* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788184981599
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IF THE PARENTS ARE RUNNING BEHIND MONEY, FORGETTING EVERYTHING? WHAT IDEAL WILL THIS ATTITUDE SET BEFORE THE CHILDREN? THE FEMALES WHO CONSIDER THEIR BODY AS A SHOWPIECE DO NOT HESITATE TO USE IT FOR MONETARY GAINS THUS CAUSING EMOTIONAL POLLUTION. ALL THE EROTIC SCENES UNNECESSARILY PROVOKE YOUNG MINDS. WHEN WE LOOK AROUND AND WITNESS THE HIDEOUS WAYS TRIED OUT BY THE LEADERS IN THE LUST OF AUTHORITY THEN ONCE AGAIN WE ARE COMPELLED TO ASK OURSELVES, WHO WILL BE THE IDEAL FOR THE COMING UP GENERATIONS? MANY HAVE SET IN THE SEARCH OF LIGHT TODAY; THE SUN HAS SET AGES BACK FOR THEM. THEY ARE TRYING THEIR BEST TO FIND THE WAY OUT WITH JUST A TWINKLING LIGHT FROM THE ‘DIYA’. WE EXPECT A LOT FROM THE WRONG-DOERS, FROM THOSE WHO HAVE BEEN PUNISHED BY THE LAW AND JUDICIARY. BUT WHEN THEY TRY TO JOIN THE MAIN STREAM AFTER COMPLETING THEIR PUNISHMENTS, DO WE OFFER OUR HANDS WITHOUT VACILLATING EVEN FOR A MOMENT? ON THE CONTRARY, IT IS THIS SAME YOUTH THAT SUCCESSFULLY PRESERVES THE TENDERNESS AND THE FAITHS IN THEIR MINDS. THEY SET UP THEIR MINDS TO BE THE BEST AND AWAIT OUR COOPERATION.
पैशामागे लागलेले आई-वडील मुलांपुढचे आदर्श नष्ट करतात. शरीर ही प्रदर्शनाची वस्तू समजून तिची किंमत वसूल करणा-या मुली मानसिक प्रदूषणाला कारणीभूत आहेत. उत्तान दृश्यं तरुण मनाला चाळवतात. आज सत्तेसाठी चालणारी साठमारी पाहिली की प्रश्न पडतो, नव्या पिढीपुढे आपण कोणती श्रद्धास्थानं ठेवणार आहोत? ज्यांचा सूर्य मावळला आहे तीच आज प्रकाशाचा शोध घेताहेत; स्वतःची दिवली घेऊन मार्ग काढताहेत. शिक्षा भोगत असणा-या कैद्यांकडून समाजाने अपेक्षा ठेवताना, शिक्षा भोगून तावूनसुलाखून निघालेले हे तरुणच मनातल्या श्रद्धांना झळ पोचू देत नाहीत. त्यांना चांगलं व्हायचंय. आपण आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JANMATHEP #JANMATHEP #जन्मठेप #ESSAYS #MARATHI #GIRIJAKEER #गिरिजाकीर "
Customer Reviews
  • Rating Starसुहास जोशी

    लेखिका गिरिजाताई कीर यांनी सामाजिक जाणीवेतून, महत्प्रयासाने साकारलेला `जन्मठेप` प्रकल्प वाचकांकरिता खुला झाला याचं अप्रूप वाटतं. मुळात हा विषय आजवर दुर्लक्षित राहिला, तो प्रत्यक्षात अवतरला तो आपल्या उदार सहकार्यामुळेच! आम्हा जन्मठेपींचं अरण्यरुदन आपलया प्रकाशनसंस्थेच्या विशेष कृपेमुळे मुद्रित झाले ही जाणीव ठेवून कृतज्ञता प्रकट करतो. ...Read more

  • Rating Star SAHITYA SUCHI Jan-2011

    कथा, कादंबरी, ललित लेखन, बालसाहित्य अशा वाङ्मयाच्या विविध लेखन दालनात विपुल लेखन करण्याऱ्या लेखिका गिरिजा कीर. त्या केवळ लेखिका नाहीत तर सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. बालगुन्हेगार, आदिवासी, कामगार स्त्रिया–मुले यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासाठी काम रून, त्यांच्या प्रश्नांवर त्यांनी लेख, मुलाखती, कथा असे लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याचे वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादही झाले आहेत. लेखन आणि समाजसेवा याबद्दल अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘कथाकथन’ हे त्यांचे खास क्षेत्र मानले जाते. ‘जन्मठेपेची शिक्षा झालेले मध्यमवर्गीय सुशिक्षित गुन्हेगार’ हा या पुस्तकाचा विषय. ते गुन्हेगारीकडे का वळले? त्यांना आपल्या कृत्यांबद्दल पश्चाताप होतो आहे का? चांगल्या संस्कारातील ही मुले वाममार्गाकडे का वळली? त्यांचे भवितव्य काय? अशा अनेक अंगांनी त्यांनी संशोधन केले आहे. येरवडा जेल-पुणे, आग्वाद जेल-गोवा, आधारवाडी जेल-कल्याण येथे जाऊन त्यांनी कैद्यांच्या भेटगाठी घेतल्या आहेत. काही तुरुंगाधिकाऱयांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यातून त्यांचा कैद्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन लक्षात येतो. या अधिकाऱयांनी लेखिकेला दिलेल्या सौजन्यपूर्ण वागणुकीबद्दल त्यांनी ऋणनिर्देश केला आहे. पुस्तकांच्या परिशिष्टांमध्ये कैदी सुहास जोशी यांचा देहदानाचा अर्ज, येरवडा कारागृहाने गिरिजातार्इंना बंद्यांना भेटण्यासाठी दिलेले परवानगीपत्र, बंद्यांना मुलाखतींच्या आधारे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी दिलेले परवानगीपत्र, इंडियन एक्सप्रेसमधील निशा नमिआर यांच्या पुस्तकाचा परिचय करून देणारा इंग्रजी लेख, गौरी कुलकर्णी यांचा ‘बंदिजनांची आई’ हा गिरिजातार्इंच्या या कार्याविषयीचा ‘सकाळ’मधील लेख आणि ८ मार्च २००६ रोजी कल्याण कारागृहातील अधिकाऱयांच्या सहीने सर्व बंदिजनांच्या वतीने त्यांना देण्यात आलेला ‘माई’ सन्मान (मानपत्र) अशा सहा गोष्टींचा समावेश आहे. जन्मठेपेच्या बंदिजनांच्या हृदयपरिवर्तनाचे काम केल्याबद्दल या बंदिजनांच्या इच्छेनुसारच त्यांना हे मानपत्र दिले आहे. या कागदपत्रांमुळे गिरिजा कीर यांचे मानपत्र दिले आहे. या कागदपत्रांमुळे गिरीजा कीर यांचे सामाजिक भान लक्षात येते. तुरुंगातील कैद्यांसाठी त्या करत असलेले हे काम त्यांच्या घरच्या लोकांना पसंत नाही. पण तरीही सामाजिक जाणीवेने त्या ते करत राहिल्या आहेत. आपली हे काम करण्यामागची भूमिका, त्यांनी पुस्तकाच्या प्रारंभीच स्पष्ट केली आहे. येरवडा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुहास जोशीने त्यांचे ‘इथे दिवा लावायला हवा’ हे स्लम dwellers वरील पुरस्कार विजेते पुस्तक तसेच ‘लावण्याखुणा’ हे पुस्तक वाचले. त्या पुस्तकांसंबंधी विचार व्यक्त करणारे पत्र त्याने लेखिकेला पाठवले. लेखिकेने त्याला उत्तर पाठवले. तीन वर्षे दोघांचा पत्रव्यवहार चालू होता. मग कीर यांनी त्याला भेटायचा निर्णय घेतला. तुरुंगाधिकाऱयांची परवानगी घेऊन मुंबईहून पुण्याला येऊन त्या येरवडा जेलमध्ये त्याला भेटल्या. सुहासमुळे त्यांचा आणखी काही बंदिजनांशी संपर्क आला. त्यांना जाणवले की ही चांगल्या घरातील मुले भावनेच्या भरात काहीतरी करून बसतात आणि जन्माची गुन्हेगार ठरतात. मग उपेक्षित जीवन वाट्याला येते. मायेची माणसेही दुरावतात. त्यातले बरेचजण सुशिक्षित आहेत. त्यांना साहित्य, नाट्य, कला ह्यात रस आहे. ती गुन्हेगारीकडे का वळत असावीत? त्यांची मने दुबळी आहेत की कुटुंबसंस्थेत उणीवा आहेत? त्यांच्यावर वडिधाऱयांचे दडपण आहे का? पैसा हेच जीवनाचे ध्येय मानल्यामुळे नैराश्य वाट्याला येते का? हा कुसंगतीचा परिणाम आहे की कोणाची दहशत आहे? भ्रष्टाचार, शोषण, गुंडगिरी या गोष्टी कितपत जबाबदार आहेत? असे अनेक प्रश्न त्यांच्याभोवती फेर धरून नाचू लागले. गजाआडचे जग त्यांना खुणावू लागले. त्यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्या तरुण मुलांना भेटत राहिल्या. पुस्तके, राख्या, भेटकार्डे पाठवीत राहिल्या. पत्र लिहिणारा सुहास जोशी आणि त्याचे आणखी सहा मित्र यांच्या गुन्हेगारीच्या कहाण्यांवर हे पुस्तक आधारित आहे. राजकुमार गुप्ता आणि नीलिमा पंडित या अन्य कैद्यांनीही त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मुलांची मानसिकता जाणून घेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्या ह्य निष्कर्षांपर्यंत आल्या आहेत की अविवेकाने घडलेल्या चुकांबद्दल या मुलांना पश्चाताप होतो आहे. त्यांना चांगले नागरिक म्हणून जगायचे आहे. त्यांचे पुनर्वसन करायला हवे. गिरिजा कीर म्हणतात – ‘ज्यांचा सूर्य मावळला आहे तेच प्रकाशाचा शोध घेताहेत. स्वत:ची दिवली घेऊन मार्ग काढताहेत. शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांकडून समाजाने अपेक्षा ठेवताना, शिक्षा भोगून तावूनसुलाखून निघालेले हे तरूणच मनातल्या श्रद्धांना झळ पोहोचू देत नाही. त्यांना चांगलं व्हायचंय. आपण आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे.’ अशा बंदिवानांबद्दल समाजाने क्षमाशील दृष्टी ठेवावी आणि कैद्यांनीही समाजाबद्दल कृतज्ञता बाळगावी असे त्यांना वाटते. तुरुंगातल्या सात मुलांची त्या ‘आई’ झाल्या आहेत. त्यापैकी संजय कांबळेला फाशीची शिक्षा जाहीर झालेली असते. परंतु राष्ट्रपतींनी दया केल्यामुळे त्याची फाशी रद्द होऊन जन्मठेप होते. जन्मठेपेच्या बंदिवानांची शिक्षा कमी व्हावी म्हणून तो प्रयत्नशील आहे. वसंत बंदावणे हा संगमनेरचा शिक्षक. एक मुलगी त्याच्यावर प्रेम करत होती. हा प्रतिसाद देईना तेव्हा त्याला बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवले. निलेश जोशी एम. बी. झालेला, एका श्रीमंत तरूणीवर प्रेम करणारा, मुलीच्या बापाला त्यांचे प्रेम पसंत नव्हते. त्यांनी आणि निलेशच्या भावाने कारस्थान केले. न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली त्याला जन्मपेठ झाली. तुरूंगात तो झोपडपट्टीतल्या मुलांसाठी संस्कारवर्ग चालवतो. सुहास जोशी, संतोष भिंताडे, शिवाजी सांळुके आणि संतोष शिंदे यांच्याबद्दल थोड्या अधिक विस्ताराने लिहिले आहे. संतोष जोशी मूळचा सावंतवाडीजवळील ‘अरोंदा’ गावाचा राहणारा. त्याने आपल्या पत्रात कोकणचे निसर्गसौंदर्य वर्णन केले आहे. वडील गावचे पौरोहित्य करणारे - ‘किरवंत’ म्हणजे मरणोत्तर क्रियाकर्म करणारे. त्यामुळे इतर ब्राह्मण त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत. त्याची आई गोव्याची. ती त्याच्याकडून स्तोत्रे, श्लोक वगैरे पाठ करून घेते. दोन प्रीप्लॅन्ड मर्डर केल्याबद्दल त्याला जन्मठेप झाली आहे. शिक्षण पूर्ण झाल्याबद्दल नोकरीच्या शोधात मुंबईला आलेला संतोष, बेकारांच्या तांड्यात सामील झाला. १९९१ साली त्याला ‘बँक ऑफ कॉलिफोर्निया’मध्ये कम्युनिकेशन रूममध्ये ऑपरेटर म्हणून नोकरी लागली. ‘कल्याण’ नावाचा व्हाईस प्रेसिडेंट आणि ‘मीना’ नावाच्या लेडी ऑफिसरने त्याची निवड केली. लेखी ऑर्डर दिलीच नाही. १५०० रूपये पगारात तो १२/१४ तरास राबत होता. ऑफिसमध्ये काम करणारे सगळे तिशीच्या आतले कामसू पण अबोल. कोणालाच अपॉर्इंटमेंट लेटर नाही. मस्टर नाही, पे स्लिप नाही, भत्ते नाहीत. कोणाचीच बोलायची हिंमत नव्हती. ‘मीना, कल्याण’ यांची कंपनी आहे. ‘परवडत नसेल तर सोडून जा’ असा खाक्या होता. सर्वांना अपमानास्पद वागणूक दिली जात असे. लग्न असो वा मर्तिक एक दिवसही रजा मिळत नसे. थोडासा विरोध करणारा असला तर त्याची हकालपट्टी ठरलेली. एकीकडे कामाचा ताण तर दुसरीकडे नोकरी जाईल ही भीती. नशीबावर भरवसा ठेवून कष्ट करायचे. नको असलेली माणसे खोटा आळ ठेवून काढून टाकत. मीनाने मुद्दाम सुहासला लाथ मारली. आधी लेखी मेमो दिले. मग टर्मिनेशन ऑर्डर दिली. संतापाच्या भरात त्याने कोयत्याने वार करून मीना व कल्याण दोघांनाही ठार केले. स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला आणि जन्मठेप झाली. त्याच्या पत्रातील हकीगत वाचून लेखिकेप्रमाणे आपणही हादरून जातो. सुहासने आपल्या भागात जायचे म्हणून गोव्यातील तुरूंगात बदली मागून घेतली. कारावासातून सुटल्यावर गावी जाऊन वृद्धाश्रम काढायचे त्याचे स्वप्न आहे. मूळचा जळगावचा संतोष भिंताडे, लॉ करण्यासाठी पुण्यात बहिणीकडे आला.विद्यार्थी संघटनेचे काम करून लागला. बाजूच्या कॉलनीतील गुंड पोरांनी त्याच्या कॉलनीतील एका पोरीची छेड काढली. म्हणून त्यांना जाब विचारायला गेला. त्यातून एका पोराशी भांडण झाले. शिवीगाळ, मारामारी झाली. संतापाच्या भरात याने केलेल्या वाराने तो मरण पावला. हा स्वत:हून पोलिसस्टेशन मध्ये हजर झाला. जन्मठेप झाली. घरची माणसेही दुरावली. आता तो पैठणच्या खुल्या बंदिगृहात आहे. त्याच कारागृहातील शिवाजी साळुंके आपल्या कवितेतून कठोर वास्तव मांडतो आणि भविष्याचे आशादायी चित्र काढताना म्हणतो – आता तरी हे आपण बदलायला हवे घेऊनी हाती परत कुंचला चित्र नवे काढायला हवे। त्याचा ‘आत्मझड’ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. वडारवाडीतील वयाने मोठ्या सुनीतावर प्रेम करणाऱ्या संतोष शिंदेचे कशावरून तरी तिच्याशी बिनसले. तिने पोलिसात तक्रार केली. संतोषच्या वडिलांनाही पोलिसांनी त्रास दिला तेव्हा संतापून संतोषने सुनीतावर चाकूने वार केले. त्यात तिचे निधन झाले. ह्याला अटक होऊन जन्मठेप झाली. तो कलाकार आहे. नाटिका बसवतो. अभिनय करतो. तुरुंगातल्या या तरूणांना गिरिजा कीर यांनी संजीवनी दिली आहे. त्यांची मानसिक ताकद वाढवली आहे. त्यामुळे त्या सर्वांची ‘माई’ झाल्या आहेत. पुस्तकातील येरवडा जेलचे वर्णन, तेथील गांधींचा पुतळा, पुणे करार झाला तो आम्रवृक्ष, ३०/३२ श्वेतशाम फोटो आणि चंद्रमोहन कुलकर्णीचे मुखपृष्ठ यामुळे पुस्तक आकर्षक झाले आहे. अवश्य वाचावे असे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 21-11-2010

    गुन्हेगारी हा जसा चिंतेचा विषय आहे, तसा संशोधनाचाही विषय आहे. पण इथे फक्त संशोधन करूनही भागत नाही, तर त्यावर कामही करावे लागते. चांगल्या घरातील लोक गुन्हेगार का होतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. जन्मठेपेची शिक्षा उपभोगत असलेल्यांना ता काय वाटते ? आणि काय करायची इच्छा आहे हे या पुस्तकात लेखिका गिरिजा कीर यांनी सांगितले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती