* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA
  • Availability : Upcoming
  • ISBN : 9789353171667
  • Edition : 1
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
V.S. Khandekar The eminent writer has appreciated the work by great littérateurs like Tolstoy, Shreepad Krishna Kolhatkar, Krushnaji Prabhakar Khadilkar, N.C. Kelkar, R.G. Gadkari, poet Borkar, dramatist and poet Kusumagraj, poet V.R. Kant, story writer Arvind Gokhale and others. His writing highlights the positive points of these great many, yet it also points at the flaws. Thus, with the balance maintained, the criticism has become quite readable. The two articles, including one on Acharya Atre and other on poet B.B. Borkar are integral in nature. These are in letter format. They also allow us to know Khandekar’s command over poetry. While elaborating the plus and minus points of Arvind Gokhale as a story-writer, one is impressed with Khandekar’s in depth knowledge about this form of literature. A true and honest critique- Khandekar appears to be very humble throughout. His diligence and contemplative nature is easily noticeable.
‘साहित्यप्रतिभा : सामर्थ्य आणि मर्यादा’मध्ये वि.स.खांडेकरांनी टॉलस्टॉय, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, न.चिं.केळकर, रा.ग.गडकरी, कवी बोरकर, नाटककार आणि कवी कुसुमाग्रज, कवी वा.रा.कांत, कथाकार अरविंद गोखले प्रभृती साहित्यकारांबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल असलेली आत्मीयता व्यक्त करण्यासाठी केलेले समीक्षालेखन आहे. त्यात भलामण असली तरी दोषदिग्दर्शनाने ती संयमित व संतुलित झालेली आहे. ती सकारात्मक समीक्षा झाली आहे. आचार्य अत्रे आणि कवी बा.भ.बोरकर यांच्यावर लिहिलेले या संग्रहातील दोन लेख व्यवच्छेदक म्हणावे लागतील ते शैलीच्या अंगाने नि आत्मीय गुण त्यांत अवतरल्यामुळेही. हे दोन्ही लेख पत्र शैलीत लिहिले असून, आत्मीयतेमुळे ते विशेष वाचनीय झाले आहेत. नाटकाबरोबरीने खांडेकरांचा काव्यव्यासंग त्यातून स्पष्ट होतो. कथाकार अरविंद गोखले यांच्यावरील या संग्रहातील कथाकार म्हणून विवेचन करणारा लेख खांडेकरांची कथेची जाण स्पष्ट करतो. या सर्व समीक्षालेखांतून दिसणारे समीक्षक खांडेकर हे स्वागतशील आस्वादक म्हणून जसे पुढे येतात, तसेच त्यांच्या व्यासंगाची, चिंतनाचीही ते साक्ष देतात.
Keywords
#साहित्यप्रतिभा : सामर्थ्य आणि मर्यादा#वि. स. खांडेकर# डॉ. सुनीलकुमार लवटे# #Sahityapratibha : Samrthya ani Maryada#V.S. Khandekar# Dr. Sunilkumar Lavate#
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

VADALFUL
VADALFUL by REI KIMURA Rating Star
DAINIK TARUN BHARAT 10-02-2019

एका राजकन्येची अचंबित करणारी कहाणी... रेई किमुरा हे नाव अपरिचित नाही. किमुरांच्या कादंबऱ्या अतिशय वाचकप्रिय आहे. The Princess and The Spy मेहता प्रकाशनाने ‘वादळफूल’ या शीर्षकाने वाचकांसाठी आणले आहे. अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि अगदी नेमका ब्लर्ब यासह. मांचुरिया हा विस्मृत चीनचा एक भाग. इथेही राजेशाही होती. वजकुमार स्यू काय किंवा चिनी सम्राट काय सगळे एका माळेचे मणी होते. ‘दी किंग कॅन डू नो राँग’ मानणारे. जनतेची पर्वा नसणारे. उपभोगात रमलेले, कोणाच्या जनान्यात किती भोगस्त्रिया आहेत, यावर मोठेपणा मानणारे, एकप्रकारे सत्तेच्या, भोगाच्या, सुखलोलुपतेच्या कैफात असलेले, मांचुरियाचे राजकुमार स्यू त्याच परंपरेतले. स्यूंच्या एका ‘जनानी’ची बंडखोर, मनस्वी, संस्कारशून्य मुलगी म्हणजे आयसिन सिओरो. ही सुधारणेच्या पलीकडे आहे हे जाणून राजकुमार स्यू त्यांच्या सावत्र भावाला ही कन्या दत्तक देतो. तिची जपानमध्ये पाठवणी करतो. ‘योशिको कावाशिमा’ या नावाने इथून पुढे ती ओळखली जाते. तिची आत्मकथनात्मक कादंबरी म्हणजे ‘वादळफूल’. Know thy self ही आज्ञा ती पाळते. ती स्वत:ला पूर्ण ओळखते. साहसी, संकटांनी भरलेले दुहेरी आयुष्य जगणारी. एक निरुपयोगी मुलगी असा वडिलांनी शिक्का मारलेली, खेद-खंत नसलेली, वडिलांवरही हेरगिरी करणारी, मुलांसारखा पोशाख करणारी, अन्नावर तुटून पडणारी, स्त्री-पुरुष संबंध याबद्दल लहान वयात जाण आलेली, त्यात कसलेही पाप न मानणारी, स्वयंकेद्रित, टीकेची पर्वा न करणारी, देहसुख घेण्यात कसलाही टॅबू न मानणारी, मिलिटरी ऑफिसर यमागासह सातआठ मित्र असलेली, अनेकांशी निकटचे संबंध असले तरी एक सैल व स्वैर आयुष्य जगणारी मुलगी. वासंती घोसपूरकर यांनी हा अनुवाद एवढा चांगला केला आहे, की हा अनुवाद वाटत नाही. आपण मराठीतून रेई किमुरा यांनी कादंबरी लिहिली व मेहता प्रकाशनाने ती प्रसिद्ध केली याचे समाधान देणारा हा छान अनुवाद आहे. ज्यांना दुसऱ्या महायुद्धात, त्यातल्या जपानी सहभागात व गुन्हेगारी विश्वात रस आहे. त्यानी ‘वादळफूल’ वाचायलाच हवे, एवढ्या तोलामोलाचे हे पुस्तक आहे. –अनंत मनोहर ...Read more

ADAM
ADAM by RATNAKAR MATKARI Rating Star
DAINIK TARUN BHARAT 10-02-2019

रत्नाकर मतकरी शोध घेत आहेत. माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! ‘अ‍ॅड्म आणि इव्ह’ यांच्या न संपणाऱ्या गोष्टींचा. काळानुसार कथानकात बदल होत असला तरी प्रवृत्ती तीच आहे. स्त्रीचा नेमका कोणता गुण पुरुषांना आकर्षित करतो, ज्यासाठी ते शरणागती पत्करतात?... स्त्रीच्ा देहाचं आकर्षण, तिच्या विषयी वाटणारी वैषयीक भावना, तिच्यामधले कला गुण की तिची बुद्धिमत्ता? आपल्या ‘अ‍ॅड्म’ या कादंबरीत मराठीतील नामांकित साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या नाजूक विषयावर कुठेही बीभत्स न होता भाष्य केले आहे. ‘अ‍ॅड्म’ या कादंबरीचा नायक वरदाचा हा जीवनप्रवास! निव्वळ लैंगिक भावनांचा विचार केला, तर सुरुवातीचा प्रवास तरी बहुसंख्य पुरुषांचा सारखाच असतो. मुख्य म्हणजे लहानपणी स्त्री देहाविषयी वाटणारं कुतूहल काहीच्या बाबतीत मात्र पौंगंडावस्थेतच असमाधानी स्त्रीकडून वापरलं जाणं नशीबात असता. वरदाच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. उमलत्या वयात त्याला उफाड्याच्या नवनीतमचे आकर्षण वाटते. ही ओढ अतिशय नैसर्गिक आहे. नवीनतम तिशीची आहे. तिचे लग्न झालेले आहे. तिचा नवरा म्हातारा आहे. ती वरदाकडे घरकामाला असून कामक्रीडेत प्रवीण आहे. ती वरदाला प्रतिसाद देते आणि या खेळाचे शिक्षण देखील. वरदा तिला लग्न करशील का असे विचारतो तेव्हा ती उत्तर देते. ‘कामवालीशी कोणी लग्न करतात का?’ एकुणच अतृप्त स्त्रीच्या कामुकतेचे आणि ती पुरी करण्याकरता साधलेल्या संधीचे वास्तव चित्रण अ‍ॅड्म या कादंबरीत रत्नाकर मतकरींनी केले आहे. एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावरील ही कादंबरी मराठी साहित्य विश्वात एक नवा प्रवाह निर्माण करते आहे, हे निश्चित! – डी. व्ही. कुलकर्णी ...Read more