* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667288
  • Edition : 11
  • Publishing Year : MARCH 1991
  • Weight : 150.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GERMINATE LIKE THE SEED AND GROW INTO A TREE. MERGE LIKE A DROP OR A WAVE AND BECOME LIKE THE OCEAN. DROWN! MERGE! CEASE TO EXIST! SURRENDER YOURSELF COMPLETELY INTO THE SELF; LOSE YOUR DUALITY; THEN YOU WILL BECOME THE OCEAN! BECOME VAST! THERE WILL BE NO MORE BOUNDARIES, NO SORROW, AND NO PAIN. YOU WILL BE NEITHER POOR NOR MEEK. YOU WILL BE ACCOMPLISHED, WEALTHY, AND LIKE A KING. ALL DIVINE INCARNATIONS ARE YOUR REFLECTIONS. YOU ARE NO LONGER ‘YOU’; YOU ARE GOD!
वपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक. हर्ष, हुंदके आणि हुंकार ह्यांच्या हा नजराणा.हा नजराणा असंख्य वाचकांनी केलेला.रोज कुणाचं न कुणाचं पत्र दारासमोर रांगोळी काढता येतं.`तुम्ही आम्हाला ओळखत नाही,पण आम्ही तुम्हाला ओळखतो`.ह्यासारख्या परिचयाच्या ठिपक्याठिपक्यांनी रांगोळी प्रगट होते.रांगोळी काढणाऱ्याचे हात दिसत नाहीत आणि कधी कधी नावही काळात नाही.तसं झालं की आठवतो तो सांताक्लाँझ!पत्रांची भेट पाठवणारे सांताक्लाँझ?की त्यांची भेट माझ्या दारावरच्या प्लेझरबॉक्स पर्यंत पोहचवणारा खाकी वेशातला पोस्टमन सांताक्लाँझ?.हे कोडं सुटत नाही.जाऊ दे!न सुटू दे.संवादाचा पूल ऐलथडीला जोडणारी प्रत्येक कमान सारख्याच तोलामोलाची.सगळेच सांताक्लाँझ.सांताक्लाँझची पाऊल आता आपोआप ऐकू येतात.ती वेळ अचूक समजते.पण एखादाच दिवस असा उगवतो की त्या दिवशी ती चाहूल येत नाही.ऐन दुपारी येणारा रातराणीचा सुगंध त्या दिवशी येत नाही."वपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक." हर्ष, हुंदके आणि हुंकार ह्यांच्या हा नजराणा.हा नजराणा असंख्य वाचकांनी केलेला.रोज कुणाचं न कुणाचं पत्र दारासमोर रांगोळी काढता येतं.`तुम्ही आम्हाला ओळखत नाही,पण आम्ही तुम्हाला ओळखतो`.ह्यासारख्या परिचयाच्या ठिपक्याठिपक्यांनी रांगोळी प्रगट होते.रांगोळी काढणाऱ्याचे हात दिसत नाहीत आणि कधी कधी नावही काळात नाही.तसं झालं की आठवतो तो सांताक्लाँझ!पत्रांची भेट पाठवणारे सांताक्लाँझ?की त्यांची भेट माझ्या दारावरच्या प्लेझरबॉक्स पर्यंत पोहचवणारा खाकी वेशातला पोस्टमन सांताक्लाँझ?.हे कोडं सुटत नाही.जाऊ दे!न सुटू दे.संवादाचा पूल ऐलथडीला जोडणारी प्रत्येक कमान सारख्याच तोलामोलाची.सगळेच सांताक्लाँझ.सांताक्लाँझची पाऊल आता आपोआप ऐकू येतात.ती वेळ अचूक समजते.पण एखादाच दिवस असा उगवतो की त्या दिवशी ती चाहूल येत नाही.ऐन दुपारी येणारा रातराणीचा सुगंध त्या दिवशी येत नाही.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarSushil Kale

    आयुष्यात पुष्कळ गोष्टी जशा लहान वयात मिळतात तशाच अनेक गोष्टी निसटून ही जातात. यशस्वी वाटचालीचा रस्ता जरी शिखराकडेच नेणारा असला तरी प्रत्येक प्रवासी हा स्वतंत्र घटक असतो. यश म्हणजे तरी काय..? यश म्हणजे प्रकाश. प्रकाश असतो तरी किंवा नसतो तरी. पण dnhi अवस्थेत त्याच्या प्रभावाच किंवा अभावाच अस्तित्व मानावच लागतं. तीच गोष्ट यशाची. त्यामुळे शिखरापाशी पोहचलेला हा यशस्वी असतोच- पण त्याच वेळेला मिळालेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी तितकेच लहान-मोठे खड्डेही ह्याच वाटचालीत निर्माण झालेले असतात आणि उंचावरून ज्याचे त्याला हे खड्डे, ह्या दऱ्या जास्त ठळकपणे जाणवतात. ह्या वाटचालीतील काही खड्डे काही व्यक्तीना पटकन दिसतात. त्यातली बायको ही पहिली व्यक्ती.तिला नवऱ्याच्या यशाच्या शिखराअगोदार खड्डेच प्रथम दिसतात.ह्यात तिची चूक नसते. कारण ती रथाच दुसरं चाक. तिला त्या खड्डयांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, लौकिक हादरे जास्त बसतात. ह्या हादऱ्यांबरोबरच नवऱ्याकडे कुणी बोट उगारता कामा नये हा तिने स्वतःच घालून घेतलेला दंडक असतो. सवलत वा संशयाचा फायदा ती तिच्या कोर्टातल्या आरोपीला द्यायला तयार नसते. तिची ती भूमिका योग्य असते. कारण ज्योत जळून तेजोमय ठरते, समईनुसतीच तापत राहते. खड्डा अचूक टिपणारा, जवळचा मित्र,ही दुसरी व्यक्ती. ...Read more

  • Rating StarSushil Kale

    आयुष्यात पुष्कळ गोष्टी जशा लहान वयात मिळतात तशाच अनेक गोष्टी निसटून ही जातात. यशस्वी वाटचालीचा रस्ता जरी शिखराकडेच नेणारा असला तरी प्रत्येक प्रवासी हा स्वतंत्र घटक असतो. यश म्हणजे तरी काय..? यश म्हणजे प्रकाश. प्रकाश असतो तरी किंवा नसतो तरी. पण dohi अवस्थेत त्याच्या प्रभावाच किंवा अभावाच अस्तित्व मानावच लागतं. तीच गोष्ट यशाची. त्यामुळे शिखरापाशी पोहचलेला हा यशस्वी असतोच- पण त्याच वेळेला मिळालेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी तितकेच लहान-मोठे खड्डेही ह्याच वाटचालीत निर्माण झालेले असतात आणि उंचावरून ज्याचे त्याला हे खड्डे, ह्या दऱ्या जास्त ठळकपणे जाणवतात. ह्या वाटचालीतील काही खड्डे काही व्यक्तीना पटकन दिसतात. त्यातली बायको ही पहिली व्यक्ती.तिला नवऱ्याच्या यशाच्या शिखराअगोदार खड्डेच प्रथम दिसतात.ह्यात तिची चूक नसते. कारण ती रथाच दुसरं चाक. तिला त्या खड्डयांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, लौकिक हादरे जास्त बसतात. ह्या हादऱ्यांबरोबरच नवऱ्याकडे कुणी बोट उगारता कामा नये हा तिने स्वतःच घालून घेतलेला दंडक असतो. सवलत वा संशयाचा फायदा ती तिच्या कोर्टातल्या आरोपीला द्यायला तयार नसते. तिची ती भूमिका योग्य असते. कारण ज्योत जळून तेजोमय ठरते, समईनुसतीच तापत राहते. खड्डा अचूक टिपणारा, जवळचा मित्र,ही दुसरी व्यक्ती. ...Read more

  • Rating Star-सचिन काळे

    प्लेझर बॉक्स रूपाने मला वपु पुन्हा भेटले. त्यांनीच मला आदेश दिला असावा असे समजून मी हे लिहिण्याचा प्रयत्न करतोय. प्लेझर बॉक्सच्या माध्यमातून वाचकांची सुद्धा प्रवृत्ती कळाली. तसेच वपुंना सुद्धा जाणून घेता येतय. वपुंच्या कथा काही वाचकांना का पटल्या नाह किंवा त्यांनी वपुंवर का टिका केली? हे वाचकांच्या प्रवृत्तीवरून व त्यांच्या पत्रांवरून लक्षात आले. परंतु, वपुंना ह्या कथा कशा सुचायच्या? हा अनेकांना पडलेला प्रश्न. पण वाचकांच्या याच पत्रांमुळे वपु हे नकळतपणे लिहित असावे, असे मला जाणवते. वपु माणसाला माणूस म्हणून पाहायचे. यात कुणाचेच दुमत नसावे. वपुंची पुस्तके वाचक जरी आवडीने तसेच न आवडता वाचत होती. परंतु वपुसुद्धा व्यक्तींचे वाचन त्यांच्या गुणदोषांसह करत होते. वपु निश्चित वाचकसुद्धा होते. त्यांना भेटणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष (पत्राद्वारे) व्यक्तींना ते वाचत असावे. त्यामुळेच आज माझ्यासारखे वाचक त्यांचे चाहते आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more