ROHAN TILLU

About Author

Birth Date : 15/10/1985


ROHAN TILLU HAS BEEN WORKING IN THE FIELD OF JOURNALISM FOR MORE THAN TEN YEARS. HE HAS WORKED IN VARIOUS MARATHI NEWSPAPERS LIKE DAINIK PUDHARI, MAHARASHTRA TIMES, LOKSATTA. HIS KHABUGIRI - KHABU MOSHAI, WHICH IS WRITTEN TO SUPPLEMENT THE VIVA OF LOKSATTA, IS ESPECIALLY FAMOUS. HE HAS WRITTEN EXTENSIVELY ON THE TWO MAJOR TOPICS OF ENTERTAINMENT AND TRANSPORTATION. HE IS ALSO SPECIALIZED IN THE FIELD OF ARTS AND IS ALSO A WRITER, DRAMATIST AND ACTOR.

रोहन टिल्लू गेली दहाहून अधिक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दैनिक पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशा विविध मराठी वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणीसाठी लिहीत असलेलं त्यांचं खाबूगिरी - खाबू मोशाय हे सदर विशेष प्रसिद्ध आहे. मनोरंजन, वाहतूक या दोन प्रमुख विषयांबद्दल त्यांनी विस्तृत लेखन केले आहे. त्यांचा कलाक्षेत्रातही विशेष वावर असून ते लेखक, नाटककार आणि अभिनेताही आहेत. त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयासाठी, आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांसाठी लिहिलेल्या नाटकांसाठी अनेक पारितोषिकं लाभली आहेत. त्यांनी युटोपिया कम्युनिकेशन्स, मुंबई संस्थेसाठी लिहिलेल्या ती... या दोन अंकी प्रायोगिक नाटकाचे ५० प्रयोग झाले आहेत. तर अनुवादाच्या क्षेत्रात त्यांनी घोडदौड सुरू असून मेहता पब्लिशिंग हाऊससाठी त्यांनी तीन पुस्तकांचा अनुवाद केला आहे. ते सध्या बीबीसी न्यूज मराठीमध्ये कार्यरत आहेत.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 4 of 4 total
48 %
OFF
DHARMANMADHIL BANDHUTVACHYA MARGAVAR Rating Star
Add To Cart INR 240 INR 125
48 %
OFF
KAHANI PAHILYA AAGINGADICHI Rating Star
Add To Cart INR 350 INR 182
33 %
OFF
KHAKI FILES Rating Star
Add To Cart INR 250 INR 168
48 %
OFF
PATNA BLUES Rating Star
Add To Cart INR 360 INR 187

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more