APARNA VELANKAR

About Author

Birth Date : 01/10/1968


THE LEADING NAME IN THE FIELD OF MARATHI TRANSLATION! AWARDED SAHITYA AKADEMI AWARD FOR MARATHI TRANSLATION OF ARUNDHATI ROYS NOVEL THE GOD OF SMALL THINGS. ACCLAIMED WRITER SHOBHA DEY IS CREDITED WITH PASSIONATELY CONNECTING WITH HER MARATHI ROOTS. MARATHI TRANSLATIONS OF SHOBHA DES BOOKS SELECTIVE MEMORY, SPEED ​​POST AND SPOUSE ARE PARTICULARLY POPULAR.

मराठी अनुवादाच्या क्षेत्रातले आघाडीचे नाव! अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमी च्या पुरस्काराने सन्मानित. शोभा डे या ख्यातनाम लेखिकेला तिच्या मराठी मुळांशी उत्कटतेने जोडण्याचे श्रेय. शोभा डे यांच्या सिलेक्टिव्ह मेमरी , स्पीड पोस्ट आणि स्पाऊज् या पुस्तकांचे मराठी अनुवाद विशेष लोकप्रिय. युद्धग्रस्त अफगाणिस्तानातले उद्ध्वस्त बालपण नशिबी आलेल्या मुलांची फरफट शब्दबद्ध करणाऱ्या ब्रेडविनर , परवाना , शौझिया (डेबोरा एलिस) या तीन पुस्तकांचा अनुवाद प्रसिद्ध. फॉर हिअर, ऑर टू गो? हे पहिले स्वतंत्र पुस्तक. उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सिअ‍ॅटल येथील अधिवेशनात प्रसिद्ध. ६०-७० वर्षांपूर्वी महासागर ओलांडून उत्तर अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांच्या पाऊलखुणा शोधणाऱ्या, परभूमीवरचा त्यांचा संघर्ष-कष्ट-झळाळते यश आणि एकाकी अपयश शब्दबद्ध करणाऱ्या या संशोधनाला उदंड लोकप्रियता. गेल्या तीन वर्षांत सहा आवृत्त्या प्रसिद्ध! संशोधन, लेखन आणि जाहीर कार्यक्रमांच्या निमित्ताने उत्तर अमेरिकेत विपुल प्रवास व वास्तव्य. पेशाने पत्रकार. सुमारे २० वर्षे पत्रकारितेत सक्रिय. लोकमत वृत्तपत्रसमूहात फीचर्स एडिटर म्हणून कार्यरत.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
FOR HERE OR TO GO? Rating Star
Add To Cart INR 295
IMAGINING INDIA Rating Star
Add To Cart INR 995
LADIES COUPÉ Rating Star
Add To Cart INR 600
SELECTIVE MEMORY Rating Star
Add To Cart INR 440
SHANTARAM Rating Star
Add To Cart INR 995
SPEEDPOST Rating Star
Add To Cart INR 380
THE GOD OF SMALL THINGS Rating Star
Add To Cart INR 425

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more