* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172312
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GOSHTA DOTCOM ANI ITAR BODHKATHA:BHAG-3
९७ बोधकथांचा हा संग्रह म्हणजे संस्कारांची शिदोरीच आहे. या छोट्या छोट्या बोधकथांच्या शेवटी कथेतून काय बोध घ्यावा आणि त्यासाठी कोणता संकल्प करावा हेदेखील मुलांना सांगितले आहे. लहान वयात मुलांच्या कोवळ्या मनावर जे संस्कार होतात, ते पुढे दीर्घ काळ टिकवून राहतात. मुलांच्या कोवळ्या मनावर ज्ञानदा नाईक यांच्या या बोधकथा नक्कीच प्रभाव पाडतील. या कथांमधून नम्रता, सहकार्य, विश्वास, संयम, आदर, प्रामाणिकपणा यांसारखी मूल्ये बालकांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मित्र-मैत्रिणी, नातेसंबंध त्यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या बोधकथा त्यांनी लिहिल्या आहेत. या कथा सांगताना त्यांना परी, यक्ष, जादू अशा मुलांच्या कल्पनांमध्ये असणाऱ्या शब्दांचा छान वापर केला आहे. मुलांनी आपले स्वभावगुण ओळखावेत, डायरी लिहावी, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा, क्षमाशील व्हावे, चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात, निसर्गावर- प्राणिमात्रांवर प्रेम करावे असे संदेश या बोधकथा देतात. मनोरंजन आणि संस्कार यांचा सुरेख मेळ या कथांमधून ज्ञानदा नाईक यांनी घातला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#DNYANADANAIK #PRACHANDABHOPLYTLARAKSHASANIETERBODHKATHA #BALSAHITYA #SONUCHADHADA, #TALYAKATHCHIMAITRI #YAKSHACHEDHOLKE #AKSHADAANIHOSTEL #BICHARASHANTANU #AADITYACHAUNT, #RABRACHA MANUS, #GHABRATSAVNI #AMITCHAPILU #SHORTCUT #KUMARCHEAAJOBA #TAJELDARCANVAS #GURUSHISYAKATHA #BODHKATHA #CHATURYKATHA #ज्ञानदानाईक #प्रचंडभोपळ्यातलाराक्षसआणिइतरबोधकथा #बालसाहित्य #सोनूचाधडा #तळ्याकाठचीमैत्री #यक्षाचेढोलके #अक्षदाआणिहॉस्टेल #बिचाराशंतनू #आदित्यचाउंट #रबराचामाणूस #घाबरटसावनी #अमितचापिलू #शॉर्टकट #कुमारचेआजोबा #तजेलदारकॅनव्हास #गुरुशिष्यकथा #बोधकथा #चातुर्यकथा
Customer Reviews
  • Rating StarLOKMAT 2-6-2019

    लहानांसाठी गोष्टीरुप बोधकथा निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे लहान मुलांच्या कुतुहल बुद्धीने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात आणि त्यांच्याच भाषेत त्या मांडल्या तर बालवाचकांना मनापासून वाचायला आवडतात. याच नजरेतून मेहता पब्लिशिंग हाऊसने लहानांसाठ एक संचात्मक छोटेखानी पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे. त्यातीलच एक चार पुस्तकांचा संच ज्ञानदा नाईक यांनी लिहिला आहे. यात सोनूचा धडा आणि इतर बोधकथा, प्रचंड भोपळ्यातला राक्षस आणि इतर बोधकथा, तळ्याकाठची मैत्री आणि इतर बोधकथा, यक्षाचे ढोलके आणि इतर बोधकथा यांचा या संचात समावेश आहे. निसर्गात आपल्या स्वाभाविक प्रेरणांनी जगणार्या प्राणी, पक्ष्यांचे निसर्गाशी नातं अधोरेखित करताना या पुस्यकांतून त्यांच्या जगण्याशी मानवाच्या कृतीची एक सांगड घालून निसर्गसंवर्धनाच्या बाबीवर बोलका प्रकाश टाकला आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 20-05-2019

    मनोरंजनातून संस्कार... मुलांचं मन समजावून त्यांच्यावर संस्कार रुजवण्याचा मार्ग खरंतर कठीणच, पण लहान-लहान गोष्टीतून त्यांना पटेल, उमजेल अशा पद्धतीने समजावून सांगितलं, काय योग्य-अयोग्य यातला फरक सांगितला, तर मुलं स्वत:ला बदलतात. हाच धागा पकडून ‘गोष्ट ॉटकॉम’ अंतर्गत प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून चांगल्या गोष्टी मुलांच्या वागण्या-बोलण्यात, जगण्यात रुजवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखिका ज्ञानदा नाईक यांनी केला आहे. कुठल्यातरी स्वप्नवत राजा-राणी-पऱ्यांच्या गोष्टींच्या जगात अनेक मुलं रमतात. या पुस्तकांतही अशा मुलांना कुतूहल, गंमत वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण तरीही या कथा केवळ स्वप्नरंजन ठरत नाहीत. या व्यक्तिरेखा मुलांना आयुष्याचा धडा देऊन जातात. त्यातील चेटकीण भीतीतून निर्माण झालेली आहे, भुरळ घालणारी बाग प्रामाणिकपणाचं महत्त्व अधोरेखित करते, बोटाएवढी परी दुसऱ्याला मदत करण्याचा मार्ग दाखवते. तर बागेतले यक्ष एका नव्या दुनियेची ओळख करून देतात. प्रचंड भोपळ्यातला राक्षस इतरांना मदत करण्याची शिकवण देतो. यक्षाच्या ढोलक्यातून म्हणजेच कचाट्यातून बाहेर पडणारी तानु संकटावर मात करण्याची उर्मी देते. या कथांमध्ये आई-बाबा आहेत, त्यांच्यावर रागवणारी मुले आहेत, प्रेमळ आजी आहे, बहीण-भावामधील वाद आहेत. पण हे प्रत्येकाच्या घराचे चित्र किंवा रोज घडणारे प्रसंग कथेतून वाचताना मजा येते. या कथा शेवटी साहजिकच वेगळा दृष्टिकोन देऊन जातात. लहान मुलांना शिकवताना मोठ्यांकडून होणाऱ्या चुकाही लेखिकेने खुबीने मांडल्या आहेत. यात कामाच्या धावपळीत व्यग्र असणारे पालक, त्यांची मुलांना वेळ देऊ शकत नसल्याची तगमगही दिसते. तसेच बाबांचे प्रेमही काही कथांमधून सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहे. मित्र-मैत्रिणींच्या जिव्हाळ्याच्या, मस्तीच्या, वादाच्या, भांडणाच्या कथाही मजा आणतात. या कथांत आणखी एक मजेशीर दुनिया दिसते ती म्हणजे प्राण्यांची. पक्ष्यांचे, निसर्गाचे, मुक्या जिवांचे जगणे मांडण्यात आले आहे. त्यांना विनाकारण त्रास न देण्याचा धडा मिळतो. तसेच त्यांची काळजी कशी घ्यावी, हेही पटवून सांगितलं आहे. यात पाळीव प्राण्यांसोबत उंट, हत्ती, कासव, सरडा असे प्राणीही भेटतात. काही कथांमध्ये प्राण्यांची फजितीही वाचायला मिळते. शिवाय दुसऱ्याला मदत करण्याचे, भीतीवर मात करण्याचे, आत्मविश्वासाचे मूल्यही या कथांमधून मांडण्यात आले आहे. अगदी लहान-लहान कथा बालमनात छान विहार करतात. त्यांना हसवतात, गुदगुल्या करतात, उत्सुकता ताणून धरतात आणि सरतेशेवटी विचार करायला लावतात. या कथासोबत समर्पक चित्रेही असल्याने गोष्ट छान पद्धतीने उलगडण्यास मदत होते. प्रत्येक कथेच्या शेवटी संकल्प काय करायचा तेही दिले आहे. एकूण तीन संच असून दोन संचात तीन आणि एका संचात चार पुस्तके आहेत. एका पुस्तकात साधारण आठ ते दहा कथा आहेत. यातील प्रत्येक कथा बोलकी आहे. मुलांच्या मानसिकतेशी मेळ साधणारी आहे. म्हणूनच या संचातून करमणुकीसोबत संस्काराचे गाठोडेही मिळते. – ऋतुजा सावंत ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.