DHRUV BHATT

About Author

Birth Date : 08/05/1947

DHRUV BHATT WAS BORN ON 8 MAY 1947 IN NINGALA VILLAGE OF BHAVNAGAR STATE (NOW BHAVNAGAR DISTRICT, GUJARAT) TO PRABODHRAY BHATT AND HARISUTA BHATT. HE STUDIED AT VARIOUS PLACES, STANDARD 1 TO 4 AT JAFRABAD AND MATRICULATION FROM KESHOD. AFTER STUDYING COMMERCE FOR TWO YEARS, HE LEFT FURTHER STUDYING[1] IN 1972 AND JOINED GUJARAT MACHINE MANUFACTURERS AS SALES SUPERVISOR. HE VOLUNTARY RETIRED AND STARTED WRITING CAREER.

आशयघन, गूढरम्य कविता आणि मोजक्याच; पण अत्यंत अर्थपूर्ण कादंबऱ्या लिहिणारे ध्रुव भट्ट हे गुजराती साहित्यात थोड्याच वर्षांमध्ये एक महत्त्वाचे, अग्रगण्य लेखक म्हणून प्रसिद्ध झाले. समुद्रान्तिक (मराठी अनुवाद : सागरतीरी) ही त्यांची पहिलीच कादंबरी अनेक पुरस्कार मिळवून गेली आणि त्यानंतरच्या तत्त्वमसिला तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानंतर आली आणखी एक वेगळीच कादंबरी अतरापी, आणि प्रस्तुत अकूपार ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली. कदाचित ही त्यांची आत्तापर्यंतची सर्वांत चांगली कादंबरी म्हणता येईल, कारण ती वाचकांना एका वेगळ्याच वातावरणातील, मन गुंतवून ठेवणारी कथा तर देतेच; पण त्याचबरोबर पर्यावरण, मनुष्य आणि इतर प्राणी ह्यांच्यामधील संबंध ह्यांविषयी विचार करायला लावते. त्यांचा खास असा एक गूढधागा कथेत मिसळलेला आहे. ध्रुव भट्टांच्या कादंबऱ्याचं एक वैशिष्ट्य हे की, त्यांमध्ये कथानायक स्वत:च कथा सांगतो, परंतु त्याचं नाव शेवटपर्यंत समजत नाही. आणि दुसरं वैशिष्ट्य हे की, ज्या प्रदेशातील कथा ते सांगतात, तेथे स्वत: जाऊन, राहून, अनुभव घेऊन, मगच लिहितात. गीर अभयारण्यात माहिती गोळा करायला गेलेले भट्ट पतिपत्नी एक लहानसं घर बांधून काही महिने तेथेच राहिले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 8 of 8 total
AKOOPAR Rating Star
Add To Cart INR 300
ATARAPI Rating Star
Add To Cart INR 160
27 %
OFF
DHRUV BHATT COMBO SET - 7 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1830 INR 1329
KARNALOK Rating Star
Add To Cart INR 320
PRATISHRUTI SMARANYATRA BHISHMANCHI Rating Star
Add To Cart INR 330
SAGARTIRI Rating Star
Add To Cart INR 160
TATVAMASI Rating Star
Add To Cart INR 240
TIMIRPANTHI Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर