN A CRIB OF LITTER. THE ENIGMATIC S. TILOTTAMA IS AS MUCH OF A PRESENCE AS SHE IS AN ABSENCE IN THE LIVES OF THE THREE MEN WHO LOVE HER. THE MINISTRY OF UTMOST HAPPINESS IS AT ONCE AN ACHING LOVE STORY AND A DECISIVE REMONSTRATION. IT IS TOLD IN A WHISPER, IN A SHOUT, THROUGH TEARS AND SOMETIMES WITH A LAUGH. ITS HEROES ARE PEOPLE WHO HAVE BEEN BROKEN BY THE WORLD THEY LIVE IN AND THEN RESCUED, MENDED BY LOVE – AND BY HOPE. FOR THIS REASON, THEY ARE AS STEELY AS THEY ARE FRAGILE, AND THEY NEVER SURRENDER. THIS RAVISHING, MAGNIFICENT BOOK REINVENTS WHAT A NOVEL CAN DO AND CAN BE. AND IT DEMONSTRATES ON EVERY PAGE THE MIRACLE OF ARUNDHATI ROY’S STORYTELLING GIFTS.
गेल्या दोन दशकांच्या काळाला मुखर करणारे अनेकविध आवाज या कादंबरीत आहेत. आंदोलनांची समर्थक-कार्यकर्ती असलेल्या रॉय यांच्या अ-कथात्मक लेखनातूनही त्यांचा उद्देश परीघ आणि परिघावरच्यांचे आवाज ऐकणं आणि त्यांना प्रतिसाद देणं हाच राहिलेला आहे. या दोन्ही गोष्टी परस्परांशी पूरकच आहेत, असं त्या त्यांच्या या कादंबरीतून सांगू पाहताहेत. हे बहुविध आवाज जे आहेत त्यांत तृतीयपंथी, स्वत:ला मुस्लीम म्हणवणारा दलित, काश्मिरी नागरिक, भारतीय नागरी सेवेतले अधिकारी, निर्ममपणे हत्या करणारे खुनी, हस्तक, लाचार पत्रकार, आदिवासी, कलावंत, घुबडं, मांजरं अशा अनेकांचे आहेत. हे आवाज ज्या अवकाशातून येतात ती ठिकाणंही- जुन्या दिल्लीतलं कब्रस्तान, युद्धग्रस्त काश्मीर, नक्षल लढायांनी ग्रस्त अशी मध्य भारतातील जंगलं, दलित संघर्षांला कारण ठरलेलं उना, १८ व्या शतकातलं पण आंदोलनांचं ठिकाण झालेलं जंतरमंतर आणि तिथं भ्रष्टाचाराविरुद्ध झालेलं अण्णा हजारेंचं आंदोलन, अहमदाबाद-गोध्रानंतरच्या दंगलीतला गुजरात अशी वैविध्यपूर्ण आहेत. कादंबरीत प्रत्येक प्रकरणाआधी आगा शाहीद अली, ज्याँ जेने, जेम्स बॉल्डविन, पाब्लो नेरुदा आणि इतरांची अर्थपूर्ण अशी अवतरणं दिलेली आहेत.
Video not available
Keywords
#THEMINISTRYOFUTMOSTHAPPINESS #ARUNDHATIROY #KASHMIRISSUE #THEGODOFSMALLTHINGS #SUPRIYAVAKIL
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SECOND LADY
SECOND LADY by IRVING WALLACE Rating Star
SANDIP CHAVAN

सेकंड लेडी ही आयर्विंग वॅलेस या अमेरिकन लेखकाची गाजलेली रहस्यकथा (कादंबरी) आहे. याचा मराठी अनुवाद रवींद्र गुर्जर यांनी केलेला आहे. रशियाची गुप्तचर संस्था केबिजी, अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नीची हुबेहूब नक्कल (डमी) तयार करते. अमेरिका अध्यक्षांची खर पत्नी जेव्हा एका ठरलेल्या कार्यक्रमासाठी मॉस्को मध्ये येते तेव्हा तिच्या जाग्यावर नकली व्यक्ती अतिशय योजनाबद्ध रीतीने बदलवली जाते. या कामासाठी केबिजीने तीन वर्षे मेहनत घेतलेली असते. या योजनेचा हेतू काय असतो? ही गोष्ट अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला समजते का? अमेरिकी अध्यक्षांना या गोष्टीचा सुगावा लागतो की नाही? केबीसीला हवी असणारी माहिती मिळते की नाही? आणि शेवटी व्हाईट हाऊसमध्ये राहते ती अध्यक्ष्यांची खरी पत्नी असते की खोटी? हे जाणून घ्यायला ही कादंबरी वाचायला हवी. ही कादंबरी वाचताना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या रहस्यकथेत आपण इतके हरवून जातो की काळ- वेळेचे भानही आपल्याला राहत नाही. समोर एखादा हॉलिवूड चित्रपट पाहतोय अशी रंगत ही कादंबरी वाचताना येते. पुढे काय होणार याची उत्कंठा शेवटापर्यंत राहते हे या कथेचे यश आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नी बदलणे आणि तिच्या जागी खोटी व्यक्ती पत्नी म्हणून पाठवणे हे काम म्हणजे थोडी अतिशयोक्ती वाटते. परंतु पूर्वग्रह न ठेवता पुस्तक वाचल्यास वाचक त्यामध्ये हरवून जातो हे निश्चित! ही काल्पनिक कथा वाचत असताना पाश्चात्य लेखकांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते. अनुवादकाने घेतलेली मेहनतही कौतुकास्पद आहे. ...Read more

CORPOKSHETRA
CORPOKSHETRA by DEEPAK KAUL Rating Star
DAINIK LOKMAT 08-12-2019

आधुनिक महाभारताची विनोदी गाथा... महाभारत आणि रामायण तसे हिंदू धर्माची अस्मितेची प्रतिके. लहानपणापासूनच या साहित्याची ओळख आपआपल्यापरीने प्रत्येक कुटुंबात करून दिले जाते. पण तुमच्या हातात जर हेच महाभारत, त्यातील सर्व पात्रे फक्त आधुनिक व कॉर्पोरेट क्षत्राशी संबंधित पद्धतीने जुळवून आले तर किती आनंददायी अनुभव असेल नाही का? कॉर्पोक्षेत्र हे पुस्तक म्हणजे एमबीए युगातील महाभारत वाचकांसमोर ठेवते. त्यातून मराठी वाचकांना हे पुस्तक पुराणातील अनुभव देण्यासोबतच आधुनिक दृष्टी देईल. आजच्या काळात महाभारतातील पात्रांशी काही संबंध शोधण्याचा प्रयत्न करेल. कॉर्पोक्षेत्र यातील कथा ज्या रंजक शैलीने आणि विनोदीपद्धतीने मांडतानाच युवकांचा विचारप्रवाह बदलू शकेल इतकी सामथ्र्यशाली आहे. महाभारताची आधुनिक ही गाथा मनोवेधक आहे. -दीपक कुलकर्णी ...Read more