* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LIFE OF A HUMAN BEING, SO VERY COMPLICATED, A VERY COMPLEX PROCESS INVOLVING VARIOUS RELATIONSHIPS, FEELINGS, EMOTIONS AND EVENTS, NEVER IMAGINED BEFORE. SOME OF THE RELATIONS CREATE HARDLY ANY BONDING BETWEEN TWO PEOPLE WHILE SOME WEAVE TOGETHER FOREVER, AT THE BASE OF THE HEART. SOMETIMES, YOU GET TO KNOW SOMEBODY BETTER AFTER MANY YEARS AND THEN.... THIS BOOK IS BASED ON THE RELATIONSHIP OF A FATHER AND HIS TWO CHILDREN. THE FATHER WHO HAS FALLEN A VICTIM IN THE HANDS OF DESTINY; THE SON WHO HAS FULFILLED HIS DUTY OF BEING A SON BY OFFERING HIMSELF NOT SAYING ANYTHING, NOT COMPLAINING ABOUT ANYTHING, AND THE DAUGHTER WHO HELPS TO ACHIEVE THE SET TARGET, NOT BACKING AT ANY POINT. SUDHA MURTI`S EMOTIONAL, THOUGHTFUL WRITING WITH A NEW DIMENSION....
माणसाचं आयुष्य ही एक अजब गुंतागुंत! नात्यांची, भावनांची आणि अतर्क्य घटनांची! काही नाती कोणतेही भावबंध निर्माण न करणारी, तर काही नकळत नात्यांचे बंध उरात जपणारी! काळाचा दीर्घ पडदा सरून गेल्यानंतरही एका अनोख्या नात्याची ओळख होते. मग... नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदारी स्वत:चं अर्घ्य देऊन पूर्ण करणाया कर्तव्यशील पुत्राचं अस्वस्थपण... आणि त्या पूर्ततेसाठी खंबीर उभी राहिलेली कन्या, यांचं अतूट नातं जपणारी पितृऋण! सुधा मूर्ती यांच्या वैचारिक, भावनाप्रधान लेखणीचा नवा आविष्कार!

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarPawan Chandak

    सुधा मूर्तीच्या सर्वच कथा या मानवी मूल्यांवर आधारित व त्या कथेतून सकारात्मक संदेश व शिकवण देऊन जातात. अशीच ही एक कथा `पितृऋण`. बेंगलोर मध्ये एक कुटुंब राहत असते. वेंकटेश नावाचे ज्येष्ठ व्यक्ती त्या कुटुंबातील एक जबाबदार सहृदय अत्यंत शांत व सदै इतरांना मदत कारणारा स्वभाव असणारे गृहस्थ जे SBI मध्ये नोकरी करतात. तर त्याच विरुद्ध स्वभावाची त्यांची पत्नी शांता की अत्यंत व्यवहारी जिला नेहमीच व्यवहार, पैसा गुंतवणे, शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग, महिला मंडळ लेडीज पार्टी आदीत आवड सोबत प्रतिष्ठा वगैरे प्रिय. त्यांना 2 मुले मुलगा रवी सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केलेला आई प्रमाणेच व्यवहारी तर मुलगी गौरी MBBS करून स्त्रीरोगतज्ज्ञ चे शिक्षण सुरू आणि भविष्यात स्त्रीरोगतज्ज्ञ होऊन रुग्णांची सेवा हेच तिचे ध्येय, वडीलांप्रमाणे तिचा स्वभाव मनमिळाऊ, शांत, इतरांना मदतीसाठी सदैव तत्पर. एकदा वेंकटेश यांची बदली हुबळी येथे होते तिथे ते गौरी ची मैत्रीण पाटील यांच्या घरी किरायदार म्हणून राहू लागतात. एकदा एका मुंजच्या कार्यक्रम निमित्त शिग्गावी जातात केंव्हा अनेक जण त्यांना शंकर मास्तर समजून आवाज देतात, एकदा घोळ होऊ शकतो पम तीनदा ... ते म्हणतात ना जगात एकाच प्रमाणे दिसणाऱ्या 7 व्यक्ती असू शकतात. पण एकाच गावात 3 लोक त्यांना शंकर मास्तर म्हणून हाक मारतात म्हणून मग शोध सुरू होतो. शंकर मास्तर कोण आहेत त्याचा.....त्यांना जाऊन वेंकटेश भेटतात.....तिथे शंकर मास्तरांची मुलगी देखील वडील समजून हाक मारते.....मग दोघांची चर्चा कुटुंबविषयी....शंकर मास्तरांचे कुटुंब अत्यंत साधे दारिद्र्यात परंतु स्वाभिमानाने जीवन जगत असतात. वेंकटेश यांचा शोध त्यांना शंकर मास्तर यांच्या मूळ गावी शिशुनाळ ला पोहोचतात तिथे त्यांची भेट शंकर मास्तरांची आई भागव्वा शी भेट होते. आणि वेंकटेश यांना श्राद्ध पूजेतून पीत्रांचे स्मरण करतांना आपल्या पूर्वजांच्या नावाशी साम्य दिसल्यावर मग ते रहस्य जाणून घेण्यासाठी ते भागव्वा ला विनंती करतात. भागव्वा कडून त्यांना त्यांच्या वडील सेतुमाधवराव विषयीच्या पूर्वायुष्याची कहाणी, त्यात गैरसमज व नियतीने घेतलेल्या कठीण परीक्षा, परिस्थिती सर्व गोष्टी तुटक तुटक उलगडत जातात. या सर्व कठीण परिस्थितीत आपल्या आज्जीच्या स्वभावामुळे, गुंडप्पा, गावातील लोकांच्या बोलणे, गैरसमज आदींमुळे भागव्वा व शंकरराव वर ओढवलेली आर्थिक परिस्थिती, अवेळी आलेले वैधव्य, केशवपन ........ नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदारी स्वतःचे अर्घ्य देऊन पूर्ण करणाऱ्या कर्तव्यशील पुत्र वेंकटेश याचे अस्वस्थपन या कादंबरीत पावलोपावली दिसून येते. आता खरी भूमिका नायक वेंकटेश यांची ही परिस्थिती जाणून घेतल्यावर वेंकटेशराव आपल्या वडिलांचे पितृऋण अर्थात भागव्वा व शंकर च्या प्रति त्यांची असलेली जबाबदारी व पितृऋण फेडण्यासाठी काय भूमिका घेतात ? अत्यंत व्यवहारी अशी त्यांची पत्नी शांता व मुलगा रवी त्यांना हे पितृऋण फेडण्यासाठी साथ देईल का ? मुलगी गौरी तिच्या वडिलांचे पितृऋण हे आपलेच समजून ते पूर्ण करण्यासाठी काय भूमिका घेईल..... मानवी भावना, मूल्यांची जपवणूक शिकवणारी अशी ही कादंबरी पितृऋण नक्कीच आपण सर्वांनी एकदा तरी वाचावी. वाचक: डॉ पवन चांडक ...Read more

  • Rating StarShivraj Aarati Vishwasrao Juvekar

    सुधा मूर्ती यांचं आणखीन एक अफलातून पुस्तक. ८७ पाने मनात घर करून जातात. काल वाचायला घेतले आज पूर्ण झाले.

  • Rating StarRajesh Latpate

    नियतीचा बळी ठरलेल्या वडिलांची जबाबदारी स्वतःच अर्घ्य देऊन पूर्ण करणाऱ्या कर्तव्यशील पुत्राचं अस्वस्थपण. आणि त्या पूर्ततेसाठी खंबीर उभी असलेली कन्या, यांचं अतूट नातं जपणारी `पितृऋण` ! कन्नड भाषेतील सुधा मूर्ती यांच्या `RUNA` या कादंबरीचे मराठीतील `पितृऋण` हे भाषांतर वाचण्यात आले. काळाच्या पडद्याआड गेलेल्या अतर्क्य घटना दीर्घ कालावधी नंतर समजतात आणि माणसांच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत वाढत जाते. वडिलांच्या हाताने झालेल्या अपरित घटना जेव्हा मुलाला कळतात तेव्हा अस्वस्थ होऊन त्याची जबाबदारी स्वतः वर घेत त्यासाठी धरपड करणारा व्यंकटेश जेव्हा हातास होऊन जगत असतो आणि घरात सगळं काही असताना जुन्या नात्याला काहीही मदत करू शकत नाही त्यावेळी त्याला समजवणारी आणि खंबीर उभी राहिलेली त्याची मुलगी गौरी नात्याचं बंधन जपण्यासाठी वडीलांना ज्याप्रकारे साथ देते त्याच चित्र मनाला हेलावणारे आहे. वडीलांवर मुलगी ज्याप्रमाणे प्रेम करते, त्यांना समजून घेते त्याच अप्रतिम चित्रण मनाला भिडते. नात्यातील एका बाजूला वाढत गेलेला दुरावा आणि दुसऱ्या बाजूला आजही जिवंत असलेली भावनिकता `पितृऋण` त सुधा मूर्ती यांनी अप्रतिम मांडणी केली आहे ज्यात वैचारिक आणि भावनिक दोन्हीचा संगम करून आजच्या घडीचे वास्तविक चित्र आपल्या समोर उभं केलंय. ...Read more

  • Rating StarNeeta Kuvalekar

    सकारात्मक प्रेरणादायी पुस्तके सुचवा

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more