* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664270
  • Edition : 30
  • Publishing Year : MARCH 1982
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DEAR FRIENDS, DO YOU REALLY WANT TO READ AND UNDERSTAND VAPURZA, THEN OPEN IT TO ANY PAGE, START READING. DO NOT EVER CONSIDER TO FINISH READING IT IN ONE SITTING, FROM START TO END. NEVER. HAVE YOU EVER NOTICED THE BOTTLES OF PERFUME LINED UP ON SOME DRESSING TABLES, IN SOME ENTHUSIASTIC HOUSES? WHAT IS THE PURPOSE BEHIND HAVING SO MANY BOTTLES LINED UP TOGETHER? WE USE ONLY ONE AT A TIME. THE PURPOSE IS TO USE THE FRAGRANCE THAT THE MIND DESIRES AT A PARTICULAR MOMENT. THIS BOOK IS ALSO LIKE THE LINED UP PERFUME BOTTLES. OPEN IT TO THE PAGE THAT YOUR MIND DESIRES. GET ENVELOPED IN THE FRAGRANCE, ENJOY IT THOROUGHLY. THERE IS NO BINDING OF FINISHING READING THAT HAS BEEN STARTED. ENJOY IT AS AND WHEN AND HOW MUCH YOU WISH, WITHOUT ANY BOTHERATION OR ANXIETY OF `WHAT NEXT?`_X000D_ IF YOUR MIND IS TAKEN AWAY BY A PARTICULAR PERFUME, THEN DO NOT HESITATE, FEEL IT AGAIN. YOU NEVER KNOW WHAT YOU CAN COME ACROSS WHILE TRYING TO FIND SOMETHING ANEW. KEEPING ALL THESE THINGS IN MIND, THERE IS NO SEQUENCE, NO INDEX AND NO REFERENCES GIVEN IN THIS BOOK, WITH THE SOLE INTENTION OF ALLOWING YOU A FREE MIND FOR ALL THE IDEAS, CONCEPTS AND FEELINGS._X000D_ AND NOW A FEW WORDS ABOUT THE BOOK BY VA PU HIMSELF._X000D_ "DEAR FRIENDS, THE GLASS WHICH IS SHOWN ON THE COVER PAGE IS EMPTY, YOU MIGHT BE WONDERING WHY? THE REASON IS IT IS READY TO GRASP EVERY SINGLE WORD COMING FROM THE DEPTHS OF THE SKY. THE GLASS WILL ALWAYS REMAIN EMPTY FOR NEW IDEAS IF YOU TRY AND KEEP IT CLEAN FROM ALL THE UNDER ESTIMATION ABOUT OTHERS AND THE OVERRATING ABOUT YOURSELF. THEN THE GLASS WILL BE EMPTY TO CAPTURE THE SKIES. I KNOW THAT YOUR MINDS WERE FREE FROM ALL SUCH EVIL THINGS; THEY WERE FREE FOR THOSE MANY MANIFESTATIONS, I AM INDEED LUCKY TO HAVE SOME PLACE IN YOUR MIND. DEAR FRIENDS, BLESS ME TODAY THAT MY GLASS WILL REMAIN EMPTY THROUGHOUT, OF ALL THE BAD AND EVIL WISHES, LET IT BE FREE FROM ALL THE MISCONCEPTIONS, EGOS AND ILL WILLS. LET IT BE READY FOREVER TO ACCEPT THE BLESSINGS OF THE SKIES, ALWAYS...
कोणतंही पान उघडा आणि वाचा! ‘वपुर्झा’ हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी! हे पुस्तक कसं वाचायचं? एका बैठकीत? अथ ते इति? एका दमात? छे! मुळीच नाही. काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात. जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं. हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं. एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर? पुन्हा शोधायचा. त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेलं नाही.
VAPURZA BY V P KALE
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarArun Kulkarni

    पुस्तक - वपुर्झा , हे पुस्तक अर्पण करतांना लेखक व .पु.काळे लिहितात , `शांतचित्त ज्ञाना रोखठोक तुका ` ह्यांचा अपूर्व संगम म्हणजे दुर्गाबाई भागवत. `वपुर्झा ` ची हि आवृत्ती दुर्गाबाई भागवत ह्यांना . -- वपु . पुस्तकावर लिहिलेला अभिप्राय - कोणतेही पान घडा आणि वाचा !वपुर्झा हे पुस्तक कोणासाठी ? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अश्या वेड्यांसाठी ! हे पुस्तक कस वाचायच? एका बैठकीत? अथ ते इति एका दमात? छे मुळीच नाही. काही हौशी घरामध्ये ड्रेसिंग टेबलवर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात . जसा मूड असेल तस अत्तर वापरायच किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तस अत्तर निवडायचं . हे पुस्तक असंच वाचायचं .हव ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि सुगंधाने भारून जायचं .एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर पुन्हा शोधायचा . त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल .म्हणून या पुस्तकात अनुक्रमणिका ,क्रमांक , संदर्भ काहीही दिलेलं नाही . या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच वाक्य . नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही .वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात . म्हणजे ते ते साहित्य स्वतः पुरतं चिरंजीव होत . करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही . साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असतं . त्यात आपल्या विचारांचा काथ टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही . आणि लेखकांला हवा असतो संवाद . त्याशिवाय त्याच पान रंगत नाही . ...Read more

  • Rating StarRajesh Javir

    वपुर्झा हे पुस्तक आज वाचून झाले पण केव्हा संपलं कळलेच नाही. वपुर्झा हे पुस्तक व पु काळे द्वारा लिखीतकथा-कादंबरी.. कोणतंही पान उघडा आणि वाचा! प्रत्येक पानावर एक अनुभव किंवा विचार मांडला आहे, त्यामुळे तुम्ही कुठलेही पान काढून वाचले तरी चालेल. हे पस्तक एक उत्कृष्ट नमुना आहे. हे बागेसारखे आहे. आपण कोणत्याही विभागात टहल जाऊ शकता, आपण भेटू शकतील अशा छटा दाखवून आपण मंत्रमुग्ध व्हाल. लेखकाचा जीवनाचा दृष्टीकोन दर्शवितो आणि तो इतका सकारात्मक, हृदयस्पर्शी आणि पृथ्वीवर इतका खाली आहे. तो मैत्रीपासून ते लग्नापासून महत्वाकांक्षा या प्रत्येक गोष्टीवर आपले विचार सामायिक करतो .. हे जवळजवळ आपल्या अनुभवी वृद्ध शहाण्या माणसाशी बोलत असताना सारखेच आहे. आश्चर्यकारक पुस्तक आपण वाचत असलेले विचार आपल्या स्थितीशी उत्तम प्रकारे जुळतील. आणि आपला मूड लगेच बदलेल. हे माझे आवडते पुस्तक आहे आणि मी ते नेहमी माझ्याकडे ठेवतो. कथा-कादंबरी.व. पु.काळे ह्यांचे हे पुस्तक. कथा-कादंबरी वगैरे कोणत्याही प्रचलित साहित्यप्रकारात बदलता येणारे नसले तरी वपुस्पर्श झालेला हा वैविध्यपूर्ण लेखनगुच्छ असा आहे की वाचकांनी भरभरून दाद दिल्याने लाखो मनात घर करणारे म्हणुनच पुन:पुन्हा मुद्रण करावे लागले आहे. एकाचा दुसर्‍याशी संबंध नसलेल्या तरीही त्यांच्यात एक धागा असलेल्या अनेक ढंगी परिच्छेदांची सुरेख गुंफण ह्या पुस्तकात गुंफण्यात आली आहे. त्यामुळेच आपल्या इच्छेनुसार हाताला लागेल ते पान उघडावे आणि त्या पानावरील लिखाणात मग ती एखादी छोटीशी गोष्ट असो वा मोजक्या शब्दात सांगितलेला तो एक विचार असो रंगून जावे असे हे पुस्तक आहे. हा एक मुक्त आनंद आहे म्हणूनच त्याला शीर्षक-क्रमांक-संदर्भ वगैरेचे बंधन नाही. #वपुर्झा #वपुकाळे #पुस्तकवाचन ...Read more

  • Rating StarSunil Mane

    कोणतंही पान उघडा आणि वाचा! ‘वपुर्झा’ हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी! हे पुस्तक कसं वाचायचं? एका बैठकीत? अथ ते इति? एका दमात? छे! मुळीच नाही. काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असात. जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं. हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं. एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर? पुन्हा शोधायचा. त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेलं नाही. ...Read more

  • Rating StarSandhya Shanbhag

    वपुर्झा लेखक: व पु काळे इतक्या लोकांनी हे पुस्तक वाचले आणि त्याबद्दल लिहिले सुद्धा, मी ही बऱ्याच लोकांचे मत वाचून हे पुस्तक विकत घेतले आणि एका ही क्षणी मला ह्याचा पश्चाताप झाला नाही. ह्या पुस्तकाबद्दल सगळे म्हणत होते कुठूनही सुरुवात केली तरी चालल. मी विचार केला असं कोणतं पुस्तक आहे जे कुठूनही वाचू शकतो. पण जेंव्हा सुरुवात केली तेव्हा कळलं- ह्याला कारण एकच - प्रत्येक पानावर एक अनुभव किंवा विचार मांडला आहे, त्यामुळे तुम्ही कुठलेही पान काढून वाचले तरी चालेल. हे इतकं सुरेख पुस्तक आहे की, एखादा गोड किंवा आपल्याला आवडणारा पदार्थ कसा आपण अगदी थोडा थोडा, चव घेऊन खातो त्याप्रमाणे अगदी ४-५ पाने रोज अस मी वाचलं, आणि अजूनही वाचून झालेलं नाही पण मला इथे लिहील्याशिवाय राहवलं नाही. हे विचार, अनुभव किंवा संवाद वाचताना आपणही असे विचार बऱ्याचदा करतो अस लक्षात आलं. वपुंचं लिखाण म्हणजे - अगदी सामान्य लोकांमधील संभाषण किंवा त्यांची विचार करण्याची पद्धत. त्यांच्या लिखाणाचा असा काही प्रभाव आहे ज्यामुळे हे पुस्तक कोणालाही नावडणार नाही. टीका म्हणून नाही पण त्यांनी माणसाच्या स्वभाव धर्माचे उत्तम उदाहरणे देऊन खुलासे केले आहेत. एखादी सामान्य परिस्थिती कशी हाताळावी वा कशी हाताळू नये ह्याचे अगदी मजेशीर व काहीसे उपहासात्मक किस्से सांगितले आहेत. परत परत वाचावे असे हे पुस्तक जरूर संग्रही असावे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती