* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: UNDER THE BANYAN TREE AND OTHER STORIES
  • Availability : Available
  • Translators : NANDINI DESHMUKH
  • ISBN : 9789353173067
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :R. K. NARAYAN BIRTHDAY COMBO OFFER
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A DELIGHTFUL COLLECTION FROM INDIA`S FOREMOST STORYTELLER, UNDER THE BANYAN TREE ADDS TWENTY-EIGHT TALES OF THE RICH AND COLORFUL HERITAGE OF R K NARAYAN`S FICTIONAL SOUTH INDIAN CITY, MALGUDI. NARAYAN`S CHARACTERS, OBSERVED WITH A WRY AND COMPASSIONATE EYE, COME FROM EVERY AREA OF INDIAN SOCIETY - MERCHANTS, BEGGARS, HERDSMEN, HERMITS, TEACHERS, ROGUES - AND REPRESENT IN MINIATURE A WEALTH OF HUMAN EXPERIENCE. A REBELLIOUS YOUNG MAN REFUSES TO HONOUR A VOW MADE BY HIS PARENTS IN AN ANCESTRAL TEMPLE LONG AGO IN NITYA. A SHOPKEEPER IS MADE BANKRUPT BY A CHARMING STRANGER IN A CAREER. IN OTHER TALES, A SCHOOLTEACHER INDULGES FOR ONE TRAUMATIC DAY IN THE LUXURY OF TELLING THE TRUTH; A NERVOUS SMALL BOY, FORCED TO SLEEP ALONE TO PROVE HIS COURAGE, CATCHES A BURGLAR; A BROWBEATEN CLERK TRIUMPHS OVER HIS STARS, AND A GHOST IS LAID TO REST. OUTSTANDING IN THIS SUPERB BOOK IS THE MASTERPIECE A HORSE AND TWO GOATS, DRAWN FROM A COLLECTION NOW NO LONGER AVAILABLE, AND THE MARVELOUS TITLE STORY, ABOUT THE DIVINE GIFT OF STORYTELLING ITSELF. LIKE THE STORYTELLER IN UNDER THE BANYAN TREE, R K NARAYAN IS AN ENCHANTER, A WEAVER OF WORDS WHO KEEPS HIS AUDIENCE SPELLBOUND WITH THE RHYTHMS AND HAUNTING IMAGES OF HIS TALES. DRAWN FROM THE MARKET-PLACE, THE MOUNTAINSIDE, THE DUSTY STREET, THE RIVER BANK, THESE GENTLE, IRONIC, FINELY OBSERVED STORIES OF VILLAGE AND CITY LIFE DEMONSTRATE THE POWER OF FICTION AT ITS BEST
एक बंडखोर तरुण त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या लहानपणी पूर्वापार कुठल्यातरी देवळात जाऊन केलेला जुना नवस फेडण्याचा आदर करण्याऐवजी त्यांना नकार देतो... एक चलाख, चुणचुणीत दिसणारा तरुण मुलगा सगळ्यांवर छाप पडून विश्वास संपादन करतो आणि नंतर एका दुकानदाराचे दिवाळे काढतो... एक शिक्षक पालकांनी लाडावलेल्या लहान मुलाकडून अभ्यास करून घ्यायला येतो, पण तो मुलगा त्या शिक्षकाला अजिबात दाद न देता दुसऱ्याच गोष्टीत भरकटत ठेवतो...खुसखुशीत विनोदाची फोडणी असणाऱ्या आणि भोवतालाशी घट्ट वीण सांगणाऱ्या मालगुडीस्टाइल रम्य कथांचा संग्रह ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आरकेनारायण #अंडरदबनयनट्रीअँडअदर स्टोरीज #अनुवादनंदिनीदेशमुख #वडाच्याझाडाखालीआणि इतरगोष्टी #नित्या #एकघोडाआणिदोनबक ऱ्या #चिप्पी # गवतामधलासाप #नारळाचावास #अण्णामलाई #वडाच्याझाडाखाली #सैतानाचाश्वास # मुकासोबती # अनावश्यकबोलणे #दोडू #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक#UNDERTHEBANYANTREE&OTHERSTORIES #VADACHAZADAKHALIANIETHARGOSHTI #RKNARAYAN #NANDINIDESHMUKH #MUKASOBATI #ANNAMALAI #VADACHAZADAKHALI #CHIPPI #NITYA #EKGHODAANIDONBAKRYA #GAVTAMADHALASAAP #NARALACHAVASS #DODU #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarVijay Bhadane

    पुस्तक परिचय पुस्तक :- वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा लेखक ;- आर के नारायण अनुवाद:- नंदिनी देशमुख आर के लक्ष्मणांच्या प्रभावशाली कथा ! "मालगुडी डेज" या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे विख्यात कथालेखक आर के लक्ष्मण यांच्या "Under The Banyan Tee And Other Stories" या इंग्रजी पुस्तकाचा नंदिनी देशमुख यांनी केलेला मराठी अनुवाद "वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा हे पुस्तक वाचनात आले.28 कथांचा हा संग्रह वाचताना वाचक झपाटून जातो.आर के लक्ष्मण हे वेगळ्या धर्तीचे लेखक होते.आयुष्याच्या पूर्वार्धात रमताराम होउन ते इतस्ततः खुप भटकले. नदी,तलाव,बाजार,डोंगर दऱ्या,गर्दीची ठिकाणे इथे ते माणसांचे निरीक्षण करत.त्यांचे संवाद ऐकत,देवघेवीचे व्यवहार बघत. तिथे त्यांना कथासूत्र सापडे.म्हणून अनुभवाची विपुलता,समृद्धता त्यांच्या लिखाणात ठायी ठायी दृष्टीस पडते.साधीसरळ,संवादत्मक भाषाशैली,लयबद्धता यामुळेच त्यांच्या कथा मोहक,उत्कंठावर्धक,कसदार ठरतात. सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करतात.परिस्थितीने पिचलेली तरी तीच्याशी नेटाने संघर्ष करीत जगणारी,भोळीभाबडी दयाळू व सर्वच वर्गातील आहे.लेखकाला मनमुराद भटकंतीत,सहज निरिक्षणातुन आपले कथानायक,पात्रे व कथाबीज सापडतात. प्रस्तुत पुस्तक" वडाच्या झाडाखाली" याच्या अनुवादक नंदिनी देशमुख यांनी खुप मेहनत घेउन वाचकाहाती मौल्यवान कथासंग्रह सुपूर्द केला आहे. अनुवाद करताना आर.कें च्या भाषेच ओघवतेपण जपुन दाक्षिणात्य संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे. उत्तम अनुवादीका ही ओळख निर्माण केली आहे. या साऱ्याच कथामध्ये विषयातील वैविध्य,हलकेफुलकेपणा, विनोद,गांभीर्य असे वैशिष्ट्य आढळते.नित्या ही पहिलीच कथा आधुनिकता व पारंपारिकता या दोन विचारसरणींचा संघर्ष दर्शविते.आपल्या जुन्या तत्वावर श्रध्दा, विश्वास असलेले नित्याचे आईवडील मुलाच्या सुधारित विचारांशी टक्कर देता देता मेटाकुटीला येतात त्यांची बाजू घ्यावी तर हे असे का? त्याला काही पुरावा आहे का? असे तर्कशुद्ध बोलणारा नित्याही वाचकांची मने जिंकून घेतो.दोन पिढ्यातील विचारमूल्यांचा संघर्ष लेखकाने छान रंगविला आहे. अर्ध्या रुपयांची किंमत या कथेत शोषक व शोषित,लोभी व गरजु या दोन प्रवृत्तीच दर्शन घडते.तांदळाचा अमाप साठा करून ठेवलेला,पैसे ठेवण्यास जागा नसलेला सुबय्या हा तांदळाचा व्यापारी तांदुळा अभावी भुकेने तडफडत असलेल्या एका गरिबाला केवळ अर्धा रुपया चे तांदूळ नाखुषीनेच देत असताना गोडाऊन मध्ये तांदुळाची थप्पी अंगावर पडून मरून पडतो शेवटी करावे तसे भरावे लागते हे लेखकाने या कथेत दाखविले आहे.अशा कितीतरीं मनाच्या ठाव घेणाऱ्या कथा या संग्रहात आहे शेवटची शीर्षक कथा या कथासंग्रहाची कळसाध्याय ठरावी अशी आहे.नंबी या वरदानप्राप्त व्यक्तीला वार्धक्यात मात्र गावकऱ्यांना गोष्टी सांगता येत नाही.एकाकी ती शक्ती नाहीशी होते.लेखकाला त्यामधून हेच सुचवायचे आहे की कुठल्याही प्रथितयश कलावंतांला कुठे थांबावे याचे तारतम्य,भान हवे अन्यथा इतर कोणी त्यास थांब म्हणतील हे खुप वाईट ठरेल ! विजय रघुनाथ भदाणे 686 रविवार पेठ नाशिक 9552213340 ...Read more

  • Rating StarPriyanka Tupe

    निखळ निर्मळतेचा शोध ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह अनुवादित साहित्यातील एक मौल्यवान ठेवा आहे. प्रियांका तुपे priyanka.tupe@expressindia.com ‘स्वामी अँड फ्रेंड्स’, ‘मालगुडी डेज’अशा अजरामर कथामालिका लिहिणारे आर. के. नाराण हे भारतीय भाषांतील प्रभावशाली कथाकारांपैकी एक आहेत. ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह अनुवादित साहित्यातील एक मौल्यवान ठेवा आहे. या कथासंग्रहातील २८ कथा या काही दशकांपूर्वी लिहिलेल्या असल्या तरी सदाबहार आणि टवटवीत आहेत. भरपूर रंजन करणारी कथांमधली जिवंत पात्रं, खुमासदार शैलीतलं निवेदन, निखळ विनोद आणि दैनंदिन जगण्यातल्या गमतींसह टिपलेला विरोधाभास ही या कथांची ठळक वैशिष्टय़े आहेत. ‘नित्या’ ही यातील पहिलीच कथा आजच्या पिढीची वाटते. कथेचा नायक नित्या त्याच्या आई-वडिलांना प्रश्न विचारून भंडावून सोडतो. खरं तर नित्याच्या लहानपणी, त्याची प्रकृती सुधारण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी एक नवस केला होता. परंतु नित्या २० वर्षांचा झाला तरी नवस फेडणं काही शक्य झालं नव्हतं. त्यामुळे आता त्याचे आई-वडील नवस फेडण्याची तयारी करत होते. नवसासाठी एका टेकडीवरच्या देवळात नेऊन त्याचं मुंडण करावं लागणार होतं. नित्याला हे कळताच तो खट्टू झाला. मुंडण करणं त्याला मान्य नव्हतं. त्यावरून त्याने आई-वडिलांना भरपूर प्रश्न विचारले. आई-वडिलांसोबत देवळात जाणं टाळण्यासाठी त्यानं भरपूर क्लृप्त्या केल्या. नवसाची गोष्ट कळल्यावर नित्या काय काय करामती करतो, आई-वडिलांना कसा चकवा देतो, याची ही कथा! वरवर पाहता अत्यंत साधीशीच. परंतु नित्याच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीतून लेखकाला अधोरेखित करायचा आहे तो – विवेकवाद. कोणतीही गोष्ट केवळ ज्येष्ठांनी सांगितली म्हणून करण्यापेक्षा प्रश्न विचारणं, संवाद करणं, तर्कबुद्धीचा वापर करणं अशा कित्येक बाबींची सुरेख गुंफण कथाकार चटकदार संवाद नि हलक्याफुलक्या विनोदाच्या आधारे करतो. कोणतीही गोष्ट सरधोपटपणे स्वीकारण्याऐवजी, असं का? असे प्रश्न विचारण्याची नित्याची वृत्ती आणि खूप निरागसपणे या कथेतून समोर येते. माणसातला निरागसपणा, सहजता नारायण यांच्या सर्वच कथांमध्ये दिसते. या कथा म्हणजे बोधकथा नव्हेत, तरीही विचार-मूल्यांचा संघर्ष त्यात आहे. माणसांचे विविध मनोव्यापार त्यात सहजपणे येतात. नैतिक-अनैतिकतेच्या चौकटी ठरवण्यापेक्षा माणसाच्या दैनंदिन जीवनात काय घडतं, याची दृश्य चित्रणं यात केलेली आहेत. ‘अर्ध्या रुपयाची किंमत’सारखी कथा सुबय्या या धनदांडग्या तांदूळ विक्रेत्याच्या क्रूरपणावर भाष्य करते. अर्धा रुपया कमी आहे म्हणून अन्नान्नदशा झालेल्या एका व्यक्तीला तांदळांसाठी तिष्ठत ठेवणाऱ्या सुबय्याचा, त्याच तांदळाच्या गोदामात, धान्याच्या गोण्या अंगावर पडून होणारा मृत्यू चटका लावून जातो. नुकताच चाळिशीत पदार्पण केलेला रामा राव स्वत:च्या वाढदिवसाची खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारात जातो. पण घेतलेल्या नवीन कपडय़ांचे पैसे देताना त्याच्या लक्षात येतं, की त्याचं पाकीटच खिशात नाही. बहुतेक बसमधल्या गर्दीत पाकीट मारलं गेलं असावं, असा विचार करून तो निराशेनेच ते कपडे दुकानदाराला परत करतो. घरी जाण्यासाठी बसच्या तिकिटापुरतेही पैसे त्याच्याकडे उरत नाहीत, त्यामुळे त्याला चालत घरी जावं लागतं. दुसऱ्या दिवशी, सुटी घेतलेली असूनही तो कामावर हजर होतो. वाढदिवसाचा बेत सफल न झाल्याची घटना विसरून तो काम करू लागतो. सामान्य माणसाला, श्रमिक वर्गातील लोकांना साध्यासुध्या इच्छाही अनेकदा मारून टाकाव्या लागतात. जीवनाचा वेग, अभावग्रस्तता, असुरक्षितता यामुळे दु:ख करत बसणं त्यांना परवडत नाही. आनंद साजरा करणं आणि दु:ख करणं दोन्ही गोष्टी न परवडल्यानं कोटय़वधी सामान्य माणसं दररोज दिवस पुढे ढकलत राहतात. ती जिवंत असतात पण ‘जगत’ नाहीत. भांडवली जगातलं हे प्रखर वास्तव नारायण ‘चाळिशीतील फलप्राप्ती’ या कथेत अगदी सहजरीत्या सांगतात. संवेदनशीलपणे पाहिलेला भवताल उपहासगर्भ शैलीत रेखाटणं, माणसांच्या दैनंदिन जीवनातल्या साध्या प्रसंगांमधील अंतर्विरोध विनोदी शैलीत प्रकट करणं, ही नारायण यांच्या एकंदर सर्वच लघुकथांमध्ये आढळणारी लेखनशैली आहे. माणसांच्या वर्तनव्यवहारांचं बारकाईने केलेल निरीक्षण, अनुभवांना कथात्मकतेची जोड देण्याची अफाट क्षमता यामुळे नारायण यांच्या कथा प्रचंड वाचनीय आहेत. ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ या संग्रहातील कथांमधली पात्रं जितकी जिवंत, तितकंच रसरशीत वर्णन येतं ते यातल्या भौगोलिक प्रदेशांचं, प्राण्यांचं. कुत्रा, माकड, साप हे प्राणी या कथांमधून वेगळ्याप्रकारे भेटतात. दाक्षिणात्य समाज, तेथील भू-सांस्कृतिक प्रदेशांची वर्णनं निव्वळ वाचनीय आहेत. या कथांमधील अण्णामलाई, सुबय्या, रामा रावसारख्या व्यक्तिरेखा मनात घर करून राहतात. या कथा अनुवादित करताना त्यातलं ओघवतेपण अबाधित राखण्याचं मोठं आव्हान नंदिनी देशमुख यांनी यशस्वीरीत्या पेललं आहे. कथांमधील वर्णनं, संदर्भ दाक्षिणात्य संस्कृतीशी संबंधित असले तरीही ते परके वाटत नाहीत. उत्तम अनुवादानं ही किमया साधली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-01-2020

    ‘मालगुडी’च्या पुनर्भेटीचा प्रत्यय... काही वर्षांपूर्वी ‘दुरदर्शन’वर ‘मालगुडी डेज’ नावाची मालिका प्रसारित व्हायची. खासगी वाहिन्या, दैनंदिन मालिका नसलेल्या त्या काळात ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. दक्षिण भारतातल्या मालगुडी या काल्पनिक; पण समृद् गावातल्या साध्याभोळ्या लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या घटनांवरील कथांवर आधारित ही मालिका होती. प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांनी सन १९३५ मध्ये लिहिलेल्या या कथा मानवी स्वभाव, भावभावनांचं दर्शन घडवणाऱ्या आणि वास्तववादी असल्यानं प्रेक्षकांना भावल्या होत्या. आर. के. नारायण यांच्याच लेखणीतून साकारलेला ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा कथासंग्रह वाचताना ‘मालगुडी डेज’ची आठवण नक्कीच होते. या पुस्तकातल्या कथांनाही मालगुडी गाव आणि परिसराची पार्श्वभूमी लाभलेली आहे. कथेतली पात्रं साधीभोळी, काहीशी चित्रविचित्र स्वभावाची; पण तरीही आपलीशी वाटणारी आहेत. जगण्याची लढाई लढत असताना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर आधारित या कथा आहेत. कथांचं मूळ हे वैयक्तिक अनुभव, निरीक्षण आणि ऐकलेलं एखादं संभाषण यात असल्याचं लेखकानं प्रस्तावनेत म्हटलं आहे. या कथांमध्ये कुठंही मोठं नाट्य नाही, की धक्कादायक शेवट नाही... पण तरीही लेखकाची भाषा, ओघवती शैली यामुळे त्या गुंतवून ठेवतात. कथेतल्या पात्राच्या सुखदु:खाशी नकळतपणे वाचकाला जोडून घेतात. पुस्तकात एकूण २८ कथा आहेत. कथेतली पात्रं ही छोटी मुलं, तरुण, ज्येष्ठ अशी विविध वयोगटांतली आहेत, त्याचबरोबर शेतकरी, मेंढपाळ, व्यापारी, शिक्षक, पहारेकरी, मजूर, भिकारी अशी वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतली आहेत. एका कथेत तर कुत्रा हीच मुख्य व्यक्तिरेखा आहे. अंधश्रद्धेविरुद्ध बंड करणारा नित्या आहे, तसाच आत्महत्या करणाऱ्या मुलीला आपण त्यापासून परावृत्त करू शकलो, ही खंत बाळगणारा आणि अनेक वर्षांनंतर ती जिवंत असल्याचा साक्षात्कार झालेला पहारेकरी आहे. जातीय दंगलीत होरपळणारा मित्र आहे. शेखरला सत्य बोलण्याची किंमत चुकवावी लागते, तर अनावश्यक बोलणं टाळून शास्त्री वाईट ग्रहांवर विजय मिळवतो. पैशांच्या लालसेनं दुकानमालकाला फसवून देशोधडीला लावणाऱ्या रामूला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात, तर मालकाप्रती कर्तव्यदक्ष राहूनही शंकर चोरीच्या आरोपानं होरपळतो. एकटा झोपायला घाबरणारा छोटा स्वामी आणि पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणारा आठ वर्षांचा दोडू... या दोघांच्या कथांतून छोट्यांची मानसिकता दिसते. भाषेच्या गोंधळामुळे एका परदेशी व्यक्तीला गावातल्या घोड्याचा पुतळा विकणाऱ्या मुनीची कथा मजेशीर आहे. मुनी त्या व्यक्तीला दोन बकऱ्या विकत देतो, प्रत्यक्षात ती व्यक्ती घोड्याच्या पुतळ्याचा व्यवहार करून त्याला पैसे देते. बकऱ्या मुनीच्या मागं पुन्हा घरी येतात, तेव्हा त्याची पत्नी त्याच्यावर अविश्वास दाखवून चोरी केल्याचा संशय घेते. असाच संशय रंगाची पत्नीही घेते, जेव्हा तो एका श्रीमंत कुटुंबाला त्यांचा विहिरीत पडलेला मौल्यवान हंडा काढून देऊन पैसे मिळवतो. या दोन्ही कथांमध्ये नायक जास्त पैसे मिळवण्याचे स्वप्न पाहत असतो, त्याचवेळी त्यांच्या बायका मात्र अचानक धनप्राप्ती अशक्य आहे, असा वास्तववादी विचार करत असतात. मालगुडी शहराला ऐतिहासिक वारसा आहे, हे सिद्ध करण्याचा खटाटोप करणाऱ्या संशोधकाची कथाही मजेशीर आहे. चिप्पीची कथा प्राण्यांच्या भावभावनांचं दर्शन घडवते. मालकानं दुसरा छोटा कुत्रा आणला म्हणून चिडून हा चिप्पी घरातून निघून गेलेला असतो. मुका सामीच्या कथेतलं माकड त्याला अर्थार्जनासाठी मदत करत असतं. माकडाचे खेळ करून सामी पैसे मिळवतो; पण तेच माकड संधी मिळताच स्वत:ची सुटका करून घेऊन त्याला सोडून निघून जातं. डोळ्यांच्या ऑपरेशननंतर परिचारकाच्या मदतीनं परावलंबी जिणं लेखकाला जगावं लागतं. त्या दिवसांतले अनुभव लेखकानं ‘सैतानाचा श्वास’ कथेत लिहिले आहेत. बंगल्यावर अनेक वर्षं पहारेकरी, माळी म्हणून कामाला असलेल्या अण्णामलाईचं व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटलं आहे. शेवटची कथा आहे वडाच्या झाडाखाली गोष्ट सांगणाऱ्या म्हाताऱ्याची... थांबावं कधी आणि कुठं हे सांगणारी... साऱ्या कथा साध्याच; पण माणसाच्या स्वभावाचे कंगोरे टिपणाऱ्या, भोवतालच्या परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या, प्रसंगी उपरोधिक भाष्य करणाऱ्या... कथांचा काळ जुना आहे. तसे अनेक संदर्भ ओघानं येतात; पण तरीही ती कथा आजची, तितकीच ताजीतवानी वाटते. नंदिनी देशमुख यांनी अनुवाद करताना लेखकाची शब्दांची गुंफण आणि ओघवती शैली कायम ठेवल्यानं या कथा खिळवून ठेवतात. – नयना निर्गुण ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 26-01-2020

    निखळ निर्मळतेचा शोध… ‘स्वामी अँड फ्रेंड्स’, ‘मालगुडी डेज’अशा अजरामर कथामालिका लिहिणारे आर. के. नारायण हे भारतीय भाषांतील प्रभावशाली कथाकारांपैकी एक आहेत. ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह अनुवादित साहित्यातील एक मौल्यवान ठेवा आहे. या कथासंग्रहातील २८ कथा या काही दशकांपूर्वी लिहिलेल्या असल्या तरी सदाबहार आणि टवटवीत आहेत. भरपूर रंजन करणारी कथांमधली जिवंत पात्रं, खुमासदार शैलीतलं निवेदन, निखळ विनोद आणि दैनंदिन जगण्यातल्या गमतींसह टिपलेला विरोधाभास ही या कथांची ठळक वैशिष्टय़े आहेत. ‘नित्या’ ही यातील पहिलीच कथा आजच्या पिढीची वाटते. कथेचा नायक नित्या त्याच्या आई-वडिलांना प्रश्न विचारून भंडावून सोडतो. खरं तर नित्याच्या लहानपणी, त्याची प्रकृती सुधारण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी एक नवस केला होता. परंतु नित्या २० वर्षांचा झाला तरी नवस फेडणं काही शक्य झालं नव्हतं. त्यामुळे आता त्याचे आई-वडील नवस फेडण्याची तयारी करत होते. नवसासाठी एका टेकडीवरच्या देवळात नेऊन त्याचं मुंडण करावं लागणार होतं. नित्याला हे कळताच तो खट्टू झाला. मुंडण करणं त्याला मान्य नव्हतं. त्यावरून त्याने आई-वडिलांना भरपूर प्रश्न विचारले. आई-वडिलांसोबत देवळात जाणं टाळण्यासाठी त्यानं भरपूर क्लृप्त्या केल्या. नवसाची गोष्ट कळल्यावर नित्या काय काय करामती करतो, आई-वडिलांना कसा चकवा देतो, याची ही कथा! वरवर पाहता अत्यंत साधीशीच. परंतु नित्याच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीतून लेखकाला अधोरेखित करायचा आहे तो – विवेकवाद. कोणतीही गोष्ट केवळ ज्येष्ठांनी सांगितली म्हणून करण्यापेक्षा प्रश्न विचारणं, संवाद करणं, तर्कबुद्धीचा वापर करणं अशा कित्येक बाबींची सुरेख गुंफण कथाकार चटकदार संवाद नि हलक्याफुलक्या विनोदाच्या आधारे करतो. कोणतीही गोष्ट सरधोपटपणे स्वीकारण्याऐवजी, असं का? असे प्रश्न विचारण्याची नित्याची वृत्ती आणि खूप निरागसपणे या कथेतून समोर येते. माणसातला निरागसपणा, सहजता नारायण यांच्या सर्वच कथांमध्ये दिसते. या कथा म्हणजे बोधकथा नव्हेत, तरीही विचार-मूल्यांचा संघर्ष त्यात आहे. माणसांचे विविध मनोव्यापार त्यात सहजपणे येतात. नैतिक-अनैतिकतेच्या चौकटी ठरवण्यापेक्षा माणसाच्या दैनंदिन जीवनात काय घडतं, याची दृश्य चित्रणं यात केलेली आहेत. ‘अर्ध्या रुपयाची किंमत’सारखी कथा सुबय्या या धनदांडग्या तांदूळ विक्रेत्याच्या क्रूरपणावर भाष्य करते. अर्धा रुपया कमी आहे म्हणून अन्नान्नदशा झालेल्या एका व्यक्तीला तांदळांसाठी तिष्ठत ठेवणाऱ्या सुबय्याचा, त्याच तांदळाच्या गोदामात, धान्याच्या गोण्या अंगावर पडून होणारा मृत्यू चटका लावून जातो. नुकताच चाळिशीत पदार्पण केलेला रामा राव स्वत:च्या वाढदिवसाची खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारात जातो. पण घेतलेल्या नवीन कपडय़ांचे पैसे देताना त्याच्या लक्षात येतं, की त्याचं पाकीटच खिशात नाही. बहुतेक बसमधल्या गर्दीत पाकीट मारलं गेलं असावं, असा विचार करून तो निराशेनेच ते कपडे दुकानदाराला परत करतो. घरी जाण्यासाठी बसच्या तिकिटापुरतेही पैसे त्याच्याकडे उरत नाहीत, त्यामुळे त्याला चालत घरी जावं लागतं. दुसऱ्या दिवशी, सुटी घेतलेली असूनही तो कामावर हजर होतो. वाढदिवसाचा बेत सफल न झाल्याची घटना विसरून तो काम करू लागतो. सामान्य माणसाला, श्रमिक वर्गातील लोकांना साध्यासुध्या इच्छाही अनेकदा मारून टाकाव्या लागतात. जीवनाचा वेग, अभावग्रस्तता, असुरक्षितता यामुळे दु:ख करत बसणं त्यांना परवडत नाही. आनंद साजरा करणं आणि दु:ख करणं दोन्ही गोष्टी न परवडल्यानं कोटय़वधी सामान्य माणसं दररोज दिवस पुढे ढकलत राहतात. ती जिवंत असतात पण ‘जगत’ नाहीत. भांडवली जगातलं हे प्रखर वास्तव नारायण ‘चाळिशीतील फलप्राप्ती’ या कथेत अगदी सहजरीत्या सांगतात. संवेदनशीलपणे पाहिलेला भवताल उपहासगर्भ शैलीत रेखाटणं, माणसांच्या दैनंदिन जीवनातल्या साध्या प्रसंगांमधील अंतर्विरोध विनोदी शैलीत प्रकट करणं, ही नारायण यांच्या एकंदर सर्वच लघुकथांमध्ये आढळणारी लेखनशैली आहे. माणसांच्या वर्तनव्यवहारांचं बारकाईने केलेल निरीक्षण, अनुभवांना कथात्मकतेची जोड देण्याची अफाट क्षमता यामुळे नारायण यांच्या कथा प्रचंड वाचनीय आहेत. ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ या संग्रहातील कथांमधली पात्रं जितकी जिवंत, तितकंच रसरशीत वर्णन येतं ते यातल्या भौगोलिक प्रदेशांचं, प्राण्यांचं. कुत्रा, माकड, साप हे प्राणी या कथांमधून वेगळ्याप्रकारे भेटतात. दाक्षिणात्य समाज, तेथील भू-सांस्कृतिक प्रदेशांची वर्णनं निव्वळ वाचनीय आहेत. या कथांमधील अण्णामलाई, सुबय्या, रामा रावसारख्या व्यक्तिरेखा मनात घर करून राहतात. या कथा अनुवादित करताना त्यातलं ओघवतेपण अबाधित राखण्याचं मोठं आव्हान नंदिनी देशमुख यांनी यशस्वीरीत्या पेललं आहे. कथांमधील वर्णनं, संदर्भ दाक्षिणात्य संस्कृतीशी संबंधित असले तरीही ते परके वाटत नाहीत. उत्तम अनुवादानं ही किमया साधली आहे. -प्रियांका तुपे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more