* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHROMOSOME-6
  • Availability : Available
  • Translators : VAISHALI JOSHI
  • ISBN : 9788177660845
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 512
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CHROMOSOME 6 IS A PROPHETIC THRILLER THAT CHALLENGES THE MEDICAL ETHICS OF GENETIC MANIPULATION AND CLONING IN THE JUNGLES OF EQUATORIAL AFRICA, WHERE ONE MISTAKE COULD BRIDGE THE GAP BETWEEN MAN AND APE--AND FOREVER CHANGE THE GENETIC MAP OF OUR EXISTENCE...
शरीरात परक्या पदार्थाचा प्रवेश झाला तर त्याला कडाडून विरोध करायचा, हे याचं कार्य असतं. अडचण अशी होती, की एम्एच्सी हा क्रोमोझोम्-६ च्या छोट्या भागातील फारच छोटा भाग होता. त्यामध्ये आम्लारींच्या लक्षावधी जोड्या असलेल्या कितीतरी रिकाम्या जागा होत्या. या जागांमध्ये इतर शेकडो जनुकं होती. या जनुकांचं कार्य काय आहे, ते केविनला अजिबात ठाऊक नव्हतं. ते जाणून घेण्यासाठी त्यानं अलीकडेच इंटरनेटवर चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला मिळालेली उत्तरं फारच मोघम आणि असमाधानकारक होती. बऱ्याच संशोधकांचं म्हणणं असं होतं, की क्रोमोझोम्-६ च्या छोट्या भागामध्ये स्नायू आणि हाडांच्या वाढीशी संबंधित अशी जनुकं आहेत. पण यापलीकडे आणखी काही माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKAKIBAND #THEWHISTLEBLOWER #एकाकीबंड #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SINDHUJOSHI #KATHRYN BOLKOVACCARILYNN "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 06-05-2001

    उत्क्रांतीवादाला धक्का देणारी रहस्यमय कादंबरी... माकडे, उंदीर, घोडे वगैरेसारख्या प्राण्यांचे मानवावर मुख्यत: वैद्यकीय क्षेत्रात अनंत उपकार आहेत. अनेक प्रकारची औषधे, लशी, प्रतिजैविके ही एकतर प्राण्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या घेतलेल्या चाचण्यांरून बनविली आहेत. याच क्षेत्रात क्रोमोसोम्स म्हणजे रंगसूत्रांवरील जनुके आणि सूक्ष्मात सूक्ष्म अशा प्रथिनांच्या संशोधनावर भर दिला जात आहे. अशाच प्रकारच्या संशोधनात माणसाच्या शरीरातील विशिष्ट क्रोमोसोम्सवरील जनुके शोधून, ती एका जागेवरून दुसरीकडे किंवा एखाद्या प्राण्याच्या शरीरात फलित स्त्रीबीजांमार्फत हलविणे आणि मग त्या प्राण्याच्या वाढीनंतर आरोपण करणे, या विशिष्ट पद्धतीने पेशीसमूह जुळवून घेऊन माणसाचे शरीर त्या अवयवाचा सहजगत्या स्वीकार करते, या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर ‘क्रोमोझोम - ६’ ही इंग्रजी कादंबरी आधारित आहे. गुन्हेगारी विश्वातील एक कुविख्यात गुंड कार्लो फ्रॅंकोनीचा खून होतो. त्याचा मृतदेह न्यूयॉर्कमधील सहकारी शवागारात आणल्यानंतर अचानकरीत्या बेपत्ता केला जातो. काही दिवसांनी पाण्यावर तरंगत असलेला एक मृतदेह आणला जातो. त्याच्या शवविच्छेदनानंतर छिन्नविछिन्न केलेल्या यकृताचा शस्त्रक्रिया केलेला एक भाग गुन्हेगारी रोगनिदान तज्ज्ञ डॉ. जॅक स्टेपलटन आणि डॉ. लॉरी मॉन्टगोमेरी यांना आढळतो. त्यासंबंधी त्यांना काही वेगळेच वाटून, ही जोडगोळी या यकृताच्या अनेक चाचण्या घेते. त्याचे उलटसुलट निष्कर्ष निघून शेवटी ते कोठल्यातरी माकडाचा तो झीनोग्राफ्ट असल्याचा तर्क करतात. पोलिसांच्या साहाय्याने धागेदोऱ्यांचा शोध घेत ही जोडगोळी शेवटी आफ्रिका खंडातील इक्वेटोरियाला गिनीमधील कोगो शहरात पोहोचते. याच वेळेस या कोगो शहरातील जेनेनिस या जीव-तंत्रज्ञान कंपनीच्या प्रयोगशाळेतील रेण्वीय जीवशास्त्रज्ञ केविन मार्शल यकृत रोपणाकरता ‘बोनोबो’ जातीच्या एप्स माकडांचा उपयोग करून, त्या माणसाची एक प्रतिकृतीच (किमेरो) तयार होते आणि असे अनेक बोनोबो कोगोजवळील इस्ला फ्रॅन्सेस्का या निर्जन, अस्पर्श जंगल असलेल्या बेटावर सोडले जातात. पण या बोनोबोंबद्दल केविनला वेगळाच संशय येऊ लागतो. शेवटी तो आणि जेनेसिसमधल्या मेलनी आणि कँडेससह तिसऱ्या प्रयत्नांत यशस्वीपणे त्या बेटावर पोहोचतात. केविनची भीती व्यर्थ ठरत नाही. आग निर्माण करणारे, हत्यारे बनवणारे, असे हे बोनोबो म्हणजे ५० लाख वर्षांपूर्वीचे आदिमानव तयार झालेले असतात. हे सर्व अमानवी भयंकर असे घडते. पुन्हा एकदा ही जोडगोळी आणि न्यूयॉर्कवरून आलेली डॉक्टर मंडळी त्या बेटावर कसे पोहोचतात, त्या बोनोबोचे पुढे काय होते, हे रहस्य नक्कीच वाचण्यासारखे आहे. रोमांचकारी घटना वेगाने घडत जातात त्यामुळे वाचण्यातली उत्सुकता पानागणिक वाढतच जाते आणि शेवटी पुढे काय होणार, ही उत्कंठा कायम राहते. इतकी प्रभावी कादंबरी मूळ इंग्रजी लेखक डॉ. रॉबिन कुक यांनी साकारली असून, त्याचा मराठी अनुवाद वैशाली जोशी यांनी तितक्याच प्रभावीपणे आणि समर्थपणे ओघवत्या भाषाशैलीत वाचकांपुढे उभा केला आहे. भौगोलिक परिस्थितीचे भान यावे म्हणून इक्वेटोरियल गिनी आणि कोगोचे नकाशे दिले आहेत आणि एक इंग्रजी-मराठी शब्दसूचीही दिली आहे. पाश्चात्त्य लेखकांनी अनेक वैज्ञानिक कल्पना लढवून यंत्रमानव, परग्रहावरील विश्व, अशा कथा-कादंबऱ्या पूर्वीच लिहिल्या आणि त्या गोष्टी आज आपण प्रत्याक्षात खऱ्या झालेल्या पाहतो आहोत. एके काळी अशक्य असणाऱ्या मनावी जनुकांचा आराखडा आत पूर्णपणे बनविल्याचा क्रांतिकारक शोध नुकताच लागला आहे. त्याच धर्तीवर या क्रोमोझोम - ६ कादंबरीतील वैद्यकीय अमानवी कल्पना नजीकच्या भविष्यात खऱ्या ठरू शकतात याची भीतीयुक्त जाणीव पदोपदी होत राहते. -डॉ. अनिल महाबळ ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (YUVA)

    अमेरिकेत ‘बेस्टसेलर’ कादंबऱ्या म्हणजे एक मोठंच प्रकरण आहे. एखादा चित्रपट यशस्वी होण्यासाठी जसे त्याच्यात काही विशिष्ट घटक आवश्यक असतात. तसंच या कादंबऱ्यांचंही असतं आणि चित्रपट किती धंदा खेचतोय याचा जसा दर आठवड्याला आढावा घेण्यात येतो. आदल्या महिन्यातजास्तीत जास्त खपलेल्या पहिल्या दहा पुस्तकांची नावं जाहीर करण्यात येतात. तीच ‘बेस्टसेलर लिस्ट.’ या कादंबऱ्यांमधला विषय अगदी नवा असतो. लेखकाने वर्णन केल्या जाणाऱ्या विषयाचा अगदी सखोल अभ्यास केलेला असतो आणि त्याचं कथानक अत्यंत गतिमान असतं. वाचक गुंतून राहील असं घट्टपणे कथानक बांधलेलं असतं. शिवाय बाकी हमखास यशस्वी मसाला असतोच. पण म्हणजे मसाला हा चटकदारपणासाठी असतो. मुख्य विषयावर लेखकाने प्रचंड मेहनत घेतलेली असते. म्हणून मग त्या कादंबऱ्या जगभर तुफान खपतात आणि लेखकाला श्रीमंत बनवतात. जेफ्री आर्चर, हेरॉल्ड रॉबिन्स, मारिओ पुझो, फ्रेडरिक फोरसिथ, मायकेल क्रायटन हे सध्याचे बेस्टसेलर लेखक आहेत. त्यांच्याच पंक्तीतलं आणखी एक नाव म्हणजे रॉबिन कुक. स्वत: निष्णात डॉक्टर आहेत. साहजिकच त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये वैद्यक शास्त्रीय विश्वातले विषय भन्नाटपणे हाताळलेले असतात. ‘क्रोमोझोम-६’ ही डॉ. रॉबिन कुक यांची अशीच एक भन्नाट कादंबरी. जेनेटिक्स किंवा जनुकशास्त्र या विषयात वाचकाला आरपार घुसवणारी, खिळवून ठेवणारी. डी.एन.ए. हा शब्द आपल्याला माहीतच आहे. व्यक्तीची सगळी आनुवंशिक माहिती डी.एन.ए.मध्ये सांकेतिक भाषेत साठवलेली असते. हे डी.एन.ए. ज्यांच्यामध्ये असतं अशा प्रत्येक पेशीतील लांबट आकाराच्या रचना किंवा समजुतीसाठी म्हणूया डी.एन.ए.च्या डब्या म्हणजे क्रोमोझोम किंवा गुणसूत्रं. गुणसूत्रं एकूण सेहेचाळीस असतात आणि ती नेहमी जोड्यांमध्ये असतात. माणसामध्ये आणि मानवसदृश वानरांमध्ये गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात. सध्या अवयवारोपणाच्या शस्त्रक्रिया सर्रास केल्या जातात. पण अनेकदा रुग्णाचं शरीर तो आरोपित अवयव नाकारलं. कारण त्याच्या शरीरासाठी तो अवयव ही ‘फॉरिन बॉडी’ असते. मग शस्त्रक्रिया फुकट जाते. डॉ. केविन मार्शल या मॉलिक्युलर बायोलॉजी तज्ज्ञाला यावर एक उपाय सुचतो. प्रत्येक माणसाचीच एक प्रतिकृती बनवायची. प्रतिकृतीमधली सगळी गुणसूत्रं ही मूळ व्यक्तीशी मिळतीजुळतीच ठेवायची. म्हणजे मूळ व्यक्तीला गरज लागेल तेव्हा प्रतिकृतीतला अवयव काढून त्याचं आरोपण करता येईल. मूळ व्यक्तीचं शरीर ‘फॉरिन बॉडी’ म्हणून तो नाकारणार नाही. कल्पना तर अफलातून असते. पण ती प्रत्यक्षात उतरवायची कशी? प्रत्येक माणसाची प्रतिकृती घडवायची कशी? निसर्ग हा असा महान शास्त्रज्ञ आहे की दोन जुळी भावंडं देखील तो निराळी घडवतो. डॉ. केविन मार्शलचं यावरचं संशोधन असं की, चिपांझी वानरांमधल्या बोनोबो या जातीमध्ये मानवी शरीरातील क्रोमोझोम-६ आरोपित करायचा. म्हणजे उदाहरणार्थ, एका बोनोबो नराच्या शरीरातला मूळ क्रोमोझोम-६ काढला आणि डॉ. केविन मार्शलच्या शरीरातला क्रोमोझोम-६ तिथे घातला की, तो नर म्हणजे केविनची प्रतिकृती झाली. भविष्यात केव्हाही केविनला एखादा अवयवाची गरज पडली की, त्या नराच्या शरीरातला हवा तो अवयव काढून त्याचं आरोपण केविनच्या शरीरात करता येईल. डॉ. रेमंड लियॉन्स नावाचा व्यापारी दृष्टीचा डॉक्टर केविनच्या संशोधनावर बेहद्द खूष होतो. त्याच्या दृष्टीने हे संशोधन म्हणजे सोन्याची खाण असते. आफ्रिका खंडातल्या इक्वेटोरियल गिनी या देशातलं घनदाट झाडीचं एक बेट निवडण्यात येतं. तिथे बोनोबो वानरांची वसाहत करण्यात येते. डॉ. केविन मार्शलला एक अत्याधुनिक, सुसज्ज प्रयोगशाळा उभारून देण्यात येते. जगभरातले धनिक स्त्री-पुरुषही डॉ. रेमंडची गिऱ्हाईकं असतात. भरपूर भाडं घेऊन त्या श्रीमंतांची प्रतिकृती निर्माण करणं हा डॉ. रेमंडचा शास्त्रीय धंदा बनतो. हे सारं वैज्ञानिक नितीमत्तेला सोडून असतं. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत गुप्त ठेवण्यात येतो. पण न्यूयॉर्कचा कुख्यात माफिया कार्लो फ्रॅंकोनी याचा खून होतो. त्याचं प्रेत शवागारातून अचानक गायब होतं. परत सापडतं तेव्हा त्या प्रेताचं यकृत छिन्नविछिन्न केलेलं असतं. शवविच्छेदनात तज्ज्ञांना आढळतं की, हे यकृत मूळचं नाही, आरोपित केलेलं आहे. इथून शोधाला सुरुवात होते आणि कथानक डॉ. जॅक स्टेपलटन, डॉ. लॉरी मॉनृगोमेरी, डॉ. केविन मार्शल आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह इक्वेटोरियल गिनीच्या दाट जंगलात घुसतं. शेवट अर्थातच गोड होतो. पण त्या शेवटपर्यंत डॉ. रॉबनि कुक वाचकाला असं काही थरारून टाकतात की, पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. विज्ञानाच्या उपयोगातून माणूस अधिक शहाणा, अधिक जबाबदार बनण्याऐवजी तो अधिकाधिक लोभी बनत चाललाय, पैशासाठी तो अन्य सजीवांच्या आणि अन्य मानवांच्या जिवाशीही खेळ सुरू लागलाय. हे अत्यंत घातक आहे. हा भस्मासूर उलटला तर संपूर्ण मानवजातच धोक्यात येऊ शकते, या वास्तवाचं भान वाचकाला या कादंबरीतून येतं. कोणत्याही उपदेशाचे डोस न पाजता कादंबरीतून हा संदेश वाचकांपर्यंत पोचणं हेच डॉ. रॉबिन कुक याचं यश आहे. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 27-05

    वाचकांसाठी एक वेगळे दालन… निसर्गचक्र आपल्या हाती ठेवण्याचे प्रयत्न विविध संशोधनांच्या निमित्ताने मानवाने सुरू केले आहेत. जिनोम प्रकल्पाच्या यशानंतर आता या प्रकल्पाच्या नैमिकतेविषयी जगभरात प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. मानव निसर्गचक्रात आता खूपच ढवळढवळ करू लागल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. आपल्याला हवा तसा माणूस जन्माला घालण्यातही कदाचित येत्या काही वर्षांमध्ये मानवाला यश येईल. अशी शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर मानवाच्या या कारवायामुळे यात काय होऊ शकते, याचा एक रोमांचकारी अनुभव देणारी क्रोमोझम् – सिक्य ही कादंबरी विख्यात लेखक डॉ. रॉबिन कुक यांनी लिहिली असून मेहता पब्लिशिंगने सुरू केलेल्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या अनुवाद प्रकल्पाअंतर्गत त्याचा मराठी अनुवादही सादर करण्यात आला आहे. हा मराठी अनुवाद वैशाली जोशी यांनी केला आहे. कादंबरीला सुरुवात होते ती कुख्यात गुंड कार्लो फ्रॅंकोनी याच्या हत्येपासून. या हत्येनंतर त्याचा मृतदेह सरकारी शवागरातून गायब केला जातो. हे प्रतिस्पर्धी गुंड टोळीचे काम असावे, असा कयास सुरुवातीस व्यक्त केला जातो. मात्र या सरकारी शवागारात काम करणारा गुन्हेगारी रोगनिदान तज्ज्ञ डॉ. जॅक स्टेपलटन आणि त्यांची सहकारी डॉ. लॉरी मॉन्टगोमेरी या प्रकरणाचा पिच्छा पुरवितात आणि एका वेगळ्याच व्यापारी कटाचा पर्दाफाश होतो. सरकारी शवागाराला एक मृतदेह सापडतो, ज्याची ओळख पटणे खूपच कठीण असते. त्या मृतदेहामध्ये यकृतारोपण केलेले असते. मात्र अवयवारोपणानंतर तो नवा अवयव शरीराने स्वीकारावा यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा मागमूसही त्या मृतदेहात सापडत नाही. यामुळे सारेच चक्रावून जातात. विविध चाचण्यानंतर तो छिन्नविच्छन्न मृतदेह फ्रॅंकोनीचाच असल्याचे स्पष्ट होते. असे लक्षात येते की, कदाचित विषुवृत्तावरील घनदाट अरण्यात इक्वेटोरियन गिनीमध्ये या घटनेचे मूळ असावे. डॉ. जॅक व डॉ. लॉरी दोघेही तेथे पोहोचतात आणि त्यांना धक्कादायक उलगडा होतो. या कादंबरीचे कथानक दोन समांतर पातळ्यावर पुढे सरकते. दुसरी समांतर पातळी आहे ती, केविन मार्शलशी संबंधित. त्याने हिस्टोकॉपोबिलीटी या विषयावर केलेले संशोधन पाहून डॉ. रेमंडच्या मनात एक वेगळी कल्पना येते. बोनोबो जातीच्या माकडांमधील गुणसूत्रात अवयवारोपण करावाच्या व्यक्तीतील क्रोमोझोम सिक्सचा भाग घालून नवीन माकडाची निर्मिती केली जाते. हे नवे बोनोबो माकड म्हणजे त्या माणसाची दुसरी प्रतिकृतीच असते. दोन ते तीन वर्षांत हे माकड पूर्णपणे वाढल्यानंतर त्याचे वर्षांत हे माकड पूर्णपणे वाढल्यानंतर त्याचे अवयव काढून रुग्णाच्या शरीरात त्याचे रोपण केले जाते. ते त्याच्या प्रतिकृतीचेच रोपण असल्यामुळे रोपण टिकण्यासाठीची औषधे घ्यावी लागत नाहीत. या माकडांच्या व्यवस्थेचा खर्च मोठा असल्याने केवळ श्रीमंत व्यक्तींनाच त्याचा लाभ घेता येतो. ज्या डॉक्टरांकडे श्रीमंत व्यक्ती येतात, त्यांना यात सहभागी करून घेऊन ‘जेनिसिस’ या कंपनीकडून इक्वेटोरियन गिनीमध्ये हा प्रकल्प राबविला जातो. ढोबळ मानाने हेच कादंबरीचे कथानक असले तरी मध्यवर्ती कल्पना असलेल्या बोनोबो माकडांची वर्तणूक आणि त्यामुळे केविन मार्शलला आलेली शंका यामुळेच कादंबरीला कलाटणी मिळते. माणसाचे गुणसूत्र असलेल्या माकडाची निर्मिती करता करता असा काही तरी घोटाळा होतो की केविन मार्शल व त्याची सहाय्यक मेलिनी यांच्याकडून पूर्णरूपात येणाऱ्या मानवापूर्वीची वानर-मानवाची निर्मिती होते. संघटितपणे रहाणे, आगीचा वापर करणे, शस्त्रांचा वापर करणे या बाबींमुळे ही शंका खरी असल्याचे लक्षात येते. त्यामुळे हा प्रकल्प बंद करावा, असे केविनचे मत असते. मात्र मोठाल्या फायद्यामुळे डॉ. रेमंड आणि त्याच्या सहकाऱ्यांना तो बंद करायचा नसतो. यातच केविन मार्शलचे धाडस आणि त्याच वेळेस डॉ. जॅक आणि त्याच्या सहप्रवाशांचे तिथे पोहोचणे, योगयोगाने एकाच वेळेस होते. या सर्वांना यमसदनी धाडण्याचाच जेनेसिसच्या मुख्य सुरक्षा रक्षकाचा विचार असतो. मात्र एकमेकांच्या मदतीने हे सारेजण निसटतात आणि जाता जाता बोनोबोंनाही विषुवृत्तीय जंगलात सोडून देतात. तब्बल ५२० पांनाच्या या कादंबरीत तीन ते चार ठिकाणीच केवळ शास्त्रीय माहिती मोठ्या प्रमाणावर येते. तिथे कदाचित सामान्य माणसाला वाचताना कंटाळा येऊ शकतो. मात्र ज्याला विज्ञानकथा वाचण्याची सवय आहे. त्याला हा भाग समजून घेण्यात अधिक मजा वाटू शकते. कारण संपूर्ण कादंबरीचे तेच मूळ आहे. त्याच कल्पनेवर पूर्ण कादंबरी घेतलेली आहे. दोन समांतर पातळ्यांवर केलेली कादंबरीची रचनाही उत्तम झाली आहे. त्यामुळे कादंबरीच्या वेगातही समतोल राखण्यात लेखकाला यश आले आहे. कादंबरीच्या अगदी मध्यापर्यंत वाचकाची उत्सुकता टिकवून ठेवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. त्यानंतर बोनोबोंचे गूढ उकलते तरीही पुढे काय हा प्रश्न वाचकाच्या मनात राहतोच. कादंबरीचा शेवट ज्या वेगात करण्यात आला आहे. तो मात्र काहीसा खटकणारा आहे. कादंबरीतील घटना अतिशय वेगात घडत असल्या तरी कादंबरी मात्र तितकी वेगात पुढे जात नाही. यात वावगे काहीच नाही. मात्र हा वेग कादंबरीच्या अंतिम टप्प्यात म्हणजे केविन मार्शल आणि डॉ. जॅक व सहप्रवाशांच्या अटकेजवळ अचानक वाढतो. कादंबरी लवकर संपविण्याच्या घाईच लेखकाला झाली आहे की काय अशी शंका यावी इतपत हा वेग वाढला आहे. मराठी अनुवादाबाबत बोलायचे तर अनुवाद चांगला उतरला आहे. आपण कोणत्या तरी एका कादंबरीचा अनुवाद वाचत आहोत अशी शंका वाचकाच्या मनात येणार नाही. ज्या वैज्ञानिक संकल्पनाचा उल्लेख कादंबरीत आहे. त्यातील महत्त्वाच्या संकल्पना शेवटच्या पानावर शब्दसूचीत देण्यात आल्या आहेत. विविध भाषांतील चांगल्या साहित्याचा अनुवाद आपल्या भाषेत आल्यास एक नवे दालन आपल्या वाचकांसमोर खुले होते, असे अनुवादाच्या बाबतीत नेहमीच म्हटले जाते. त्याचा प्रत्यय क्रोमोझोम् सिक्सचा हा अनुवाद वाचताना वाचकांना निश्चितच येईल. -विनायक परब ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more